LIVE | मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी राज्य सरकारकडून सहा सदस्यीय समिती गठीत
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट
LIVE NEWS & UPDATES
-
मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी राज्य सरकारकडून सहा सदस्यीय समिती गठीत
मुंबई मेट्रो कारशेडची जागा निश्चित करण्यासाठी राज्य सरकारकडून सहा सदस्यीय समिती गठीत, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत, मुंबई मेट्रो मार्गिका तीन, चार आणि सहा या तीन मेट्रो मार्गीकांच्या एकत्रित कार डेपो करता करणार अभ्यास, एका महिन्यात समिती राज्य सरकारला अहवाल सादर करणार
या समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे :
1) आरे येथील यापूर्वी मेट्रो 3 कारशेड डेपो करता प्रस्तावित केलेला आराखडा पुरेसा आहे किंवा आणखी जमीन किंवा आणखी वृक्ष तोड करण्याची आवश्यकता भासेल का? याबाबत तपासणी करणे
2) मेट्रो तीन आणि सहा यांच्या मार्गीकेचे एकत्रीकरण सुलभरीत्या करणं शक्य आहे का? यासाठी अंदाजित खर्च आणि कालावधी या बाबी तपासणे
3) कांजूरमार्ग येथील जागा आरे पेक्षा सुयोग्य आहे का? याची तपासणी करणे
4) मेट्रो 3, 4 आणि 6 यांच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथे जागा पुरेशी आणि सुयोग्य आहे का? याचा तपास करणे
-
नवी मुंबईत भाजपचे नगरसेवक नवीन गवते यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
नवी मुंबई महापालिकेतील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नवीन गवते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आलं. याप्रसंगी खासदार राजन विचारे नगरसेवक, नगरसेवक एम के मढवी, नगरसेवक करण मढवी उपस्थित होते.
-
-
सावधान! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, नागपुरात दिवसभरात 434 नव्या रुग्णांची नोंद
नागपूर : नागपुरात आज 434 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर दिवसभरात 304 जणांची कोरोनावर मात, नागपुरात आतापर्यंत 1 लाख 26 हजार 189 कोरोनाबाधितांची नोंद, यापैकी 1 लाख 17 हजार 949 जणांची कोरोनावर मात, तर 3 हजार 984 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू
-
CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख
मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय @AmitV_Deshmukh pic.twitter.com/LqkMo2uXgi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 6, 2021
-
रेखा जरे हत्या प्रकरण : आरोपी बाळ बोठेच्या अडचणीत वाढ, स्टँडिंग वॉरंट जारी
अहमदनगर : रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला स्टँडिंग वॉरंट जारी, पारनेर न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर दिला निर्णय, या वॉरंटमुळे बाळ बोठेला राज्यात आणि अन्य राज्यात पकडणे होणार शक्य, त्यामुळे बाळ बोठेच्या अडचणीत वाढ
-
-
बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा
मुंबई : बांधकामांवर प्रीमियम सवलतींचा लाभ देण्याचा, विकासकांना ग्राहकांतर्फे मुद्रांक शुल्क भरावे लागेल, असे महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. त्याचबरोबर बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी, बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा, याआधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयत्यावेळी प्रस्ताव आल्याने काँग्रेसने केला होता विरोध, सरकारमधील तीनही पक्षांची चर्चा झाल्यानंतर आज या प्रस्तावाला मंजुरी
मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली. “शक्ती कायद्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची दोन बैठका झाल्या. या बैठकीत राज्यातील जनतेने आपल्या सूचना 15 जानेवारीपर्यंत सूचना देण्याचे आवाहन केले आहे. महिला, वकील संघटना यांना भेटण्यासाठी 11 जानेवारीला नागपूर, 19 जानेवारीला मुंबई जॉईंट सलेक्शन कमिटीची बैठक बोलावली आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
-
दिलासादायक ! केडीएमसीत दोन दिवसांपासून एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही
ठाणे : केडीएमसीत दोन दिवसांपासून एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू नाही, आतापर्यंत 58 हजार ३४ रजणांना कोरोनाची लागण, यापैकी 56 हजार 21 रुग्णांची कोरोनावर मात, तर 111o रुग्णांचा दुर्देवी मृत्यू
-
नागपुरात भारत बायोटेकच्या कोव्हक्सिनच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण
भारत बायोटेकच्या कॉव्हक्सिन लसीचा तिसरा टप्पा पूर्ण करण्यात आला नागपुरात आता पर्यंत 1600 स्वयंसेवकांवर परीक्षण करण्यात आलं. आतापर्यंत कोणालाही साईड इफेक्ट्स नाहीत.
