अखेर पत्रीपुलाचा गर्डर बसविण्यासाठी मुहूर्त मिळाला, 21 आणि 22 नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर चार तासांचा मेगाब्लॉक

येत्या 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी पत्रीपुलाचा गर्डर बसविण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे (Kalyan Patripul girder to be installed on November 21).

अखेर पत्रीपुलाचा गर्डर बसविण्यासाठी मुहूर्त मिळाला, 21 आणि 22 नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर चार तासांचा मेगाब्लॉक
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 10:52 AM

ठाणे : कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपुलाचं गेल्या दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून काम सुरु आहे. मात्र, अजूनही पत्रीपुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता कल्याणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पत्रीपुलाचा गर्डर बसविण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळाला. येत्या 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी पत्रीपुलाचा गर्डर बसविण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे (Kalyan Patripul girder to be installed on November 21).

कल्याणच्या पत्रीपुलासाठी 700 मेट्रीक टनाचा गर्डर तयार करण्यात आला आहे. हा गर्डर बसविण्याच्या कामासाठी 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. याबाबत मुंबई येथील रेल्वेच्या जीएम कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला रेल्वेचे डीआरएम उपस्थित होते (Kalyan Patripul girder to be installed on November 21).

पूलाचे गर्डर हैद्राबाद येथील कंपनीत तयार करण्यात आले असून ते कल्याणला आणले आहे. हा गर्डर बसविण्यासाठी मोठ्या क्रेनचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी रेल्वेला ब्लाक घ्यावा लागणार आहे. रेल्वेच्या सुरक्षा आयु्क्तांनी गर्डर ठेवण्याच्या कामाला एनओसी दिली आहे. त्यामुळे या पूलाचा गर्डर 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी बसविला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी 4 तासाचा रेल्वे ब्लॉक घेतला जाणार आहे.

पत्रीपूल हा वाहतूकीसाठी धोकादायक झाल्याने 2018 मध्ये हा पूल पाडण्यात आला होता. हा पूल ब्रिटीश कालीन होता. कल्याण रेल्वे मार्गावर हा पूल असल्याने कल्याण शीळ मार्गाला जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. हा पूल मार्गी लावण्यासाठी खासदारांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. या पूलाचा कामात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी खासदार शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

हेही वाचा : पत्रीपुलाला हेरिटेजचा दर्जा द्या, मनसे आमदार राजू पाटलांची उपरोधिक मागणी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.