Maharashtra News Live : गव्हाच्या किंमती 5 ते 6 टक्क्यांनी भडकण्याची शक्यता

| Updated on: Jan 26, 2023 | 2:50 PM

Maharashtra Breaking News Live : राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live : गव्हाच्या किंमती 5 ते 6 टक्क्यांनी भडकण्याची शक्यता
latest breaking news live Image Credit source: tv9 marathi

मुंबई: बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवर बंदी घालण्यात आल्याने जेएनयूत राडा झाला आहे. जेएनयूमध्ये दगडफेक करण्यात आली असून इंटरनेट आणि वीज बंद करण्यात आली आहे. या घटनेचे आज दिवसभरही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केली आहे. यासह राज्य आणि देशातील ताज्या घडमोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Jan 2023 07:17 PM (IST)

    गव्हाच्या किंमती रेकॉर्ड तोडणार

    किमान आधारभूत किंमतींपेक्षा भावात जोरदार वाढ

    गव्हाच्या किंमती 5 ते 6 टक्क्यांनी भडकण्याची शक्यता

    खुल्या बाजारात गव्हाचे भाव 3150 प्रति क्विंटलपेक्षाही जास्त

    रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारने केली किंमत निश्चित

    2125 रुपये प्रति क्विंटल ही किमान आधारभूत किंमत

  • 25 Jan 2023 06:37 PM (IST)

    सूर्यकुमार यादवच्या कामगिरीची आयसीसीकडून दखल, दिला मोठा पुरस्कार

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने आपला ठसा उमटवला आहे. सूर्यकुमार यादवने केलेल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसीने त्याला 2022 या वर्षातील सर्वोत्तम टी 20 फलंदाज पुरस्कार जाहीर केला आहे.

    सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

  • 25 Jan 2023 05:38 PM (IST)

    काँग्रेसचे आमदार संजय काका जगताप यांच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

    पुणे : 

    काँग्रेसचे आमदार संजय काका जगताप यांच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

    पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14 मे ला शासकीय इतमामात साजरी करावी केली मागणी

    पुरंदर किल्ला हा माझ्या मतदारसंघात येतो इथं शासकीय इतमामात जयंती साजरा करा.

    मी केलेली मागणी मान्य करावी पत्राद्वारे केली विनंती

    पुरंदर हवेली मतदारसंघात माजी मंत्री विजय शिवतारेंनी याआधी केली.होती मागणी

    आता काँग्रेसचे आमदार संजय जगतापांनीही पत्राद्वारे केली मागणी

  • 25 Jan 2023 05:37 PM (IST)

    Mohammed Siraj : मोहम्मद सिराज ठरला जगातील नंबर वन बॉलर

    आयसीसीने वनडे बॉलर रँकिग जाहीर केली. या रँकिगमध्ये टीम इंडियाचा वेगवागन गोलंदाज मोहम्मद सिराज याने आपला ठसा उमटवला आहे. सिराज ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेझलवूड याला पछाडत वनडे क्रिकेटमधील एक नंबर गोलंदाज ठरला आहे.

    सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

    ICC ODI Rankings : मोहम्मद सिराज याचा वर्ल्ड क्रिकेटमध्ये धमाका, ठरला जगातील नंबर वन बॉलर

  • 25 Jan 2023 04:44 PM (IST)

    शेअर बाजारात धडामधूम

    सेन्सेक्समध्ये 800 अंकांची घसरण

    जवळपास सर्वच सेक्टरमध्ये आपटी बार

    पीएसयू बँक इंडेक्समध्ये 3.7 टक्क्यांची घसरण

    निफ्टी बँकेत आज 2.3 टक्क्यांची घसरण

    स्टॉक एक्सचेंजवरील 2350 शेअर गडगडले

    शेअर बाजारात 752 शेअरमध्ये तेजी

  • 25 Jan 2023 04:33 PM (IST)

    अहमदनगरमध्ये बिबट्या विहिरीत पडला

    अहमदनगर :

    बिबट्या विहिरीत पडला कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारातील घटना राजेंद्र फटांगरे या शेतकऱ्याच्या विहिरीत पडला बिबट्या काल रात्री बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आज दुपारी फटांगरे विहिरीकडे गेले असता लक्षात आली घटना वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले बिबट्याला रेस्क्यू करण्याचे काम सुरू बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील रहिवाशांची गर्दी

  • 25 Jan 2023 04:28 PM (IST)