-
राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनची बैठक होणार: उदय सामंत
राज्यातील महाविद्यालयं सुरू करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेतली जाणार आहे. राज्यात टप्याटप्याने कॉलेज सुरू करण्यात येतील. महाविद्यालय किती टक्के उपस्थिती सुरु करायची याचा निर्णय लवकर घेतला जाईल, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
-
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतीगृह खुले करा’, विद्यार्थ्यांचं आंदोलन
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतीगृह खुले करावीत, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारती बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचून दाखवला, आणि वसतिगृह खुले करावे, अशी मागणी केली. कुलगुरू साहेब शुद्धीवर या अशा घोषणा विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या आणि कुलगुरूंचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
-
प्रेमविवाहाला कुटुंबाचा विरोध, तरुणीची पोलिसात धाव, प्रेमी युगुलाचं पोलीस ठाण्यात लग्न
औरंगाबाद : प्रेमविवाहाला कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर तरुणीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी समुपदेशन करून पोलीस ठाण्यातच तरुण आणि तरुणीचा प्रेम विवाह घडवून आणला. पोलीस ठाण्यातच लग्न लावण्याची बहुदा ही पहिली घटना असावी. विशेष म्हणजे लग्न लावल्यानंतर नवरी मुलीला पोलिसांनी नवऱ्या मुलासोबत पाठवूनही दिले. त्यामुळे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन जीवाचं एक अनोखं मनोमिलन पोलिसांनी करून दिलं. त्यामुळे पोलिसांच्या या आगळ्या वेगळ्या कामगिरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
-
धक्कादायक ! बँक खाते हॅक करून साडे चौदाकोटी पळवले
नांदेड: बँक खाते हॅक करून साडे चौदाकोटी रुपये पळवले, नांदेडच्या शंकर नागरी बँकेचे पैसे हॅकरने संशयीतरित्या इतरत्र वळवले, आयडीबीआय बँकेत असलेल्या शंकर नागरी सहकारी बँकेचे पैसे केले हॅक, NEFT आणि RTGS द्वारे बँकेला चुना, बँकेच्या तक्रारीनंतर सायबर सेलद्वारे होणार तपास, तूर्त बँकेकडून माध्यमांना अधिकची माहिती देण्यास नकार.
-
मुंबई : खारमध्ये 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरु
मुंबई : खार परिसरात एक 16 वर्षीय मुलीची आत्महत्या, इमारतीच्या 10 व्या मजल्यावरुन उडी मारून केली आत्महत्या, घटना मंगळवार (5 जानेवारी) उशिरा रात्रीची, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, खार पोलिसांकडून ADR दाखल, याप्रकरणी तपास सुरु
-
ठाण्यातील विजय गार्डन्स या सोसायटीत अनेक पक्षी मृतावस्थेत, कारण अद्याप अस्पष्ट
ठाणे : ठाण्यातील विजय गार्डन्स या सोसायटीत अनेक पक्षी मृतावस्थेत, बगळा जातीतील हे पक्षी सकाळपासून रस्त्यावर मृतावस्थेत पडून, या पक्षांना नेमके काय झाले याची माहिती नाही, स्थानिकांनी पक्षी प्रेमी, पर्यावरण प्रेमी यांना बोलावून माहिती दिली, पोंड हेरॉन म्हणजे पाण बगळा, जातीचे हे पक्षी, एकूण 14 पक्षी मेले, ठाणे पालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पक्षांना ताब्यात घेतले असून, त्यांची तपासणी करून नेमके कारण शोधले जाईल
-
कोरोनासाठी आता नोझल वॅक्सिन, नाकातून देण्यात येणाऱ्या लसीबाबत संशोधन
नागपूर : कोरोनासाठी आता नोझल वॅक्सिन, नाकातून देण्यात येणाऱ्या लसीबाबत संशोधन सुरु, देशात चार ठिकाणी संशोधन सुरु, भारत बायोटेकच्या माध्यमातून संशोधन, यामध्ये नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटलचा समावेश, यासाठी प्राथमिक डाटा तयार करून मान्यतेसाठी पाठविला जाणार, नागपुरात तयारी सुरू
-
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील ग्रापपंचायत निवडणुकीत 11 जागांपैकी 1 जागा बिनविरोध
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे ग्रापपंचायत निवडणुकीत 11 जागांपैकी 1 जागा बिनविरोध झाली आहे. उर्वरित 10 जागांसाठी 21 उमेदवार रिंगणात आहेत. अद्याप उमेदवाराचे पत्रक आणि बॅनर लागलेले नाही. त्यामुळे पॅनल कोणाचे, कोणते उमेदवार याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे यांची तसेच स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागेल.
