LIVE | शहापूर तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस व सुसाट वादळामुळे अनेक घरांची पत्रे उडाली

| Updated on: May 08, 2021 | 11:09 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | शहापूर तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस व सुसाट वादळामुळे अनेक घरांची पत्रे उडाली
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 May 2021 10:06 PM (IST)

    शहापूर तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस व सुसाट वादळामुळे अनेक घरांची पत्रे उडाली

    शहापूर : शहापूर तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस व सुसाट वादळामुळे साठगाव, शिल्लोत्तर, शेणवे परिसरात अनेक घरांचे कौले, पत्रे फुटुन शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी सुसाट्याच्या वाऱ्याने अनेक घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे.

  • 08 May 2021 08:57 PM (IST)

    परमवीर सिंग, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथिंबीरे यांच्याविरोधात तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ, विरार पोलिसांवर गंभीर आरोप

    माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथिंबीरे यांच्या विरोधात तक्रार घेण्यास विरार पोलिसांनकडून टाळाटाळ

    विरार मधील मयुरेश राऊत यांचा आरोप

    2017 मध्ये मयुरेश राऊत यांच्या दोन गाड्या जबरदस्तीने ठाणे खंडणी विरोधी पथकाने घेऊन गेले असल्याचा आरोप तक्रारीत आहे.

    गाड्या चोरी, अपहरण, जीवितास धोका असल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, तक्रार दाखल करून तपास होईपर्यंत मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी मयुरेश राऊत यांच्या तक्रारीत आहे.

    मला मानसुख हिरेन व्हायचे नाही. म्हणून मी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथिंबीरे यांच्या विरोधात तक्रार देतोय पण माझी तक्रार कोणी घेत नसल्याचाही राऊत यांचा आरोप

    राऊत यांच्या गाडीने अनेक गुन्हे घडले असल्याचेही राऊत यांचे म्हणणे

  • 08 May 2021 08:19 PM (IST)

    गोंदियामध्ये पावसाची जोरदार हजेरी, तब्बल 1 तास बॅटिंग

    गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होवून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यासह तब्बल एक तास कोसळलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे गोंदिया शहरातील रस्त्यावर सवत्र पाणी पाणी दिसून येत होते. तर शहरातील अनेक दुकानावरील पत्रे उडून गेली. अनेक ठिकाणी झाडेसुद्धा उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला. अचानकपणे आलेल्या मुसळधार पावसामुळे रब्बी पिकासह बागायती शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

  • 08 May 2021 07:43 PM (IST)

    संगमनेर पोलीस हल्ला प्रकरण, मुस्लिम समाजच्यावतीने हल्ल्याचा निषेध

    संगमनेर पोलीस हल्ला प्रकरण, मुस्लिम समाजच्या वतीने हल्ल्याचा निषेध, पोलिसांना दिले निवेदन, आरोपींना अटक करण्याची मागणी, मात्र आरोपी सोडून इतरांवर कारवाई करू नये, निवेदनात केली मागणी, पोलीस हल्ला प्रकरणी चार जणांना केली अटक, उर्वरित आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजवरून शोध सुरू

  • 08 May 2021 06:09 PM (IST)

    नाशिक रोड येथील आनंद बाजार कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग

    – नाशिक रोड येथील आनंद बाजार कॉम्प्लेक्समध्ये लागली आग – शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज – अग्निशमन बंब, आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल

  • 08 May 2021 05:38 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवार यांची भेट

    मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

    आज सकाळी ‘सिल्व्हर ओक’ येथे घेतली भेट

    प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेतली भेट

    पवार आणि राऊत यांच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता

  • 08 May 2021 04:27 PM (IST)

    पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात ट्रकचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

    पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात ट्रकचा अपघात

    संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात अपघात

    अपघातात एकाचा जागीच मृत्यू

    टोमॅटो घेऊन जाणारा आयसर ट्रक पलटी झाल्याने अपघात

    महामार्गावर टोमॅटोचा अक्षरक्ष : खच

    नाशिककडून पुण्याकडे जाणारी वाहतुक काही काळ विस्कळीत

    महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल

    क्रेनच्या सहाय्याने ट्रक हटवला

  • 08 May 2021 04:20 PM (IST)

    सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या राजकारणामुळे मराठा समाजात संताप, मराठा नेत्याची प्रतिक्रिया

    पुणे :

    – मराठा क्रांती मोर्चा नेत्यांची पत्रकार परिषद

    – सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाविषयी दिलेला निकाल, राज्य व केंद्र सरकारच्या आरक्षण विषयी भूमिका आणि अन्य विषयावर पत्रकार परिषद

