LIVE | मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार

| Updated on: May 10, 2021 | 11:36 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 May 2021 10:19 PM (IST)

    मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार

    मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार, मुख्यमंत्री मंगळवारी संध्याकाळी राज्यपालांची पाच वाजता भेट घेणार, या भेटी दरम्यान मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत राज्यपालांना निवेदन देणार

  • 10 May 2021 09:26 PM (IST)

    संगमनेरमध्ये अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने वायरमनचा मृत्यू

    अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने वायरमनचा मृत्यू संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील घटना मृत्यूनंतर तीन तास खांबावर लटकलेल्या अवस्थेत वीजप्रवाह बंद असताना अचानक सुरू झाला प्रवाह 22 वर्षीय कंत्राटी कामगार सौरभ गायकवाड यांचा मृत्यू दुपारी 3 वाजेच्या दरम्यानची घटना दोषींवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

  • 10 May 2021 08:21 PM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कोदामेंडी आणि जवळपासच्या परिसरामध्ये मान्सून पूर्व पाऊस

    नागपूर :

    नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कोदामेंडी आणि जवळपासच्या परिसरामध्ये आज संध्याकाळच्या मान्सून पूर्व सुमारास पाऊस

    सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसासोबत काही ठिकाणी गारपीटही झाली

    रामटेक शहरातही अर्धा तास झालेल्या पावसात दहा मिनिटं मध्यम आकाराची गारपीट झाली

    अचानक आलेल्या या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे

  • 10 May 2021 08:16 PM (IST)

    राज्य सरकारचा अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाप्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपा संदर्भात चौकशीसाठी गठित न्यायलयीन समिति संदर्भात राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय,

    निवृत न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल ह्यांना मिळणार उच्च न्यायलयाच्या विद्यमान न्यायमूर्तींना अनुज्ञेय असलेले वेतन आणि भत्ते इतके मानधन

    उच्च स्तर चौकशी समितीचे वकील असणार अॅडवोकेट शिशिर हीरे, त्याना मिळणार प्रत्यक्ष सुनावनिसाठी दिवसाचे 15000 इतके मानधन

    भैय्यासाहेब बोहरे (समितीचे प्रबंधक), सुभाष शिखरे (समितीचे शिरस्तेदार), हर्षवर्षंन जोशी (समितीचे लघुलेखक), संजय कार्णिक (कार्यालयीन अधीक्षक दंडाधिकारी)

    समितीचे वकील व्यतिरिक्त इतरांच्या मानधनबाबत विशेष वेतनाचे आदेश काढण्यात येतील

  • 10 May 2021 07:53 PM (IST)

    राज्यात ऑक्सिजन निर्मितीसाठी 1100 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार

    राज्यात ऑक्सिजन निर्मितीसाठी 1100 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार

    येत्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्तावाला मिळणार मंजुरी

    कमी कालावधीत सुरू होणारे प्रकल्प राज्य सरकार करणार सुरू

    सध्या महाराष्ट्रत १८०० मेट्रिक टनची आवश्यकता असून यापैकी १२९५ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रत होते तर ५०० मेट्रिक टन इतर राज्याकडून मिळते

    त्यापैकी बिल्लारी प्रकल्पातून मिळणाऱ्या 50 मेट्रिक टनचा पुरवठा बंद आहे तर कोल्हापूरमधील 11 मेट्रिक टन ऑक्सिजन गोव्याला केंद्र सरकारच्या आदेशाने पाठवण्यात आला

    त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्य सरकारला राज्यात तयारी करावी लागणार

  • 10 May 2021 07:32 PM (IST)

    नागपूरला आज मोठा दिलासा, बाधित रुग्णांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या जास्त, मृत्यू संख्येतही घट

    नागपूर जिल्ह्यात आज 6068 जणांनी केली कोरोनावर मात

    2530 नवीन रुग्णांनाची नोंद

    तर 51 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्ण संख्या – 451605

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 392269

    एकूण मृत्यू संख्या – 8142

  • 10 May 2021 06:51 PM (IST)

    कल्याणमध्ये तरुणाची पुलावरुन नदीत उडी मारुन आत्महत्या

    कल्याण :

    गांधारी परिसरात धक्कादायक प्रकार,

    मयूर जाधव नावाचा तरुणाने पुलावरून नदीत मारली उडी

    कल्याण पश्चिमेतील बारावे परिसरात राहत होता मयूर

    मयूरला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू

    नदीत उडी मांडण्यापूर्वी मयूरने तयार केला होता व्हिडिओ

    स्टेटस वर ठेवला होता व्हिडिओ

    दारुमुळे आत्महत्या केल्याच्या प्राथमिक अंदाज

    आत्महत्याचे नक्की कारण काय पोलीस तपासात समोर येणार

    पडघा पोलीस आणि अग्निशामक दल कडून शोध मोहीम सुरू

  • 10 May 2021 06:49 PM (IST)

    बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला, बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा?

    बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

    शरद पवार साहेबांना भेटलो ते आजारपणात ना बाहेर येत आहेत. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भेटलो होतो पण पवार साहेबांना भेटलो म्हणजे निव्वळ तब्येतीची चौकशी नाही तर अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली

    साखर कारखानदारीत साखरेचे उत्पादन झालय. साखर जादा तयार झाली आपण तिची विक्री होत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर आणि कारखानदारीवर परिणाम झालेत

    खरीप हंगाम येत आहे यावर चर्चा झाली मान्सून पीक पुढच्यावर्षी कसा राहील पाण्याचा साठा यावर चर्चा झाली कोरोना च्या कामावर माहिती घेतली

    कृषी कायदा केंद्र सरकारने केला आहे अध्याप ही त्याला विरोध होत आहे यावरही चर्चा झाली. बदल हवेत यावरही चर्चा झाली

    साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेला असलं साखर विकली जात नाहीये लॉक डाऊन मुळे, त्यामुळे कृषी कर्जाच्या मर्यादा वाढवाव्यात आणि हे केंद्राकडे अखत्यारीत प्रश्न आहेत

    अशा विषयांचे राजकारण करायचं नसतं त्यामध्ये हा विषय आहे जरी त्यांचे सरकार होतं भारतीय जनता पक्षाचा त्या कालखंडामध्ये कायदा केला गेला घटनेच्या बदल केला गेलेला कायदा सुप्रीम कोर्टाने मान्य केला नाही. याचा दोष आमचा नाही आम्ही मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला होता राजकारण केलं नाही काय पर्याय आहे याची चर्चा आम्ही करत आहोत मार्ग काढू त्यावेळी आम्ही एकीने मागे उभे राहिलो आता विनायक मेटे सारखे लोकं कोणीतरी सांगत म्हणून ते राजकारण करत आहेत

    विनायक मेटे यांना राजकारण करायचा आहे ही दुर्दैवाची गोष्ट, हे चुकीचं आहे

  • 10 May 2021 05:56 PM (IST)

    परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांकडूव जिवीतास धोका, 24 तास सुरक्षा द्या, सहाय्यक पोलीस निरिक्षकाची मागणी

    परमबीर सिंग यांच्यावर आरोप केलेल सहाय्यक पोलीस निरिक्षक बी आर घाडगे यांनी केली 24 तास संरक्षणाची मागणी – परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांकडूव जिवीतास धोका असल्याचा आरोप – मुंख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, ठाणे पोलीस आयुक्तांना लिहीलं पत्र – त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना धोका असल्याचं सांगत २४ तास हत्यारी पोलीस संरक्षण निशुल्क देण्याची केली मागणी

  • 10 May 2021 04:42 PM (IST)

    भाजपमध्ये गटातटाच्या राजकारणाला सुरुवात, प्रसाद लाड नाराज

    – भाजपमध्ये गटातटाच्या राजकारणाला सुरुवात, प्रसाद लाड नाराज, सुत्रांची माहीती – मुंबई मनपा आयुक्त कार्यालयातील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आशिष शेलार, अतूल भातखळकर, प्रविण दरेकर पोहोचले. पण प्रसाद लाड साईडलाईन झाल्याने नाराज असल्याची माहीती – संध्याकाळी प्रसाद लाड याबाबात मोठा खूलासा करण्याची शक्यता

  • 10 May 2021 03:52 PM (IST)

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचं महाविकास आघाडी विरोधात आंदोलन

    वाशिम : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द करण्यात आल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. वाशिम जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील अहिरे यांच्या नेतृत्वात राजगाव येथे महाविकास आघाडी सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 10 May 2021 03:45 PM (IST)

    उजणीचे पाणी इंदापूरला जाणार नाही : दत्तात्रय भरणे

    दत्तात्रय भरणे – सोलापूर पालकमंत्री – उजनीच्या पाण्यावरून विरोध होता – त्यासाठी बैठक आयोजित केली होती – सोलापूर आणि इंदापूरचे प्रतिनिधी उपस्थित होते – शंकेची उत्तर अधिकाऱ्यांनी दिली – उजणीचे पाणी इंदापूरला जाणार नाही – सगळ्याच उत्तरांचे समाधान झालेच असं नाही – उजनी, खडकवासलाचे पाणी आणि सांडपाणी याबाबत सर्वांना माहिती दिलीय – सोलापूरचे पाणी कमी होणार नाही आणि इंदापूरला पाणी मिळालं पाहिजे

    – सोलापूरची पाण्याची योजना दहा वर्षे झाली ती पूर्ण मी करणार – दहा महिन्यात सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवू

    पुणे शहराला देखील २२ टक्के पाणी लागतंय – टेल इंदापूरला असल्यानं इंदापूरचं पाणी कमी झालं – कृपा करून यामध्ये राजकारण नको – सोलापूरच्या योजना सुरू झाल्या पाहिजे आणि इंदापूरला पाणी मिळालं पाहिजे

    अतुल खोपसे – पाणी संघर्ष समिती सोलापूर

    – दत्ता मामा यांनी जे सांगितलं ते लबाड आहे – उजणीत पाणी येतच नाही असं पुणे पालिकेने सांगितलं – अधिकारी आणि पोलिसांवर मोठा दबाव आहे – उजनीच्या वाटपातील एक टीएमसी पाणी सुद्धा शक्य नाही – बारामतीवरून हे सगळं घडलंय – पालकमंत्री चोर आणि अजित पवार दरोडेखोर – आमचं पाणी चोरलंय, सगळी गोलमाल उत्तरं – दत्ता भरणे यांनी इंदापूर आणि सोलापूरच्या लोकांमध्ये भांडण लावलं – पुढील आंदोलन आता गोविंद बागेत करू

  • 10 May 2021 03:41 PM (IST)

    सांगली : मिरजेत मुसळधार पाऊस, शेतकरी पावसामुळे हवालदिल

    सांगली : मिरजेत पावसाचे जोरदार आगमन, गेल्या अर्ध्या तासापासून मिरजेत मुसळधार पावसाची सुरुवात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, मिरज ग्रामीण भागातील शेतकरी पावसामुळे हवालदिल. मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान जनजीवन विस्कळीत

  • 10 May 2021 02:42 PM (IST)

    उजनीच पाणी पेटलं, पालकमंत्र्यांच्या समोरच शेतकरी एकमेकांना भिडले

    पुणे : उजनीच पाणी पेटलं, पालकमंत्र्यांच्या समोरच शेतकरी एकमेकांना भिडले

    बैठकीत इंदापूर आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांमध्ये वादावादी

    इंदापुरच्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याची पालकमंत्र्यांची सूचना

  • 10 May 2021 02:41 PM (IST)

    कल्याणमध्ये वयोवृध्द दाम्पत्याच्या घरी चोरी, मोलकरणीला अटक

    कल्याण : वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरामधून चार लाखांच्या दागिने चोरणाऱ्या मोलकरिनला.कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे . सुनीता थोरात असे या मोलकरणीचे नाव असून ती कल्याणच्या रामबाग परिसरात राहते. कल्याणच्या कर्णिक रोड परिसरात 70 वर्षीय रामकृष्ण नाडार आपल्या पत्नीसोबत राहतात. त्यांची मुले परदेशात आहे. सुनीता थोरात ही मोलकरीन संधीचा फायदा घेत एका दिवसी सर्व दागिने लंपास केले होते. महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला असता या मोलकरनीने चोरी केल्याचे उघड झाले. तिला अटक करून तिच्याकडून जवळपास चार लाख हे दागिने हस्तगत करण्यात आले आहे

  • 10 May 2021 02:39 PM (IST)

    मास्क न लावता आणि परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार, डॉक्टरला अटक

    वांगणी- अखेर डॉक्टर-यु.एस.गुप्ता याला पोलिसांनी केली अटक

    ९९ टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णांला दोन दिवसात बरे केल्याचा केला होता दावा

    मास्क न लावता आणि परवानगी नसतांना कोरोना रुग्णांवर करत होता उपचार

    जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभाग ठाणे यांची कोणतेही परवानगी न घेता कोरोना रुग्णांवर करत होता उपचार

    ०७ मे ला कुळगांव बदलापूर पोलिस ठाण्यात झाला होता डॉ. गुप्ता विरोधात गुन्हा दाखल

  • 10 May 2021 01:00 PM (IST)

    औरंगाबादेत आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने मुंडन आंदोलन, पदोन्नतीतील आरक्षण रद्द निषेध

    औरंगाबाद  :-

    आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने मुंडन आंदोलन

    पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ मुंडन

    औरंगाबादच्या भडकल गेट परिसरात सुरू आहे मुंडन आंदोलन

    आंदोलनासाठी असंख्य कार्यकर्ते उपस्थित

    दहा ते 12 कार्यकर्त्यांनी केलं मुंडन

    पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे घेण्याची मागणी

  • 10 May 2021 12:59 PM (IST)