-
इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरण, वकिलाने मागितली मुदतवाढ, पुढील सुनावणी आता 13 जानेवारीला
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरण, आज होणारी सुनावणी टळली, पुढील सुनावणी आता 13 जानेवारीला, इंदोरीकर महाराजांच्या वकिलाने मागितली मुदत वाढ, आज लेखी युक्तिवाद सादर करण्याचे दिलेले होते आदेश, मात्र आता 13 जानेवारीला होणार पुढील सुनावणी
-
मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये चहा पिण्यास बंदी
मुंबई : राज्य सरकारने नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडपासून आँफीसच्या वेळेपर्यंत शिस्त लावण्याचा निर्णय घेतला असताना आता मंत्रालयाच्या कॉरीडॉरमध्ये कोणत्याही वेळेत चहा पिताना चकाटय़ा पिटणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही बंधने घातली आहेत. अधिकारी ,कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मंत्रालयाच्या इमारतीमधील कॉरीडॉरमधील चहा विक्री बंद करण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
-
सोलापुरात ड्रायरन होणार, केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता
सोलापुर : केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम कधीही जाहीर होणार, त्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी, राज्यात पहिल्या टप्प्यात लसीकरणाचा ड्रायरन झाले, शुक्रवारपासून सोलापुरसह अन्य जिल्ह्यात ड्रायरन होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांची माहिती
-
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादक शुल्क विभागाची मोठी कारवाई
पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादक शुल्क विभागाची मोठी कारवाई, 25 हजार लिटरचे स्पिरिटने भरलेलं टँकर जप्त, याच स्पिरिटचा वापर दारू बनवण्यासाठी केला जातो, एकूण 36 लाख 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथकं तैनात.
-
रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचे काम आता महामेट्रोकडे
नवी मुंबई : रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोचे काम आता महामेट्रोकडे, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) उर्वरित काम करणार, उर्वरित कामांची अंमलबाजवणी करण्यासाठी सिडको महामंडळाने घेतला निर्णय, 11.1 किलोमीटरच्या मार्गावरील उर्वरित कामे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे या निकषावर सिडकोकडून देण्यात आले काम, महामेट्रोकडे नागपूर आणि पुणे मेट्रोचा अनुभव
-
थोरातच हवेत, कॉंग्रेस मंत्र्यांची भूमिका, आमदार, नेते काय करणार?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलू नका, राज्यातील घडी बसलीय, बहुतांश मंत्र्यांनी ही भूमिका काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या समोर मांडली आहे. सरकार स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील समोर आहेत, अशा वेळी बाळासाहेब थोरात यांना आता बदलण्याचे औचित्य किंवा कारण दिसत नाही. अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या समोर मांडली. दोन दिवस एच.के. पाटील हे मुंबईत येऊन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी कोण असावे याची चाचपणी करत आहेत. सकाळपासून त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर वैयक्तिक संवाद साधला
-
चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या पोस्टरला समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फासले काळे
चंद्रपूर : चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या पोस्टरला समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फासले काळे, समाजवादी पक्षातर्फे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन, आंदोलकांनी जोरगेवार यांच्या बॅनरवर असलेल्या फोटोला काळे फासले, 200 युनिट दो वरना खुर्ची खाली करो, अशा प्रकारची नारेबाजी आंदोलकांकडून करण्यात आली.
