Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावच्या 3 विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू, मृतदेह भारतात पाठवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु, नेमकं काय घडलं?

जळगावच्या तीन विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तीनही मृत विद्यार्थी रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील नॉबबोर्ड या विद्यापीठाचे वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 4 जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्ग जवळ असलेल्या वॉलखोप या नदीत पाय घसरून तीनही जण बुडाल्याची माहिती आहे.

जळगावच्या 3 विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू, मृतदेह भारतात पाठवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु, नेमकं काय घडलं?
जळगावच्या 4 विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 9:27 PM

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : रशिया देशातील सेंट पीटर्सबर्ग नजीक नदीत जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी आहेत. तर तिसरा विद्यार्थी भडगाव येथील असल्याची माहिती आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. मृत विद्यार्थी रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील नॉबबोर्ड या विद्यापीठाचे वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 4 जून रोजी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्ग जवळ असलेल्या वॉलखोप या नदीत पाय घसरून तीनही जण बुडाल्याची माहिती आहे.

जिया फिरोज पिंजारी, जी शान अशपाक पिंजारी आणि हर्षल देसले अशी जळगाव जिल्ह्यातील मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघांपैकी हर्षल देसले या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून इतर विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

रशिया येथील प्रशासन आणि पोलीस यांच्यावतीने भारतीय दूतावासाला या घटनेबाबत कळविण्यात आलं आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती कळवून मयत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला आहे. चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूने जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी रशियाची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.

pinjari famiky

पिंजारी कुटुंबिय, अमळनेर

नेमकं काय घडलं?

यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव ( आय.एफ.एस ) यांच्याशी संपर्क करून सर्व सर्व माहिती जाणून घेतली. तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हर्षल अनंतराव देसले (भडगाव) , जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) येथील विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचे सहअध्यायी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी ही शोकांतिका अपघाती आणि अनपेक्षित घडल्याचे कळते.

pinjari

दोन्ही मयत जिशान अश्पाक पिंजारी आणि जिया फिरोज पिंजारी

सध्या रशियन फेडरेशनमधील सर्व संबंधित एजन्सीं पुढील कार्यवाही करत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. भारतीय दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती जाणून घेतल्याचे सांगितले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. पालकांना पूर्ण ते सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतावासच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.