    पुणे उजनी पाणी बैठक, सिंचन भवनात सोडत नसल्याने शेतकरी आणि पोलिस यांच्यात वादावादी

    पुणे उजनी पाणी बैठक

    सिंचन भवनात सोडत नसल्याने शेतकरी व पोलिस यांच्यात वादावादी

    वादावादीनंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना आत सोडलं

    पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरवात

  • 10 May 2021 12:58 PM (IST)

    माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं वृद्धापकाळाने निधन

    बारामती : माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं निधन..

    वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने झाले निधन..

    पुण्यातील राहत्या घरी झालं निधन..

    शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून होती ओळख..

  • 10 May 2021 12:04 PM (IST)

    मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गॅस टँकर पलटी, मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत

    मुंबई :  मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर गँस टँकर पलटी

    खोपोली हद्दीत पुण्याहून मुंबईकडे जाणारा प्राँपलेन गँस असलेला टँकंर पलटी होऊन मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

    अत्यंत ज्वलनशील गॅस असल्यामुळे सावधनात बाळगून टँकंरपासून सुरक्षित अतंर ठेवण्यात येत आहे.

    महामार्ग पोलीस, आय आर बी यत्रंणा, देवदुत टिम, खोपोली पोलीस घटनाथळी उपस्थित.

    मुंबईकडे येणा-या मार्गावरील वाहतुक थांबविण्यात आली आहे.

    गँस टँकंर मुंबईकडे येताना गँस टँकंरचा ब्रेक फेल झाल्याने तो तीन अन्य गाड्यांवर आदळला.

    त्यामुळे एक कंटेनर, एक ट्रक व एक टेम्पो धडक बसल्याने ट्रक पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला पडला, दोन अन्य वाहन क्षतीग्रस्त होऊन एकुण तीन जण जखमी झाले.

    अद्याप मुंबई लेन वर आडवा झालेला गँस टँकर हलविण्यात आलेला नाही.

    टँकंर मध्ये गँस असल्या कारणाने रिलायन्स कपंनीची टेक्नीकल टिम त्या बाबत उपाय योजना करत आहे.

  • 10 May 2021 11:08 AM (IST)

    मुलाची कैफियत ऐकल्यानंतर अजित पवार झाले भावुक

    बारामती –

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानला भेट देत असतात. त्यात ते नागरिकांसोबत गप्पा मारत स्थानिकांचे प्रश्न समजुन घेतात. असाच एक प्रकार शनिवारी घडला. विद्या प्रतिष्ठानला अजित पवारांनी भेट दिली. त्यावेळी अनेक लोक त्याठिकाणी अजित पवारांना भेटण्यास इच्छूक होते. त्यावेळी एका मुलानं आपली समस्या अजित पवारांना सांगितली. त्यानंतर अजित पवार भावूक झालेले दिसले

  • 10 May 2021 10:57 AM (IST)

    पुण्यात प्रवाशांची वाढती मागणी पाहता उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशी गाड्यांची संख्या वाढवली

    पुणे –

    प्रवाशांची वाढती मागणी पाहता उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशी गाड्यांची संख्या वाढवली

    उत्तरेकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या प्रशासनाने वाढवली,

    पुणे गोरखपूर एक्स्प्रेस 13 ते 22 मे दरम्यान धावणार,पुणे दानापूर एक्स्प्रेस ही 11 ते 18 मे दरम्यान सोडण्यात येणार आहे,

    पुणे दरभंगा एक्स्प्रेस 15 ते 22मे दरम्यान सोडली जाईल तर पुणे भागलपूर एक्स्प्रेस 18 मे रोजी सोडली जाणाराय,

    उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता पुणे रेल्वे विभागाचा निर्णय

  • 10 May 2021 10:53 AM (IST)

    नागपूर विभाग खरीप पेरणी नियोजनासाठी बैठक सुरु

    – नागपूर विभाग खरीप पेरणी नियोजनासाठी बैठक सुरु

    – बैठकीत कृषिमंत्री, मदत न पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मंत्री सुनील केदार उपस्थितीत

    – बैठकीत खरीप पेरणी, पीक कर्ज, बियाणं आणि खतांबाबत चर्चा

    – कोरोनाच्या संकटात खरीप पेरणी नियोजनात अनेक अडचणी

  • 10 May 2021 10:01 AM (IST)

    ईडीचे अधिकारी असल्याचं सांगून नाशिक बाजार समितीचे संचालक दिलीप थेट यांच्याकडे मागितली खंडणी