-
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादेत पोल्ट्री चालकांकडून कोंबड्यांना लस देण्याची उपाययोजना
उस्मानाबाद : देशातील 4 राज्यात बर्ड फ्लूने कहर केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील पोल्ट्री चालक यांनी वेळीच उपाययोजना आणि काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. बर्ड फ्लू जरी आला नसला तरी कोंबड्यांना लस देणे, स्वच्छता राखणे आणि इतर काळजी घेणे सुरू केले आहे, बर्ड फ्लूचा कोंबडी विक्रीवर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती उस्मानाबादच्या एका पोल्ट्री चालकाने टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना दिली आहे.
-
ग्रामपंचायत निवडणुकीत अतिशय चांगलं यश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु : चंद्रकांत पाटील
“भाजपचे 12 नेते राज्याच्या दौऱ्यावर, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय, पक्षबांधनी बाबात निर्णय, ग्रामपंचायत निवडणुकीच्या मार्चेबांधनीसाठी नियोजन, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 28 कार्यकर्ते सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवासाला निघाले आहेत, ते सर्व ठिकाणांचा आढावा घेतील, साडे चौदा हजार ग्रामपंचायत निवडणुकीत अतिशय चांगलं यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
-
कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता द्या, अण्णा हजारेंचे केंद्र सरकारला पत्र
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं केंद्र सरकारला पत्र, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून अधिकार काढून कृषी मूल्य आयोगाला स्वायत्त अधिकार देण्याची मागणी
-
SEBC प्रवर्गातील विद्यार्थींसाठी पोलिस भरतीबाबत गृहविभागाचा जीआर
SEBC प्रवर्गातील विद्यार्थींसाठी पोलिस भरतीबाबत गृहविभागाचा जीआर
– ‘एसईबीसी’चे आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय – ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार – जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी आणि शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून करावा विचार – ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार – वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा, 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागणार – पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना – गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती, मात्र 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती – मात्र गृह विभागाने पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले
-
वर्षा संजय राऊत यांना पुन्हा ईडीचं समन्स
वर्षा संजय राऊत यांना पुन्हा ईडीचं समन्स, 11 जानेवारीला चौकशीसाठी हजेरीचे आदेश, वर्षा राऊत यांची चार जानेवारी रोजी चार तास चौकशी, परंतु चौकशी पूर्ण न झाल्याने ईडीचे पुन्हा समन्स
-
संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रद्द, शेकडो वर्षांची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित
संत निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा रद्द, शेकडो वर्षांची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित, त्रंबकेश्वर येथे दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराज यांची भव्य यात्रा होत असते, या यात्रेला राज्य भरातून हजारो वारकरी होतात सहभागी, फेब्रुवारी महिन्यात 6 ते 9 तारखे दरम्यान होणार होता हा उत्सव, वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ महाराज यांच मोठं स्थान, कमी वारकऱ्यांच्या उपस्थितीत या उत्सवाला परवानगी देण्याची विश्वस्त मंडळाची मागणी
-
मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर सोलापुरात, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर सोलापुरात, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक सुरु, कोराना लस वितरणाचा घेत आहेत आढावा, कोरोना नवीन संसर्गाच्या उपाययोजना आणि प्रशासनाची तयारी याचा घेत आहेत आढावा
-
महाराष्ट्राची ‘संत परंपरा‘ राजपथावर दिसणार, प्रजासत्ताक दिनी राजपथावर ‘संत परंपरा’ दाखवणारा चित्ररथ
महाराष्ट्राची ‘संत परंपरा‘ राजपथावर दिसणार, प्रजासत्ताक दिनी राजपथावर ‘संत परंपरा’ दाखवणारा चित्ररथ, शिवाजी महाराज आणि संत तुकाराम भेटीचा फिरता देखावा असेल, तुकारामांची गाथा राजपथावर दिसेल, संत साहित्याची महती पाहायला मिळणार, वारकरी चित्ररथावर पाहायला मिळणार, यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा, संत जनाबाई यांचा देखावा.
