कोल्हापुरातील काँग्रेसच्या नेत्याचा पक्षाला रामराम, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन (Shishak-Padvidhar Election) महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं असताना कोल्हापुरातून (Kolhapur) एक मोठी बातमी समोर आलीय.

कोल्हापुरातील काँग्रेसच्या नेत्याचा पक्षाला रामराम, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण
congress Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 8:14 PM

कोल्हापूर : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन (Shishak-Padvidhar Election) महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं असताना कोल्हापुरातून (Kolhapur) एक मोठी बातमी समोर आलीय. कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे (Umesh Apte) यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरातील काँग्रेसचे मोठे नेते अशी ख्याती असलेले आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातोय. उमेश आपटे यांची सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ओळख आहे. असं असताना त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. उमेश आपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काय भूमिका घेतात, आपटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान उमेश आपटे हे भाजपच्या वाटेवर असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत. तसं असेल तर काँग्रेसची कोल्हापुरातील मोठी हानी मानली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश आपटे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक अशी उमेश आपटे यांची ओळख आहे. आपटे यांच्या राजीनाम्यामुळे आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याची चर्चा कोल्हापुरातील राजकीय वर्तुळात सुरुय.

उमेश आपटे यांची राजीनामा नेमका का दिला?

उमेश आपटे यांनी राजीनामा का दिला? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यावर त्यांनी कौटुंबिक कारण दिलंय. याशिवाय पक्षात काम करत असताना अडचणी येत असल्याचं उमेश आपटे यांचं म्हणणं आहे. आता त्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

उमेश आपटे भाजपच्या वाटेवर?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेश आपटे हे भाजपच्या वाटेवर आहेत. तशी चर्चा देखील कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहे. पण त्याबाबत कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

काँग्रेसमध्ये एकमत नाही?

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी हायकमांडकडे पत्र पाठवत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची विनंती केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी दोन वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे गोंधळलेली परिस्थिती आहे.

काँग्रेसमध्ये खरंच मोठा भूकंप होणार?

दरम्यान, भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसबद्दल मोठं विधान केलं होतं. काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचं विधान त्यांनी केलं होतं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.