LIVE | शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अकोट पोलिसांत तक्रार दाखल
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अकोट पोलिसांत तक्रार दाखल
बुलढाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड विरोधात अकोट पोलिसांत अखेर तक्रार दाखल, धार्मिक भावना दुखविणे आणि किर्तनकारांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी तहसीलसह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल, विश्व वारकरी सेनेने केली तक्रार, तर शिवसेनेच्या एकही आमदारांनी आमदार संजय गायकवाड यांच्या बाजूने प्रतिक्रिया न दिल्याबद्दल महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायच्या वतीने शिवसेनेचे मानले जाहीर आभार
-
ठाण्यात हुक्का पार्लरवर धाड, पोलिसांची धडक कारवाई
– ठाणे राबोडी पोलीस स्टेशन हद्दीतील क्लाऊड 9 या हुक्का पार्लरवर धाड
– सरकारच्या नियमांचे उल्लंघन
– संचारबंदीच्या काळात परवानगी नसताना सुरु होता हुक्का पार्लर
– अवैध पद्धतीने सुरु होता हुक्का पार्लर, कोणतंही सोशल डिस्टन्स नाही.
– पोलिस पोहचताच काही तरुणाई ने काढला पळ तर काहींना राबोडी पोलिसांनी घेतले ताब्यात
-
-
गोंदियामध्ये 70 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त
गोंदिया : 70 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त
गोंदिया पोलिसांची मोठी कारवाई
पोलिसांकडून आरोपीस अटक
गांजाची किंमत 8 लाख 43 हजार रुपये
-
नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेची हत्या
नागपूर : नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेची हत्या
गळा चिरून महिलेचा खून
एमआयडीसी पोलिसांनी केला तपास सुरू
हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही
अवघ्या काही तासात दोन खुनाच्या घटनांनी हादरले नागपूर शहर
-
रबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण होणार, वसई विरार नालासोपारा परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वसई विरार- पूर्व मध्य अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता
– वसई विरार नालासोपारा परिसरातील समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
– 16 मे रोजी महाराष्ट्र , गोवा समुद्र किनाऱ्यावर 41-45 ते 60 किलोमीटर प्रतिताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता
या काळात समुद्र खवळलेला राहणार
– 14 ते 17 मे या कालावधीत मच्छिमार, नागरिक यांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला
– वसई विरार महापालिकेकडून मच्छिमार तसेच किनाऱ्यावरील नागरिकांना आहवान
-
-
मावळ परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
पुणे – मावळ परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
– पूर्वमोसमी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा
-
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपची टीका द्वेष भावनेतून- सचिन सावंत
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची भाजपवर टीका
– मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपची टीका दुर्दैवी आणि द्वेष भावनेतून
– इंद्र साहनी खटला निकालातील 50 टक्के मर्यादाविरोधातही केंद्र सरकारने भूमिका घ्यावी
– केंद्र सरकारच्या 102 व्या घटना दुरूस्तीसंदर्भात फेरविचार याचिका दाखल केल्याने महाविकास आघाडी सरकारची मराठा आरक्षण संबंधीची भूमिका योग्यच होती, हे आता स्पष्ट झालंय- सचिन सावंत
-
देशी विदेशी दारू अवैधरित्या विकणाऱ्या आरोपींना नाशिक पोलिसांकडून बेड्या
नाशिक – देशी विदेशी दारू अवैधरित्या विकणाऱ्या आरोपींना पंचवटी पोलिसांनी ठोकल्या बेड्या – नाशिक शहर लॉकडाउन असतानाही करत होते दारूची अवैध विक्री – 5 संशयित आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात – संशयित आरोपींकडून 2 लाख 45 हजारांचा मुद्देमाल केला जप्त
-
नाशिक महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ओली पार्टी
नाशिक -महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ओली पार्टी..
कर्मचाऱ्यांकडून ओल्या पार्ट्या झाडल्या जात असल्याचे अंदाज
महापालिकेत दारु पार्टी होत असल्याने खळबळ
अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या राउंड मध्ये प्रकार आला उघडकीस…
सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई करण्याच्या देण्यात आल्याय सूचना
दारूच्या बाटल्या, खाण्याचे पदार्थ, तंबाखू, बिडी , सिगारेट चे पोकेट्स आले आढळून..