    मुंबईच्या उच्चभ्रू अशा पेडर रोड परिसरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे लागले होर्डींग्ज

    – मुंबईच्या उच्चभ्रू अशा पेडर रोड परिसरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे लागले होर्डींग्ज

    – 29 तारखेला राजकिय हेवेदावे सोडून सर्व हिंदू बांधवांना दादर शिवाजी पार्क येथे सकाळी दहा वाजता एकत्र येण्याचं सकल हिंदू समाजाचं निमंत्रण

    – श्रद्धा वालकर हत्याकांडचा आरोपी आफ्ताबला जन्मठेप व्हावी यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढणार

    – लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि लॅंड जिहाद विरोधी कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी निघणार मोर्चा

    – या होर्डींग्जची सध्या जोरदार चर्चा

  • 25 Jan 2023 03:08 PM (IST)

    मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समधून काढणं हे अयोग्य;अभिनेता दिगंबर नाईक यांनी मांडली भूमिका

    मुंबईः

    महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे

    पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी मल्टिप्लेक्सच्या विरोधात रस्त्यावर उतरा

    मराठी चित्रपटाला जर कात्री लागत असेल तर त्याचा विचार केला जाईल

    मराठी चित्रपट कमी खर्चामध्ये येतो आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली जाते आणि असेच मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समधून काढणं हे अयोग्य नाही.

    हिंदी चित्रपटामुळे मराठी चित्रपटाची गोची केली जाते. जर काय मराठी प्रेक्षकानी मल्टिप्लेक्समध्ये न जाण्याचं ठरवलं तर कशाप्रकारे चित्रपट चालवणार? दिगंबर नाईक यांचा सवाल

    मराठी चित्रपटाबाबत जर असं काय झालं तर हळूहळू चित्रपट काढणे बंद होणार

    मराठी चित्रपटाला जर कात्री लागत असेल तर त्याचा विचार केला जाईल.

  • 25 Jan 2023 03:08 PM (IST)

    गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालक पदावरून उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

    ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांचे गोकुळ दुध संघातील संचालकपद कायम करण्याचा न्यायालयाचा निर्णय

    शिंदे फडणवीस सरकारने केले होते संचालक पद रद्द

    महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जाधव यांची शासन नियुक्त संचालक म्हणून नियुक्ती

    मुरलीधर जाधव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख

  • 25 Jan 2023 02:53 PM (IST)

    Rohit Sharma शतकानंतर कोणावर नाराज झाला? जाहीर प्रेस कॉन्फरन्समध्ये सुनावलं

    सेंच्युरी मारुनही रोहित शर्मा त्यांच्यावर का चिडला? वाचा सविस्तर…..

  • 25 Jan 2023 02:34 PM (IST)

    ब्रह्मानंद पडळकर यांना न्यायालयाचा दणका

    मिरजेतील त्या जागेबाबत मिरजेच्या तालुका न्याय दंडाधिकारी यांनी दिला निकाल

    मिळकतदारांचा कब्जा मिरजेच्या तालुका न्याय दंडाधिकारी यांनी केला मान्य

    ब्रह्मानंद पडळकर यांना योग्य त्या ठिकाणी दाद मागण्याचा दिला निकाल

  • 25 Jan 2023 02:27 PM (IST)

    महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांना जामीन मंजूर

    100 कोटी खंडणी प्रकरणी संजीव पालांडे यांना जामीन मंजूर

    मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

    याप्रकरणी सीबीआयने दाखल केला होता गुन्हा

    ज्या अटींवर देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला होता, त्याच अटींवर पालांडे यांनाही जामीन मंजूर

  • 25 Jan 2023 02:25 PM (IST)

    असं कसं होऊ शकतं? ऑस्ट्रेलियात मॅच फिक्सिंग? एका बॉलवरुन वाद, टीम जिंकणारी मॅच हरली

    ऑस्ट्रेलियात कुठल्या मॅचमध्ये हे घडलं? आणि जिंकणारा सामना कसा हरला? ते जाणून घ्या. वाचा सविस्तर….

