Maharashtra News LIVE Update | मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 861 प्रवाशांची चाचणी, तिघांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटस जाणून घ्या टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर
हवामान खात्याने मुंबई मध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळ मुळे पाऊस पडत आहे.तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अजूनही सुरुच असून अनिल परब (Anil Parab) यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा सुरु असून त्यावर आज तोडगा निघतो का हे पाहावं लागणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) राज्यसभेच्या (Rajya Sabha) बारा खासदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. यासोबतच महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –
LIVE NEWS & UPDATES
-
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 861 प्रवाशांची चाचणी, तिघांना कोरोनाची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली !
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज 861 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर करण्यात आली होती
त्यापैकी 3 जणांची आरटीपीसीआर पॉझिटिव्ह
आतापर्यंत 28 जणांचे अहवाल जनुकीय चाचणीसाठी पाठवले
12 नमुने एन आय व्हीमध्ये तर 16 नमुने कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेत
आरोग्य विभागाची माहिती
-
केपटाऊनहून डोंबिवलीत आलेल्या रुग्णासोबत प्रवाशाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
कल्याण डोंबिवलीला दिलासा
केपटाऊनहून डोंबिवलीत आलेल्या रुग्णासोबत दिल्ली ते मुंबई विमान प्रवास करणाऱ्या 50 वर्षीय प्रवाशाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
50 वर्षीय प्रवाशाच्या 2 कुटुंबीयांची टेस्ट निगेटिव्ह
केडीएमसी आरोग्य विभागाची माहिती
-
-
पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियाहून आलेल्या आणखी एकाला कोरोनाची लागण
-पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियाहून आलेल्या आणखी एकाला कोरोनाची लागण
-तसेच त्यांच्या संपर्कात आलेले आणखी दोघे पॉझिटिव्ह
-त्यामुळे आतापर्यंत नायजेरियाहून आलेले 3 आणि त्यांच्या संपर्कातील 3 असे सहा पॉझिटिव्ह आढळले
-या सर्वांचे घशातील द्रव हे ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या तपासणीसाठी जिनोम सिक्वेंसिंगकरिता पाठविण्यात आले आहेत.
– सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर महापालिकेचे जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू
-
आज राज्यभरात 498 एसटी कर्मचारी निलंबित, 36 जणांच्या सेवा समाप्त
आज राज्यभरात 498 एसटी कर्मचारी निलंबित
आतापर्यंत एकुण 9 हजार 141 कर्मचारी निलंबित
आज एकूण 36 जणांच्या सेवा समाप्त
आतापर्यंत 1 हजार 928 जणांच्या सेवा समाप्त
-
पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी : देवेंद्र फडणवीस
मुंबई : पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली पाहिजे
मागच्या काळात सरकारने घोषणा खूप केल्या पण मदत पोहोचली नाही – देवेंद्र फडणवीस
-
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली पक्षनेते आणि सरचिटणीसांची बैठक
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली पक्षनेते आणि सरचिटणीसांची बैठक.
उद्या सकाळी 11 वाजता ‘शिवतीर्थ’ येथे होणार बैठक.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पक्षाच्या व्यूहरचनेबाबत होणार बैठकीत चर्चा.