पालिका मुख्यालयात कोरोनामुळे बाहेरच्या व्यक्तींवर प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
-
नागपुरातील कुख्यात गुंड शहानवाजची हत्या, तपास सुरु
नागपूर –
कुख्यात गुंड शहानवाजची करण्यात आली हत्या
चाकूने वार करत केली हत्या
सकाळी 10.30 च्या सुमारास मृतक आणि आरोपी यांत झालं होतं भांडण
मृतक हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून तडीपार आरोपी होता
दोन संशयित आरोपी ना घेतलं ताब्यात
महाल परिसरात घडली घटना
पोलीस तपास सुरू
-
कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
कोल्हापूर :
गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
विश्वास पाटील अनुभवी संचालक
निवडणुकीच्या अगोदर केला होता सतेज पाटील यांच्या गटात प्रवेश
अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात होती चुरस
सत्तातंर करण्यात मोठा वाटा उचलल्याचं मिळालं बक्षीस
-
नागपुरात कुख्यात गुंड शहानवाजची हत्या
नागपूर –
कुख्यात गुंड शहानवाजची करण्यात आली हत्या
चाकूने वार करत केली हत्या
सकाळी 10.30 च्या सुमारास मृतक आणि आरोपी यांत झालं होतं भांडण
मृतक हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून तडीपार आरोपी होता
दोन संशयित आरोपी ना घेतलं ताब्यात
महाल परिसरात घडली घटना
पोलीस तपास सुरू
-
कणकवली बाजारपेठेत उसळली मोठी गर्दी
सिंधुदुर्ग- कणकवली बाजारपेठेत उसळली मोठी गर्दी.तब्बल 13 दिवसानंतर उघडलेल्या बाजारपेठेत लोकांची खरेदीसाठी गर्दी. कणकवली शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट असताना कणकवलीकरांनी गर्दी करून सोशल डिस्टनसिंगचे वाजवले तीन तेरा.कणकवली शहरात 1 मे पासून 10 पर्यंत होता जनता कर्फ्यु.9 तारखेला जिल्हा प्रशासनाने पुकारला होता 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन.मात्र कणकवलीत आधीच जनता कर्फ्यु असल्यामुळे प्रशासनाने 14 पासून कणकवलीकरांना 7 ते 11 साठी दिली होती मुभा.मुभेच्या आज पहिल्याच दिवशी बाजारात प्रचंड गर्दी.
-
कोल्हापूर गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड, दुपारी 1 वाजता घोषणा
कोल्हापूर
गोकूळ दूध संघाच्या अध्यपदाची आज होणार निवड
विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांची नावे चर्चेत
आज दुपारी एक वाजता निवड होणार घोषित
अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचे लक्ष
30 वर्षानंतर सतेज पाटील मुश्रीफ ताब्यात गोकूळ संघ
-
अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पुणे पोलिसांकडून अटक
लोणावळा,पुणे
-अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
-जामतारा वेबसिरीज पाहून प्रेरित होऊन अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणारी टोळी व बंगल्याच्या आवारात असलेली गांजाची शेती करणाऱ्या 15 जणांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक
– हे आरोपी कंप्यूटर व मोबाईल सॉफ्टवेअर वरून व्हॉइस मेल पाठवून मलमइम व गजमद या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करून अमेरिकेतील लोकांची फसवणूक करून त्यामधून बेकायदेशीररित्या हवाला करीता पैसे जमा करीत होते
-
औरंगाबादच्या बंदुकबाज आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
औरंगाबाद ब्रेकिंग :-
औरंगाबादच्या बंदुकबाज आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बंदूक हातात घेऊन स्टाईल मारणार केला होता सोशल मीडियात व्हायरल
गौतम बनकर असं व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीचे नाव
बंदूक हातात घेऊन सिनेस्टाईल बनवला होता व्हिडीओ
व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणासह परवाना धारकवरही गुन्हा दाखल
-
मराठा आरक्षणाचे सर्वच राजकीय पक्षांकडून राजकारण, सांगलीत काळे झेंडे दाखवत निषेध
सांगली
मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी सर्वच राजकीय पक्ष त्याचे राजकारण करत आहेत
त्यामुळे सकल मराठा समाजा तर्फे काळे झेंडे दाखवत निषेध
अनेक ठिकाणी काळ्या गुढ्या उभा करून निषेध तर
शिक्षणात चांगले गुण मिळवुन देखील संधी मिळणारच नसतील तर अशा पदवी चे करायचे काय असे म्हणत
युवक युवतींनी पदवी प्रमाणपत्र जाळून केला निषेध
तसेच आरक्षण साठी सर्वच राजकीय पक्षां चा निषेध केल्याची छायाचित्रे समाजमाध्यमावर टाकण्यात आली
-
मुंबईत लाॅकडाऊनमध्ये पुन्हा महागाईचा भडका, पेट्रोलची किंमत 98.65 रुपये
मुंबईत लाॅकडाऊनमध्ये पुन्हा महागाईचा भडका
– आज मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 98.65 रुपये आहे. डिझेलचा दर प्रति लिटर 90.18 रुपये आहे, ..
