AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lata Mangeshkar Health Update : प्रकृतीत सुधारणा, पण डिस्चार्ज कधी? लतादीदींबाबत आता डॉक्टरांनी काय म्हटलं?

कोरोना आणि न्यूमोनियातून लता मंगेशकर बऱ्या झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी काल दिली. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे. लता मंगेशकर यांच्या तब्बेतीबाबत माहिती घेण्यासाठी ब्रिच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांबरोर बोलून राजेश टोपे यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे. लता मंगेशकर कोरोनातून आणि न्यूमोनियातून बऱ्या झाल्यानं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.

Lata Mangeshkar Health Update : प्रकृतीत सुधारणा, पण डिस्चार्ज कधी? लतादीदींबाबत आता डॉक्टरांनी काय म्हटलं?
लता मंगेशकर
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 9:27 PM
Share

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंगेशकर यांची प्रकृती सुधारल्यानं व्हेंटिलेटर काढण्यात आलां असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल दिली होती. त्यानंतर आता लता दीदींवर उपचार सुरु आहेत. मात्र, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळेल हे सांगणं कठीण असल्याचं ब्रिच कँडी रुग्णालयाचे (Birch Candy Hospital) डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितलं. दरम्यान, कोरोना (Corona) आणि न्यूमोनियातून लता मंगेशकर बऱ्या झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी काल दिली. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे. लता मंगेशकर यांच्या तब्बेतीबाबत माहिती घेण्यासाठी ब्रिच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांबरोर बोलून राजेश टोपे यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे. लता मंगेशकर कोरोनातून आणि न्यूमोनियातून बऱ्या झाल्यानं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.

लता मंगेशकर यांच्या ट्विटर हँडलवरुन प्रकृतीसंदर्भात माहिती

लता मंगेशकर यांच्या ट्विटरवर हँडलवरून 27 जानेवारीला त्यांच्या चाहत्यांना सांगण्यात आले होते की, त्यांच्या तब्बेतीत हळूहळू सुधारणा होत असून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यावेळी त्यांना लावण्यात आलेला व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते. त्यांची काळजी घेण्यासाठी डॉ. प्रतीत सामदानी आणि त्यांची टीम काम करीत आहे.

याआधीही नोव्हेंबर २०१९ मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना २८ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.

इतर बातम्या : 

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज 16 फेब्रुवारी पासून भरता येणार, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

‘उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प, नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग’, मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.