    नाशिक –

    ईडीचे अधिकारी असल्याचं सांगून मागितली खंडणी

    नाशिक बाजार समितीचे संचालक दिलीप थेट यांच्याकडे मागितली खंडणी

    तुमच्या विरोधात ईडी कडे तक्रार आली आहे , मिटवायचे असेल तर पैसे द्या अशी मागणी

    नाशिकच्या सायबर सेल मध्ये तोतया ईडी अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

  • 10 May 2021 10:00 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यापूर्वी कामांना आला वेग

    पिंपरी-चिंचवड –

    – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यापूर्वी कामांना आला वेग

    – शहरात पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले आणि ड्रेनेज साफसफाईच्या कामांना वेग

    – पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाऊस झाला तर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचत असते

  • 10 May 2021 09:56 AM (IST)

    परभणी पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा दरवाढ, पेट्रोल 23 पैसे, डिझेलच्या दरात 32 पैशांची वाढ

    परभणी –

    परभणी पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा दरवाढ

    पेट्रोल 23 पैसे, डिझेलच्या दरात 32 पैशांची वाढ

    परभणीत पेट्रोलचे नवे दर 100.24 पैसे प्रतिलीटर

    डिझेल 90.10 पैसे प्रतिलिटर

    सलग सातव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ

  • 10 May 2021 08:51 AM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली लसीकरण मोहीम आज पुन्हा सुरु होणार

    सिंधुदुर्ग –

    जिल्ह्यात बंद असलेली लसीकरण मोहीम आज पुन्हा सुरू होणार

    कोवीशिल्डच्या 18 हजार लस जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध

    जिल्ह्यातील आठही तालुक्यासाठी लसीचा पुरवठा

    जिल्ह्यात एकूण ३६ लसीकरण केंद्रावर प्रतिदिन २५० प्रमाणे कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार.

    45 वर्षावरील नागरिकांना दुसरी लस देण्या करीताचं ही लस राखीव.

    त्यामुळे १८ ते २४ वयोगटातील नागरिकांना पहिला अथवा दुसरा डोस देता येणार नाही.

  • 10 May 2021 08:50 AM (IST)

    औरंगाबादेत मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

    औरंगाबाद –

    मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

    हर्सूल सावंगी तलावात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

    हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद..

    पाण्याचा अंदाज न लागल्याने दोन्ही तरुण बुडाले

    बुडनाऱ्या तरुणांनी आरडाओरड केली असताना नागरिकांची बघ्याची भूमिका

    अग्निशमन दलाने मृतदेह काढले पाण्या बाहेर

  • 10 May 2021 08:48 AM (IST)

    आज मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 97.92 रुपये

    – मुंबईत लाॅकडाऊनमध्ये महागाईचा भडका

    – आज मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 97.92 रुपये आहे, डिझेलचा दर प्रति लिटर 89.22 रुपये आहे

    – पेट्रोल 25 पैशांनी तर डिजेल 35 पैशांनी महागलंय

    – मुंबईत एका आठवड्यातील ही पाचवी दरवाढ आहे… पेट्रल शंभरी पार करेल असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे…

    – मार्च आणि एप्रिलमध्ये काही दिवस सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत होती. विशेष म्हणजे 23 फेब्रुवारीला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शेवटची वाढ झाली होती. पण आता महामारीच्या काळात पुन्हा दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे….

    – पेट्रोलच्या किंमती वाढल्याने भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे…

  • 10 May 2021 06:56 AM (IST)

    नागपुरात लुडो गेम खेळण्याच्या नावाखाली दोन मुलींवर अत्याचार

    – नागपुरात लुडो गेम खेळण्याच्या नावाखाली दोन मुलींवर अत्याचार

    – नागपूर शहरातील कळमना पोलीस स्टेशन हद्दीतली संतापजनक घटना

    – शेजारी राहणारा ५५ वर्षीय आरोपी डोलचंद चव्हाणला अटक

    – शेजारी राहणाऱ्या १० ते १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

    – दोन्ही मुलींच्या तोंडाला कापड बांधून अत्याचार

  • 10 May 2021 06:27 AM (IST)

    मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन घ्या, शिवसेना खासदार हेमंत पाटील यांची पंतप्रधानांकडे मागणी

    यवतमाळ – मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानन्तर विशेष अधिवेशन बोलावून तामिळनाडू च्या धर्तीवर मराठा आरक्षण वर विशेष अधिवेशन बोलवाव अशी मागणी करण्यात आली आहे

Published On - May 10,2021 10:19 PM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.