LIVE | संगमनेरमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग

| Updated on: Apr 27, 2021 | 11:05 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | संगमनेरमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Apr 2021 10:14 PM (IST)

    संगमनेरमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला भीषण आग

    संगमनेर :

    महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला आग अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील घटना अचानक आग लागल्याने व्यापाऱ्यांची धावपळ बाजार समितीच्या आवारातील गोडाऊनला भीषण आग गोडाऊन मधील कापसाच आणि मक्याचे आगीत मोठे नुकसान 3 अग्निशामक घटनास्थळी दाखल आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

    आग रात्री 9 वाजेच्या सुमारास लागल्याची प्राथमिक माहिती असून गोडावुनमध्ये कापुस, मका, बाजरी, गहू आदी धान्य असल्याने आगीने रौद्र रुप धारण केलंय. अकोले, राहाता, कोपरगाव, संगमनेर, शिर्डी आदी ठिकाणचे अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात कोट्यवधीच धान्य भस्मसात झालंय. सुदैवाने जीवितहानी नाही.

  • 27 Apr 2021 10:14 PM (IST)

    दिल्लीचा तिसरा फलंदाज माघारी, पृथ्वी शॉ 21 धावांवर बाद

    दिल्लीने तिसरी विकेट गमावली आहे. पृथ्वी शॉ 21 धावांवर बाद झाला आहे. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक एबी डिव्हिलियर्सने सोपा झेल घेत शॉला बाद केलं.

  • 27 Apr 2021 10:12 PM (IST)

    दौंड तालुक्यातील पाटस येथे प्रेयसीच्या मदतीने पतीकडून सात वर्षाच्या मुलासह पत्नीचा खून

    दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे सात वर्षाच्या मुलासह आईचा मृत्यू

    माय-लेकरांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

    यवत पोलिसांनी लावला अवघ्या पाच तासात छडा..

    पतीनेच केला पत्नी आणि मुलाचा प्रेयसीच्या मदतीने खून

    लिना सचिन सोनवणे आणि ओम सोनवणे अशी मृत मायलेकरांची नावे

    सचिन सोनवणे याला यवत पोलिसांनी घेतले ताब्यात..

  • 27 Apr 2021 08:47 PM (IST)

    फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्याला लाथा बुक्यांनी मारहाण

    नालासोपारा: नालासोपारा पूर्व रहमत नगर येथील स्टार बेकरी समोर फेरीवाल्यावर कारवाई करायला गेलेल्या वसई विरार महानगरपालिकेचे अधिकाऱ्याला फेरीवाल्यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा एक विडीयो वायरल झाला आहे.

    सोमवारी सायंकाळी सहा वाजता विभाग समिती -बी मधील कर्मचारी मधुकर गणपत डोंगरे (वय 46) हे त्यांच्या पथकासह नालासोपारा पूर्व रहमत नगर भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. कारवाई करताना फेरीवाल्यांनी पालिकेच्या अधिका-याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. फेरीवाल्यांनी त्यांना शिवीगाळ ही केली आणि त्यानंतर फेरीवाल्यांनी डोंगरेवर हल्ला केला. १० ते १२ जणांच्या जमावांनी डोंगरे यांना जमिनीवर फेकले आणि लाथा बुक्यांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी तुलिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आतापर्यंत चार जणाना अटक ही करणयात आली आहे.

  • 27 Apr 2021 07:57 PM (IST)

    ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन कोरोनाबाधित महिला आरोपीची आत्महत्या

    पुणे –

    – ससून रुग्णालयातील कोविड इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मोक्काच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दीप्ती काळे या महिलेने आत्महत्या केली..

    – आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली..

    – दीप्ती काळे हिच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे पुणे पोलीस आणि तिच्यावर आजच मोक्का अंतर्गत कारवाई केली होती..

    – पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणच्या एका गुन्ह्यात काही दिवसांपूर्वी अटक केली होती..

    – त्यानंतर तिचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला ससून रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये ॲडमिट करण्यात आले होते..

    – दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास तिने रुग्णालयातील बाथरूम मधून खाली उडी मारली..

    – यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला

  • 27 Apr 2021 07:27 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 3871 नवे कोरोनाबाधित, 82 रुग्णांचा मृत्यू

    पुणे कोरोना अपडेट : – दिवसभरात ३८७१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ६१५९ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ८२ रुग्णांचा मृत्यू. २५ रूग्ण पुण्याबाहेरील. – १३६८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४०६५२६. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४५०७५. – एकूण मृत्यू -६६११. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३५४८४०. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १६६५०.

  • 27 Apr 2021 07:17 PM (IST)

    परमबीर सिंग यांची चौकशी होणार

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांची आता चौकशी होणार आहे.

  • 27 Apr 2021 05:51 PM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस

    पिंपरी चिंचवड

    -शहरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस सुरु

    -दुपार पासून उन्हाचा तडाखा वाढला होता

    -वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना गरमी पासून दिलासा

  • 27 Apr 2021 04:26 PM (IST)

    मुंबई : भांडुपमध्ये महानगर गॅस लीक, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

    मुंबई : भांडुपमध्ये महानगर गॅस लीकेज, गाढव नाका परिसरात अग्निशमन दलाची गाडी पोहोचली, लीकेज बंद करण्याचे काम शर्थीने सुरु, कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही

  • 27 Apr 2021 04:23 PM (IST)

    सटाणा तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

    सटाणा : तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, तालुक्यातील मुल्हेर, हरणबारी, जेतापुर, मालीवाडे या भागाला पावसाने काढले झोडपून, अचानक आलेल्या पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान, दमदार पाऊस झाल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा

  • 27 Apr 2021 03:36 PM (IST)

    मुंबईत काँग्रेसकडून जाहिरात कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

    मुंबईतील अंधेरीत कांग्रेस आक्रमक,

    -स्टोरीया फूड्स या कंपनीच्या ऑफिसमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाई जगताप यांच्या नैतृत्वात केली तोडफोड. – या कंपनीने एक जाहिरात बनवलेली, ज्यात काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य दाखवले गेले – त्याच्या निषेधार्थ आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या आदेशानुसार मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस व युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी पूर्व येथील स्टोरीया फूड्सच्या कार्यालयाची तोडफोड केली. – त्यानंतर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. – याबाबत अधिक माहिती देताना भाई जगताप म्हणाले की आमचे नेते आदरणीय राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल जाहिरातीत आक्षेपार्ह दाखविण्यात आले. ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांना आम्ही चांगलाच धडा शिकवलेला आहे. ही जाहिरात ताबडतोब बंद झाली पाहिजे आणि स्टोरीया फुड्स कंपनीने जाहीररीत्या माफी मागावी अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन मुंबई काँग्रेस करेल. – स्टोरीया फुडसचे कार्यालय आम्ही बंद पाडू, असा इशारा भाई जगताप यांनी दिलाय

  • 27 Apr 2021 03:11 PM (IST)

    पुणे महापालिकेकडून 19 दिवसात 25 लाखांचा दंड वसूल

    पुणे –

    – पुणे महापालिकेकडून 19 दिवसात 25 लाखांचा दंड वसूल,

    – निर्बंध मोडणाऱ्या पुणेकरांना महापालिकेने १९ दिवसांत २५ लाख ७६ हजार ८७० रुपयांचा दंड ठोठावला,

    – महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत कारवाई,

    – सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणे, मास्क न वापरणे अशा कारणांमुळे दंड ठोठावण्यात आलाय,

    – कडक निर्बंधांमुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली असली तरी किराणा दुकाने, भाजी, फळ विक्री दुकानांत शिस्तीचे पालन केले जात नाहीय,

    – तसेच सोसायट्यांचे परिसरात नागरिक मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणे असे बेशिस्त वर्तन सुरूच आहे,

    – मास्क न घातल्यास ५०० रुपये तर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्याने १ हजार रुपयांचा दंड केला जात आहे,

    – पालिकेने निर्बंध आणल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत २२ एप्रिल पर्यंत १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलीय,

  • 27 Apr 2021 01:37 PM (IST)

    पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा रोखठोक इशारा

    कोरोनाच्या काळात रुग्णवाहिका, शववाहिका आणि अंत्यविधीच्या नावाखाली लूट केली तर त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला इशारा

    -रुग्णवाहिका आणि शववाहिकेचे 25 किलोमीटर साठी 500 रुपये ते 1000 रुपये इतकेच बिल अदा करावे.

