कोरोनाचा कहर वाढला; महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश बंदी!
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात येण्यास बंदी घातली आहे. (Karnataka releases guidelines for travellers from Maharashtra, no entry in karnataka)
कोल्हापूर: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात येण्यास बंदी घातली आहे. कर्नाटकात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. (Karnataka releases guidelines for travellers from Maharashtra, no entry in karnataka)
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने प्रवेशबंदी केली आहे. केवळ 72 तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून प्रत्येक प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जातोय. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना परत पाठवले जात आहे. कोगनोळी नाक्यावर अचानक तपासणी सुरू करण्यात आल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्रवाशांना रांगेत तास न् तास अडकून राहवं लागत आहे. तसेच काही प्रमाणात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट
महाराष्ट्र आणि केरळ राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. कर्नाटक सरकारने आता त्यांच्या राज्यात बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. यासाठी महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभे करण्यात आलेले आहेत. सांगली जिल्हा लगतच्या कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या कागवाड या ठिकाणी कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु झालेली आहे. या चेकपोस्टवर प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग आणि मास्क तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना टेस्टची विचारणा करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना नियम पाळण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. पोलीस आणि आरोग्य प्रशासनाकडून प्रत्येक वाहनांची तपासणी करुनच कर्नाटकमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण
महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात कोरोनाचे रुग्ण आढळल्याचं दिसून आलं आहे. या राज्यांमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या सहाही राज्यांमध्ये 86.69 टक्के नव्या केसेस समोर आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र आणि केरळात एकूण 75. 87 टक्के सक्रिय रुग्ण असल्याचं दिसून आलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात कोरोनाचा दर 97.27 टक्के असून मृत्यू दर 1.42 टक्के आहे. देशात 1 लाख 43 हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. (Karnataka releases guidelines for travellers from Maharashtra, no entry in karnataka)
VIDEO : Special Report | राज्यात लॉकडाऊनची बेडी, महाराष्ट्राला धडकी !https://t.co/xldCVUuGK6#Lockdown #MaharashtraLockdown #Corona #LockdownUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
संबंधित बातम्या:
बाप रे! आता माणसांनाही बर्ड फ्लूची लागण; रशियात H5N8 स्ट्रेनची सात जणांना लागण
वेळेआधीच अजित पवार बैठकीला पोहोचले, अधिका-यांची पळापळ, आमदार-खासदारांचीही दमछाक
मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे 15 दिवस महत्वाचे, रुग्ण वाढले तर लॉकडाऊन अटळ?
(Karnataka releases guidelines for travellers from Maharashtra, no entry in karnataka)