जळगावः इंदोरहून अमळनेरला येणाऱ्या बस अपघातात अद्याप 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील धार इथं बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुलावरून ही बस थेट नर्मदा नदीत कोसळली. बसमध्ये जवळपास 55 प्रवासी होते. जळगाव जिल्हा आणि धार येथील स्थानिक प्रशासनातर्फे बसमधील प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेत अनेक जण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी 10 जणांची ओळख पटली आहे. बस नदीत कोसळल्यानंतर काही जण पोहत नदीच्या किनारी आले तर काहीजण खडकांचा आधार घेत तिथेच थांबून राहिले. प्रशासनातर्फे या प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
(टीप- मृतांच्या नावांची यादी प्राथमिक माहितीनुसार देण्यात आली आहे. मृतांच्या सामानातील आधार कार्डावरून काही नावे देण्यात आली आहेत. लवकरच पुढील नावांची खात्री होईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.)
– जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193
– घटनास्थळी मदतीसाठी – 09555899091.
-एसटी महामंडळाचा संपर्कक्रमांक 022/23023940
Bus No MH40N9848
चालक- चंद्रकांत एकनाथ पाटील 18603
वाहक – प्रकाश श्रावण चौधरी 8755
मार्ग – इंदोर – अमळनेर
इंदोर हून सुटण्याची वेळ – 7:30
अपघाताचे ठिकाण – खलघाट अणि ठीगरी मध्ये नर्मदा पुलावर
मुख्यमंत्री यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2022
बस नदीत कोसळल्यानंतर 15 ते 20 जण वाहून गेल्याचं सांगितलं जातंय. तर काहीजण पोहत पोहत किनाऱ्यावर पोहोचले. काहींना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. या बसमध्ये जवळपास 55 प्रवासी होते. अजूनही दरीत कोसळलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, नर्मदा नदीवरील पुलाची रेलिंग ओलांडताना ही दुर्घटना घडली. पुलावरून कोसळल्यानंतर ही बस नदी लगतच्या खडकावर कोसळून परत नदीत पडली. या विचित्र अपघातामुळे अनेक जण जखमी झाले. यात बसचा चक्काचूर झाला. अपघातातून बचावलेले प्रवासी जवळपासच्या खडकांचा आधार घेत प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत होते. तर काहीजण पोहत किनाऱ्यापाशी पोहोचले. या घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याचा आकडा बचावकार्य पूर्ण झाल्यावरच समोर येईल. तोपर्यंत नागरिकांनी बचावकार्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.