AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur North Assembly election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा, पंढरीतून फुंकलं रणशिंग

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी उडी घेतली आहे. येत्या मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी आज पंढरपुरात जाहीर केले.

Kolhapur North Assembly election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा, पंढरीतून फुंकलं रणशिंग
करुणा शर्मा निवडणूक रिंगणातImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 20, 2022 | 5:00 PM
Share

सोलापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant jadhav) यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेची पोटनिवडणूक (Kolhapur north Assembly Election) जाहीर झाली आहे. भाजपनं पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपनं यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. मात्र या निवडणुकीत आता अचानक नवं ट्विस्ट आलं आहे. कारण कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी उडी घेतली आहे. येत्या मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी आज पंढरपुरात जाहीर केले.कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक लढण्या पूर्वी करुणा शर्मा यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले.

काही दिवसांपूर्वीच पक्षाची घोषणा

करुणा शर्मा यांच्या निवडणुकीत उतरण्यानं ही निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच करुणा शर्मा यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. शिवशक्ती सेना असं नवीन पक्षाचं नाव असल्याचं करुणा शर्मांनी जाहीर केलं. “अनेक पक्षांनी मला प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं होतं, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या सारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत” असा दावाही करुणा शर्मांनी केला होता. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची करुणा शर्मा यांनी भेट घेतली होती. त्यानंतर करुणा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येणार, असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा मानसही करुणा यांनी बोलून दाखवला होता. तेच आता प्रत्यक्षात येत आहे.

निवडणुकीत नवं ट्विस्ट

आधी ही निवडणूक सत्यजीत कदम विरुद्ध जयश्री जाधव अशी मानली जात होती. मात्र आता या निवडणुकीला वेगळं वळण प्राप्त झालं आहे. सुरूवातील ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सतेज पाटील यांनी केला मात्र त्यांना यश आलं नाही. जयश्री जाधव यांना भाजपकडून लढण्याची ऑफर होती, त्यांनी ती नाकारली त्यानंतर भाजपने ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते.

गडकरींना लतादिदी आणि अटलजी यांची आठवण आली, म्हणाले मी दोनदाच हार खरेदी केला…

2 वर्षात तब्बल 38 Flatsची खरेदी! यशवंत जाधवांनी कधी काय घेतलं? 2 वर्षांची कुंडली tv9च्या हाती

काही चुकांमुळे Congress कमकुवत झालीय, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.