Maharashtra News LIVE Update | वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

| Updated on: Jun 11, 2021 | 12:13 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Jun 2021 12:12 AM (IST)

    दहिसर दुर्घटनेतील दोघांना रेस्क्यू करण्यात यश, यातील एकाचा मृत्यू, एकावर उपचार सुरु

    मुंबई : दहिसर पूर्वेत आज संध्याकाळी 6:30 वाजता केतकीपाडा या ठिकाणी असलेला शंकर मंदिराजवळच्या डोंगरावर माती सरकल्यामुळे 3 घर कोसळले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई पोलिसांचे जवान यांनी दोघांना रेस्क्यू केले आहे. यात 26 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दुसर्‍यावर शताब्दी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे. सध्या दहिसर पोलिसांचा घटनास्थळावर मोठा बंदोबस्त करून डोंगरावर या घराला लागून असलेल्या काही धोकादायक घरांना खाली करुन घेतले जात आहे.

  • 10 Jun 2021 10:31 PM (IST)

    वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

    वर्धा- जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

    – सकाळपासून जिल्ह्यात होते ढगाळ वातावरण

    – दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या  होत्या

    – रात्री वाऱ्यासह मुसळधार पाऊस

    – जिल्ह्याच्या आठही तालुक्यात पावसाच्या सरी

    – पावसाच्या आगमनाने शेतकरी आनंदीत

    – शेतीकामांना येणार वेग

  • 10 Jun 2021 10:23 PM (IST)

    मुसळधार पावसामुळे दहिसरमध्ये सहा घरे कोसळली, एकाचा मृत्यू, मलब्याखाली तीन जण अडकल्याची भीती

    मुसळधार पावसामुळे दहिसर केतकीपाडा परिसरात शिवाजी नगर याठिकाणी सहा घरे कोसळली आहेत. यामध्ये तीन व्यक्ती अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दल ,पोलीस, महानगरपालिका यांच्या कडून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे, 1 व्यक्ती मृत्यू झाला आहे

  • 10 Jun 2021 08:13 PM (IST)

    दहिसर पूर्वेत केतकी पाडा भागात घरे कोसळली, एकाचा मृत्यू

    दहिसर ;

    दहिसर पूर्वेत केतकी पाडा भागात तीन घरं कोसळली

    एकाचा मृत्यू

    अग्निशमन दल, मुंबई महापालिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल

  • 10 Jun 2021 07:01 PM (IST)

    मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सच्या नावाखाली परदेशी नागरिकांना फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    व्हियाग्रा, सियालिस आणि ल्विटाराय अशा ड्रग्सच्या नावाखाली परदेशी नागरिकांना फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    मुंबईच्या जोगेश्वरी भागात ड्रग्सच्या नावाखाली परदेशी नागरिकांना फसवण्यासाठी कॉल सेंटर चालविले जात होते

    हे कॉल सेंटर एलटीट्यूड या नावाने चालविले जात होते

    गुन्हे शाखेने 10 आरोपींना अटक केली

    पुढील तपास सुरु असून इतरांच शोध ही शुरू

  • 10 Jun 2021 06:09 PM (IST)

    नागपुरातील 21 महिन्याच्या मुलीला दुर्धर आजाराने ग्रासले

    नागपूर :

    नागपुरातील 21 महिन्याच्या मुलीला दुर्धर आजाराने ग्रासले

    चिमुकलीला बरं होण्यासाठी जगातील सगळ्यात महाग 16 कोटी रुपये किमतीच्या इंजेक्शनची आवश्यकता

    युएसमधून मागवावे लागणार इंजेक्शन

    त्यावर लागणारी इम्पोर्ट ड्युटी मिळून इंजेक्शनची किंमत जाणार 20 कोटीच्या वर

    बंगळुरुच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सुरू आहेत उपचार

    मुलीचे वडील होमिओपॅथी डॉक्टर आहेत

    परिवाराने केंद्र आणि राज्य सरकारला इमोपर्ट ड्युटी माफ करण्याची केली मागणी

    तर समाजातील नागरिकांना सुद्धा करत आहे मदतीची विनंती

  • 10 Jun 2021 06:04 PM (IST)

    संजय राऊत यांचा धुळ्यात चंद्रकांत पाटलांना टोला

    धुळे : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे ;

    लोकनेते दि. बा. पाटील हे स्थानिक नेते असल्याने त्यांच्या स्मारकाचा विचार करावा लागेल. परंतु सध्यातरी नवी मुंबई विमानतळास बाळासाहेबांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे

    चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी वाढदिवस साजरा करावा, कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावे, लहान मुलाप्रमाणे चंद्रकांत पाटलांकडे पाहावे,

    हे सरकार 5 वर्ष टिकेल, लोकसभा विधानसभा देखील लढवू, प्रत्येकाला वाटते की, आपला मुख्यमंत्री व्हावा तो प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे, नाना पटोले यांना वाटते की त्यांचा मुख्यमंत्री व्हावा, त्यात गैर नाही

    राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट झाली. राजशिष्टाचार प्रमाणे बैठक होती. आणखी झालेल्या चर्चेबाबत चंद्रकांत पाटलांना माहीत असल्याची कोपरखिळी राऊतांनी लगावली.

  • 10 Jun 2021 04:52 PM (IST)

    ब्रिटिशांनी सगळं मुंबईत केलं, शिवसेनेनं मुंबईत काय केलं? चंद्रकांत पाटलांचा सवाल

    पुणे :

    चंद्रकांत पाटील :

    ब्रिटिशांनी सगळं मुंबईत केलं,

    म्हातारीचा पुल ब्रिटिशांनी केलं, राणीचा बाग ब्रिटिशांनी तयार केलं

    शिवसेनेनं मुंबईत काय केलं ?

    या आधी काँग्रेसची सत्ता होती

    चंद्रकांत पाटलांचा पुण्यात कार्यक्रमावेळी शिवसेनेवर हल्लाबोल

  • 10 Jun 2021 04:10 PM (IST)

    भाजपशी घनिष्ठ मैत्री असल्यामुळे सरकार स्थिर आहे, संजय राऊत यांचा टोला

    धुळे :

    संजय राऊत :

    संघटनेत शिथिलता येणे गरजेचे आहे

    देशाची परिस्थिती सुधारलेली नाही

    चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यांनी वाढदिवस साजरा करावा, लहान मुलाप्रमाणे त्यांच्याकडे पाहावे

    जंगलातल्या वाघाने तुम्हाला खेळवलं आणि लोळवलं

    भाजपशी घनिष्ठ मैत्री असल्यामुळे सरकार स्थिर आहे

    धनगर आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे,

    शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केंद्र सरकार देखील प्रयत्न करत आहे

  • 10 Jun 2021 03:32 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे उदयनराजेंची भेट घेणार

    कोल्हापूर :

    संभाजीराजे आणि उदयनराजे यांची उद्या पुण्यामध्ये भेट होणार- सूत्र

    सर्व नेत्यांची भेट घेतली पण उदयनराजे यांची भेट झाली नव्हती

    त्यामुळे उद्या पुण्यात 12 वाजता उदयनराजे यांची भेट घेतली जाणार

  • 10 Jun 2021 03:30 PM (IST)

    रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा

    रोहित पवार :

    – एक पार्टी अशी आहे तिला नेहमी असं वाटतं की आपण राज्यात आणि देशात सत्तेत राहावं असा अहंकार नेहमी पाहायला मिळतो, नाव न घेता भाजपवर रोहित पवारांची टीका

    – मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची जे चर्चा करतात त्यांचा अभ्यास कमी आहे, आणि मुद्दामहून केलेली चर्चा आहे,

    – महाविकास आघाडी सरकारने राजकारण बाजूला ठेवून लोकांचा विचार करत आहेत,

    – चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मात्र चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षांनी एक लक्षात घेतलं पाहिजे केंद्राची आणि राज्याची खरी मजबुरी काय आहे यावर विचार केला पाहिजे, चंद्रकांत पाटलांनी लोकांची सेवा केली पाहिजे, रोहित पवारांचा सल्ला

    – महापुराचे नियोजन करतांना अटीतटीचं सरकार होते,

    – राष्ट्रवादीची ताकत कार्यकर्ते आहेत, येत्या काळात नवीन आव्हानं सोडण्याचा आमचा प्रयत्न असणार, विशेष करून तरुणांकडे आमचं लक्ष असणार आहे,

    – राज्यातील निवडणुकांमध्ये मोदींचा चेहरा वापरण्यासंदर्भातला भाजपचा अंतर्गत निर्णय आहे, मात्र आता उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका आहे, त्यासाठी काय नियोजन केले जाते ते पाहावं लागेल,त्यांना मदत जाहीर होत असेल आणि महाराष्ट्राला मदत मिळत नसेल तर केंद्र सरकार राजकारण करत आहे,

    – विरोधी पक्ष राज्याला मदतीसाठी केंद्राला कधी पत्र लिहणार ? रोहित पवारांचा विरोधी पक्षाला सवाल

  • 10 Jun 2021 01:44 PM (IST)

    10 वर्षानंतर कोणी बोट ठेवेल अशी भूमिका मी घेणार नाही – संभाजीराजे छत्रपती

    कोल्हापूर

    संभाजीराजे छत्रपती

    10 वर्षा नंतर कोणी बोट ठेवलं अशी भूमिका मी घेणार नाही

    आरक्षण नाकारल्या नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोण चुकलं यावरच जास्त चर्चा सुरू झाली

    चुका काढण्यापेक्षा या राजकीय नेत्यांनी मार्ग सांगितले पाहिजेत

    राजकीय खेळ सुरू झाल्यानेच मी आक्रमक भूमिका घेतली

  • 10 Jun 2021 01:42 PM (IST)

    मालाड मालवणी इमारत दुर्घटना, मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत

    मालाड मालवणी इमारत दुर्घटना

    मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये, जखमीवर शासकीय खर्चाने उपचार

    मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

  • 10 Jun 2021 01:41 PM (IST)

    मराठा समन्वयकांच्या बैठकीत नाराजी नाट्य, केवळ संभाजीराजे यांनी बोलावं असं काही समन्वयकांची अपेक्षा

    कोल्हापूर

    मराठा समन्वयकांच्या बैठकीत नाराजी नाट्य

    केवळ संभाजीराजे यांनी बोलावं असं काही समन्वयकांची अपेक्षा

    वेगवेगळ्या भूमिकेवरून बैठीत काहीसा गोंधळ

  • 10 Jun 2021 12:44 PM (IST)

    कोल्हापुरात मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक

    कोल्हापूर

    कोल्हापुरात मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक

    बैठकीला खासदार संभाजीराजे यांचे उपस्थित

    बैठकीत 16 जून ला होणाऱ्या मोर्च्याच्या नियोजना बाबत होणार प्राथमिक चर्चा

  • 10 Jun 2021 12:13 PM (IST)

    लोकांचे प्रश्न सोड वण्यासाठी सत्ता गरजेची आहे – शरद पवार

    शरद पवार –

    राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन

    सहकाऱ्यांच्या कष्टानं राष्ट्रवादीने २२ वर्ष पूर्ण केले

    राजकारणात सतत काम करत राहाणे गरजेचं

    सत्ता ही महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडावण्यासाठी सत्ता गरजेची आहे

    मविआ सरकार ५ वर्ष टिकणार, नुसतं टिकणार नाही तर लोकांसाठी कामही करणार

    देशात अनेक पक्ष बनले, काही टिकले तर काही कधी गायब झाले कळलं नाही

    राष्ट्रवादी योग्य दिशेने जात आहे

    पक्षातून काही लोक गेले तर नवीन लोक तयार झाले

    तीन पक्षाच्या सरकारला लोकांनी स्विकारलं, लोकांच्या याच विश्वासावर हे सरकार उत्तम सुरु आहे

    सत्ता एकाच ठिकाणी राहू नये, एकाच ठिकाणी राहिल्याने सत्ता भ्रष्ट होईल

    ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण, हे प्रश्न सोडवावेच लागतील,

    मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या

  • 10 Jun 2021 11:56 AM (IST)

    नागपुरात एलपीजी सिलेंडरमधील गॅस लिक झाल्याने शेजारी शेजारी असलेले तीन घरे जळून खाक

    नागपूर –

    एलपीजी सिलेंडरमधील गॅस लिक झाल्याने शेजारी शेजारी असलेले तीन घरे जळून खाक..

    नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे गावातील आज सकाळची घटना…

    सकाळी 6 च्या सुमारास राधाबाई टूले यांच्या कडील एलपीजी गॅस सिलेंडर लिक झाल्याने त्यांच्या घरी आग लागली.

    पाहता पाहता आग शेजारी राहणाऱ्या विठाबाई टुले, कुमुद नारायण सरोदे यांच्या घरापर्यंत पोहोचली…

    या आगीत तिन्ही घरं आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे..

    दुर्दैवाने एका विठाबाई टुले या महिला शेतकऱ्याने खरीप हंगामासाठी बियाणे व खत घेण्याकरिता जमा केलेले 50 हजार पण जळून खाक झाले आहे…

    प्राथमिक अंदाजानुसार या आगीत 10 लाखांचा नुकसान झाला आहे.. हा घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही

  • 10 Jun 2021 11:15 AM (IST)

    पुण्यातुन एनडीआरएफची पथकं अतिवृष्टीची शक्यता असणाऱ्या ठिकाणी रवाना झाली

    पुणे

    -पुण्यातुन एनडीआरएफची पथकं अतिवृष्टीची शक्यता असणाऱ्या ठिकाणी रवाना झाली

    -एकूण बारा पथकं आहेत. जी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि रायगड जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहेत

    -अतिवृष्टीने कोणती आपत्तीजनक स्थिती निर्माण झाल्यास हे जवान बचावकार्य पार पाडणार आहेत

  • 10 Jun 2021 11:08 AM (IST)

    पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्याला पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

    पुणे –

    पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्याला पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी,

    गर्दीचं सोशल डिस्टंसिंगचा फज्जा,

    अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या नाहीत का ?

    कोरोना विसरून कार्यकर्ते सेल्फी ,फोटो काढण्यात मग्न,

    महिला कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी,

    अजित पवारांना कार्यकर्त्तांना सल्ला देणार का ?

    कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून पुण्यात वर्धापन दिन साजरा

  • 10 Jun 2021 11:03 AM (IST)

    50 हजार रुपयांत किडनी! मलकापूरच्‍या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडन्या काढल्या विकायला

    बुलडाणा –

    50 हजार रुपयांत किडनी, मलकापूरच्‍या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडन्या काढल्या विकायला

    सरकारकडे मागितली परवानगी, पीक कर्जासाठी बँकांकडून छळ होत असल्याची तक्रार

    मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली

    उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत त्‍यांनी हे निवेदन दिले, दीपक पाटील, योगेश काजळे, दीपकसिंह गौर, सतीश काजळे, नितीन पाटील यांच्‍यासह अन्य शेतकऱ्यांनी दिले निवेदन

  • 10 Jun 2021 11:01 AM (IST)

    येत्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार, शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचा निर्धार

    पुणे

    येत्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार,

    आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच,

    पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी केला निर्धार,

    सत्ताधारी भाजपच्या कामावरती पुणेकरांमध्ये असंतोष,

    पुणेकर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवतील,

    अजित पवारांच्या नेतृत्वात महापालिका जिंकू शहराध्यक्षांना विश्वास,

    बाईट – प्रशांत जगताप ;शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

  • 10 Jun 2021 10:38 AM (IST)

    शिरपूर तालुक्यातील अजंदे गावात बंद असलेल्या जिंगिंग मध्ये देशी दारुचा कारखाना उध्वस्त

    धुळे –

    शिरपूर तालुक्यातील अजंदे गावात बंद असलेल्या जिंगिंग मध्ये देशी दारुचा कारखाना उध्वस्त

    लाखो रुपयांचा मुद्दे माल जप्त

    मुंबईच्या उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

    3 जण ताब्यात

  • 10 Jun 2021 10:09 AM (IST)

    पुण्यातील देवाच्या आळंदीमधील ग्रामस्थांनी यंदा पायी वारी सोहळा नको, अशी भूमिका घेतलीये

    पुणे –

    -पुण्यातील देवाच्या आळंदीमधील ग्रामस्थांनी यंदा पायी वारी सोहळा नको, अशी भूमिका घेतलीये

    -दुसऱ्या लाटेत बरंच भोगल्यानंतर आता तिसऱ्या लाटेत तीच वेळ यायला नको

    -शिवाय तिसऱ्या लाटेचं खापर ही वारकरी सांप्रदाय आणि ग्रामस्थांवर फुटू नये

    -म्हणून यंदा ही एसटीतूनच पंढरपूरला वारी नेहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीये

  • 10 Jun 2021 09:43 AM (IST)

    75 वर्षांच्या परंपरेला फाटा देत लासलगाव बाजार समिती कांदा लिलाव अमावस्येच्या दिवशी सुरु

    लासलगाव –

    – 75 वर्षांच्या परंपरेला फाटा देत लासलगाव बाजार समिती कांदा लिलाव अमावस्यच्या दिवशी सुरू

    लासलगाव बाजार समितीत प पू भगरी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करत कांदा लिलावाचा शुभारंभ

    600 वाहनातून 13 हजार क्विंटल कांद्याची मोठी आवक विक्रीसाठी दाखल

    कांदा लिलाव सुरू होता पहिल्या वाहनातील कांद्याला 2251 रुपये इतका बाजार भाव

    टीव्ही 9 च्या बातमीची दाखल घेत अमावस्येला लासलगाव बाजार समिती कांद्याचे लिलाव सुरू

  • 10 Jun 2021 08:29 AM (IST)

    कोल्हापुरातील मराठा समन्वयकांची महत्वपुर्ण बैठक

    कोल्हापूर :

    कोल्हापुरातील मराठा समन्वयकांची महत्वपुर्ण बैठक

    खासदार संभाजीराजे छत्रपती राहणार उपास्थित

    16 तारखेला होणाऱ्या मोर्चा नियोजनासंबंधी होणार चर्चा

    दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे होणार बैठक

    बैठकीत मोर्चाचा स्वरूप मार्ग या बाबत होणार प्राथमिक नियोजन

    मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी दिलाय आंदोलनाचा इशारा

    संभाजीराजांच्या आक्रमक भूमिकेनंतर आज होणाऱ्या नियोजनाच्या बैठकीकड सर्वांच लक्ष

  • 10 Jun 2021 08:20 AM (IST)

    पलूस तालुक्यातील आमणापूर बुर्लीत कृष्णाकाठी निसर्गाचा कलाविष्कार

    सांगली –

    पलूस तालुक्यातील आमणापूर बुर्लीत कृष्णाकाठी निसर्गाचा कलाविष्कार

    मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे बंचाप्पा वन झाले हिरवेगार

  • 10 Jun 2021 07:55 AM (IST)

    सोलापुरात स्मार्ट सिटी योजनेचे काम संथ गतीने सुरु

    सोलापूर–

    मोठा गाजावाजा करून शहरात पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी योजना झाली लागू

    मात्र स्मार्ट सिटी योजनेचे काम संथ गतीने सुरू

    नियोजनशून्य आणि अर्धवट कामामुळे व्यापारी आणि नागरिकांची मोठी तारांबळ

    गेल्या तीन वर्षांपासून केवळ कामे लवकरच पूर्ण करू असे दिले जात आहे आश्वासन

    आता पुन्हा नोव्हेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण  करण्याचा  केला वायदा

    गावठाणात तीन वर्षापासून कामे प्रलंबित असल्याने व्यापार करताना आणि नागरिकांना होत आहे त्रास

    महापौर आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका अधिकारी आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन व्यक्त केली नाराजी

    येत्या दोन महिन्यात काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा इशारा

  • 10 Jun 2021 07:51 AM (IST)