    राजेंद्र कोंढरे –

    – 5 न्यायाधीशांनी हा निर्णय दिला आहे, म्हणून त्याचं गांभीर्य आहे

    – राज्य सरकारला पुन्हा नव्याने कायदा करावा लागेल

    – समाजाने लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व निश्चित करावं लागेल

    – सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या राजकारणामुळे मराठा समाजात संताप

    – मराठा समाजाचे आतोनाक नुकसान झालंय – यावर सरकारने आता पर्याय काढावा – राज्य सरकारने रिव्ह्यू पिटीशन करावी

    – आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झाल्याची माहिती

    – सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर समाजाच्या भावना संतप्त आहेत,

    – यावर राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा

  • 08 May 2021 04:16 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील वाई परिसरात तिसऱ्या दिवशी जोरदार अवकाळी पाऊस

    वाशिम जिल्ह्यातील वाई परिसरात तिसऱ्या दिवशी जोरदार अवकाळी पाऊस सुरू, या पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद आणि आंबा पिकाचे नुकसान

  • 08 May 2021 02:31 PM (IST)

    पालकमंत्री छगन भुजबळ आणि भाजप आमदार राहुल आहेर यांच्यात शाब्दिक चकमक

    – पालकमंत्री छगन भुजबळ आणि भाजप आमदार राहुल आहेर यांच्यात शाब्दिक चकमक -कोरोना प्रादुर्भाव उपाययोजना बाबत सुरू असलेल्या बैठकीत भाजप आमदार डॉ राहुल आहेर आक्रमक – लोकप्रतिनिधी आणी अधिकारी यांची संयुक्त बैठक – जिल्ह्यातील सर्व खासदार,आमदार आणी सर्व प्रमुख अधिकारी सहभागी – प्रशासनाच्या आरोग्य उपाययोजना दाव्यांची,डॉ राहुल आहेर यांनी केली पोलखोल – कोविड हॉस्पिटल नावाखाली,इतर रुग्णांना मिळत नाहीयेत उपचार – सरकारी दावे आणी आकडेवारी यातील तफावत,पुराव्यासाहित,आमदार डॉ आहेर यांनी मांडली – पालकमंत्री भुजबळ यासोबत,खडाजंगी

  • 08 May 2021 02:30 PM (IST)

    लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहापूरमधील दुकानदारांवर धडक कारवाई

    शहापूर नगरपंचायत व गोठेघर ग्रामपंचयत मार्फत लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहापूर मधील दुकांनदारांवर धडक कारवाई

    लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता काही ठराविक सेवा पुरवणाऱ्या दुकानदारांना सकाळी 7 ते दुपारी 11 या कालावधीतच आपली दुकाने चालू ठेवण्याचे आदेश प्रशासना मार्फत दिले आहेत तरी सुद्धा ते नियम पायदळी तुडवत काही दुकानदार आपली दुकाने चालूच ठेवतात व लॉकडाऊन काळात नियमाचे पालन न करता आदेशाला केराची टोपली दाखवतात अशा दुकांदारांवर शहापूर नगर पंचायत व गोठेघर ग्रामपंचायत मार्फत धडक कारवाई

  • 08 May 2021 01:46 PM (IST)

    पंढरपुरात सकल मराठा समाजाची बैठक, अभ्यास करुन पुढील दिशा ठरवणार

    पंढरपुरात सकल मराठा समाजाची बैठक

    नूतन आमदार समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली बैठक

    सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर दिशा ठरवण्यासाठी झाली बैठक

    निकाल जवळपास पाचशे पानाचा असल्याने तो पूर्ण वाचून त्याचा अभ्यास करुन पुढील दिशा ठरवणार असल्याचे आमदार समाधान अवताडे यानी सांगितले ..