– पेट्रोल 29 पैशांनी तर डिजेल 36 पैशांनी महागलंय…
– पावर पेट्रल 102.58 पैसे आहे…
– मुंबईत आठ दिवसांतील ही सहावी दरवाढ आहे… पेट्रल शंभरी पार करेल असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे…
– मार्च आणि एप्रिलमध्ये काही दिवस सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत होती. विशेष म्हणजे १२ मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शेवटची वाढ झाली होती. पण आता पुन्हा महामारीच्या काळात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे….
– पेट्रोलच्या किंमती वाढल्याने भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे
-
तीन जेलरविरुद्ध सहा वर्षानंतर खंडणीचा गुन्हा दाखल
– तीन जेलरविरुद्ध सहा वर्षानंतर खंडणीचा गुन्हा दाखल
– कैद्याला सुविधा देण्यासाठी मागीतली होती १ लाख ८ हजारांची खंडणी
– कैद्याने दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाच्या आदेशाने झाली चौकशी
– गुन्हा दाखल झाल्याने तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ
– कृष्णा चौधरी, गुलाब खरडे, रविंद्र पारेकर या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
-
खत, बियाण्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर भरारी पथकाची नजर
– खत, बियाण्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर भरारी पथकाची नजर
– नागपूर जिल्हयात कृषी विभागाकडून १३ भरारी पथकाची स्थापना
– जिल्हा आणि तालुका पातळीवर नियंत्रण कक्षाचीही स्थापना
– शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
-
अक्षयतृतीयेला नागपूरात ॲानलाईन सोन्याच्या नाण्यांची विक्री
– अक्षयतृतीयेला नागपूरात ॲानलाईन सोन्याच्या नाण्यांची विक्री
– दुकानं बंद असल्याने सराफा व्यापाऱ्यांची ॲानलाईन योजना
– अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर २५ टक्के व्यवसाय होण्याचा सराफांना विश्वास
– दुकानं बंद असल्याने ग्राहकांना घरपोच दागीने पोहोचविण्याची सोय
– ग्राहकांची ॲानलाईन सोनं खरेदीला कमी पसंती
-
बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांना मागील 2 महिन्याच्या पगाराची प्रतीक्षा
बुलडाणा –
जिल्ह्यातील शिक्षकांना मागील 2 महिन्याच्या पगाराची प्रतीक्षा
जिल्ह्यात 6872 शिक्षक
कोरोना काळात शिक्षकांना करावा लागतोय आर्थिक अडचणींचा सामना
त्यामुळे शिक्षकांचे पगार उशिरा का
शिक्षकांनी उपस्थित केला प्रश्न
1 तारखेला पगाराची मागणी असतानाही 12 ते 15 तारखेला होतो पगार
-
वरोऱ्यात उधारीच्या रकमेच्या 1 हजार रुपयाच्या कारणावरुन मित्राचा खून
चंद्रपूर – जिल्ह्यातील वरोरा शहरात भर दुपारी चौकात हत्या, उधारीच्या रकमेच्या 1 हजार रु. च्या कारणावरुन मित्राचा खून, भाजी कापण्याच्या तिक्ष्ण सुरीने सुकराम अलाम (26) याची भर गर्दीतल्या गांधी चौकात हत्या, आरोपी निलेश ढोक (21) याने हत्या केल्यावर स्वतः जखमी मित्राला रुग्णालयात केले दाखल, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीला रुग्णालयातच केली अटक
-
विहिरीच्या खुदाईसाठी वापरल्या जाणार्या जिलेटीनच्या कांड्याचा बेकायदा साठा सातारा पोलिसांकडुन जप्त
कराड
विहिरीच्या खुदाईसाठी वापरल्या जाणार्या जिलेटीनच्या कांड्याचा बेकायदा साठा सातारा पोलिसांकडुन जप्त
सातारा जिल्हा विशेष शाखेची पाटण तालुक्यातील तारळे येथे कारवाई
गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) या राजस्थानी व्यापार्याच्या घरावर छापा टाकून 103 किलोंच्या जिलेटीनच्या स्फोटकांचा विना परवाना साठा जप्त
ब्लास्टिंगचा विहीर खुदाईचा परवानाही आहे. मात्र जिलेटनचा विना परवाना साठा केला होता आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल
Published On - May 14,2021 9:34 PM