समूहाने पाण्यात अडकल्यास सर्वांना कसे वाचवाल? लोणावळ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर चीनमधील व्हिडिओ व्हायरल

Lonavala Bhushi Dam: जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी X वर टि्वट केलेल्या या व्हिडिओला लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. त्याला अनेकांनी लाईक केले आहे. तसेच त्यावर अनेकांनी कॉमेंट केल्या आहेत. अनेक जणांनी हा व्हिडिओ रिपोस्ट केला आहे.

समूहाने पाण्यात अडकल्यास सर्वांना कसे वाचवाल? लोणावळ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर चीनमधील व्हिडिओ व्हायरल
china viral video
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 12:35 PM

लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या पाच जणांचा पाण्याचा प्रवाहात वाहून मृत्यू झाला. या घटनेनंतर पर्यटनस्थळावर अतीधाडस करण्याऱ्यांसंदर्भात प्रशासन कठोर झाले आहे. पर्यटनस्थळासंदर्भात पुणे जिल्हाधिकारींनी नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये आता पाण्याचे धबधबे, दऱ्या, अभयारण्ये आदी ठिकाणी जाण्यावर निर्बंध लादले आहेत. पुणे शहरातील अन्सारी कुटुंबातील साहिस्ता लियाकत अन्सारी (वय- 36), अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 13), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 8) अदनान अन्सारी (वय- 4), मारिया अन्सारी (वय- 9) या पाच जणांचा लोणावळ्यात बुडून मृत्यू झाला. आता ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी चीनमधील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जोराच्या पाण्याच्या प्रवाहात समूह अडकल्यावर कसे वाचता येईल, ते दिले आहे.

अन्सारी कुटुंबासारखी चूक नको

पाण्यात मधोमध जाण्याचे धाडस कोणीही करायला नको. परंतु कधी प्रवाहात समूह अडकल्यास स्वत:चे आणि इतरांचे प्राण कसे वाचवावे? यासंदर्भातील प्रशिक्षण चीनमध्ये देण्यात आले. लोणावळ्यातील समूह पाण्यात अडकल्यावर गोल रिंगण करुन उभा राहिला होता. परंतु पाण्याचा प्रवाहाच्या शक्तीपुढे त्यांची ताकद कमी पडली. परंतु त्यांनी चीनमधील त्या प्रशिक्षणातील व्हिडिओ पहिला असता, ते तंत्र अवलंबले असते तर त्यांचा जीव वाचला असता.

हे सुद्धा वाचा

काय आहे चीनमध्ये दिलेले ते प्रशिक्षण

लोणावळा घटनेचा पार्श्वभूमीवर चीनमधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या प्रशिक्षणातील व्हिडिओमध्ये पाण्यात अडकल्यास गोल रिंगण न करता एकामागे एक रांगेत एकमेकांना घट्ट पकडावे. त्यावेळी पाण्याचा प्रवाहाविरोधात सर्व समूहाची शक्ती कार्यरत होते. तसेच प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्याची मदत मिळते. पहिल्या क्रमांकावर असलेल्या व्यक्तीलाही शेवटी उभा असलेल्या व्यक्तीची मदत मिळते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह त्या लोकांना वाहून नेऊ शकत नाही. काही मिनिटे या पद्धतीने तग धरल्यास इतरांची मदत मिळू शकते. त्यामुळे समुहातील सर्वांचे जीव वाचू शकतात.

जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी X वर टि्वट केलेल्या या व्हिडिओला लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. त्याला अनेकांनी लाईक केले आहे. तसेच त्यावर अनेकांनी कॉमेंट केल्या आहेत. अनेक जणांनी हा व्हिडिओ रिपोस्ट केला आहे.

हे ही वाचा

लोणावळा भुशी डॅम्पवरील पर्यटक वाहण्याचा थरारक व्हिडिओ, अंगावर शहारे आणणारी घटना पाहून तुम्हाला बसेल हादरा

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.