Kirit Somaiya: मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याच्या कंपनीत मनी लॉन्ड्रिंगचा पैसा, पैसा कसा आला?; सोमय्यांनी सांगितली मोडस ऑपरेंडी

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एक घोटाळा काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या श्रीजी होम्स या कंपनीत 29 कोटी 62 लाख 29 हजार 320 रुपये मनी लॉन्ड्रिंग होऊन आले आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

Kirit Somaiya: मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याच्या कंपनीत मनी लॉन्ड्रिंगचा पैसा, पैसा कसा आला?; सोमय्यांनी सांगितली मोडस ऑपरेंडी
मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याच्या कंपनीत मनी लॉन्ड्रिंगचा पैसा, पैसा कसा आला?; सोमय्यांनी सांगितली मोडस ऑपरेंडीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 2:14 PM

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एक घोटाळा काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या श्रीजी होम्स या कंपनीत 29 कोटी 62 लाख 29 हजार 320 रुपये मनी लॉन्ड्रिंग होऊन आले आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. तसेच या कंपनीचा मुख्यमंत्र्याचा संबध काय? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसेच या कंपनीत पैसा कसा आला? त्याची मोडस ऑपरेंडीच सोमय्या यांनी सांगितली. हवाला किंग, हवाला एन्ट्री ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीला (nandkishor chaturvedi) आपण कुठे लपवलं आहे? त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी जनतेला द्यावी. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांच्यासोबत चतुर्वेदीचे अनेक व्यवहार झाले आहेत. मी तपास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चतुर्वेदी गायब आहे. ठाकरे सरकारचे कौटुंबिक मित्रं आहेत. त्यांना फरार घोषित करा ही आमची मागणी आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी सांगितलं.

किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. दीड डझन कंपन्याची चतुर्वेदींची यादी आहे. त्यात दोन डझन आणखी कंपन्या बाहेर आल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि चतुर्वेदी यांच्या तीन कंपन्याचा व्यवहार झाला होता. त्याची माहिती मी दिली होती. 7 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग झालं. त्यावर ठाकरे कुटुंबाकडून एकही शब्द काढला नाही. त्यामुळे ठाकरे कुटुंब मनी लॉन्ड्रिंगमध्ये चतुर्वेदीचा वापर करत आहे का?, असा सवाल सोमय्या यांनी केला.

श्रीजी होम्सशी तुमचा संबंध काय?

उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांनी श्रीजी होम्स ही कंपनी स्थापन केली. ही पार्टनरशीप कंपनी आहे. दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या यात पार्टनर आहेत. वांद्रे येथे कंपनीचं कार्यालय आहे. या कंपनीने दादरच्या शिवाजी पार्कात मोठी इमारत उभी केली आहे. कोट्यवधीची इमारत आहे. या श्रीजी होम्समध्ये 29 कोटी 62 लाख 29 हजार 320 रुपये मनी लॉन्ड्रिंग होऊन आले आहेत. या पैशाच्या दोन एन्ट्री झाल्या आहेत. एक 5 कोटी 80 लाख 86 हजार 902 आणि दुसरी एन्ट्री 23 कोटी 75 लाख 48 हजार 418ची झाली आहे. काळे पैसे या कंपनीत आले. या कंपनीत मनी लॉन्ड्रिंग करण्यासाठी कोणत्या चतुर्वेदीची मदत घेतली? उद्धव ठाकरे यांनी सांगावं या कंपनीशी तुमचा संबंध काय?, असा सवालही त्यांनी केला.

मोड्स ऑपरेंडी काय?

पैसे कुठून आले हे लपवण्यासाठी चार्टड अकाऊंटंट काही ट्रीक्स दाखवतात. आतापर्यंत एलएलपी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती. त्याचे कागदपत्रं संकेतस्थळावर असतात. कंपनी मंत्रालयाची वेबसाईट चोवीस तास सुरू असते. गुगलपेवरून पैसे देऊन तुम्ही कागदपत्रं घेऊ शकता. तुम्ही त्याचं समीक्षण करू शकता. उद्धव ठाकरेंना लपवाछपवी करायची हे माहीत होतं. त्यामुळे त्यांनी पार्टनरशीप तयार केली. श्रीजी होम्स या पार्टनरशीप कंपनीचे कागदपत्रं नेटवर नाही. त्यासाठी वांद्रेला जी रजिस्टर फर्म आहे तिथे अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यावर त्यात कोण पार्टनर आहे? ती कंपनी कधी तयार केली? तो निवृत्त कधी झाला हे सर्व माहिती मिळेल. अचानक नेते 40 टक्के पार्टनर होते. ते 98 टक्के झाले. थोडी मेहनत करावी लागणार. आता आपल्याला खाली जावं लागेल. आता पार्टनरशीपमध्ये दोनच कंपन्या पार्टनर आहे. ते कंपनीच्या मंत्रालयाच्या साईटवर आहे. त्याचे साडे तीनशे पाने आहेत. ते सर्व तुम्हाला मिळेल. त्यासाठी सोमवार पर्यंत वाट पाहावी लागेल.

सोमय्यांनी उलगडली लेअर

पैसे कसे आणणार त्याला लेअर म्हणतात. पहिलं श्रीजी होम एक लेअर. दुसरी उद्धव ठाकरेंची लेअर. म्हणजे पाटणकर. त्यानंतर अजूनही एक तिसरी लेअर बनवली आहे. त्यात चतुर्वेदीने ज्या शेल कंपन्या तयार केल्या. त्यात अजूनही प्रोडक्ट घेतली. त्याने शेअर बाजारची मदत घेतली. त्याचा प्रॉफिट घेऊन तो तिसऱ्या लेअरला आला आणि तिसऱ्या लेअरने दुसऱ्या लेअरला दिले. त्यात मी सांगितलेली 29 कोटीची रक्कम टाकण्यात आली. हा पैसा कुठून आला यशवंत जाधवने दिलेला पैसा हा असू शकतो. मी गंभीरपणे सांगत आहे. हा काळा पैसा आहे. भ्रष्टाचाराचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : बुलडाणा जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा 35 टक्के अधिक पाऊस, भारतीय हवामान खात्याचा अंदाज

Gunratna Sadavarte: मेरा आवाज हिंदुस्थान की आवाज है, पोलीस कोठडीतून बाहेर येताच सदावर्तेंची घोषणाबाजी

Hasan Mushrif : मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून वाद चिघळला, कोल्हापुरात भाजपचा मोर्चा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.