LIVE | नागपुरात दिवसभरात 325 नवे कोरोनाबाधित, तर 292 रुग्णांना डिस्चार्ज
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
LIVE NEWS & UPDATES
-
देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश, अण्णांचा उपोषण करण्याचा निर्णय मागे
देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीपासून उपोषणाचा इशारा दिला होता. त्याचपार्श्वभूमीवर फडणवीस यांनी अण्णा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
“आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, अण्णा हजारे यांनी 30 तारखेपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने त्यांचा आग्रह होता. मागच्या काळात ज्यावेळी उपोषणाला बसले होते त्यावेळी त्यांना दिलेला आश्वासनांची बऱ्यापैकी पूर्तता झाली. विशेषत: त्याच्या आग्रहाखातर केंद्र सरकारने कोल्ड स्टोरेज आणि इतर कामांसाठी 6 हजार कोटींचा निधी दिला, त्यांना दिलेल्या आश्वासनानंतरच केंद्र सरकारने किसान सन्मान निधी सुरु केला, जीएसटी कमी केला, असे अनेक मुद्दे त्यावेळी घेण्यात आले. काही अजून मुलभूत मुद्दे ज्या मुद्द्यांसंदर्भात त्यावेळी सूचित करण्यात आले होते की, उच्चस्तरीय समिती गठीत करुन त्यामाध्यमातून निर्णय घेतला जाईल. दुर्देवाने निवडणूक आणि कोरोनामुळे घेता आला नाही. पण आता समिती गठीत करुन सहा महिन्यात निर्णय होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
अण्णा हजारे यांची अधिकृत घोषणा
“अनेक वर्ष समाज, राष्ट्रहितासाठी आंदोलन करत आलो, हा घटनेने दिलेला अधिकार आहे, अन्याय आणि अत्याचार होत असेल तर शांततेत अहिंसेच्या मार्गाने लढा द्यायचा. स्वामिनाथन आयोगचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला आहे. जो खर्च आहे त्यापेक्षा पन्नास टक्के उत्पन्न वाढवून द्या, असं त्यात म्हटलं होतं. त्याबाबत सरकारने आश्वासन दिलं होतं. पण आश्वासनांची पूर्तता झाली नव्हती. आता सरकारने आश्वासनांची पूर्तता करण्याचं पुन्हा आश्वासन दिलं आहे. देवेंद्र फडणवीस त्यांचा निरोप घेऊन आले आहेत. आम्ही 15 मुद्दे दिले होते. ते मुद्दे मान्य झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. फडणवीस यांनी सांगितलेल्या निरोपावर विश्वास ठेवून मी माझा आंदोलनाचा निर्णय मागे घेत आहे”, असं अण्णा हजारे म्हणाले.
-
नागपुरात दिवसभरात 325 नवे कोरोनाबाधित, तर 292 रुग्णांना डिस्चार्ज
नागपूर कोरोना अपडेट :
नागपुरात आज 325 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
4 जणांचा कोरोना मुळे मृत्यू
तर 292 जणांनी केली कोरोना वर मात
एकूण रुग्ण संख्या – 133670
बरं होणाऱ्यांची एकूण संख्या – 126209
एकूण मृत्यू संख्या – 4150
-
-
दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार, अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालकांमध्ये बैठक
दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले. राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असं आवाहान त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 29, 2021
-
दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट
दिल्लीतील ब्लास्टच्या घटनेनंतर मुंबई हाय अलर्टवर, महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस सुरक्षेत वाढ, मुंबई एअरपोर्टवर हाय अलर्टवर, मुंबईस्थित इस्त्राईल अॅम्बेसीच्या सुरक्षेत वाढ
-
लातूर : मसाल्याच्या गोडाऊनला भीषण आग
लातूर : शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई भागात मसाल्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली, आगीमागील कारण अस्पष्ट, अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल, जीवितहानी नाही, पण मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान
-
-
दिल्लीतील इस्त्रायल दुतावासाजवळ स्फोट
दिल्लीतील औरंगजेब रोडवर स्फोट, 4-5 गाड्यांचं मोठं नुकसान, इस्त्रायल दुतावासाजवळ स्फोट झाल्याची माहिती. (Blast outside Israil Embassy in Delhi) दिल्लीतील अब्दुल कलाम मार्गावर हा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकायला आला. या स्फोटामुळे उभ्या असलेल्या काही गाड्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. हा परिसर VVIP असल्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था कडक असते. या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