  • 25 Jan 2023 02:24 PM (IST)

    अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने दुबईला जाण्यासाठी दिल्ली कोर्टाकडे मागितली परवानगी

    27 ते 30 जानेवारीदरम्यान दुबईला जाण्यासाठी कोर्टाकडे मागितली परवानगी

    जॅकलिनच्या अर्जावर प्रतिक्रिया देण्यासाठी ईडीने मागितला वेळ

    200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची चौकशी सुरू

    मनी लाँड्रींग प्रकरणामुळे जॅकलिनला देश सोडून जाताना घ्यावी लागतेय परवानगी

  • 25 Jan 2023 02:24 PM (IST)

    WIPL Team Auctions : महिला IPL च्या टीमची प्राइस ते BCCI ला किती हजार कोटी मिळणार? जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी

    WIPL Team Auctions : महिला IPL टीम्स विकत घेण्यासाठी कोण-कोणत्या कंपन्या शर्यतीत आहेत? कोण-कोणत्या कंपन्या बोली लावणार? वाचा सविस्तर.

  • 25 Jan 2023 02:02 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताच्या बॅनर वर पंकजा मुंडे यांचा फोटो गायब

    औरंगाबाद : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी भाजपकडून लावले बॅनर,

    राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा फोटो नसल्याने चर्चेला उधाण,

    आजी-माजी नेत्यांचे फोटो बॅनरला मात्र पंकजा मुंडे यांचे फोटो नसल्याचे औरंगाबाद येथे चित्र,

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक असताना कार्यालय परिसरातील बॅनर.

  • 25 Jan 2023 01:53 PM (IST)

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांच उद्धव ठाकरेंना लेखी पत्र

    मविआकडे कसबा विधानसभा का मागायचा ? यासाठी पत्र पाठवण्यात आलं आहे

    कसबा विधानसभा शिवसेनेला मिळावी ही कार्यकर्त्यांची मागणी

    आज सेना भवनातील बैठकीत ठाकरे घेणार निर्णय

    मात्र त्यापुर्वी उद्धव ठाकरेंना पक्षांतर्गत पत्र

    पत्राद्वारे शहराध्यक्ष संजय मोरेंनी ठाकरेंना कसबा विधानसभा मागण्याची केली मागणी

    आज उद्धव ठाकरे घेणार निर्णय !

  • 25 Jan 2023 12:11 PM (IST)

    KL Rahul-Athiya ला विराटने गिफ्ट केली खास कार, किंमत ऐकून विस्फारतील डोळे

    धोनीने गिफ्ट केलेल्या वस्तुची किंमत लाखांच्या घरात. वाचा सविस्तर….

  • 25 Jan 2023 12:10 PM (IST)

    IPL 2023 : Mumbai Indians साठी दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ बॅट्समन येऊ शकतो ओपनिंगला

    IPL 2023 : दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ बॅट्समन येऊ शकतो ओपनिंगला. कोण आहे तो ? वाचा सविस्तर….

  • 25 Jan 2023 11:44 AM (IST)

    Mumbai News Live: ‘पठाण’वरून मनसेचा थिएटर मालकांना आंदोलनाचा इशारा

    मनसेचा थिएटर मालकांना आंदोलनाचा इशारा

    पठाणमुळे मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स मिळेनात- मनसे

    शाहरुख खानच्या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांची अडचण- मनसे

    मराठी चित्रपटांचे शो लावा, अन्यथा आंदोलन- मनसे

  • 25 Jan 2023 11:36 AM (IST)

    Nagpur Live- गणेश टेकडी मंदिरात तब्बल 1100 किलो बुंदीचा भला मोठा लाडू अर्पण

    – माघ चतुर्थी निमित्त नागपुरात बाप्पाच्या चरणी 1100 किलो लाडूचा प्रसाद

    – नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरात 1100 किलो बुंदीच्या लाडूचा महाप्रसाद

    – श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे श्री गणेश टेकडी मंदिरात 1100 किलोचा लाडू

  • 25 Jan 2023 11:18 AM (IST)

    Entertainment News Live: सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर प्रदर्शित

    शाहरुख खानच्या ‘पठाण’सोबत सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझर प्रदर्शित

    ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार चित्रपटा; पहा टीझरचा व्हिडीओ

  • 25 Jan 2023 11:15 AM (IST)

    Entertainment News Live: RRR मधील ‘नाटू नाटू’ गाण्याची ऑस्करमध्ये एण्ट्री

    प्रतिष्ठित ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात भारताच्या तीन चित्रपटांना नामांकनं

    एस. एस. राजामौली यांच्या RRR चित्रपटाने पुन्हा रचला इतिहास

    नाटू नाटू गाण्याला ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचं नामांकन, पहा ऑस्कर 2023 नॉमिनेशन्सची संपूर्ण यादी

  • 25 Jan 2023 11:01 AM (IST)

    कोल्हापुरात पाण्यासाठी महिलांनी फोडला टाहो

    कोल्हापूर : हॉकी स्टेडियम परिसरात महिलांचा रास्ता रोको,

    गेल्या अनेक दिवसात या परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या,

    पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून सुद्धा पाण्याचा पुरवठा नियमित नाही.