-
“सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न द्या”
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि बसपा सुप्रीमो मायावती यांना भारतरत्न पुरस्कार द्या, काँग्रेस नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांची मागणी. राजकरण आणि समाजकारणामध्ये महिला शक्तीचा आदर करत सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न देण्याची मागणी हरीश रावत यांनी केली.
-
चंद्रपुरात तक्रारकर्त्याची पोलीस ठाण्यातच आत्महत्या
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस ठाण्यात घडली खळबळजनक घटना, तक्रारकर्त्याने पोलीस ठाण्यातच केली आत्महत्या, कौटुंबिक वादाने होता त्रस्त, रात्री तक्रार करून आज सकाळी ठाण्यात जाऊन घेतला गळफास, अशोक राऊत असं मृताचं नाव, सिंदेवाही इथल्या दसरा चौकातील आहे रहिवासी
-
ग्रामंपचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला जागा दाखवून देऊ: आशिष शेलार
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपनं 12 जणांची स्पेशल टीम तयार केली आहे. ग्रामपंचायतीमध्ये मोठा विजय मिळवू, असं आशिष शेलार म्हणाले. विधानपरिषदेत जसं यश मिळालं तसं यश ग्रामपंचायत निवडणुकीत मिळणार नाही. यावेळी महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.
-
रायगडमध्ये चिरनेर गावाजवळ तरुणीचा मृतदेह आढळला
रायगडमध्ये उरणच्या चिरनेर गावाजवळ आढळला तरुणीचा मृतदेह, 16 वर्षीय समीक्षा वशेणिकरचा मृतदेह गावालगतच्या जंगलात आढळला, जंगलीतील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा संशय
-
राफेलच्या आकारातील पतंगीची कामोठेमध्ये विक्री
पनवेलमधील कामोठ्यात चक्क राफेल विक्रीला, 1,000 रुपयांत राफेल विमानाचे व्हा मालक, राफेलच्या आकारातील पतंगीची कामोठेमध्ये विक्री, 50 रुपयांपासून 1000 पर्यंतच्या पतंगी बाजारात
-
इचलकरंजी नगरपालिका सभापती यांची निवड होणार
इचलकरंजी नगरपालिका सभापती यांची होणार निवड, शहरातील नगरपालिकेमध्ये कोण सभापती होणार याकडे शहराचे संपूर्ण लक्ष, गतवर्षी भाजप ताराराणी आघाडी काँग्रेस व शाहू आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी यांनी सत्ता स्थापन केली होती, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सकाळपासूनच सर्व पक्षांमध्ये बैठकीचे सत्र सुरु, इचलकरंजी शहरांमध्ये महाविकास आघाडी पॅटर्न चालणार जोरदार चर्चा भाजपाला दूर ठेवण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र
-
जळगाव-ममुराबाद महामार्गावर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ
जळगाव-ममुराबाद महामार्गावर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, सकाळी शेतात जाताना गावकऱ्यांच्या लक्षात आला प्रकारबिबट्याचा वाहनाची धडक वाहून मृत्यू झाल्याची प्राथमिक अंदाज
-
नाशकात किरकोळ कारणावरुन मित्रानेच केला मित्राचा खून
नाशकात किरकोळ कारणावरून मित्रानेच मित्राचा केला खून, नाशिकच्या गंगापूर रोड भागातील घटना, खून केल्यानंतर आरोपी स्वतः हुन पोलीस ठाण्यात हजर, दगड डोक्यात टाकून केली हत्या, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलीस तपास सुरू
-
मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव “नाना शंकरशेठ सेंट्रल टर्मिनस” करण्याबाबत केंद्र सरकारची कारवाई सुरु
मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव “नाना शंकरशेठ सेंट्रल टर्मिनस” करण्याबाबत केंद्र सरकारची कारवाई सुरु, केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना पत्र लिहून दिली माहिती, गेली काही वर्षे नामांतरासाठी शिवसनेनं केला होता सातत्याने पाठपुरवठा, नामांतराबाबत सर्व यंत्रणांचा अहवाल प्राप्त राय यांनी अरविंद सावंत यांना दिली आहे.