  • 08 May 2021 01:09 PM (IST)

    लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प, केवळ भाषण, घोषणा करणं हा मोदींचा कार्यक्रम : नवाब मलिक

    नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

    – दर दिवशी चार लाख पाॅझिटिव्ह केसेस, ही परिस्थिती असताना संपूर्ण देशात कोवीड हाताळण्यात केद्र जबाबदार… – केंद्र सरकार राज्यावर जबाबदारी टाकत आहे… -ऑक्सिजनचा कोटा निश्चित करूनही राज्याला ऑक्सिजन नाही… – महाराष्ट्राला ५० टनचा कोटा अद्याप मिळाला नाही… रेमडेसीवीरचा साठा नाही.. – लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प, राज्यात ४.५० लाख लोकांचे दुसरे डोज नाही.. कंपन्यांकडून लस नाही, केवळ भाषण, घेषणा करणं हा मोदींचा कार्यक्रम… – गॅसचे दर वाढले… जाणूनबूजूून आमच्यावर अन्याय करत आहेत… – ५० टनचा कोटा आम्हाला द्या, आमच्यावर अन्याय करू नका… – मोदींचा निवडणुकांनंतर तेलचे भाव वाढवा कार्यक्रम सुरू झालाय… लोकांना पगार नाही, त्यात पेट्रोल डीझेलचे दर वाढवून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करू नये.

  • 08 May 2021 01:01 PM (IST)

    सांगलीतील खासगी रुग्णालयात डॉक्टर आणि मृत रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक बाचाबाची

    सांगली –

    इस्लामपुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि मयत रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक बाचाबाची

    पेठ-सांगली रस्त्यावरील डॉ.सचिन सांगरुळकर यांच्या लक्ष्मी-नारायण हॉस्पिटल मधील प्रकार

    या वादानंतर डॉक्टरांने दिलेल्या तक्रारीनंतर रात्री 55 हुन अधिक जणांवर गुन्हे दाखल

    जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल

    काही दिवसांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 5-6 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा होता आरोप

  • 08 May 2021 11:40 AM (IST)

    INS विक्रमादित्य एयरक्राफ्ट कॅरियर युद्धपोतवर आग, जहाजावर सर्वजण सुखरुप

    मुंबई : INS विक्रमादित्य एयरक्राफ्ट कॅरियर युद्धपोतवर आग

    सकाळी 8 मे रोजी लागली होती आग

    नाविकांच्या विश्राम कक्ष मधून धुर उठताना दिसला होता

    जहजावर असलेल्या स्टाफ तर्फे आगिवर नियंत्रण मिलविन्याचा प्रयत्न करण्यात आला होता

    जहाजावर असलेले सर्वजण सुखरूप

    ह्या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत

    सध्या INS विक्रमादित्य जहाज हे कारवार हार्बर वर असल्याची माहिती

  • 08 May 2021 11:38 AM (IST)

    वाशिममध्ये माजी सैनिकाची आत्महत्या, राहत्या घरात गळफास

    वाशिम :

    माजी सैनिक विलास दत्तात्रय गणोदे (55) यांची घरात गळफास लावून आत्महत्या

    वाशिम जिल्ह्याच्या अमानवाडी येथील घटना

    आत्महत्येचे कारण अस्पष्ट

    पोलीस घटनास्थळी दाखल

  • 08 May 2021 09:04 AM (IST)

    पुणे जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा

    पुणे –

    – पुणे जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा,

    – जिल्ह्यातील २७ गावात आणि १२९ वाड्या वस्त्यांवर ४६ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा,

    – दुर्गम तसेच अवर्षणप्रवण परिसरात जलस्रोत आटले असून यामुळे त्याठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे,

    – गेल्यावर्षीच्या तुलनेने यावर्षी जिल्ह्यात सुरू असलेली टँकरची संख्या कमी आहे,

    – आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक ११ टँकरने पाणी पुरवठा होत आहे.

  • 08 May 2021 09:01 AM (IST)

    नवी मुंबईत पावसाळ्यात रस्त्यावर खड्डा दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

    नवी मुंबई

    पावसाळ्यात रस्त्यावर खड्डा दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

    आयुक्त अभिजित बांगर यांनी खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे दिले आदेश

    पावसाळी पूर्व कामांचा विस्तृत आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी बोलावली विशेष बैठक

    पावसाळ्यात खड्ड्यांमुळे लोकांची गैरसोय होता कामा नये आणि तक्रार येता कामा नये – आयुक्त

    अतिवृष्टी झाल्यास सखोल भागात आवश्यक क्षमतेचे पाणी उपसा पंप पुरेशा उपलब्ध ठेवावे

    पावसाळीपूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करून काटेकोर लक्ष देण्याचेही निर्देश

  • 08 May 2021 07:16 AM (IST)

    नाशकात शिवसेना पदाधिकारी उमेश नाईक यांची गळफास घेत आत्महत्या

    नाशिक –

    शिवसेना पदाधिकारी उमेश नाईक यांची आत्महत्या

    गळफास घेऊन केली घरात आत्महत्या

    आर्थिक प्रश्नांमूळे आत्महत्या केल्याची प्राथमिक अंदाज

  • 08 May 2021 07:15 AM (IST)

