BJP: चारही एक्के भाजपाकडे, पाचवा एक्का आणणार कुठून ?, भाजपाच्या बड्या नेत्याचा शरद पवारांना सवाल

शिवसेना जाणीवपूर्वक भाजपला कमळाबाई असे हिणवते, यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, बाई म्हणत हिणविणे हा आईचा अपमान आहे.ज्यांची मानसिकता विकृत त्यांनी असे उल्लेख चालविले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अशांना सावित्रीबाई कधी समजल्याच नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

BJP: चारही एक्के भाजपाकडे, पाचवा एक्का आणणार कुठून ?, भाजपाच्या बड्या नेत्याचा शरद पवारांना सवाल
पाचवा एक्का आणणार कुठून, भाजपाचा सवाल
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 3:57 PM

चंद्रपूर – लोकसभा निवडणुका दोन वर्षांवर आल्या आहेत. अशा स्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करण्याच्या प्रयत्नात विरोधक आहेत. काँग्रेस अनेक राज्यांत कमकुवत झाल्यामुळे, देशातील काही वरिष्ठ नेते तिसऱ्या आघाडीच्या पर्यायाचा विचार करीत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), तेलगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा समावेश आहे. आता बिहारमध्ये भाजपासोबत सरकारमधून बाहेर पडून, राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे ही यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येते आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी नि्तीश कुमार आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याचे सांगण्यात येते आहे. अशा स्थितीत भाजपाकडून आता शरद पवार यांना लक्ष्य करण्यात येते आहे.

मोदी एवरेस्टप्रमाणे, विरोधकांकडे पर्याय नसल्याने शोध

विरोधकांना शोध घ्यावा लागतोय याचाच अर्थ त्यांच्याकडे पर्याय नाही असा टोला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. एव्हरेस्टला शोधावे लागत नाही तसेच मोदींचे आहे. असेही मुनगंटीवार म्हणाले.

चारही एक्के भाजपाकडे, विरोधकांकडे पाचवा एक्का येणार कसा?

पत्त्याच्या कॅट मधले चारही एक्के भाजपकडे असून पाचवा एक्का येणार कुठून? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे. देशातील सध्याच्या राजकीय वातावरणात भाजपासाठी सध्या चांगले वातावरण असल्याचा उद्देश या वक्तव्यामागे आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाला कमळाबाई म्हणून हिणवाऱ्यांचा समाचार

शिवसेना जाणीवपूर्वक भाजपला कमळाबाई असे हिणवते, यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, बाई म्हणत हिणविणे हा आईचा अपमान आहे.ज्यांची मानसिकता विकृत त्यांनी असे उल्लेख चालविले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अशांना सावित्रीबाई कधी समजल्याच नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही कमळाबाई नावाने हिणवणाऱ्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलेले आहे. आता उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेल्या शिवसेनेला पेंग्विन सेना म्हणायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर  शिवसेना विरुद्ध भाजपा हा संघर्ष तीव्र होताना दिसतो आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....