-
आमदार पुत्राच्या शाही विवाह सोहळ्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, विभागीय आयुक्तांचे पोलिसांना आदेश
नाशिकचे आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ, आमदार पुत्राच्या शाही विवाह सोहळ्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, विभागीय आयुक्तांचे पोलिसांना आदेश, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष, दोन दिवसांपासून कारवाई बाबत पोलीस आयुक्त आणि जिल्ह्याधिकारी यांच्यात सुरू होती टोलवाटोलवी, शाही विवाह सोहळ्याला पालकमंत्री भुजबळ, अजित पवारांपासून बड्या नेत्यांची होती हजेरी
-
सोन्याचा भाव 53 हजार 146 रुपये प्रति तोळ्यावर
जळगावात सोन्याचा भाव 53,146 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे, तर चांदी 72,703 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत
-
औरंगाबाद जिल्ह्यात 6000 महिला ग्रामपंचायतिच्या रिंगणात
औरंगाबाद जिल्ह्यात सहा हजार महिला ग्रामपंचायतिच्या रिंगणात, 617 ग्रामपंचायतमध्ये सहा हजार महिलांनी भरले उमेदवारी अर्ज, 310 ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी महिलांना संधी, निवडणुकीनंतर घोषित होणार आहे सरपंच पदासाठी आरक्षण, 617 ग्रामपंचायतीत 5683 सदस्यांसाठी होतेय निवडणूक, तर जिल्ह्यात तब्बल सहा हजार महिलांनी भरले आहेत उमेदवारी अर्ज
-
वाशिम जिल्ह्यात 163 ग्रामपंचायत पैकी 11 ग्रामपंचायत बिनविरोध
वाशिम जिल्ह्यात 163 ग्रामपंचायत पैकी 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या, 152 ग्रामपंचायतमध्ये थेट लढत होणार आहे, वाशिम जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतमध्ये शिवसेना विरोधात काँग्रेस तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँगेस अशी थेट लढत होणार
-
शिक्षिकेवरील बलात्कार प्रकरणी महेबूब शेखला पोलीस नोटीस बजावणार
शिक्षिकेवरील बलात्कार प्रकरणी महेबूब शेखला पोलीस बजावणार नोटीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी महेबूब शेखला बजावणार नोटीस, पोलीस ठाण्यात बोलावून महेबूब शेखचा घेतला जाणार जबाब, बलात्काराच्या तपासासाठी पोलिसांची तीन पथकं तयार, जबाबानंतर प्रकरण कोर्टात दाखल करण्याची पोलिसांची तयारी
-
चंद्रपुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार
चंद्रपुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार, राजुरा तालुक्यातील सिरसी गावाजवळील पहाटेची घटना, राजुरा ते विरुर मार्गावरील सिरसी गावालगत अज्ञात वाहनाच्या धडकेत मादा अस्वलाचा मृत्यू, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल
-
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीचं समन्स
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीने समन्स पाठवलं आहे
Narcotics Control Bureau, Mumbai has summoned actor Arjun Rampal’s sister today, in connection with a drugs case: NCB officer
— ANI (@ANI) January 6, 2021
-
सोलापूर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आढावा
सोलापूर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आढावा, कोराना लस वितरणाचा घेणार आढावा, कोरोना नवीन संसर्गाच्या उपाययोजना व प्रशासनाची तयारी याचा घेणार आढावा घेणार आढावा, कोरोना लस वितरणासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील 38 हजार कर्मचाऱ्यांची निवड
-
सोलापूर निर्यात बंदी हटल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आवक वाढली
सोलापूर निर्यात बंदी हटल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आवक वाढली, कांद्याच्या दरातही झाली वाढ, प्रतिक्विंटल 2,200 ते 3,600 रुपयापर्यंत कांद्याचे दर
-
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु, पहिल्याच दिवशी उमेदवारांनी काढल्या प्रचार रॅली, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या जोगेश्वरी, रांजणगाव, पाचोड, पिशोर, लासुर या ठिकाणी प्रचाराला सुरुवात, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरु
-
महावितरण कंपनीचे पालघर जिल्ह्यात 100 कोटींची थकबाकी
महावितरण कंपनीचे पालघर जिल्ह्यात 100 कोटींची थकबाकी, पालघर, डहाणू, जव्हार,तलासरी, विक्रमगड, मोखाडा ताल्युक्यातील वीज ग्राहकांनी थकवली माहावीतरणाची थकबाकी, 1 लाख 40 हजार 993 लघुदाब वीज ग्राहकाकडे 72.96 कोटी तर उच्यदाब वीज ग्राहकाकडे 36.66 कोटी वीज बिल थकीत, वीज ग्राहकांकडून बिल वसुलीसाठी सहकार्य करण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांचे स्थानिक आमदार, खासदारासह लोकप्रतिनिधींना साकडे, कोरोना काळात बिल वाटप बंद, मीटर रिडींग न घेणे, आणि अवास्तव वीज बिलाचा वीज महावितरण कंपनीला फटका
-
नागपुरातील रोड बांधकामासाठी सरकारकडून निधी मिळवून द्या, महानगरपालिकेची नागपूर खंडपीठात विनंती
नागपुरातील रोड बांधकामासाठी सरकारकडून निधी मिळवून द्या, महानगरपालिकेची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विनंती, कोरोनामुळे नागपूर महानगरपालीका आर्थिक संकटात, आर्थिक संकटामुळे रोड बांधकामासाठी राज्य सरकारकडून निधी मिळावा, निधीसाठी न्यायालयाने राज्य सरकारला आदेश देण्याची मनपाची विनंती, 21 जानेवारीला होणार पुढील सुनावणी, नागपूरातील काही रस्त्यांची दुरावस्था असल्याने नागरिकांना मनस्ताप
-
कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा सापडले दोन मोबाईल, आतापर्यंत चार घटनेत पंधरा मोबाईल जप्त
कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा सापडले दोन मोबाईल, सिम कार्ड आणि बॅटरी, मोक्कांतर्गत कारवाई तील पाच संशयितांना कडून सुरू होता मोबाईलचा वापर, बराक झडतीत उघडकीला आला प्रकार, रिकाम्या दुधाच्या पिशवीत गुंडाळून मोबाईल शौचालयाच्या पाण्यात ठेवला जात असल्याचा संशय, आतापर्यंत चार घटनेत पंधरा मोबाईल जप्त, कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेची ऐशीतैशी
-
नागपूर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, पेंच मुख्य जलवाहीनीच्या गळतीमुळे निर्णय
नागपूर शहरात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा, पेंच मुख्य जलवाहीनीच्या गळतीमुळे दिवसाआड पाणीपुरवठा, 6 फेब्रुवारीपर्यंत चालणार गळती दुरुस्तीचं काम, महिनाभर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, सम आणि विषम तारखेनुसार होणार पाणीपुरवठा, पाईपलाईनच्या गळतीमुळे कॅनलने पाणी पंपिंग स्टेशनपर्यंत, नवेगावखैरी ते महादुला पंपिंग स्टेशनपर्यंत कॅनलने पाणी
-
कोल्हापुरात महिलांनी हातोहात लांबवल्या सोन्याच्या बांगड्या, ग्राहक बनून आलेल्या तीन महिलांचे कृत्य
कोल्हापुरात महिलांनी हातोहात लांबवल्या सोन्याच्या बांगड्या, ग्राहक बनून आलेल्या तीन महिलांचे कृत्य, कोल्हापुरातील दसरा चौकातल्या तनिष्क शोरुममधील घटना, एक लाख 80 हजार रुपये किमतीच्या दोन बांगड्या महिलांनी केल्या लंपास, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, सेल्समनला बोलण्यात गुंतवून ठेवत कृत्य केलं, महिलांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-
इयत्ता 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या विशेष फेरीसाठी जवळपास 8,419 विद्यार्थी पात्र
इयत्ता 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या विशेष फेरीसाठी जवळपास 8,419 विद्यार्थी पात्र, त्यातील जवळपास 5 हजार 555 विद्यार्थ्यांना दुसऱ्या विशेष फेरीत प्रवेश, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या पुढील कार्यवाहीचा तपशील संकेतस्थळावर जाहीर
-
पुणे शहरात 7 आणि 8 जानेवारीला हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