कमी तीव्रतेचा हा स्फोट आहे. संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटात कुणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
-
महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही : मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे
“या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे या गाडीला ड्रायव्हरच नाही. अत्यंत देखणं असं रुप आहे. जे परदेशात किंवा टीव्हीत पाहायला मिळतं अगदी तशी गाडी आहे. आतमध्ये व्हिलचेअरची व्यवस्था आहे. सायकल ठेवायचीदेखील व्यवस्था आहे. सगळं या गाडीत आहे. मुंबईत जेवढी कामं सुरु आहेत, तेवढी मेट्रोची कामे जगाच्या पाठीवर कुठे चाललेली नसतील. हा सुद्धा एक अभिमानाचा विषय आहे. महाराष्ट्र कधी थांबला नाही. महाराष्ट्र कधी थांबणार नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“मधल्या काळात थोडीफार टीका झाली. तुम्ही विकास कामांना स्टे देतात, अशी टीका झाली. स्थगिती कुठेही दिलेली नाही. जर स्थगिती दिली असती तर कामच झाली नसती. पण एकेक कामं पुढे जात आहेत. मध्ये मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम बघून आलं. मे महिन्यापासून तो महामार्ग सुरु होतोय. नागपूर ते शिर्डी अशा टप्प्यात तो सुरु होणार आहे. एकेक मोठी कामं पुढे जात आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“विकास कामं कोव्हिड काळात जरुर मंदावली. कारण तो काळ भीषण होता. त्या काळात सुद्धा काम सुरुच राहिलं. मेट्रोचं रुपडं फार आकर्षक आहे. आताच्या घडीला जे जे आवश्यक आहे ते सगळं सरकार करत आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
-
मुंबई मेट्रोच्या मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई मेट्रोच्या मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम चारकोप येथील डेपोमध्ये सुरु आहे. एक महिनाभर मेट्रो कोचच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथे जाऊन कोचची पाहणी करुन आले होते. त्यानंतर कोच मुंबईत दाखल झाले.
-
अण्णांनी उपोषणाला बसावं असं कोणालाच वाटत नाही : देवेंद्र फडणवीस
अण्णांशी गेल्या आठवड्यापासून आमची चर्चा सुरु आहे. आजच्या बैठकीत काही मार्ग निघेल असं आम्हाला वाटतंय. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींवर निर्णय देखील घेण्यात आले आहेत. त्यांनी उपोषणाला बसावं असं कोणालाच वाटत नाही
राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे
लोकल सेवा टप्याटप्याने सुरु केली पाहिजे. विशेषत: खासगी क्षेत्रातील नोकरवर्गाला ही सेवा नसल्याने खूप त्रास होतो आहे. त्यामुळे त्याच्या टायमिंग संदर्भात विचार केला पाहिजे
-
सिंघू बॉर्डर खाली करा, स्थानिक आक्रमक
सिंघू बॉर्डर खाली करा, स्थानिक आक्रमक, कालही याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं, स्थानिकांनी या आंदोलकांप्रती सहानुभूती दाखवली, मात्र, ज्याप्रकारे लाल किल्ल्यावर धुडगुस घालण्यात आला, त्यामुळे हे शेतकरी नाहीत, आंदोलक आहेत, देशाच्या अस्तित्वावर जाऊन यांनी आंदोलन केलं, त्यामुळे आता यांना सिंघू बॉर्डरवरुन हाकलून लावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे
-
सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिक रहिवासी यांच्यात घमासान, पोलिसांचा लाठीचार्ज
सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिक रहिवासी यांच्यात आंदोलनावरुन पुन्हा एकदा घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात लाठीचार्ज केला आहे.
-
अण्णा हजारेंच्याभ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाची बैठक सुरु,उद्याच्या आंदोलनाचं काय होणार?
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाची बैठक सुरु, उद्याच्या आंदोलनासंदर्भात बैठक होत आहे. यामध्ये सरकारची भूमिका, तसेच केंद्र शासनाने मागण्या मान्य केल्या तर त्यावर कोणती भूमिका घ्यायची यावर 7 सदस्यांच्या उपस्थित बैठक होत येत आहे.