-
1 हजार प्रवासी महाराष्ट्रात आले, ऑमिक्रॉनचे रुग्ण सापडण्याची शक्यता, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे
पुणे : भारतात ऑमिक्रॉनचे रुग्ण सापडण्याची शक्यता आहे
कारण दक्षिण आफ्रिकेत पहिला रुग्ण हा 8 नोव्हेंबरला आढळून आला आणि संशोधन होऊन 25 नोव्हेंबरला त्याचं निदान झालं
मात्र 8 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान साधारण 1 हजार प्रवासी हे महाराष्ट्रात आलेत
ऑमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत त्यामुळे त्यांच्यामधून प्रसार होण्याची शक्यता आहे
सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढतीये
त्याचा परिणाम म्हणून येत्या काळात रुग्णसंख्या वाढलेली पाहायला मिळू शकते
आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांचे भाकीत
-
नवी दिल्ली
भारतात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले 66 आणि 46 वर्षाचे दोन रुग्ण सापडले केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती या दोघांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग सुरु आहे
-
खोटं बोला पण रेटून बोला हा भाजपच्या लोकांचा उद्योग आहे
मुंबई : खोटं बोला पण रेटून बोला हा भाजपच्या लोकांचा उद्योग आहे
भाजपवाल्यांनी इतर लोक खोटे बोलतात असं म्हणणं हास्यास्पद आहे
खोटे बोलण्यात भाजपवाल्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते
नवाब मलिक यांची आशिष शेलार यांच्यावर टीका
-
2024 मध्ये नरेंद्र मोदींनाच लोकांचा कौल मिळणार: देवेंद्र फडणवीस
लोकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला आहे. 2024 मध्येही लोकं नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवतील. आता काँग्रेसला बाजूला ठेऊन आघाडी करण्याचा प्रयत्न असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सतर्क राहावं, असं फडणवीस म्हणाले .
-
नवी दिल्लीतील सगळ्या शाळा बंद राहणार, NCR मध्ये प्रदूषणाचा पुन्हा कहर
नवी दिल्लीतील सगळ्या शाळा बंद राहणार
प्रदूषणामुळे पुन्हा एकदा नवी दिल्लीच्या शाळा बंद राहणार
पुढचा आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय
नवी दिल्ली आणि NCR मध्ये प्रदूषणाचा पुन्हा कहर
-
महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोनाचा आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागेल : अजित पवार
आपल्या नियमावलीत तफावत होती. मात्र, नियम एकसारखे हवेत त्यामुळं भारतातील कोणत्याही विमानतळावर प्रवासी आले तर त्यांच्यासाठी नियम सर्वांसाठी सारखे असावेत यासाठी बदल करण्यात आलेले आहेत. इतर राज्यातून येताना दुसऱ्या राज्यात जाताना आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागतो तर आपल्याकडे येताना रिपोर्ट दाखवावा लागेल. कोरोनाच्या तिसऱ्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आपण काळजी घेतलेली बरी, असं अजित पवार म्हणाले. ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. राष्ट्रीय नेत्यांनी बोलल्यानंतर माझ्यासारख्या राज्यातल्या नेत्यांनी बोलायची गरज नाही, असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमपीएससीतील नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी, मुंबईच्या महापौैरांनी, देशपातळीवर नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं आहे. त्यामुळं नियम बदलण्यात आलेले आहेत. त्या त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन टास्क फोर्ससोबत सल्लामसलत करुन निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.
इतर राज्यातले मुख्यमंत्री आले की ते उद्योग पळवायला आले, असा अर्थ कसा काढला जातो, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, अजित पवार यांनी आवाहन केलं आहे.
-
पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही बंद: विनायक राऊत
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ओमिक्रॉन भारतात येऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रानं कोरोना काळात चांगलं काम केलं आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्त्वात स्वदेशी बनावटीची लस तयार करण्यात आली. कोरोना काळात राजकारण व्हायला नको होतं मात्र मुंबईत दीड लाख लोकांचा मृत्यू होईल, असं म्हटलं गेलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी राज्यात कोरोना काळात चांगलं काम केलं. पीएम केअर फंडाच्या माध्यमातून मदत करण्यात आली. मात्र, त्यात पीएसए प्लांट, व्हेंटिलेटर्स आणि औषधं देण्याची गरज होती. पीएम केअर फंडातून दिलेले 60 टक्के व्हेंटिलेटर्स आजही काम करत नाहीत, असं विनायक राऊत म्हणाले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांचा दाेष नाही, असं माझं मत आहे. संंबंधित कंपनीचे तंत्रज्ञ काम करत नव्हते.