    -यापेक्षा एक रुपयाची ही जास्तीची मागणी केली तर थेट त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांशी 9529691966. या क्रमांकावर संपर्क साधावा असं जाहीर केलंय.

  • 27 Apr 2021 12:47 PM (IST)

    जिल्ह्या बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला मी उत्तर देण्यास बंधनकारक नाही- सुजय विखे

    मी किती रेमडिसिव्हर इंजेक्शन आणले याचा उल्लेख केलेला नाही…

    मी यावर राजकारण करू इच्छित नाही, ज्यांनी कोणी टीका केली असेल माझी बांधिलकी माझ्या नगर जिल्ह्याच्या जनतेसोबत आहे…

    नगर जिल्ह्यात 12 आमदार आहे या एकाही आमदाराने प्रश्न उपस्थित केला, की नेमकी त्याच्यात काय होतं ही सगळी फसवेगिरी आहे, हा स्टंट आहे तर मी त्यांना उत्तर द्यायला बंधनकारक आहे मात्र जिल्ह्या बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला मी उत्तर देण्यास बंधनकारक नाही

  • 27 Apr 2021 11:57 AM (IST)

    राज्यात कडक लॉकडाऊन मग भिवंडीत सूट?

    कोरोना विषाणीच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कडक लॉकडाऊन सुरु आहे. मग भिवंडी शहराला त्यातून सूट दिली आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी प्रशासनाने पास अत्यावश्यक केले असताना भिवंडी शहरात सर्रासपणे वाहनांची ये जा सुरु आहे.

  • 27 Apr 2021 10:33 AM (IST)

    शिरुरला अवकाळीने झोडपलं, बळीराजाचं नुकसान

    पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसराला आज पहाटेच्या सुमारास गारपीटीसह अवकाळी पावसाने झोडपले. अचानक पडलेल्या या गारपीटीच्या पावसाने बळीराजा शेतकऱ्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र या अवकाळी पावसाने दिलासा मिळाला असून वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.

  • 27 Apr 2021 09:54 AM (IST)

    जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टपरी चालकानी गळफास घेऊन आत्महत्या

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टपरी चालकानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या केलेल्या रमेश रामकिशन गुरूभैये यांचे न्यू लक्ष्मी नाष्टा सेंटर नावाचे हातगाडीवर हॉटेल होते. लाॅकडाऊनमुळे धंदा बंद पडला आर्थिक विवंचनेतून चिंता निर्माण झाली होती. याच कारणाने त्याने आत्महत्या केली आहे असे बोलले जात आहे. अधिक तपास जालना पोलीस करत आहेत.

  • 27 Apr 2021 09:44 AM (IST)

    इचलकरंजीत ट्रकची समोरासमोर धडक, दोघे जखमी, ट्रॅफिक जाम, बघ्यांची गर्दी

    शहरातील यड्राव फाटा येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जण गंभीर जखमी

    यड्राव फाटा येथे भीषण अपघात दोन ड्रायव्हर रुग्णालयात उपचार सुरू

    यड्राव फाटा दोन्ही ट्रक समोर समोर अपघात झाल्यामुळे मोठे नुकसान

    घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली पोलीस दाखल

    सकाळच्या सुमारास अपघात झाल्यामुळे ट्राफिक जाम मोठ्या प्रमाणात झाले होते

  • 27 Apr 2021 09:37 AM (IST)

    छोटा राजन कोरोना पॉझिटिव्ह

    अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोना पॉझिटिव्ह

    तिहार तुरुंगात होता राजन

    उपचारासाठी त्याला एम्स रुग्णालयात केलं आहे भर्ती

  • 27 Apr 2021 09:22 AM (IST)

    कोरोना ड्युटीमुळे आरोग्यमंत्र्यांना जेवायला वेळ मिळेना, राजेश टोपेंचा व्हिडीओ समोर

    राज्यातील आरोग्य सेवेच्या मिशनवर असलेल्या राजेश टोपे यांना त्यांच्या बिझी शेड्युल्ड मधून जेवणासाठीही वेळ मिळत नसल्यामुळे वेळी अवेळी गाडीत बसून जेवण करावं लागत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे

  • 27 Apr 2021 08:56 AM (IST)

    मिरज कोल्हापूर रस्त्यावर अपघात

    मिरज कोल्हापूर रस्त्यावर टेम्पो धडकेत एक लहान बालक ठार तर एक बालक गंभीर जखमी…

    संतप्त नातेवाईकांनी टेम्पो वर दगड फेक करून टेम्पो फोडला….

