जालना जिल्ह्यात महाविकास आघाडी की महायुती? कुणाचं पारडं जड? ज्येष्ठ पत्रकारांनी वर्तवली भविष्यवाणी

ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांनी जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण केले आहे. जालनामध्ये महिला मतदानाचा वाढलेला टक्का, खोतकर-गोरंट्याल यांच्यातील लढत, आणि दानवे यांच्यावर असलेली अँटी-इनकम्बन्सी लाट यावर चर्चा आहे.

जालना जिल्ह्यात महाविकास आघाडी की महायुती? कुणाचं पारडं जड? ज्येष्ठ पत्रकारांनी वर्तवली भविष्यवाणी
जालना जिल्ह्यात महाविकास आघाडी की महायुती? कुणाचं पारडं जड? ज्येष्ठ पत्रकारांनी वर्तवली भविष्यवाणी
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 6:52 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी जालना जिल्ह्यात कोण बाजू मारु शकतं, किंवा कुणाच्या जास्त जागा निवडून येऊ शकतात? याबाबत ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांनी विश्लेषण केलं आहे. “मतदानाचा टक्का आणि त्यातही महिलांच्या मतदानाचा वाढलेला टक्का महायुतीकडे झुकतो की, महाविकास आघाडीकडे? याची सध्या जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा आहे. जालना विधानसभेमध्ये खोतकर विरुद्ध गोरंट्याल या लढतीमध्ये, ग्रामीण भागात शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांना प्रतिसाद जास्त आहे, तर शहरामध्ये काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आणि खोतकर बरोबरीत आहेत. भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे विरोधात असलेली अँटी इनकम्बन्सी लाट सरली आहे, आणि त्याचा फायदा भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांना होऊ शकतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल”, असं ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर म्हणाले.

“बदनापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बबलू चौधरी यांना सहानुभूतीची लाट आहे. तर भाजपचे आमदार नारायण कुचे यांना त्यांचे व्यक्तिगत संबंध या मतदारसंघात उपयोगी पडतील. परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार सुरेश कुमार जेथलिया अल्पसंख्यांक समाजाचे किती मते घेतात, यावर बबनराव लोणीकर यांचे भविष्य अवलंबून आहे”, अशी प्रतिक्रिया पत्रकार सुरेश केसापूरकर यांनी दिली.

“घनसावंगी मतदारसंघामध्ये राजेश टोपे यांच्या विरोधातील मतदानाचे विभाजन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र असल्यामुळे, राजेश टोपे यांना जरांगेच्या आंदोलनाचा आणि कार्यकर्त्यांचा किती फायदा होतो? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल”, अशी प्रतिक्रिया सुरेश केसापूरकर यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

अकोल्यात काय होणार?

अकोला जिल्ह्यात महायुतीला 3 ते 4 जागांवर यश मिळू शकणारा आहे. तर महाविकास आघाडीला 1 ते 2 जागांवर यश मिळू शकतं, असा स्थानिक पत्रकारांचा अंदाज आहे. दुसरीकडे मुस्लिम आणि दलित मतं निर्णय ठरू शकणार. त्यात वाढलेल्या मतांची टक्केवारी वंचितला मूर्तिजापूर आणि बाळापूरमध्ये फायदेशीर ठरू शकते, असंही म्हटलं जात आहे. मात्र सद्यस्थितीत अकोल्यात 5 पैकी 4 जागांवर भाजपचं वर्चस्व आणि एका जागेवर ठाकरे गटाचे आमदार आहेत. दरम्यान भाजप चार जागांवरून तीन जागांवर जाऊ शकतो, असाही स्थानिक पत्रकारांचा अंदाज आहे.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.