-
चैत्यभूमीवर कोरोना नियमांचं पालन करुन अभिवादन करता येणार : किशोरी पेडणेकर
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर 2020 आपल्याला कठिण गेलं आहे. महापरिनिर्वाण दिनाला दर्शन सर्वांना दिलं जाणार आहे. जे चैत्यभूमीवर वातावरण असतं. फुलांचं अभिवादन, सुरांचं अभिवादन या सर्व गोष्टी तिथं असतील. मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख नेत्यांचं दर्शन झाल्यानंतर सर्वांना दर्शन दिलं जाईल. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यायला हवी. कोरोना नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रांगेत उभं राहणाऱ्या अनुयायांना कोरडं अन्न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतल्या जनतेनं यावेळी ऑनलाईन दर्शन घ्यावं, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. जे जे अनुयायी येतील त्यांचं आदरातिथ्य करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न राहिल. चैतभूमीवरील शासकीय अभिवादनाचे आणि अनुयायांच्या अभिवादनाचं ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
चैत्यभूमी स्मारकावर राज्य सरकारच्या आणि महापालिकेच्यावतीनं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करण्यात यावं. मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करण्यात यावा, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. महानगरपालिका सर्व अनुयायांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
-
कोरोना निर्बंधांमुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संताप
कोरोना निर्बंधांमुळे 6 डिसेंबर रोजी प्रशासन व आंबेडकरी अनुयायांच्या मध्ये उद्रेक आणि संघर्ष पेटण्याची शक्यता….
निर्बंधांचे परिपत्रक जारी केल्याने सोशल मीडियावर तमाम आंबेडकरी अनुयायांचा तीव्र संताप… अभिवादन करण्यावर अनुयायी ठाम…
चेंबूर परिसरातील आंबेडकरी अनुयायी आज सकाळी 11: 30 वाजता चेंबूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची निवास्थानी घेणार भेट
6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रशासनाने कोणालाही अडवू नये याबाबतीत राज्याचे मुख्यमंत्री तसेच मुंबई च्या मा. महापौर आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून मार्ग काढावा यासाठी देणार निवेदन
-
व्हायब्रंट गुजरात तिकडेच राहुद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांसह अर्ध मंत्रिमंडळ कशाला? संजय राऊतांचा सवाल
आरोप प्रत्यारोपाला काही अर्थ नाही, विरोधकांना पोटशूळ आहे. ममता बॅनर्जी आल्या मुंबई या उद्योगनगरीचं माहिती घेतली. मुंबईतल्या उद्योगपतींचे देशभरात व्यवसाय आहेत. ममता बॅनर्जींनी त्या उद्योगपतींना कोलकात्यात लक्ष देण्याचं आवाहन केलं त्यात काय चुकलं असं संजय राऊत म्हणाले. आज गुजरातचे मुख्यमंत्री पटेल अर्ध मंत्रिमंडळ मुंबईत घेऊन आले आहेत. व्हायब्रंट गुजरात तिकडे मुंबईत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला. मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला पळवलं. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला पळवलं. आनंदीबेन पटेल यांनी मुंबईत काय ठेवलंय, अशी वक्तव्य केलं होतं, त्यावेळी भाजपला मिरच्या का झोंबल्या, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
यूपीए आणि एनडीए मला दिसत नाही. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यासारखे लोक संघटन तयार करत असतील तर त्याकडे आम्ही डोळसपणे पाहतो. नेता कोण हा प्रश्न नसून पर्याय महत्ताचा असं संजय राऊत म्हणाले. भाजपच्या लोकांना तोंडातून डायरिया झाला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्र आणि बंगालचं वेगळं नातं आहे. ममता बॅनर्जी या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आल्या त्याचं विरोधकांना पोटशूळ उठलंय, असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज मिळतोय ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातून कामाला सुरुवात केली होती. आता ते जोमानं काम करतील, असंही राऊत म्हणाले.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली
कोल्हापूर (उत्तर) मतदार संघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘मुळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्यांचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक आहे. जाधव यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’, अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या आहेत.
-
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच निधन
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच निधन
हैदराबाद येथे हृदयविकाराच्या धक्क्याने झाल निधन
चंद्रकांत जाधव हे 2019 ला काँग्रेस मधून आले होते निवडून
जाधव यांचे पार्थिव दुपारी एक वाजता कोल्हापुरात येणार
जाधव यांच्या अचानक एक्झिट ने हळहळ
-
पुणे शहरात अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ
पुणे शहरात अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ
मागील वर्षभरात शहरात 634 अपघात
त्यातील 204 अपघातांमध्ये तब्बल 217 नागरिकांना जीव गमवावा लागला
तर गंभीर जखमी झालेल्या 339 जणांचे कायमस्वरूपी अपंगत्व
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणपत्रिकांची छपाई रखडली
स्टेशनरी साहित्याच्या अनुपलब्धतेमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणपत्रिकांची छपाई रखडली
विद्यापीठाच्या लालफितीच्या कारभारामुळे स्टेशनरीची खरेदी रखडली
गुणपत्रिकांसाठी विद्यार्थ्यांना करावी लागतीये प्रतीक्षा
विद्यापीठाकडून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परीक्षांचा निकाल जाही
मात्र, विद्यापीठाकडून अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या नाहीत
-
सोलापूरमध्ये लसीचे दोन डोस नसतील तर रेशन बंद
शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरीत करताना कोरोनाचे दोन्ही डोस बंधनकारक
दोन डोस घेणाऱ्यांनाच धान्य देण्याचे प्रशासनाचे रेशन दुकानदारांना आदेश
जिल्ह्यात कोरणा प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का अत्यल्प असल्याने लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार
जिल्ह्यात आठ लाख शिधापत्रिकाधारक
निम्मी लोकसंख्या रेशन दुकानाची संबंधित
त्यामुळे दोन डोस शिधापत्रिकाधारकांना केले बंधनकारक
-
पोलिसांना फेक कॉल केल्यास गुन्हा दाखल होणार
पोलिसांनी नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू केलेल्या 112 क्रमांकावर आता फेक कॉल केल्यास होणार गुन्हा दाखल
पोलिसांनी केलं आवाहन
शुल्लक कारणा वरून सुद्धा नागरिक करतात कॉल
तर अनेक जण फेक कॉल करून त्रास देण्याचा सुद्धा करतात प्रयत्न
नागरिकांना त्वरित मदत मिळावी या साठ ।सुरूकेलेल्या सेवेचा होतो गैर वापर
कॉल आल्या नंतर पोलिसांची यंत्रणा कामाला लागते
मात्र अनेक कॉल फेक निघतात मात्र पोलीस यंत्रणेचा अमूल्य वेळ वाया जातो
-
सोलापूर ग्रामीण भागात चोरी, जबरी चोरीचे सत्र सुरूच
सोलापूर ग्रामीण भागात चोरी, जबरी चोरीचे सत्र सुरूच
बार्शीतील तलाठ्याचे घर पडून फोडून अडीच लाखांची जबरी चोरी
चाकूचा धाक दाखवून अडीच लाखाचा ऐवज लंपास
वाढत्या चोरीच्या घटनेमुळे ग्रामीण भागात नागरिकांत घबराट
-
सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
सोलापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
तीन आठवड्या पासून सर्वच एसटी गाड्या जागेवरच थांबून
सोलापूर विभागात शिस्तभंगाच्या आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम
काल दिवसभरात सोलापूर आगारातून तुळजापूर मार्गावर एक धावली
-
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील चाळीसगावजवळ अपघात, तिघांचा मृत्यू, 10 जखमी
पाचोरा तालुक्यातील कामगारांच्या वाहनाला चाळीसगाव नजीक अपघात ,, अपघातात 3 कामगारांचा मृत्यू, 10 जण जखमी,,, जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू,,, 2 गंभीर जखमींना धुळ्याला हलवले
-
मुंबईला हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी, आजही पावसाची शक्यता
मुंबई मध्ये रात्रीच्या वेळी हळूहळू पाऊस अनेक ठिकाणी सुरु होता आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळालं..हवामान खात्याने मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळ मुळे पाऊस पडत आहे..
Published On - Dec 02,2021 6:19 AM