Kolhapur By Election Result 2022: कोल्हापूरात पराभव, आता हिमालयात जाणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, नाना लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला!
दरम्यान, निवडणूक हरल्यानंतर हिमालयात जाण्याचं वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने आज निकालानंतर एक ट्वीट केले. हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना स्वेटर, मफलर, कानटोपी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे.
कोल्हापूर| कोल्हापूर उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला पण भाजपच्या दिग्गज नेत्याने जो दावा केला होता, त्याचं काय होणार, अशी एकच चर्चा शहरात रंगली आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांनी भाजपच्या सत्यजित कदम (Santyajit Kadam)यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यामुळे सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आले असताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचं काय होणार, असाच प्रश्न कोल्हापूरकरांना पडला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रचार करताना म्हटले होते की, पराभूत झालो तर मी राजकारण सोडेन, हिमालयात जाईन.. यावर आज निवडणुकीचे निकाल लागल्यावर प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत खुबीने या प्रश्नाला उत्तर दिले. मी हरलो तर हिमालयात जाईन, असे म्हणालो मी.. आज मी नाही तर सत्यजित कदम हरलेत. त्यामुळे मी काय करायचं याचा प्रश्नच येत नाही, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
नाना लढले तर तुमच्या तोंडाला फेस…
भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा आजच्या निवडणुकीत पराभव झाला. आता निवडणूक प्रचारात दावा केल्याप्रमाणे तुम्ही हिमालयात जाणार का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांना करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, माझा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडेन हिमालयात जाईन, असा दावा केला होता. आमचा नाना (सत्यजित कदम) लढले तर तुमच्या तोंडाला एवढा फेस आला मी लढलो तर काय हाल होतील, याचा विचार करा, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
काँग्रेसचे ट्वीट चर्चेत
दरम्यान, निवडणूक हरल्यानंतर हिमालयात जाण्याचं वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसने आज निकालानंतर एक ट्वीट केले. हिमालयात जाईन म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना स्वेटर, मफलर, कानटोपी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात येईल, फक्त ते कधी निघणार आहेत, हे सांगावे, असा मजकूर त्यात लिहिला आहे.
चंद्रकांत दादा हिमालयात जायला निघाला की कळवा बरं का!#उत्तरकोल्हापूर #महाविकासआघाडी pic.twitter.com/eRS4rjP7tR
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 16, 2022
काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. त्याचे निकाल आज लागले. या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या पार पडल्या यात शेवटच्या फेरीपर्यंत जयश्री जाधव 18,901 मतांनी विजयी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा कोल्हापूरात जल्लोष सुरु आहे.
इतर बातम्या-