-
नवीन विधेयकांमुळे शेतकऱ्यांना लाभ – राष्ट्रपती
सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले, पंतप्रधान किसान योजनेचा देशातील लहान शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे – राष्ट्रपती
संसदेने कृषी विधेयकं मंजूकर केली, नवीन विधेयकांमुळे शेतकऱ्यांना लाभ – राष्ट्रपती
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तिरंग्याचा झालेला अपमान ही दुर्दैवी घटना – राष्ट्रपती
-
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा 10 कोटी छोट्या शेतकऱ्यांना लाभ
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा 10 कोटी छोट्या शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं करेल. पूर्वीच्या कायद्यातील सुविधा रद्द करण्यात आल्या नाहीत. कृषी कायद्यांविषयी गैरसमज पसरवण्यात आले ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 100 किसान रेल्वे सुरु केल्या गेल्या.
-
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा
आज देश में खाद्यान्न उपलब्धता रिकॉर्ड स्तर पर है।
वर्ष 2008-09 में जहां देश में 234 मिलियन टन खाद्यान्न की पैदावार हुई थी वहीं साल 2019-20 में देश की पैदावार बढ़कर 296 मिलियन टन तक पहुंच गयी है।
— President of India (@rashtrapatibhvn) January 29, 2021
-
सरकारने कृषीमालांना दीडपट हमी भाव दिला – राष्ट्रपती
सरकारने कृषीमालांना दीडपट हमी भाव दिला, सरकारी खरेदी केंद्रही वाढवली – राष्ट्रपती
-
केंद्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालये वाढवली – राष्ट्रपती
केंद्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालये वाढवली, आज देशात ५६२ वैद्यकीय महाविद्यालयं आहेत – राष्ट्रपती
-
सहा राज्यात गरिब कल्याण योजना सरकारने राबवली – राष्ट्रपती
सहा राज्यात गरिब कल्याण योजना सरकारने राबवली, सरकारच्या प्रयत्नांमुळे गरिबांची मदत झाली आहे, त्यांना सुविधा मिळाली आहे, ओरोग्याबाबत गरिब जनतेचा खर्चही वाचला आहे,
-
आव्हानं कितीही मोठी असली तरी भारत थांबणार नाही – राष्ट्रपती
आव्हानं कितीही मोठी असली तरी भारत थांबणार नाही, गेल्या वर्षात भारताने अनेक संकटांना तोंड दिलं – राष्ट्रपती
-
कोरोनानं आत्मनिर्भर भारताचं महत्व पटवून दिलं: राष्ट्रपती रामनाथ कोविंद
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे भारतातील लोकशाही मजबूत झाली. केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा देशातील जनतेला झाला. कोरोनानं आत्मनिर्भर भारताचं महत्व पटवून दिलं. कमी कालावधीमध्ये 200 प्रयोगशाळा निर्माण केल्या. भारत सर्वात मोठं लसीकरण अभियान चालवतोय, याचा अभिमान आहे.
-
नाशकात किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांच नुकसान
नाशिक – किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांच नुकसान, सह्याद्री हॉस्पिटल समोर असलेल्या दुकानाला रात्रीच्या सुमारास लागली होती आग, आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश, सुदैवाने जीवितहानी नसली तरी दुकानातील सर्व माल जळून खाक
-
महाराष्ट्रातील काँग्रेस मंत्री उद्या दिल्लीत, राज्यातील महत्वाच्या काँग्रेस नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी बोलावलं
महाराष्ट्रातील काँग्रेस मंत्री उद्या दिल्लीत, राज्यातील काही महत्वाचे काँग्रेस नेते आणि मंत्री यांनी पक्षश्रेष्ठींनी बोलावलं,राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदल यावर चर्चा तसच शेतकरी आंदोलन पार्शवभूमीवर महाराष्ट्रातील मंत्र्यांना दिल्लीत बोलावणे
-
पुण्यात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका अँक्शन मोडमध्ये