    पाथर्डी नगरपरिषद कर्मचारी कर्तव्य बाजावतांना मुलाने केली आईवर कारवाई

    अहमदनगर –

    पाथर्डी नगरपरिषद कर्मचारी कर्तव्य बाजावतांना मुलाने केली आईवर कारवाई

    शहरात एका पालिका कर्मचाऱ्याने आपल्या आईवर कारवाई करीत कर्तव्याला प्राधान्य दिले

    रशीद शफी शेख अस त्या मुलाचे नाव

    रस्त्यावर बसून भाजीपाला विकण्यासाठी सध्या मनाई आहे. मात्र त्या रस्त्यावर भाजीपाला विकणान्या बसल्या होत्या

    त्यामुळे आईचा सर्व भाजीपाला शेख यांनी उचलून घंटागाडीत टाकून कारवाई केली

  • 08 May 2021 07:14 AM (IST)

    नागपुरात 80 लाखांच्या करमाफीसाठी मागितली तीन लाखांची लाच, मनपाचा करसंग्रहक आणि कंत्राटी सुपरव्हायझर जेरबंद

    – नागपुरात 80 लाखांच्या करमाफीसाठी मागितली तीन लाखांची लाच

    – नागपूर मनपाचा करसंग्रहक आणि कंत्राटी सुपरव्हायझर जेरबंद

    – नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

    – करसंग्रहाक सुरज गणविर आणि रविंद्र बागडेला अटक

    – नागपुरात कराची रक्कम वाढवून सेटलमेंट करण्याचं रॅकेट सक्रिय

  • 08 May 2021 07:04 AM (IST)

    बाजार समित्या बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार, पालकमंत्री भुजबळ यांचे बैठकीत संकेत

    नाशिक – बाजार समित्या बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार

    पालकमंत्री भुजबळ यांचे बैठकीत संकेत

    वाढत्या कोरोना च्या पार्शवभूमीवर निर्णय होण्याची शक्यता

    भुजबळ फार्म वर सर्व जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागाच्या अधिकारी यांची बैठक

  • 08 May 2021 06:43 AM (IST)

    कडक लॅाकडाऊन असतानाही वर्ध्यात अवैध रेती वाहतुक नेमकी कुणाच्या आशीर्वादाने?

    – वर्धा जिल्ह्यातील अनेक रेतीघाटांवर अवैध रेतीचं उत्खनन आणि वाहतूक

    – कडक लॅाकडाऊन असतानाही अवैध रेती वाहतुक नेमकी कुणाच्या आशीर्वादाने?

    – समुद्रपूर,हिॅगणघाट तालुक्यातील घाटांवर नियम धाब्यावर बसून रेती उत्खनन

    – समुद्रपूरच्या मांडगाव – १ आणि २, मनगाव घाटातील धक्कादायक प्रकार

    – हिंगणघाटच्या नांदरा रिठ, शेकापूर बाईसह अनेक घाटांवरुन रेतीची अवैध वाहतूक

    – वणा नदीच्या पात्रात पारडी, जुनोना येथे मोठ्या प्रमाणात रेती चोरी

    – घरकुलासाठी राखीव असलेल्या घाटांवरील रेतीची अवैध विक्री

    – रोज ५०० पेक्षा जास्त टिप्पर रेतीची अवैध वाहतूक

    – सरकारच्या रोज कोट्यवधी रुपयांचा महसूलाची चोरी

    – परवानगी मसतानाही हिंगणघाट शहरात ठिक ठिकाणी रेतीची साठवणूक

    – लॅाकडाऊनमध्ये प्रशासन व्यस्त असल्याने सर्रास सुरु आहे रेती चोरी

  • 08 May 2021 06:41 AM (IST)

    पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के आरक्षण रद्द

    मुंबई :

    पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला

    पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे आता २५ मे २००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले

    आरक्षण रद्द झाल्याने नाराज झालेल्या मराठा समाजास या निर्णयाच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचे बोलले जात आहे

  • 08 May 2021 06:39 AM (IST)

    अंबरनाथमध्ये रासायनिक कंपनीत रिऍक्टरचा स्फोट

    अंबरनाथमध्ये रासायनिक कंपनीत रिऍक्टरचा स्फोट

    मोरीवली एमआयडीसीतील जैन अँड जैन कंपनी जळून खाक

    सुदैवाने कंपनी बंद असल्यानं जीवितहानी नाही

Published On - May 08,2021 10:06 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.