बुलावा आया है… राहुल गांधीनंतर आता अनिल परबांचा नंबर! काँग्रेसच्या पोलखोलवर किरीट सोमय्या काय म्हणाले?

राहुल गांधी, अनिल परब यानंतर आता किरीट सोमय्या कुणाचं नाव घेणार, कुणाचा घोटाळा उघड करणार, याविषयी चर्चा सुरु आहेत. यावर बोलताना किरीट सोमय्या यांनी सूचक वक्तव्य केलं. यानंतर काय होईल, हे सोमवारी कळेलच, असं ते म्हणाले.

बुलावा आया है... राहुल गांधीनंतर आता अनिल परबांचा नंबर! काँग्रेसच्या पोलखोलवर किरीट सोमय्या काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 1:20 PM

मुंबईः काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी तीन वेळा ईडी चौकशी झाली. त्यांना चौथ्यांदा ईडी समोर त्यांना जावं लागणार आहे. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा नंबर आहे. ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले आहे. तसं समन्स पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीचा हिशोब देण्यासाठी परबांना जावंच लागणार आहे, असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलं आहे. चौकशीसाठी बोलावलं तर परबांना भीती वाटतेय. गेल्यानंतर काय होणार, हे अनिल देशमुखांनाच विचारा… असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

अनिल परबांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, याविषयी बोलताना किरीट सोम्यया म्हणाले, ‘ परबांना भीती वाटत असली तरीही ईडीचा बुलावा आला असेल तर जावंच लागणार आहे. …

काँग्रेसनी 70 वर्षे लूटण्याचं काम केलं…

राहुल गांधींवर आरोप करताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे २४ महिन्यात लुटण्याचं काम करतायत. काँग्रेसने ७० वर्ष हे काम केलंय. काँग्रेसचा एकही नेता हे का नाही सांगत की मीडियाच्या नावानं घेतलेला प्लॉट फक्त ५० लाखात राहुल गांधी, सोनिया गांधींच्या कंपनीला दिला. ज्याचं बाजारमूल्य आज ४०० कोटी रुपयेहून अधिक आहे. हजार कोटी रुपयेही होऊ शकतं. जनतेची जमीन ५० लाखात घ्यायची आणि आपल्या कंपनीत ट्रान्सफर करायची, याचं उत्तर द्यावंच लागणार…

विधान परिषदेत कपडे उतरवले जाऊ नयेत..

उद्धव ठाकरे सत्तेवर आलेल्यानंतर त्यांनी तोडफोड शब्द बदलला. राज्यसबेच्या वेळी संजय राऊतांनी सहा आमदारांना धमक्या दिल्या. राज्याचं नाक कापून घेतलं. पण विधानपरिषदेत कपडे उतरवले जाऊ नये म्हणून धमकी देत होते. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी अशा धमक्या दिल्या तर आम्ही माफ करणार नाही. कोर्टाकडेही जाणार आणि माफियांचं राजकारण बंद करणार..

सोमवारी मोठी कारवाई?

राहुल गांधी, अनिल परब यानंतर आता किरीट सोमय्या कुणाचं नाव घेणार, कुणाचा घोटाळा उघड करणार, याविषयी चर्चा सुरु आहेत. यावर बोलताना किरीट सोमय्या यांनी सूचक वक्तव्य केलं. यानंतर काय होईल, हे सोमवारी कळेलच, असं ते म्हणाले.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...