  • 27 Apr 2021 08:09 AM (IST)

    सालापुरात रात्री झालेल्या अवकाळी कुर्बान हुसेन नगर झोपडपट्टीतील घरांची पडझड

    सोलापूर –

    रात्री झालेल्या अवकाळी कुर्बान हुसेन नगर झोपडपट्टीतील घरांची पडझड

    तर शहरातील चार ठिकाणची झाडे उन्मळून पडली

    ग्रामीण भागातही अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान

  • 27 Apr 2021 07:28 AM (IST)

    गोकुळ दूध संघासाठी जिल्ह्यात 35 केंद्रांवर होणार मतदान

    कोल्हापूर

    गोकुळ दूध संघासाठी जिल्ह्यात 35 केंद्रांवर होणार मतदान

    कोरोना प्रादुर्भावामुळे यावेळी पहिल्यांदाच मतदान केंद्रांची विभागणी

    गर्दी टाळण्यासाठी तालुक्यांच्या ठिकाणी मतदान केंद्र

    मतदान केंद्रांची ठिकाण झाली निश्चित, तयारीला वेग

    गोकुळ साठी 2 मे ला होणार मतदान तर 4 मे ला होणार मतमोजणी

    रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात होणार मतमोजणी

  • 27 Apr 2021 07:25 AM (IST)

    कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस आज पासून रद्द

    कोल्हापूर

    कोल्हापूर मुंबई मार्गावर धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेस आज पासून रद्द

    पुढचे तेरा दिवस ही रेल्वे सेवा राहणार खंडित

    कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमूळे प्रवासी संख्या कमी झाल्याचा परिणाम

    किमान प्रवासही मिळत नसल्याने रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय

    तिरुपती, कोयना, महाराष्ट्र आणि धनबाद एक्सप्रेस रेल्वे सेवा मात्र सुरू राहणार

  • 27 Apr 2021 06:46 AM (IST)

    विरार विजय वल्लभ दुर्घटना प्रकरणात आरोपींच्या 2 दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ

    विरार विजय वल्लभ दुर्घटना प्रकरणात आरोपींच्या 2 दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ

    25 एप्रिलला हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या 2 डॉक्टरला केले आहे अटक

    डॉ. दिलीप शहा आणि डॉ. शैलेश पाठक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव

  • 27 Apr 2021 06:44 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीच्या सुमारास वादळी वारा 

    गडचिरोली –

    जिल्ह्यात काल रात्रीच्या सुमारास वादळी वारा

    गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भाग असलेल्या अहेरी एटापल्ली भामरागड सिरोंचा मुलचेरा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळ

    काही तास विद्युत सेवा खंडित

    दूरध्वनी सेवाही खंडित

  • 27 Apr 2021 06:42 AM (IST)

    आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स

    आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स

    केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर गेलेल्या महाराष्ट्र केडरच्या आयपीएस रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात बजावण्यात आले आहे सम्मन्स

    रश्मी शुक्ला ह्याना हा सम्मन हैदराबादमध्ये देण्यात आल्याची माहिती

    हैदराबादच्या डीजीपीच्या हस्तक्षेपाने रश्मी शुक्ला ह्याना देण्यात आला सम्मन

    सायबर सेलच्या तपास पथक दिल्लीलाही गेले असल्याची माहिती

    महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने है समन्स बजावले आहे

    रश्मी शुक्ला एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचा बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचा आरोप आहे

  • 27 Apr 2021 06:41 AM (IST)

    नागपुरात पटेल आरा मशीन येथे मोठी आग

    नागपूर –

    भंडारा रोडवर कापसी भागात सुरुची कंपनीमागील पटेल आरा मशीन येथे मोठी आग. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी

Published On - Apr 27,2021 10:17 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.