ASHA Workers Strike | राज्यातील 72 हजारांहून अधिक आशा वर्कर्स आजपासून संपावर, मागण्या काय?

वारंवार सांगूनही सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करुनही त्यांना कमी मानधन दिले जात आहे. (Maharashtra ASHA Workers Strike Today)

ASHA Workers Strike | राज्यातील 72 हजारांहून अधिक आशा वर्कर्स आजपासून संपावर, मागण्या काय?
ASHA worker (फोटो प्रातनिधिक)
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 10:44 AM

मुंबई : योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध सुविधा मिळाव्यात यासाठी आजपासून राज्यातील आशा वर्कर्सने संपाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आमचा संपर्क सुरुच राहिल, असा निर्णय आशा वर्कर्सने घेतला आहे. यानुसार राज्यातील 72 हजाराहून अधिक आशा वर्कर कामावर न जाता घरी बसून हा संप करत आहेत. (Maharashtra ASHA Workers Strike Today demand better pay for Covid duties)

वारंवार सांगूनही सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करुनही त्यांना कमी मानधन दिले जात आहे. त्यामुळे राज्यभरातील 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तक संपाची हाक दिली आहे. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागण्या काय?

?कोरोना काळात केंद्र सरकार 33 रुपयांप्रमाणे 1000 रुपये देते तेही वेळेवर नाही. त्यासाठी रोज 300 रुपये मानधन मिळावं. ?आशा, गट प्रवतर्क महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बेड राखीव असावेत. ?आशां ना मास्क, पीपीइ किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर पुरेशा प्रमाणात मिळत नाही, त्यामुळे सॅनिटायझर, मास्क यांसह सुरक्षेचे साधनं मिळावीत. ?तब्बल 3 हजाराहून आशा कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला मात्र सरकारकडून विमा किंवा आरोग्य सुविधा दिली जात नाही. ?अनेक आशांचे आणि कुटुंबियांचे कोरोनात मृत्यू झाले, त्यांनाही सुविधा देण्यात आलेल्या नाही. ?नियमानुसार 4 तास काम करणे अपेक्षित असताना 12 तास काम करावे लागते. ?कोरोनासाठी जवळपास सर्व प्रकारची सहाय्यता करावी लागते.

निर्णायक लढाई हाच पर्याय

आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य आयुक्त इत्यादी सर्वांशी वेळोवेळी बोलणे झाले आहे. गेल्या दीड वर्ष कोरोना काळात आशांनी काम केले आहे. अजूनही करत आहेत. मात्र सरकारने आश्वासन वगळता काहीच दिले नाही. ना आरोग्य सुरक्षा, ना विमा, ना योग्य मानधन…त्यामुळे निर्णायक लढाई हाच पर्याय सरकारनेच आशांपुढे ठेवला आहे, असे आशा वर्कर संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. (Maharashtra ASHA Workers Strike Today demand better pay for Covid duties)

संबंधित बातम्या :

Asha Workers Protest | आशा वर्कर्स आजपासून संपावर, योग्य मानधन देण्याची मागणी

PAN Aadhaar Linking: 30 जूनपर्यंत पॅनकार्ड आधारला लिंक न केल्यास होणार रद्द, भरावा लागणार दंड

Corona Cases In India | देशात नवे कोरोनाग्रस्त 60 हजारांच्या घरात, कोरोनाबळींतही 1200 ने घट

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.