मुंडे प्रकरणावर बीड जिल्ह्यातील स्थानिक वर्तमानपत्रात काय?; वाचा बित्तंबातमी
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून या बातम्यांनी वर्तमानपत्रांचे रकानेचे रकाने भरून येत आहेत. (local newspaper focus on dhananjay munde rape case)
बीड: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून या बातम्यांनी वर्तमानपत्रांचे रकानेचे रकाने भरून येत आहेत. धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यातील वर्तमानपत्रातही या बातम्यांवर भर देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक वर्तमानपत्रांनी तटस्थपणे या प्रकरणावर इत्थंभूत बातम्या दिल्या आहेत. (local newspaper focus on dhananjay munde rape case)
‘सक्रीय न्यूज’ने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रतिक्रियेवर अधिक फोकस केला आहे. ‘धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर पक्ष म्हणून योग्य निर्णय घेतला जाईल- शरद पवार’ असा मथळा देऊन ‘सक्रीय न्यूज’ने पवारांची बातमी दिली आहे. ही बातमी अत्यंत छोटी असली तरी बातमीत कोणतंही भाष्य केललं नाही. ‘सक्रीय न्यूज’ने या प्रकरणावर आणखी एक बातमी दिली आहे. “त्या” महिले विरोधात भाजप नेत्याची पोलिसात तक्रार……धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळे वळण” या हेडिंगने बातमी देऊन मुंडे प्रकरणात ट्विस्ट आल्याचं म्हटलं आहे.
‘प्रजापत्र’ने ‘धनंजय मुंडे राजीनाम्याच्या तयारीत?’ अशा मथळ्याने बातमी दिली आहे. या बातमीत मुंडे यांची पवारांची भेट, पवारांची प्रतिक्रिया, मुंडेंचा जनता दरबार आदींचा सिक्वेन्स जोडून धनंजय मुंडे राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं आहे. ‘प्रजापत्र’ने ‘धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या ‘त्या’ महिलेकडून मलाही हनी ट्रॅपमद्ये अडकवण्याचा प्रयत्न’ अशी हेडिंग देऊन हनी ट्रॅप प्रकरणावर प्रकाशझोत टाकला आहे.
सूचक बातमीपत्रं
‘बीड सिटीझन’नेही पवारांच्याच प्रतिक्रियेची पहिली हेडिंग केली आहे. ‘शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घेणार…’ असं हेडिंग ‘बीड सिटीझन’ने केलं आहे. हे हेडिंग करताना ‘गंभीर’ आणि ‘निर्णय घेणार’ हे दोन शब्द लाल अक्षरात दाखवले आहेत. त्यातून मुंडे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचं सिटीझनला सूचवायचं आहे. बातमीत पवार आणि मुंडेंचा फोटो वापरण्यात आला आहे. पवारांचा अत्यंत गंभीर मुद्रेचा आणि मुंडेंच्या चेहऱ्यावर तणाव असल्याचा सूचक फोटोही वापरून सिटीझनने या बातमीचं गांभीर्य अधोरेखित केलं आहे. (local newspaper focus on dhananjay munde rape case)
हनी ट्रॅप ते राष्ट्रवादी बैठक
‘लोकाशा-बंब न्यूज’नेही ‘धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर संक्रात’ असा मथळा दिला आहे. या बातमीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांची पाठराखण केली तरी शरद पवारच मुंडे यांच्या भवितव्याचा निर्णय घेतील, असं सांगत मुंडे यांच्या मंत्रिपदावर संक्रात आल्याचं म्हटलं आहे. ‘लोकाशा’ने ‘राष्ट्रवादीच्या कोअर टीमची तातडीची बैठक, धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर चर्चा’ या हेडिंगने दुसरी बातमी देऊन राष्ट्रवादीच्या बैठकीवर भाष्य केलं आहे. ‘लोकाशा’ने पहिल्या पानावर मुंडे प्रकरणाची सेकंड लीड केली आहे. या बातमीला ‘धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीकडून पाठराखण तर राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक’ असं हेडिंग दिलं आहे. काल दिवसभरात झालेल्या घटनेचा त्यातून आढावा घेण्यात आला आहे. ‘धनंजय मुंडे ब्लॅकमेलिंग प्रकरण : मनसेच्या मनिष धुरींसोबतही असाच प्रकार घडला’ या हेडिंगने ‘कार्यारंभ लाईव्ह’ने बातमी दिली आहे. या बातमीत हनी ट्रप प्रकरणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. (local newspaper focus on dhananjay munde rape case)
Dhananjay Munde Case | धनंजय मुंडेंचा छळ झाला, ते त्रासात होते : जयंत पाटीलhttps://t.co/v24xJEMIGb#jayantpatil | #DhananjayMunde | #ncp | @Jayant_R_Patil
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2021
संबंधित बातम्या:
पंकजा मुंडे कुठे आहेत?; मौनामागचं कारण काय?
Dhananjay Munde | बलात्काराच्या आरोपांनंतरही धनंजय मुंडेंवरील कारवाई राष्ट्रवादीने का टाळली?
Dhananjay Munde LIVE: रेणू शर्माने मलाही ब्लॅकमेल केलं; मुंडेंच्या मेव्हण्याची पोलिसात तक्रार
(local newspaper focus on dhananjay munde rape case)