NEET UG 2024: नीट परीक्षा गैरव्यवहारात थेट लातूरमधील शिक्षक, विद्यार्थ्यांचे पैसे लातूरवरुन दिल्लीत व्हाय…

latur neet connection: नीट परीक्षेत गैरव्यवहार करत उमेदवारांना परीक्षा पास करून देण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहितीवरून नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पथकाने लातुरातून जाधव आणि पठाण यांना शनिवारी ताब्यात घेतले होते. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करून सोडून दिले होते.

NEET UG 2024: नीट परीक्षा गैरव्यवहारात थेट लातूरमधील शिक्षक, विद्यार्थ्यांचे पैसे लातूरवरुन दिल्लीत व्हाय...
नीट गैरव्यवहार प्रकरणात लातूरचे कनेक्शन समोर येत आहे.
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 10:40 AM

नीट यूजी परीक्षेतील घोटाळ्याचे महाराष्ट्रातील धागेदोरे उघड झाल्यानंतर आता 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी ताब्यात घेतलेल्या लातुरातील दोन शिक्षकांना चौकशीनंतर रात्री उशिरा सोडून देण्यात आले होते. मात्र, त्यांच्या सुटकेला 12 तासही उलटत नाहीत तोच रविवारी पुन्हा एक शिक्षकाला अटक करण्यात आली. नीटमध्ये गुण अधिकचे मिळवून देण्यासाठी लातूरचे दोन जण काम करत असल्याचे एटीएसच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांसह धाराशिव आणि दिल्ली येथील एक जण अशा चौघांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरहून पैसे धाराशिवला नंतर दिल्लीला पाठवण्यात येत होते.

आधी चौकशी सोडले, नंतर अटक

लातूर येथील संजय तुकाराम जाधव (४०, जि. प. प्राथमिक शाळा, टाकळी, ता. माढा) आणि जलिलखान उमरखान पठाण (३४, मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळा, कातपूर, ना. जि. लातूर) हे दोघे नीट परीक्षेत गैरव्यवहार करत उमेदवारांना परीक्षा पास करून देण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहितीवरून नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पथकाने लातुरातून जाधव आणि पठाण यांना शनिवारी ताब्यात घेऊन त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करून सोडून दिले होते. पठाणला रात्री अटक झाली आहे.

हे सुद्धा वाचा

फोनमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र अन्…

एटीएसने त्यांचे मोबाइल तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्या फोन गँलरीमध्ये 12 वर विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रांच्या प्रती आढळल्या. या सोबतच परीक्षा व उमेदवारांसंदर्भात अनेक व्हॉटस्ऍपचॅट आढळले. जलिलखान पठाण याने संजय जाधव पास काही प्रवेशपत्रांच्या प्रती आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात व्हॉट्सअप मेसेज पाठवल्याचे दिसून आले.

संशयित संजय जाधव याने पैशांच्या मोबदल्यात परीक्षा पास करण्याचे आश्वासन देऊन अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरन्ना मष्णाजी कोनगलवार (नेमणूक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरगा, जि. धाराशिव) यास व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवल्याचे कबूल केले. संजय जाधव याच्या माहितीनुसार, इरन्ना कोनगलवार हा पुढे दिल्ली येथील एका गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला. त्याच्या माध्यमातून नीट-२०२४ परीक्षेमध्ये पैशाचे मोबदल्यात प्रवेश मिळून देण्याचे अवैध काम करीत आहे. प्राथमिक चौकशीत दोषी आढळताच दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीने लातुरातील दोन शिक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Non Stop LIVE Update
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका.