वाल्मिक कराडवर सुनावणीसाठी रात्री कोर्ट चालू राहणार, बीडमध्ये मोठ्या घडामोडी
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वतःहून आत्मसमर्पण केले आहे. सीआयडीने त्याला बीडच्या दिशेला नेले आहे. याप्रकरणी सीआयडीची विनंती केज कोर्टाने मान्य केली आहे. त्यामुळे रात्री उशिरा वाल्मिक कराडच्या रिमांडवर कोर्टात सुनावणी होणार आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड हा अखेर सीआयडीला शरण आला आहे. वाल्मिक कराड याने पुण्यात सीआयडी कार्यालयात स्वत:ला सरेंडर केलं आहे. यानंतर सीआयडी पथक वाल्मिक कराड याला घेऊन बीडच्या दिशेला रवाना झालं आहे. सीआयडीकडून केज कोर्टाला वाल्मिक कराड याच्या रिमांडच्या प्रकरणावर सुनावणी व्हावी, अशी विनंती करण्यात आली होती. सीआयडीची ही विनंती कोर्ट मान्य करतं का? याबाबत उत्सुकता होती. अखेर कोर्टाने सीआयडीची विनंती मान्य केली आहे.
सीआयडीने केज कोर्टाला केलेली विनंती कोर्टाने मान्य केली आहे. वाल्मिक कराडच्या रिमांडवर आज रात्रीच सुनावणी होणार आहे. केज कोर्टातल्या कोर्ट नंबर १३ मध्ये वाल्मिक कराडला हजर केले जाणार आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात येऊन आज रात्री उशिरा कोर्ट चालवण्याची विनंती केली होती. सीआयडीची विनंती मान्य करत केज कोर्टात आजच रिमांडवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीचे पथक केजच्या दिशेने रवाना झाले आहे.
वाल्मिक कराडने स्वत:चा व्हिडीओ केला शेअर
दरम्यान, वाल्मिक कराड याने पोलिसांना शरण जाण्याआधी स्वत:चा एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओत त्याने आपण दोषी नसून आपलं नाव गोवण्यात आलं आहे, असं वाल्मिक कराडने व्हिडीओ म्हटलं आहे. संतोष भैय्या देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नाही. या प्रकरणात आपण दोषी ठरलो, तर कोर्ट देईन ती शिक्षा भोगायला आपण तयार आहोत, असं वाल्मिक कराडने व्हिडीओत म्हटलं आहे. त्यानंतर तो सीआयडीला शरण जातो. यानंतर आता सीआयडीचे पथक त्या कराडला घेऊन बीडच्या दिशेला रवाना झाले आहेत.
या वाल्मिक कराडचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध सुरु होता. पण त्या पत्ता ना पोलिसांना लागत होता, ना सीआयडीला. विशेष म्हणजे सीआयडीने या वाल्मिक कराडच्या शोधासाठी तब्बल 100 पेक्षा जास्त जणांची चौकशी केली. पण त्याच्यापर्यंत सीआयडी पोहोचू शकले नाही. तसेच वाल्मिक कराड हा स्वत:हून सरेंडर होणार असल्याची बातमी समोर येत होती. ती बातमी खरी ठरली आणि तो सीआयडीला शरण गेला. आता या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘आमच्या कुटुंबाला पोलिसांचं संरक्षण देण्यात यावं’
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपल्या कुटुंबासाठी संरक्षणाची मागणी केली आहे. “कोणालाही सोडले जाणार नाही, असे मुख्यंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. मी काल स्वतःहून सीआयडी ऑफिसला महिती घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी आमच्या गावाला आणि कुटुंबाला संरक्षण देण्याची मी मागणी केलेली आहे. कारण भयभीत वातावरण आहे. त्यामुळे संरक्षणाची मागणी केली आहे”, असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत.