Nashik| गोदावरी एक्स्प्रेस, इंटरसिटी रेल्वेगाड्या सुरू करा; खासदार गोडसे यांची मंत्री दानवे यांच्याकडे मागणी

कोरोनाची लाट आली आणि त्यामुळे मनमाड-गोदावरी एक्स्प्रेस बंद करण्यात आली. विशेष म्हणजे पंचवटी एक्स्प्रेसनंतर नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गाडी आहे.

Nashik| गोदावरी एक्स्प्रेस, इंटरसिटी रेल्वेगाड्या सुरू करा; खासदार गोडसे यांची मंत्री दानवे यांच्याकडे मागणी
मंत्री रावसाहेब दानवे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 11:44 AM

नाशिकः नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, इंटरसिटी प्रवासी रेल्वेगाड्या तात्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे केली. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, रेल्वे प्रतिनिधी आणि मासिक प्रवासी वेल्फेअर संघटनेचे राजेश फोकणे यांची उपस्थिती होती. त्यांनी मासिक पास सुरू करावा, अशी मागणी मंत्री दानवे यांच्याकडे केली.

कोरोनामुळे गाडी बंद

कोरोनाची लाट आली आणि त्यामुळे मनमाड-गोदावरी एक्स्प्रेस बंद करण्यात आली. विशेष म्हणजे पंचवटी एक्स्प्रेसनंतर नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गाडी आहे. अनेक व्यावसायिक आणि चाकरमान्यांचा रोज नाशिकला प्रवास असतो. त्यासाठी मनमाड, लासलगाव, निफाड, इगतपुरी, कसारा येथे जाण्यासाठीही नागरिकांनी ही गाडी अत्यंत सोयीची आहे. मुंबईला जाण्यासाठी सध्या इंटरसिटीसह पंचवटी एक्स्प्रेसच आहे. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेस एकदा सकाळी सात वाजता मुंबईला रवाना झाली की नंतर मुंबईला जाण्यासाठी दुसरी गाडी नाही. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. लांब पल्ल्याच्या गाड्या असतात, पण त्या सोयीच्या नाहीत.

पास सुरू करावा

कोरोनाच्या काळात मासिक, तिमाही आणि सहामाही पास बंद करण्यात आले. सध्या सर्व निर्बंध उठवल्यानंतर मध्य रेल्वे विभाग वगळता इतर ठिकाणी या पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. भुसावळ विभागात नाशिक हे सर्वात जास्त महसूल देणारे स्टेशन आहे. मात्र, येथील प्रवाशांना जास्त वेळ आणि पैसा खर्च करून प्रवास करावा लागतो आहे. याची मंत्री महोदय आणि रेल्वे विभागाने दखल घ्यावी. त्यामुळे इतर रेल्वे गाड्या सुरू करून, पासची योजनाही सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नाशिक-पुणे पावणेदोन तासांत

अवघ्या पावणेदोन तासात नाशिकहून थेट पुण्यालापोहचते करणाऱ्या नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या प्रकल्पासाठीच्या मार्गिका मोजण्याच्या कामाने सध्या गती पकडली असून, आतापर्यंत तब्बल 101 गावांपैकी 64 गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड हा राज्य सरकारच्या महत्त्वांक्षी प्रकल्पांपैकी एक असल्याने त्याला गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांतून सेमी हायस्पीड रेल्वे जाणार आहे. त्यासाठी नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील 1 हजार 470 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

इतर बातम्याः

Malegaon riots| मालेगाव दंगलीतील संशयित आरोपी शरण, पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीसह पोलिसांवर आरोपांच्या फैरी

Nashik| वृद्धेच्या गळ्यावर चाकू ठेवून हिरेजडीत दागिने लुटले; 3 कोऱ्या चेकवर सह्याही घेतल्या

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....