  • 25 Jan 2023 10:48 AM (IST)

    कोल्हापुरात पाण्यासाठी महिलांनी फोडला टाहो

    हॉकी स्टेडियम परिसरात महिलांचा रास्ता रोको

    गेल्या अनेक दिवसात या परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या

    पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून सुद्धा पाण्याचा पुरवठा नियमित नाही

  • 25 Jan 2023 10:38 AM (IST)

    Faf du Plessis ची ‘दादागिरी’, आपल्या मेहुण्याला जाम धुतलं

    मैदानात उतरल्यानंतर Faf du Plessis ला रोखणं कोणालाच जमलं नाही….वाचा सविस्तर…

  • 25 Jan 2023 10:37 AM (IST)

    IND vs NZ 3rd ODI : एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढूनही Rohit sharma शार्दुलवर का चिडला? VIDEO व्हायरल

    भर सामन्यात रोहित शर्मा शार्दुलवर का चिडला? वाचा सविस्तर….

  • 25 Jan 2023 10:29 AM (IST)

    कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल

    कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल

    आता २७ ऐवजी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार

    निकाल २ मार्च रोजीच लागणार

    बारावीच्या परीक्षेमुळे तारखांमध्ये बदल

  • 25 Jan 2023 10:25 AM (IST)

    सोन्याचा तोरा कायम, चांदीचा आपटी बार

    वायदे बाजारात सोन्यात किंचित घसरण

    सराफा बाजारात सोन्याचा तोरा कायम

    सोन्याचा भाव 57,000 रुपयांपेक्षा जास्त

    सोन्याचा भाव 57,217 रुपये प्रति 10 ग्रॅम

    चांदी 68,137 रुपये किलो

  • 25 Jan 2023 10:24 AM (IST)

    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नीला दिलासा

    माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नीला दिलासा मिळाला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering) त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वाचा सविस्तर

  • 25 Jan 2023 10:21 AM (IST)

    कॅफे कॉफी डेवर धडक कारवाई

    बाजार नियंत्रक सेबीने ठोठावला दंड

    कॅफे कॉफी डेला 26 कोटींचा भारीभक्कम दंड

    उपकंपन्यांचा पैसा प्रमोटरच्या कंपन्यांसाठी वापरल्याचा ठपका

    म्हैसूर एमल्गमेटेड कॉफी अॅस्टेट्स लिमिटिडे कंपनीला पैसे हस्तांतरीत केल्याचे उघड

    एकूण 3,535 कोटी रुपये हस्तांतरीत केल्याचा सेबीचा आरोप

  • 25 Jan 2023 09:22 AM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपडेट

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपडेट

    -चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची भूमिका आज ठरणार का ?

    -पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दुपारी एक वाजता पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत

    -या बैठकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे बंधू शंकर जगताप ही उपस्थित असणार आहेत

    -या बैठकीत कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून बैठक संपताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पत्रकारांशी संवाद ही साधणार आहेत

  • 25 Jan 2023 08:56 AM (IST)

    मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान

    ऊस उद्योग आणि शेतकरी यांच्यासंदर्भात काल महत्वपूर्ण बैठक पार पडली. अमित शाह यांनी मनापासून बारकाईने लक्ष घातलं आहे. त्यामुळे या उद्योगाला न्याय मिळेल.

    महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं. तेव्हापासून पंतप्रधान मोदी आणि शाह यांनी इतर मंत्र्यांकडून महाराष्ट्राला मदत होत आहे.

    विविध योजना आणि प्रकल्पाला सपोर्ट मिळतोय. या अर्थसंकल्पात केंद्राकडून चांगलं सहकार्य मिळेल

    महाराष्ट्रात एक परंपरा आहे. एखाद्या सदस्याचं निधन होतं. तेव्हा सर्वजण सहकार्य करतात. ती निवडणूक बिनविरोध होते.

