यंदाच्या निवडणुकीत शरद पवारांची ‘यंग ब्रिग्रेड’ मैदानात, तरुण चेहऱ्यांची संख्या अधिक

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची ‘यंग ब्रिग्रेड’ मैदानात उतरली आहे. शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या यादीत तरुण चेहऱ्यांची संख्या अधिक आहे. शरद पवार हे १९७८ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले.

यंदाच्या निवडणुकीत शरद पवारांची ‘यंग ब्रिग्रेड’ मैदानात, तरुण चेहऱ्यांची संख्या अधिक
यंदाच्या निवडणुकीत शरद पवारांची ‘यंग ब्रिग्रेड’ मैदानात
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 7:49 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. शरद पवार हे अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज नेते, मंत्री शरद पवार यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना तरुण कार्यकर्त्यांनी शरद पवारांना साथ दिली. विशेष म्हणजे शरद पवार गटातील अनेक तरुण चेहरे देखील संकटकाळात शरद पवार यांच्यासोबत राहीले. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून देखील यंदाच्या निवडणुकीत तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची ‘यंग ब्रिग्रेड’ मैदानात उतरली आहे. शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या यादीत तरुण चेहऱ्यांची संख्या अधिक आहे. शरद पवार हे १९७८ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. पक्ष फुटीनंतर यंदाची निवडणूक ही पक्षासाठी महत्त्वाची असताना पक्षाकडून नव्या नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे.

पक्षातील कमी वयाचे उमेदवार

  1. तासगावचे उमेदवार रोहित पाटील – २५ वर्षे
  2. मोहोळच्या उमेदवार सिद्धी कदम – २६ वर्षे
  3. कारंजाचे उमेदवार ज्ञायक पटणी – २६ वर्षे
  4. अकोलेचे उमेदवार अमित भांगरे – २७ वर्षे
  5. अणुशक्तीनगरचे उमेदवार फहाद अहमद – ३२ वर्षे
  6. बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार – ३३ वर्षे
  7. आष्टीचे उमेदवार मेहबूब शेख – ३८ वर्षे
  8. कर्जत जामखेडचे उमेदवार रोहित पवार – ३९ वर्षे

शरद पवार यांच्या पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. विविध पक्षांचे दिग्गज नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. यापैकी अनेक नेत्यांना शरद पवारांनी त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपातून शरद पवार गटात आलेले समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील या दिग्गज नेत्यांनादेखील शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे. हे नेते निवडून आले तर महायुतीला मोठा फटका बसणार आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने राज्यात 10 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 8 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाली होती. साताऱ्याच्या जागेचा अवघ्या काही मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला.

Non Stop LIVE Update
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?.
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात.
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात.
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी.
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”.
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात.
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?.
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला.
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?.
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट.