LIVE | वाशी टोल नाका येथे मराठा क्रांती मोर्चाचा रास्ता रोको अंदोलन
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
वाशी टोल नाका येथे मराठा क्रांती मोर्चाचा रास्ता रोको अंदोलन
नवी मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द करण्यात झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. वाशी टोलनाका येथे नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चाने रास्तारोको करून आंदोलन केले. त्यांनतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळं केला. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. तसेच सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देऊन न्यायालयाने याचा फेरविचार करून समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली.
-
ठाण्यात पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध
ठाणे : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केल्याचा आरोप करुन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात निषेध नोंदवला. हिंसाचाराचा आरोप करुन निषेध करण्यासाठी ठाण्यात भाजपचे कार्यकर्ते जिल्हाधिकरी कार्यालयासमोर जमले होते. यावेळी भाजप आमदार संजय केळकर, राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
-
-
घाटकोपर आणि विद्या विहार परिसरात भीषण आग
मुंबई : घाटकोपर आणि विद्या विहारच्या मध्यावर असलेल्या नेव्हीच्या डेपोला भीषण आग
भंगार ठेवलेल्या ठिकाणी भीषण आग
या आगीमुळे घाटकोपर आणि विद्याविहार विभागात धुराचे मोठे लोट
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि तीन टँकर घटनास्थळी दाखल
आग विझविण्याचा प्रयत्न सुरू
-
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू, मराठा आरक्षण, कोरोना परिस्थिती, लसीकरण, रेमडेसिव्हीर या मुद्यांवर चर्चा
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू
बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित
अजित पवार, जयंत पाटील, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, धनंजय मुंढे, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, अमित देशमुख विश्वजित कदम, दत्ता भरणे दिलीप वळसे पाटील यांचीसुद्दा उपस्थिती
मराठा आरक्षण, कोरोना परिस्थिती, लसीकरण, रेमडेसिव्हीर या मुद्यांवर बैठकीत चर्चा
-
बार्शी शहर आणि तालुक्यात जोरदार पाऊस, सकाळपासून ढगाळ वातावरण
सोलापूर –
बार्शी शहर आणि तालुक्यात जोरदार पाऊस
सकाळ पासून होते ढगाळ वातावरण
कापडापासून हैराण झालेल्या बार्शीकराना पावसामुळे दिलासा
-
-
नाशकात भाजपाचे सभागृह नेते सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर हल्ला
नाशिक – भाजपाचे सभागृह नेते सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर हल्ला
पंचवीस ते तीस जणांच्या टोळक्याने केला सिनेस्टाईल हल्ला
दोन दिवसांपूर्वी सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी असा हल्ला केल्याची चर्चा
दोन्ही हल्ल्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात
नाशिक मध्ये राजकीय वर्चस्वातून टोळीयुद्ध भडकले
-
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात भाजपा कार्यकत्यांचे आंदोलन
नालासोपारा – पश्चिम बंगाल मधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज नालासोपाऱ्यात भाजपा कार्यकत्यांचे आंदोलन
भाजप कार्यालयावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ नालासोपारा पूर्व तुलिंज परिसरात जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले आहे.
पश्चिम बंगाल मध्ये लोकशाही ची हत्या करण्याचे काम तृणमूल काँग्रेस चे अनेक कार्यकर्ते करत आहेत. ही मुद्दाम घडवला जाणारा हिंसाचार ही अतिशय निंदनीय प्रकार आहे.आणि त्याचा आम्ही सर्व भाजपा चे कार्यकर्ते त्याचा निषेध करतो अशा घोषणा ही भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.
-
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक
कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक
समाजाचा राज्य सरकार विरोधात संताप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
मराठा समाजाची दसरा चौकात निदर्शने
-
भाजप कार्यकर्त्यांवर बंगालमध्ये होणाऱ्या हल्ल्याविरोधात कल्याण मध्ये भाजपची निदर्शने
निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमजध्ये भाजप कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कल्याण मध्ये आज निदर्शने करण्यात आली. कल्याण पश्चिमेला माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली.
