Sharad Pawar | आगामी निवडणुका एकत्र लढवणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दोन प्रवाह, शरद पवार काय म्हणाले?

लोकशाहीत सरकारविरुद्ध एखाद्या प्रश्नावर बोलण्याचा जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे आता राजद्रोहाचा (Sedition) आरोप करू नये, असं माझं मत असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

Sharad Pawar | आगामी निवडणुका एकत्र लढवणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दोन प्रवाह, शरद पवार काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 10:17 AM

कोल्हापूरः  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) एकत्र लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गतच यात दोन मतप्रवाह असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Body Elections) महाविकास आघाडी एकत्र लढणार का, या प्रश्नाचं उतत्तर देताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच याविषयी दोन मतं आहेत. प्रत्येकाने आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवावी असं एक मत आहे तर आपण सरकार एकत्र चालवतो त्यामुळे एकत्रित निवडणूक लढवली तर सरकारच्या दृष्टीने योग्य आहे, असंही एक मत आहे. बाकीच्या दोन पक्षांची यासंबंधीची विचार अद्याप माहिती नाही. एकत्र बसून चर्चा करणार आहोत. पुढे कसं जायचं याची चर्चा करणार आहोत. मतं समजल्यानंतरच जाहीरपणे योग्य बोलणं योग्य आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी?

सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पंधरा दिवसात सुरु करण्याचे आदेश मागील आठवड्यात दिले. त्यामुळे लवकरच निवडणुका लागणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘ कोर्टानं म्हटलं की निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबवली होती, तिथपासून तुम्ही सुरु करा. आता अनेक ठिकाणी याद्या तयार झाल्या आहेत. काही ठिकाणी हरकती मागवणं राहिल्या आहेत. त्यासाठी एक महिना लागतो. महिलांसाठी राखीव जागा, इतर आरक्षण ठरवावे लागते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन अडीच तीन महिने लागतात, त्यामुळे आताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता कमी आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

‘… मलाही नोटीस येईल’

सध्या कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये भाजप वरचढ होतंय का, असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी अत्यंत सावधगिरी बाळगून उत्तर दिले. कोर्टावर मला भाष्ट करायचं नाही, कारण मग तुम्हालाही नोटीस येईल आणि मलाही नोटीस येईल, असं वक्तव्य पवारांनी केलं.

एकत्र निवडणूक लढवणार का?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का, या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच याविषयी दोन मतं आहेत. प्रत्येकाने आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवावी असं एक मत आहे तर आपण सरकार एकत्र चालवतो त्यामुळे एकत्रित निवडणूक लढवली तर सरकारच्या दृष्टीने योग्य आहे, असंही एक मत आहे. बाकीच्या दोन पक्षांची यासंबंधीची विचार अद्याप माहिती नाही. एकत्र बसून चर्चा करणार आहोत. पुढे कसं जायचं याची चर्चा करणार आहोत. मतं समजल्यानंतरच जाहीरपणे योग्य बोलणं योग्य आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

भाजपा ओबीसी उमेदवार देणार, राष्ट्रवादीचं काय?

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असतील भाजप 27 टक्के ओबीसी उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. मग राष्ट्रवादी काँग्रेसचा काय निर्णय आहे, यावर विचारले असता शरद पवार म्हणाले, आम्हीदेखील त्या पद्धतीनेच उमेदवार देणार आहोत. ज्या ठिकाणी ओबीसींची जागा आरक्षित होती, त्याठिकाणी ओबीसींचाच उमेदवार उभा करणार आहोत.’

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.