पुुणे : शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका अँक्शन मोडमध्ये, कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पालिकेनं चार संस्थांची केली नेमणूक, महिन्याला चार हजार कुत्र्यांची नसबंदी करण्याचं उद्दीष्ट , नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावात नसबंदी करण्याचं काम होणार, गावठाण परिसर नव्यानं समाविष्ट झाल्यानं मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त, पालिका मोकाट कुत्र्यांची करणार नसबंदी
-
पंचवटीतील ऐतिहासिक कपालेश्वर मंदिराचा महत्वपूर्ण निर्णय, शिवलिंगाची झीज रोखण्यासाठी होणार वज्रलेप
नाशिक – पंचवटीतील ऐतिहासिक कपालेश्वर मंदिराचा महत्वपूर्ण निर्णय, शिवलिंगाची झीज रोखण्यासाठी होणार वज्रलेप, शिवलिंगाच्या संवर्धनासाठी 5 सदस्यीय समिती गठित, विश्वस्त , पुजारी आणि भाविक प्रतिनिधी असणारी समिती पाठवणार पुरातत्व विभागाला पत्र, कपालेश्वर महादेवांच्या शिवलिंगाला प्रथमच केला जाणार वज्र लेप
-
सोलापुरात पाच महिने उचल न केलेल्या केलेल्या शिधापत्रिका निलंबित
सोलापूर – पाच महिने उचल न केलेल्या केलेल्या शिधापत्रिका निलंबित, जिल्ह्यातील 13000 शिधापत्रिका निलंबित, ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या पाच महिन्यात धान्य न देणाऱ्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका निलंबित, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांच्या आदेशानुसार शिधापत्रिका निलंबित
-
सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकाम विधीचा पहिला लिफाफा उघडला
सोलापूर – सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकाम विधीचा पहिला लिफाफा उघडला, कागदपत्रांची तपासणी करून येत्या दोन दिवसात दर संदर्भातील दुसरा लिफाफा उघडण्यात येणार, चिमणी पाडकाम संदर्भात महानगरपालिकेने लावल्या होत्या निविदा, चार जणांनी भरल्या आहेच निविदा, पंधरा दिवसांमध्ये होणार प्रक्रिया पूर्ण
-
दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर स्थानिक विरुद्ध आंदोलक असा संघर्ष पेटणार
दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर स्थानिक विरुद्ध आंदोलक असा संघर्ष पेटणार, आंदोलकांनी परत जावे या मागणीसाठी आज स्थानिक रहिवासी आणि व्यापारी करणार आंदोलन,लालकिल्ल्यावर धुडघूस घातल्यानंतर स्थानिकांची आंदोलकांविरोधात नाराजी, देशाच्या अस्तित्वावर हल्ला करणारे शेतकरी नाहीत स्थानिक रहिवाशांची भावना, आम्हा दाखवलेल्या सहानुभूतीचा शेतकऱ्यांना अपमान केला
-
गाजीपूर बॉर्डरवरील आंदोलक शेतकऱ्यांना परतवून लावण्यास पोलिसांना अपयश
गाजीपूर बॉर्डरवरील आंदोलक शेतकऱ्यांना परतवून लावण्यास पोलिसांना अपयश, रात्री पोलिसांनी आंदोलकांना परतण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी आत्महत्या करेल पण मागे हटणार नाही अशी भुमिका घेतल्याने आंदोलन सुरुच, राकेश टिकेत यांनी भावुक होत घेतली पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेनंतर उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे मोठे समर्थन टिकेत यांना मिळत आहेत, आज मोठ्या संख्येने शेतकरी गाजीपूर बॉर्डरवर येण्याची शक्यता
-
पुणे विभागात काल झालं 80 टक्के लसीकरण पुर्ण
पुणे – पुणे विभागात काल झालं 80 टक्के लसीकरण पुर्ण, विभागातील 8 हजार 600 कर्मचाऱ्यांपैकी 8 हजार 880 कर्मचाऱ्यांनी घेतली लस, पुणे ग्रामीणमध्ये 69 टक्के लसीकरण,तर पिंपरी चिंचवड 69 टक्के,पुणे शहर 89 टक्के, पुणे जिल्ह्यात एकुण 69 टक्के लसीकरण तर सर्वाधिक सातारा जिल्ह्यात 108 टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात 67 टक्के, विभागात अशी टक्केवारी, पुणे विभागात लसीकरणाची टक्केवारी वाढली
-
35 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज
नंदूरबार – शहादा तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील 35 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत आज तहसील कार्यालय शहादा येथे होणार आहे त्यामुळेच सर्वच राजकीय पक्ष सरपंचपद आपल्या पक्ष कळवा कसं नेता येणार त्याच्यासाठी मोर्चे पाहणे तयार करणाऱ्या लागले आहे
-
नागरिकांनी आधार कार्ड-रेशन कार्ड संलग्न करुन घ्या, असे आव्हान जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलं आहे
नंदूरबार – रेशन कार्डधारकांना 31 जानेवारीपर्यंत रेशन कार्ड आधार कार्ड लिंकिंग केलं नाही तर एक फेब्रुवारीपासून रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य मिळणार नाही, त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर आधार कार्ड रेशन कार्ड संलग्न करुन घ्या असे आव्हान जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केला आहे
-
मराठी नंतर आता हिंदी मालिका निर्मात्यांना ही कोल्हापूरची भुरळ
कोल्हापूर – मराठी नंतर आता हिंदी मालिका निर्मात्यांना ही कोल्हापूरची भुरळ, चित्रनगरीत लवकरच सुरू होणार मेहंदी है रचने वाली या हिंदी मालिकेचं चित्रीकरण, हिंदी मालिकेचं कोल्हापूरात पहिल्यांदाच होणार चित्रीकरण, मालिका फेब्रुवारी महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रनगरी सह शहरातील तीन लोकेशन वर होणार चित्रीकरण, कोल्हापूरच्या चित्रपट आणि मालिका निर्मिती मिळतीये संजीवनी
-
नाशिक शहरात घफोडी करणारी तडीपार गुन्हेगारांची टोळी जेरबंद
नाशिक – शहरात घफोडी करणारी तडीपार गुन्हेगारांची टोळी जेरबंद, दिवाळीच्या काळात शहरात अनेक जबरी घरफोड्या करण्यात टोळीचा होता सहभाग, सोने चांदीचे दागिने , रोख रक्कम, लॅपटॉप , मोबाईल चोरी करून शहरात पसरवली होती दहशत, शहरात झालेल्या इतरही मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता, नाशिकच्या मुंबईनाका पोलिसांची मोठी कारवाई
-
येवला तालुक्यातील बिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द
येवला तालुक्यातील बिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द, उमरणे ग्रामपंचायतनंतर कातरणी नाशिक जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत, 21 लाख रुपयांचे लिलाव झाल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग, लिलाव प्रक्रिया झाल्याच्या तक्रारीनंतर तपासात निष्पन्न झाल्याने निवडणूक आयोगाकडून कारवाई, कठोर कारवाईबाबत जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षकांना निवडणूक आयोगाचे आदेश
-
नांदेडच्या ग्रामीण भागातील तरुणीची सैन्य दलातील आसाम रायफलमध्ये निवड
नांदेड – ग्रामीण भागातील तरुणीची सैन्य दलातील आसाम रायफलमध्ये निवड, नायगांव तालुक्यातील बरबडा इथल्या पूजा बसलवाड या तरुणीने हे यश मिळवलं, देशसेवेसाठी जाण्याचे स्वप्न उराशी घेऊन पूजाने शिक्षण घेतलंय, गेल्यावर्षी सैन्य दलाच्या आसाम रायफलमध्ये भरती निघाली होती, त्यासाठी पूजाने तयारी करत सैन्य दलात समाविष्ठ होण्याचा सन्मान मिळवला, घरची परिस्थिती बेताचीच असताना पूजाने जिद्दीच्या बळावर हे यश मिळवलंय, ग्रामीण भागातील एक तरुणी सैन्य दलात समाविष्ठ झाल्याने पूजाचे मोठे कौतुक केल्या जातेय
-
नागपुरात आणखी 100 बस रस्त्यावर धावणार
नागपूर – कोरोनाचा प्रभाव काहीसा ओसरत असताना शहरातील सार्वजनिक बस सेवा पूर्व पदावर येत आहे, आणखी 100 बस रस्त्यावर धावणार, सध्या 172 बस नागरिकांच्या सेवेत असून 1 फेब्रुवारी पासून आणखी 100 बस रस्त्यावर धावणार, ऑक्टोबरमध्ये बस सुरु झाली तेव्हा 20 टक्के प्रवाशी सेवा होती ती आता 50 टक्के करण्यात आली, सध्या दररोज 52 हजार प्रवाशी प्रवास करतात, 55 मार्गावर 170 बस धावतात
-
