OBC Reservation: 11 लाखांची ताकद रस्त्यावर उतरली असती तर… जितेंद्र आव्हाडांची नेमकी खंत काय?
महाराष्ट्रात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे हा समाज पुन्हा एकदा प्रवाहातून कोसो दूर फेकला जाईल, अशी खंत गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
मुंबईः महाराष्ट्रात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे हा समाज पुन्हा एकदा प्रवाहातून कोसो दूर फेकला जाईल, अशी खंत गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील स्थानिक पातळीपासून विधानसभेपर्यंतच्या अशा एकूण 11 लाख लोकप्रतिनिधींना पद गमवावे लागले, या आशयाचे ट्विट केले. यासंबंधीची सविस्तर भूमिका त्यांनी टीव्ही9 वरील मुलाखतीत मांडली.
देशभारत #OBC राजकीय आरक्षण रद्द झाले 11 lakh लोक प्रतिनिधीनी आपली पद गमावली राजकीय आरक्षण गेल्या मुळे #OBC मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला जाईल हीच 11लाखानची ताकद रस्त्यावर उतरली असती तर नवीन इतिहास लिहला गेला असता अजून वेळ गेलेली नाही चला एक होऊया……#OBCreservation
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2022
जगात आरक्षण, मग भारतात लाज का वाटते?
11 लाख लोकप्रतिनिधींची ताकद रस्त्यावर उतरायला पाहिजे. पण तो एक येत नाही, अशी खंत व्यक्त करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, वंचित समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी राजकीय आरक्षण दिले जाते. निर्यण प्रक्रियेतच त्यांना अधिकार नाही दिला तर तो पुन्हा वंचित राहतो. पूर्वीचा इतिहास तो कधीच पुसू शकत नाही. संपूर्ण युरोपमध्ये अफरमेटिव्ह अॅक्शनमध्ये रिझर्व्हेश आहे. तिथे एलजीबीटी, महिलांना, वर्णद्वेशींना रिझर्वेहशन आहे. जगभरात रिझर्वेशन आहे. दुर्दैवाने याबद्दल आपण कधी बोललोच नाही म्हणून कळलंच नाही. ओबीसी हा गावकुसाबाहेबर गेलेला मोठा समूह आहे. धनगर ,माळी, वंझारी, तेली, कुणबी एवढ्या पाचच जाती माहिती आहेत. पण त्यात आणखी बऱ्याच जाती आहेत. त्यात कैकाडी, कलाल, भंडारी कोळी, आगरी, गावागावात वेगवेगळ्या जाती समूहांचा संच आहे.
11 लाख लोकप्रतिनिधींनी पदं गमावली
इतिहासात सोशितांवर अन्याय झआला. ओबीसींमध्ये लोहार, न्हावी, शिंपी अशा 352 जाती आहेत. लोकसंख्या पहायला गेलं तर असे 50 टक्क्यांपेक्षा जास्त निघतील. मंडल आयोगाने आरक्षण दिले म्हणून आज 11 लाख लोकप्रतिनिधी आपापल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत होते. पण राजकीय आरक्षणच काढलं तर याचे परिणाम काय होतील?
बिहारमध्ये आरक्षण आहे, म्हणून सत्ता टिकून
बिहारमध्ये सर्व ओबीसी एकत्र आहेत. राजकीय आरक्षण आहे, म्हणून तेथे ओबीसींची चळवळ टिकून आहे. महाराष्ट्रात मुंडे, भुजबळ साहेबांनी रान उठवलं म्हणून, पवार साहेब आहेत म्हणून ओबीसी चळवळ थोडी तरी टिकून आहे. आता राजकीय आरक्षणच रद्द केलं तर काय परिणाम होतील?
ट्विटरमधूनही व्यक्त केली खंत
काल 5 जानेवारी रोजी जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत एक ट्विट केले. त्यात त्यांनी लिहिले, देशभारत #OBC राजकीय आरक्षण रद्द झाले. 11 lakh लोक प्रतिनिधीनी आपली पद गमावली राजकीय आरक्षण गेल्या मुळे #OBC मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला जाईल . हीच 11लाखांची ताकद रस्त्यावर उतरली असती, तर नवीन इतिहास लिहला गेला असता. अजून वेळ गेलेली नाही, एकत्र येऊया, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले.
इतर बातम्या-