शरद पवार आणि उदयनराजे जालन्यात एकाच मंचावर; मराठा आरक्षण प्रश्नी एकत्र येणार?; बॉडी लँग्वेज काय सांगते?

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात शरद पवार आणि उदयनराजे समोरासमोर आलेले बघायला मिळाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी उदयनराजे आधी अंतरवाली गावात दाखल झाले. त्यानंतर शरद पवार तिथे आले.

शरद पवार आणि उदयनराजे जालन्यात एकाच मंचावर; मराठा आरक्षण प्रश्नी एकत्र येणार?; बॉडी लँग्वेज काय सांगते?
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 3:43 PM

जालना| 2 सप्टेंबर 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी काय-काय घडलं याविषयी माहिती दिली. त्यांनी उदयनराजे यांची आपल्याकडे विचारपूस करायला आल्याबद्दल आभार मानले. तसेच उदयनराजे यांनी सांगितलं तर आपण आताच उपोषण सोडून घरी जायला तयार आहोत, असं मनोज जरांगे म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी एक अनोखी घटना घडली. उदयनराजे मनोज जरांगे यांच्यासोबत मंचावर बसलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील तिथे दाखल झाले.

उदयनराजे काय म्हणाले?

हे बघ तुझं कुटुंब आहे, तुला काही झालं तर त्यांना जास्त भोगावं लागेल. या गोष्टी चर्चेतून सुटणाऱ्या आहेत, असं उदयनराजेंनी यावेळी मनोज यांना सांगितलं. त्यानंतर राजे तुम्ही सांगितलं तर मी आता घरी जायला तयार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

आपली अंतरवालीतील माता रक्तबंबाळ झाली. ही घटना वाऱ्यासारखी राज्यात पसरली. आपल्या मदतीला आख्खा महाराष्ट्र उभा राहिला. तुम्हाला मी याआधीच सांगितलं होतं. आज आपलं रक्त सांडलं आहे. आपल्या भेटीसाठी आपले सर्व बांधव येतील. मी राजेंना सर्व सांगतो. राजे बोलतील तीच पूर्वदिशा. सर्व 14 कोटी नागरीक राजेंचा शब्द ऐकतात.

आम्ही आरक्षणाचा लढा सुरु केला. राजेंसारखे लोकांचे पाय आपल्या गोधा पट्ट्याला लागले हे आपलं मोठं भाग्य आहे. मराठ्यांनी चलबिचल व्हायचं नाही. निडर वागायचं. आम्ही २९ तारखेला आंदोलन सुरु केलं. आमची सरकारशी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उच्च स्तरीय समिती गठीत करतो असं सांगितलं. मे महिन्यात समिती गठीत झाली. राजेसाहेब तीन महिन्यात अहवाल देण्यास सांगितलं.

29 ऑगस्टला समितीचा कार्यकाळ संपला. समिती बाहेर आली नाही. काम केलं नाही. म्हणून लाखो लोकांचं आंदोलन सुरु झालं. मी कायदा आणि लोकशाही सोडून आंदोलन केला. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी फोन केला. ते म्हणाले, आता का उपोषणाला बसले. मी सांगितलं, समितीने अहवाल दिला नाही. आरक्षण कसं देणार? पूर्ण गाव ऐकत होते. ते म्हणाले, आरक्षणावर मार्ग काढतो. त्यानंतर दोन दिवसांनी १ हजार एसआरएफ पोलिसांचा फौजफाटा पाठवला. ते गावकऱ्यांशी बोलून गेले. राजे मी थूंकही गिळत नाही. त्यांनी सांगितलं, पाणी प्या. एसपीनी आणि गावकऱ्यांनी आवाहन केलं की पाणी प्या. म्हणून मी पाणी पिलं. कलेक्टर बोलले मॉब जमवणं सोपं आहे, मी मॉब परत पाठवला.

शरद पवार काय म्हणाले?

राज्यातील मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय केला. त्यांच्याशी बोलणं झालं. एका ठराविक दिवसात प्रश्नांची तड लावण्याचं ठरलं. काही चर्चा झाली. आश्वासने दिली. दुर्देवाने जे काही ठरलं होतं त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मनोजने निर्णय घेतला आपण समाजासाठी पडेल ती किंमत द्यायची आणि त्यासाठी उपोषणाचा कार्यक्रम घेतला. आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मी काल सर्व माहिती घेतली. मनोज आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करायला पोलीस आले. त्यांनी बोलणी केली.

एका बाजूला चर्चा सुरू केली आणि दुसऱ्या बाजूने पोलीस मोठ्या संख्येने आणल्या गेले. चर्चा चालू आहे. आणि चर्चा चालू असताना एका बाजूने बळाचा वापर करून काही लोकांवर लाठी हल्ला केला. बळाचा वापर केला. एवढंच नाही तर हवेत गोळीबार केला. त्याशिवाय अलिकडच्या काळात बंदुकीतून छर्रे वापरतात. त्या छर्यांचा मारा केला. मी रुग्णालयात गेलो. काही लोक असे होते त्यांच्या अंगावर छर्रे मारले गेले. छोट्या छोट्या गोळ्या मारल्या गेल्या.

प्रश्न समजून घेण्यासाठी लोकशाहीत अधिकार असतो. आंदोलनात कोणताही कायदा हातात घेतला नाही. कोणताही दंगा केला नाही. असं असताना पोलीस बळाचा वापर करणं योग्य नाही. त्याची आवश्यकता नव्हती. हे सर्व माहीत असतानाही बळाचा वापर केला गेला. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने शांततेने मागण्यासाठी कार्यक्रम सुरू होता त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे.

आज संबंध देशात एक वेगळं चित्र आहे. देशात काही ठिकाणी, काही राज्यात सवलती दिल्या आहेत. तिथे सवलती दिल्या आहेत, त्यापेक्षा काही वेगळी मागणी नाही. तुमची जी मागणी आहे, त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. मागच्या सरकारने निर्णय घेतला. त्यानंतर काही लोकांनी कोर्टात जाऊन स्थगिती दिली. त्यामुळे हा निर्णय झाला नाही.

उदयनराजे काय म्हणाले?

हा जो अनुचित प्रकार घडला त्यासंबंधी चौकशी होईल. लाठीचार्ज करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. मराठा आंदोलकांना आरक्षण मिळायला हवं. खरंतर हे फार वर्षांपूर्वी व्हायला होतं. ज्यावेळेस अशाप्रकारचा अन्याय होतो त्यावेळेस उद्रेक होणं स्वभाविक आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, आपल्या शांततेत आंदोलन करायचं आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल माझी भेट झाली. या दोन-तीन दिवसातच चर्चा करुन लवकरात लवकर आंदोलकांची भेट घालून देऊ. एक-दोन नाही तर 57 महामार्चा झाले पण कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पण त्याचा असा अर्थ नाही की मराठा समाज सहन करतो म्हणून प्रतिक्षा करावी. इतर समाजाला न्याय, मग मराठा समाजाला न्याय का नाही? मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं गेलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.