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वादळी सभेनंतर अखेर कार्यकारिणीला पाच वर्षे मुदतवाढ
पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वादळी सभेनंतर अखेर कार्यकारिणीला पाच वर्षे मुदतवाढ, काही सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर बहुमताच्या आधारावर झाला निर्णय, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर साहित्य परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली होती, त्यामुळे सध्याच्या कार्यकारिणीला मुदतवाढ मिळेल अशी चर्चा अगोदरपासूनच होती, त्यासंदर्भात पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात जवळपास तीन तास चर्चा झाली, अखेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांच्या कार्यकारिणीला पाच वर्षाची मुदतवाढ देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
-
नायलॉन मांजा वापरणाऱ्या किती जणांवर कारवाई करण्यात आली, मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर महापालिकेला सवाल
नागपूर – नायलॉन मांजा वापरणाऱ्या किती जणांवर कारवाई करण्यात आली, मांजाचा वापर थांबविण्यासाठी काय उपाय योजना करण्यात आल्या, अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार आणि महापालिकेला केली, तसेच यावर एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले, नायलॉन मांजा मुळे प्रणय ठाकरे नावाच्या युवकाचा मृत्यू झाला होता याची गंभीर दखल घेत न्यायालया ने ही जनहित याचिका दाखल करून घेतली होती
-
नागपुरात अतिक्रमणविरोधी मोठी कारवाई, एका दिवसात शहरातील तब्बल 500 अतिक्रमण हटवले
नागपुरात अतिक्रमणविरोधी मोठी कारवाई, एका दिवसात शहरातील तब्बल 500 अतिक्रमण हटवले, अतिक्रमण विरोधी कारवाईत तब्बल आठ ट्रक वस्तू जप्त, अतिक्रमण विरोधी पथकाने 23500 रुपयांचा दंड केला वसूल, अतिक्रमण हटवल्यामुळे शहरातील फुटपाथने घेतला मोकळा स्वास
-
नागपूरातील पाच हजार एकावरील आरक्षण अखेर रद्द, नागपूर सुधार प्रण्यासच्या विश्वस्त बैठकीत मोठा निर्णय
नागपूरातील पाच हजार एकावरील आरक्षण अखेर रद्द, नागपूर सुधार प्रण्यासच्या विश्वस्त बैठकीत मोठा निर्णय, पाच हजार अकरावरील आरक्षण रद्द केल्याने हजारो लोकांना दिलासा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी होतं आरक्षण
-
नागपुरातील वंजारीनगर पुलावरील कारची स्टंटबाजी, पोलिसांनी आवळल्या स्टंट करणाऱ्यांच्या मुसक्या
नागपुरातील वंजारीनगर पुलावरील कारची स्टंटबाजी, पोलिसांनी आवळल्या स्टंट करणाऱ्यांच्या मुसक्या, वाहतूक पोलिसांकडून स्टंटबाज युवकांच्या कार जप्त, महिनाभरासाठी कार केल्या जप्त, कारचालकांवर विविध कलमान्वये चालान कारवाई
-
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पहाटेपासूनच वाहतूक जाम
वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावर पहाटेपासूनच वाहतूक जाम, गुजरातवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर 1 ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, वसई हद्दीत वर्सोवा ब्रिज ते सुवी पॅलेसपर्यंत लागल्या रांगा, वाहतूक धीम्या गतीने सुरू
-
हे सर्व शेतकऱ्यांविरुद्ध षडयंत्र आहे – राकेश टिकेत
आम्ही भारत सरकराशी चर्चा करु, जी अडचण आहे त्यावर बोलु, हे सर्व शेतकऱ्यांविरुद्ध षड्यंत्र आहे, यापेक्षा मोठं षड़्यंत्र जगात होउच शकत नाही. आमच्य़ावर लाठीचार्ज करा काही हरकत नाही, पण काही पक्षाची लोक येउन पोलिसांसोबत शेतकऱ्यावर लाठीचार्ज करतात मग शेतकऱ्यांच्या मोर्चात दुसऱ्या लोकांना घुसवुन शेतकऱ्यांची प्रतिमा खराब केली गेली. या प्रतिमेला धुतल जाईल साफ केल जाईल. हा शेतकरी आता मागे हटणार नाही प्रत्येक जिल्रह्यात आंदोलन होईल. आणि सरकारला मान्य करावच लागेल – राकेश टिकेत
Published On - Jan 29,2021 9:07 PM