खूशखबूर… खूशखबर… जळगावच्या सूवर्णनगरीत सोनं 3 हजारांनी स्वस्त

देशाच्या अर्थसंकल्पात सोन्या आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्क्यांनी कमी केल्याची घोषणा झाल्यामुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्या-चांदीचे दर घरसले आहेत. केंद्र सरकारने सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खूशखबूर... खूशखबर... जळगावच्या सूवर्णनगरीत सोनं 3 हजारांनी स्वस्त
सोने-चांदीचे दर
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 7:13 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या सीमा शुल्कात मोठी घट केली आहे. केंद्र सरकारने 15 टक्क्यांवर असलेले सीमा शुल्क 6 टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे आजपासूनच सोने-चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोने-चांदीचे सीमा शुल्क कमी झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फायदा आणि दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे देशाच्या अर्थसंकल्पात सोन्या आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्क्यांनी कमी केल्याची घोषणा झाल्यामुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्या-चांदीचे दर घरसले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 3 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरातही 3 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर 73 हजार रुपयांवरून 70 हजार रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर हे 90 हजार रुपयांवरून 87 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात चढ-उतार होत असल्याने सराफ व्यावसायिक तसेच ग्राहक संभ्रमात होते. मात्र आता तब्बल 3 हजार रुपयांनी सोन्याने आणि चांदीचे दर कमी झाल्यामुळे त्याचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आगामी काळात सण-उत्सव असल्याने सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. देशाचा अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याची घोषणा झाल्याने त्याचा जळगावच्या सराफ बाजारात परिणाम झाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडून आनंद व्यक्त केला जातोय.

जळगावच्या सराफ बाजारात गर्दी उसळली

सोन्या-चांदीचे दर तब्बल तीन हजारांनी घसरल्यानंतर जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली आहे. देशाच्या अर्थसंकल्पात दागिन्यांवरील कस्टम ड्युटी सहा टक्क्यांनी कमी झाल्यानंतर जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दर तब्बल तीन हजार रुपयांनी घसरले. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याच्या बातमीनंतर जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीचे दागिने खरेदीसाठी ग्राहकांची झाली गर्दी. गेल्या एक ते दीड महिन्यानंतर तब्बल 3 हजार रुपयांनी सोन्या चांदीचे दर घसरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल तीन हजार रुपयांनी दर घसरल्यामुळे मोठा आनंद होत असल्याच्या भावना महिला ग्राहकांनी व्यक्त केल्या.

गेल्या काही दिवसांपासून बजेटमध्ये नसलेलं सोनं आता बजेटमध्ये आल्याने सोनं खरेदी करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली. सोन्या चांदीचे भाव पुन्हा वाढण्याची शंका असल्यामुळे ग्राहकांनी आज दर घसरताच सोनं खरेदीसाठी सराफाच्या दुकानांमध्ये गर्दी केली. सोन्याच्या भावात चढ-उतार होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट असलेल्या जळगावच्या सराफ बाजारांमध्ये तासाभरात ग्राहकांची मोठी गर्दी झाली.

मुंबईत 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर किती?

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर काल प्रती 10 ग्रॅम किंवा 1 तोळे सोन्याचा दर हा 67 हजार 700 रुपये इतका होता. पण आता हाच दर 64 हजार 950 रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे मुंबईत काल 1 ग्रॅम सोन्याचा दर हा 6770 रुपये इतका होता. पण आज तोच दर 6495 रुपये इतका झाला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर हा कालपर्यंत 7385 रुपये प्रतीग्रॅम होता. तोच दर आझ 7086 वर आला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा कालचा दर हा 73,850 इतका होता. आता तोच दर 70,860 वर आला आहे. जवळपास 2990 रुपयांची घसरण झालेली बघायला मिळत आहे.

गोंदियात सोन्याचे दर किती?

गोंदिया जिल्ह्यात काल 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतीतोळे 73 हजार 300 रुपये होते. यानंतर केंद्र शासनाने बजेट सादर केल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात आज सोन्याचा भाव प्रतीतोळे 69 हजार 400 रुपये आहे. या दरात तब्बल 3900 रुपयांची घट झाली आहे. तसेच चांदी काल 89 हजार 900 रुपये किलो होतं. तोच दर आज बजेट सादर केल्यानंतर 85 हजार 500 रुपयांपर्यंत घटला आहे. चांदीवर एक किलो मागे 4400 रुपयांची घसरण झाली आहे.

दिल्लीत 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर किती?

देशाची राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर हा काल 1 ग्रॅम सोने हे 6785 रुपये इतकं होतं. पण त्याची किंमत आज 6510 इतकी झाली आहे. तर 1 तोळे सोन्याची किंमत ही 67,850 इतकी होती, तीच किंमत आज 65,100 रुपयांवर आली आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा काल प्रती तोळे 74 हजार रुपये इतका होता. हाच दर आज 71,010 वर आला आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.