पुणे शहरात 7 आणि 8 जानेवारीला हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज, शहर आणि परिसरात लागणार पावसाची हजेरी, पुणे वेधशाळेने वर्तवला अंदाज, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक व अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार, यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत, रविवारपर्यंत (10 जानेवारी) राज्यात हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये येत्या 11 जानेवारीपासून सुरु होणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये येत्या 11 जानेवारीपासून सुरु होणार, पहिल्या सत्रातील शिक्षण ऑनलाईनद्वारे बहुतांशपणे पूर्ण, त्यातील प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी ही महाविद्यालये सुरु होणार, विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार महाविद्यालये सुरु होणार, विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये सुरु करण्यासाठी प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलीये समिती, पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट आणि शोधप्रबंध पूर्ण करणे शक्य होणार, त्यानंतर पहिल्या सत्रातील परीक्षा घेतल्या जाणार
-
जबरदस्तीने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वृद्धाला पळवले, नागपुरातील घटना
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वृद्धाला पळवले, हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील कालडोंगरीतील घटना, रामभाऊ पवार यांच्या तक्रारीवरुन हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, बाल्या बावणे, दिपक करवा, पुरुषोत्तम सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल, गुन्हा दाखल झाल्यानंतर कालडोंगरी गावातील वातावरण तापलं, जबरदस्तीने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं प्रकरण
-
संजय राऊत गुरुवारी नाशिक दौऱ्यावर
शिवसेना खासदार संजय राऊत येत्या गुरुवारी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत, भाजपचे 2 बडे नेते शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता, याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे फायरब्रॅण्ड नेते संजय राऊत गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आहेत.
-
मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, संघटनात्मक बांधणीचा आढावा
मुंबईत भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीवरही चर्चा झाल्याचं ते म्हणाले
-
महाराष्ट्र राज्य काँग्रेस अध्यक्षांवर आज मोठ्या निर्णयाची शक्यता – सूत्र
महाराष्ट्र राज्य काँग्रेस अध्यक्षांवर आज मोठ्या निर्णयाची शक्यता, सूत्रांची माहिती, उशिरा रात्रीपर्यंत काँग्रेसची बैठक सुरु, या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटलांनी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, चरणसिंग सप्रा यांच्याबरोबर चर्चा केली,
-
आमदार रोहित पवार अंडा भुर्जी बनवतात तेव्हा…
आमदार रोहित पवारांकडून नवी मुंबईत अंडा भुर्जी बनवण्याचा प्रयोग, नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला, यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून रोहित पवारांनाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही, “शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला”, रोहित पवारांची माहिती
नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला.यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही.शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला. pic.twitter.com/T93MXIFcu3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2021
-
वाशिममध्ये पावसाची रिपरिप, बहरत आलेला आंबा मोहोर जळण्याची भीती
वाशिम जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून मध्यरात्री कारंजा शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे, या पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणामुळे बहरत आलेला आंबा मोहोर जळण्याची भीती, तर भाजीपाला पिकांनाही फटका बसण्याची शक्यता
-
भिवंडीतील रेवदी गावातील केमिकल ड्रमच्या भंगाराला भीषण आग
भिवंडी वाडा रस्त्यावरील तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या रेवदी येथे केमिकल ड्रमचा भंगार साठवलेल्या ठिकाणी भीषण आग, घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल
Published On - Jan 06,2021 9:58 PM