    याचं उदाहरण आपण मुंबईत पाहिलं. बिनविरोध करण्याचं आवाहन करण्यात आल्यानंतर आम्ही माघार घेतली. हीच परंपरा सर्वांनीच पाळली पाहिजे. जपली पाहिजे

  • 25 Jan 2023 08:45 AM (IST)

    आज पेट्रोल-डिझेलचे भाव काय

    कच्चा तेलाच्या दरात 2 टक्क्यांची घसरण

    मुंबईमध्ये पेट्रोल 102.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

    अहमदनगर पेट्रोल 106.52 रुपये तर डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर

    अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर

    अमरावतीत 106.82 तर डिझेल 93.35 रुपये प्रति लिटर

    औरंगाबाद 107.31 पेट्रोल आणि डिझेल 93.79 रुपये प्रति लिटर

    नागपूरमध्ये पेट्रोल 106.03 तर डिझेल 92.62 रुपये प्रति लिटर

    नांदेडमध्ये पेट्रोल 108.21 तर डिझेल 94.69 रुपये प्रति लिटर

    जळगावमध्ये पेट्रोल 107.19 आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लिटर

    नाशिकमध्ये पेट्रोल 106.48 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर

    लातूरमध्ये पेट्रोल 106.86 तर डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर

    कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर

    पुण्यात पेट्रोलचा भाव 106.61 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर

    सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.92 रुपये तर डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर

  • 25 Jan 2023 08:39 AM (IST)

    Maharashtra News Live | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर

    राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर

    2016 च्या कथित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर

    एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याची माहिती

    परवानगीशिवाय देश न सोडण्याचे न्यायालयाचे आदेश

    पुराव्यांशी छेडछाड करू नये, चौकशीसाठी वेळोवेळी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर

    अधिवक्ता मोहन टेकवडे यांची माहिती

  • 25 Jan 2023 08:28 AM (IST)

    IND vs NZ 3rd ODI : वनडे सीरीज जिंकली, टीम इंडियासाठी वाईट बातमी, हार्दिक पंड्याच टेन्शन वाढलं

    IND vs NZ 3rd ODI : न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना सुरु असताना ही बातमी आली. त्यामुळे हार्दिक पंड्याच टेन्शन नक्कीच वाढेल. वाचा सविस्तर…

  • 25 Jan 2023 08:27 AM (IST)

    IND vs NZ 3rd ODI : कॉल देऊन इशान फसला, अखेर सीनियरसाठी द्यावा लागला बळी, VIDEO

    IND vs NZ 3rd ODI : पॅव्हेलियनमध्ये परतताना इशान वैतागल्याच स्पष्ट दिसत होतं. वाचा सविस्तर….

  • 25 Jan 2023 08:27 AM (IST)

    भीमा नदीत रोज एक मृतदेह सापडत होता, सात दिवसांत सात मृतदेह

    अमोल ऐकत नसल्याने पुण्यात असलेल्या मोहन पवार यांचा मुलगा राहुलला फोन त्यांनी फोन केला आणि सर्व घटना सांगितली. जर अमोलने आमचे ऐकले नाही, तर आम्ही आमचा जीव देऊ, असे मोहन पवार यांनी राहुलला शेवटच्या क्षणी सांगितले होते..,वाचा सविस्तर..

  • 25 Jan 2023 08:27 AM (IST)

    IND vs NZ 3rd ODI : जिद्दीला सलाम, पेन किलर घेऊन न्यूझीलंडच्या बॅट्समनने भारताविरुद्ध ठोकलं शतक

    IND vs NZ 3rd ODI : स्नायुंच्या दुखापतीमुळे हा बॅट्समन लंगडत धावा घेत होता. वाचा सविस्तर….

  • 25 Jan 2023 08:21 AM (IST)

    Entertainment News Live | ‘पठाण’च्या पहिल्या शोनंतर प्रेक्षकांची पहिली प्रतिक्रिया; जाणून घ्या कसा आहे शाहरुखचा चित्रपट?

    शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पठाण’ आज प्रदर्शित

    फर्स्ट डे फर्स्ट शोनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर, वाचा सविस्तर..

  • 25 Jan 2023 08:05 AM (IST)

    नाशिकमध्ये शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित

    नाशिकमध्ये चित्रपटाचे शो हाउसफुल्ल

    मालेगाववरून चित्रपट पाहण्यासाठी चाहते आले नाशिकला

    नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दर्शवला चित्रपटाला विरोध

    मल्टिप्लेक्स थिएटर बाहेर पोलिसांचा बंदोबस्त

    कॉलेजरोडवरील सिनेमॅक्स थिएटरबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

  • 25 Jan 2023 07:59 AM (IST)

    वाहनाच्या पैशाच्या वादातून एका हॉटेल मालकावर चाकूने हल्ला

    नाशिक : जखमी हॉटेल मालकाची उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार,

    हल्लेखोरांनी हॉटेलच्या काचा फोडून केले नुकसान,

    मामेभावाने हल्ला केल्याची हॉटेल मालकाची तक्रार,

    उजव्या बाजूला कंबरेच्या खाली वार झाल्याने हॉटेल मालक गंभीर जखमी,

    घटनेचे सीसीटिव्ही फुटेज आले समोर.

  • 25 Jan 2023 07:50 AM (IST)

    औरंगाबादेत आज मराठवाडा स्तरीय अर्थसंकल्पाची बैठक

    औरंगाबादेत आज मराठवाडा स्तरीय अर्थसंकल्पाची बैठक होणार

    मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचं वार्षिक अर्थ नियोजन होणार

    उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार

    बैठकीला मराठवाड्यातील आठ खासदार 48 आमदार आणि सर्व मंत्री उपस्थित राहणार

    मराठवाड्याला यावर्षी किती निधी मिळणार? याचं नियोजन केलं जाणार

  • 25 Jan 2023 07:12 AM (IST)

    अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला तीन वर्षे सश्रम कारावास

    भंडारा : दोषी तरुणाला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली,

    राकेश राजकुमार पंचबुद्धे असं शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव,

    शिवीगाळ करण्याची ही घटना भंडारालगतच्या कारधा येथे 7 डिसेंबर 2020 रोजी घडली होती,

    साक्षी पुराव्याअंती आरोप सिद्ध झाल्याने आरोपी राकेश पंचबुद्धे याला तीन वर्षे कारावासची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

  • 25 Jan 2023 06:43 AM (IST)

    माघी गणेश जयंती निमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

    सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे

    तसेच विविध पालख्या देखील आज सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत आहेत

    सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव 22 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येत आहे

    श्री सिद्धिविनायकाची रथयात्रा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातून दुपारी 3.30 वाजता निघणार आहे

  • 25 Jan 2023 06:41 AM (IST)

    नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला अमरावती स्पेशल कॉरिडॉरद्वारे जोडण्याची मागणी

    नांदगाव खंडेशवर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथून 44 किलोमीटर अंतरावर कॉरिडॉर शक्य

    अमरावतीवरून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी तीन पर्याय

    अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या फायदाचा ठरू शकतो स्पेशल कॉरिडॉर

  • 25 Jan 2023 06:40 AM (IST)

    पदवीधर निवडणुकीमुळे अमरावतीत तीन दिवस ड्राय डे

    अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील मद्यविक्री 28 ते 30 तारखेपर्यत राहणार बंद

    बार, वाईन शॉपीसह सर्व दारू दुकाने राहणार बंद

    ड्राय डे विरोधात बार मालक न्यायालयाय याचिका दाखल करण्याची शक्यता

    निवडणूक आयोगाने दिले राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र

  • 25 Jan 2023 06:37 AM (IST)

    पुणे-सातारा महामार्गवरील व्यावसायिकांकडून खंडणी मागणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

     
     
    खेड शिवापूर इंडस्ट्रियल एरियातील व्यावसायिकांकडे मागितली खंडणी
     
    कार्तिक धुमाळ, प्रमोद सूर्यवंशी आणि उत्कर्ष कोंडे अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावं
     
    खेड शिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल
     
    काही दिवसांपासून व्यावसायिकांना खंडणी मागणे, भंगार देण्यासाठी दमदाटी करणे, रस्त्यात अडविणे, मारहाण करणे, असे घडत होते प्रकार
     
    या त्रासाला कंटाळून व्यावसायिकांनी पुणे ग्रामीण पोलिस आयुक्तांना दिलं होतं निवेदन
     
    निवेदनानंतर राजगड पोलिसांची कारवाई
  • 25 Jan 2023 06:31 AM (IST)

    गोंदियात जिल्हा परिषदेच्या शाळेत अग्नि तांडव, मध्यरात्री लागली आग

    आमगाव शहराच्या लगतच असलेली जिल्हा परिषदेच्या शाळेत रात्री अचानक आग लागली

    आगीमुळे जुनी कवेली लाकडाची इमारत संपूर्ण जळून खाक झाली

    आगचं कारण सध्या अस्पष्ट, कोणतीही जीवित हानी नाही

    वर्गातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले……

Published On - Jan 25,2023 6:28 AM

Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.