    सोलापूर एसटीचे 25 टक्के प्रवासी परतले

    सोलापुर -एसटीचे 25 टक्के प्रवासी परतले

    एसटी सेवेला पुन्हा गती आली आहे

    राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा एकदा सुरू झाली आहे एसटी सेवेला सुरुवात

    लॉकडाऊनचा एसटी महामंडळाला मोठा फटका

    गेले तीन चार दिवसात सोलापूरच्या एसटी सेवेत पुन्हा पूर्वी प्रमाणे प्रवासी वाहतूक सुरू

  • 10 Jun 2021 07:50 AM (IST)

    नाशिकच्या 51 कोव्हिड रुग्णालयांना नोटीस

    नाशिक – 51 कोव्हिडं रुग्णालयांना नोटिसा

    आरक्षित खाटांवर अल्प रुग्ण दाखवल्याने मागवला खुलासा

    मनपाने 167 कोव्हिडं रुग्णालयांना दिली होती मान्यता

    मनपाच्या 80 टक्के खाटा आरक्षित असताना बिल सादर न केल्याने समोर आला प्रकार

    मार्च एप्रिल मध्ये खाटा उपलब्ध नसल्याचं सांगणाऱ्या रुग्णालयांकडून आता बिल सादर करण्यास टाळाटाळ

  • 10 Jun 2021 07:35 AM (IST)

    पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मारुती सुझुकी कारने दुचाकीला धडकले

    सोलापूर –

    पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मारुती सुझुकी कारने दुचाकीला धडकले

    कारमध्ये केली जात होतो अवैद्य हातभट्टीची दारू

    अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी

    तर कार चालक अपघातानंतर झाला फरार

    जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

  • 10 Jun 2021 07:34 AM (IST)

    पुण्यात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत महावितरणच्या वीज देयकांची थकबाकी पुन्हा वाढली

    पुणे

    गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत महावितरणच्या वीज देयकांची थकबाकी पुन्हा वाढली

    पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण थकबाकी ७३५ कोटींवर

  • 10 Jun 2021 06:47 AM (IST)

    लोकमान्य मेडीकल कॉलेज सायन होस्टेलच्या रुममध्ये पावसाचं पाणी

    लोकमान्य मेडीकल कॉलेज सायन होस्टेलच्या गळक्या पत्रामुळे शिकाऊ डॉक्टरच्या रुममध्ये पावसाचं पाणी

    दुसऱ्या दिवशी परिक्षा असताना विद्यार्थाना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार

    महापालिकेकडून लगेच घेतली गेली नोंद

  • 10 Jun 2021 06:45 AM (IST)

    पायी वारी सोहळ्याला आळंदी ग्रामस्थांचा विरोध

    पायी वारी सोहळ्याला आळंदी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला

    यंदाही पालखी सोहळा हा एसटीतूनच पंढरपूर जावा, अशी मागणी राज्य सरकार, आळंदी देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदनातून केली

    दुसरी लाट परदेशातून आली, पण तिसऱ्या लाटेला आपण जबाबदार ठरायला नको

    कुंभमेळा, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक, ग्रामपंचायत निवडणुकांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे

    तेव्हा पायी वारीचा अट्टाहास वारकरी संप्रदायाची अवहेलना आणि बदनामीला कारणीभूत ठरेल, असं ग्रामस्थांनी निवेदनात म्हटलंय

  • 10 Jun 2021 06:44 AM (IST)

    अमरावती विभागीय आरोग्य उपसंचालक राजकुमार चव्हाण यांना खंडणीची मागणी, आरोपीला अटक

    अमरावती विभागाचे आरोग्य उपसंचालक व अकोल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांना एका इसमाने फोनवरून धमकी देऊन खंडणीची मागणी केली

    याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भांदवि कलम 384,  504,  506 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

    याप्रकरणी शिवणी येथील बुद्ध कॉलनीत राहणाऱ्या 38 वर्षीय संघरक्षीत गोपनाराण यास अटक केली

  • 10 Jun 2021 06:37 AM (IST)

    मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, 9 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

    मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली

    या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला

    8 जण गंभीर जखमी झाले

    जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु

    दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु

Published On - Jun 10,2021 6:30 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.