आणखी एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! प्रवासी साखर झोपेत असताना घडला अनर्थ
ओव्हरटेकिंगचा जीवघेणा नाद! जालना औरंगाबाद रोडवर खासगी बसचा भीषण अपघात
संजय सरोदे, TV9 मराठी, जालना : जालना औरंगाबाद रोडवर (Jalana Accident) एका खासगी बसचा भीषण अपघात (Private Bus Acccident) झाला. भरधाव बस पहाटेच्या सुमारास रस्त्यावर उलटली. ओव्हरटेकिंग करताना बस अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 7 प्रवासी जखमी झालेत. पुण्याहून रिसोडकडे (Pune-Risod Accident) खासगी ट्रॅव्हल्स बस जात होती. बालाची ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बालाजी ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाला.
काळ आला होता, पण…
या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसचं मोठं नुकसान झालं आहे. 7 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर थोडक्यात बचावल्यानं बसमधील इतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.
पाहा लाईव्ह घडामोडी : Video
कशामुळे अपघात?
ओव्हरटेक करत असताना भरधाव वेगात असलेली खासगी बस रस्त्यावरील डिव्हायडरच्या कठड्यावर आदळली. कठड्यावर आदळताना बसचा वेग प्रचंड होता. त्यामुळे ही बस रस्त्यावरच उलटली. या अपघातामुळे रस्त्यावरील एक बाजू पूर्णपणे ब्लॉक झाली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीदेखील झाली. या अपघातात बसचंही मोठं नुकसान झालं.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. तसंच क्रेनच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्त बस रस्त्यावरुन बाजूला केली.
या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा नोंदवलाय. पुढील तपास केला जातोय.
नाशिकमध्ये झालेल्या खासगी बस अपघातातील दुर्घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित झाले होते. त्यानंतर खासगी बसने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्याही मनात भीती निर्माण झाली होती. दरम्यान, आता जालना-औरंगाबाद रोडवर झालेल्या अपघातानेही प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.