डॉ. माधुरी कानिटकर यांनी स्वीकारला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी आज (1 नोव्हेंबर) स्वीकारला. आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाचा मानदंड देऊन लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

डॉ. माधुरी कानिटकर यांनी स्वीकारला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार
Dr. Madhuri Kanitkar
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 10:02 PM

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी आज (1 नोव्हेंबर) स्वीकारला. आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाचा मानदंड देऊन लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

विद्यापीठाच्या कामकाजाची दिशा ठरवली जाणार

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा कार्यभार स्वीकारताना मला आनंद होत आहे. विद्यापीठ हे शिक्षणाचे केंद्र आहे. यामध्ये विविध विषयांवर संशोधन व उपक्रम होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाचे व्हिजन डॉक्यूमेंट तयार करुन कामकाज करणार आहे. यामुळे अल्प, मध्यम अणि दीर्घ मुदतीत विद्यापीठाच्या एकूणच कामकाजाची दिशा ठरवली जाणार आहे.

विद्यार्थी घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू

“माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सक्षमतेने पोहचणे शक्य होणार आहे. आरोग्य शिक्षण क्षेत्रात कोविड-19 च्या काळात आलेल्या अडचणींची पुनरावृती होऊ नये यासाठी व्यापक प्रमाणात बदलाची गरज आहे. यासंदर्भात विषयतज्ज्ञ व त्या-त्या क्षेत्राशी निगडीत लोकांचा सल्ला आाणि मार्गदर्शनाने कार्याची वाटचाल करु” असे कानिटकर त्यांनी सांगितले. तसेच संशोधन विद्यापीठाचे प्रमुख ध्येय असून त्या अनुषंगाने विशेष कार्य केले जाणार आहे. अंतर विद्याशाखा संशोधनावर भर दिला जाणार आहे. रुग्णाला पूर्ण बरे करण्यासाठी सर्वसमावेशक उपचार पद्धतीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने विद्यार्थी घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेदेखील कानिटकर म्हणाल्या.

विद्यापीठाचे कार्यक्षेत्र राज्यभर, चोखपणे होणारे कामकाज उल्लेखनीय 

विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले की, “प्रभारी कुलगुरुपदाचा कारकीर्दीत यादरम्यान आरोग्य शिक्षणाच्या विविध प्रशासकीय बाबींचा अभ्यास करता आला. विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठीचे काम, विविध बैठका, चर्चासत्र व उपक्रम यात सहभाग, परीक्षा कालावधीत कोविड-19 च्या परिस्थितीत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यांचा उल्लेख महत्वपूर्ण आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र राज्यभर आहे तसेच कमी मनुष्यबळ असताना चोख होणारे कामकाज उल्लेखनीय आहे. आरोग्य शिक्षणाची जागतिक भरारी विद्यापीठाने घेतली असून नवनियुक्त कुलगुरु लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या मार्गदर्शनाने विद्यापीठाच्या कार्याला नवी दिशा मिळेल,”

दरम्यान, कुलगुरुपदाच्या निवडीकरीता शासनाकडून शोध समिती गठीत करण्यात आली होती. त्याआधी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरु पदाचा कार्यभार पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळर यांच्याकडे होता. कुलपती कार्यालयाकडून आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. आभार प्रदर्शन परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

कोण आहेत माधुरी कानिटकर?

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1960 रोजी झाला. त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी बालरोगशास्त्र या विषयात एमडी पदवी प्राप्त केली. त्यांनी 2017 ते 2019 या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले. त्यांना अध्यापन व संशोधनाचा एकूण 22 वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे 2008 साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.

इतर बातम्या :

लज्जास्पद! मोहम्मद शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्काराच्या धमक्या? नेटीझन्स संतापले

मुंबईत नियम धाब्यावर बसवत प्रभाग फेररचना, भाजपचा आरोप; गांधीगिरी आंदोलनातून निषेध

स्वप्नांच्या शहरात स्वप्नातलं घर, गोरेगावात एकूण 787 कोटींचे फ्लॅट्सही विक्री, लॅविश लाईफ, हायप्रोफाईल सुविधांना प्रचंड प्रतिसाद

(left General Dr Madhuri Kanitkar take over charge of Vice-Chancellor of Maharashtra University of Health Sciences)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.