-
तडीपार गुंड प्रवीण महाजनकडून फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक फोजादार सय्यद यांचा खून
पुणे –
तडीपार गुंड प्रवीण महाजनकडून फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक फोजादार सय्यद यांचा खून,
बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ खून,
गुंड महाजन पोलिसांच्या ताब्यात
-
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मुलांच्या जवळपास 6 कंपन्या सीबीआयच्या रडारवर
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखच्या मुलांच्या जवळपास 6 कंपन्या सीबीआई च्या रडारवर
अनिल देशमुखवर लागलेल्या भरस्टाचार प्रकरणाची सध्या चौकशी करत आहे सीबीआई
अनिल देशमुखचे पुत्र सलिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख हयांच्या कोलकाता स्थित ज़ोडीएक डीलकाम प्रायवेट लिमिटेड कम्पनि चौकशीच्या केंद्रबिंदु
सुत्तरांच्या माहिती प्रमाणे सदर कम्पनिचा पत्ता ज़ोडीएक डीलकाम ९/12 लाल बाजार इ ब्लॉक दूसरा मजला कोलकता आहे
हा पत्ता मार्केंटाईल बिल्डिंगच आहे मात्र 2017 च्या काळ्या पैसांच्या एका तपासात ह्या इमारतीत जवळपास 400 शेल कंपन्या ( बोगस कंपन्या ) आढळून आल्याचा माहिती समोर आली होती
त्यावेळी मिनिस्ट्री ऑफ कारपोरेट अफेयर्सने मोठ्या संख्येत यातल्या कंपन्या केला होता बंद
मात्र रजिस्ट्रार आफ कंपनीच्या रिकार्ड प्रमाणे जवळपास 100 पेक्षा जास्त कंपन्या अजूनही शुरू असल्याची माहिती
त्यापैकी सक्रिय जवळपास 30 कम्पनयांच्या रजिस्टर्ड कार्यालयाचा पत्ता तोच आहे जो देशमुखंच्या ज़ोडीएक डीलकाम कम्पनिचा पत्ता आहे
सम्पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआई मार्फत शुरू आहे
-
वसई विधान सभेत हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेतून लढलेल्या विजय पाटील यांची घरवापसी
वसई : वसई विधान सभेत हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेतून लढलेल्या विजय पाटील यांची घरवापसी
काल शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थित केला पक्ष प्रवेश.
विजय पाटील यांच्या घरवापसिने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसईत हा शिवसेनेला मोठा धक्का तर काँग्रेसला मिळाले बळ
मुस्लिम ।आणि ख्रिश्चन समाजाचे विजय पाटील यांना आहे मोठे पाठबळ
-
पुण्यातील बुधवार पेठेत तडीपार गुंडाचा पोलिसावर खुनी हल्ला
पुणे –
– पुण्यातील बुधवार पेठेत तडीपार गुंडाचा पोलिसावर खुनी हल्ला,
– हल्यात पोलिस हवालदार समीर सय्याद यांचा जागीच मृत्यू,
– सय्यद यांच्यावर गुंड प्रविण महाजन याने चाकूने गळा चिरत केला श्रीकृष्ण टॉकीज जवळ केला हल्ला,
– आरोपी प्रविण महाजनवर अनेक गंभीर गुन्हे आहेत दाखल,
– डबल तडीपार आरोपीचा बुधवार पेठेत होता वावर.
-
नागपुरातील मेयो, मेडीकलमधील प्रशिक्षणार्थी डॅाक्टर्स आज दुसऱ्या दिवशीही संपावर
– नागपुरातील मेयो, मेडीकलमधील प्रशिक्षणार्थी डॅाक्टर्स आज दुसऱ्या दिवशीही संपावर
– मेयो आणि मेडीकलमधील रुग्णसेवा विस्कळीत
– मानधन वाढ, विमान कवच आणि इतर मागण्यांसाठी संप
– जिल्हाधिकारी आणि मा.आयुक्त यांच्या सोबत झालेल्या बैठकीत तोडगा नाही
– लेखी आश्वासन न मिळाल्याने प्रशिक्षणार्थी डॅाक्टर कामावर रुजू झाले नाहीत
-
जेष्ठ स्वातंत्रसेनानी वसंतराव हुदलीकर यांचं पहाटे निधन
नाशिक – जेष्ठ स्वातंत्रसेनानी वसंतराव हुदलीकर यांचं पहाटे निधन
स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींसोबत दिला होता लढा
2011 साली अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात केलं नेतृत्व
हुदलीकर यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात हळहळ
-
नाशकात आईच्या मृत्यूने व्यथित झालेल्या मुलीची आत्महत्या
नाशिक – आईच्या मृत्यूने व्यथित झालेल्या मुलीची आत्महत्या
ऑक्सिजन बेड न मिळाल्याने जया भुजबळ या महिलेचा झाला होता मृत्यू
आईच्या मृत्यूने व्यथित झालेल्या शिवानी भुजबळ हिने सॅनिटायझर प्राशन करत केली आत्महत्या
आई आणि मुलीच्या पाठोपाठ मृत्यू मुळे शहरात हळहळ
-
व्यावसायिक मयुरेश राऊत यांचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
सोनू जालाननंतर विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि माजी पोलीस अधिकारी आणि एंकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा, ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांवर गंभीर आरोप
2017 साली पोलिसांनी घरात दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचा आरोप
-
पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या सीबीआय चौकशीसाठी भाजप सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली. हिंसाचार घडविणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
-
मुंबई शहरातून चार पोलीस निरीक्षकांची बदली
मुंबई शहरातुन चार पोलिस निरीक्षक सुधीर दळवी, केदारी पवार, नंदकुमार गोपाळे आणि सचिन कदम यांची मुंबईबाहेर बदली
सुधीर दळवी यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र नानाविज,
केदारी पवार यांना जिल्हा जात प्रमाणपत्र चाचणी समिती जळगाव
नंदकुमार गोपाळे यांना पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना
तर सचिन कदम यांची TRTI औरंगाबाद येथे बदली करण्यात आली आहे
Published On - May 05,2021 5:07 PM