LIVE | तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर सहा दिवसांनी मालवण शहरात वीज पुरवठा पूर्ववत

| Updated on: May 21, 2021 | 11:28 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर सहा दिवसांनी मालवण शहरात वीज पुरवठा पूर्ववत
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 May 2021 08:54 PM (IST)

    कल्याण ग्रामीणमधील हेदुसन गावात आग

    डोंबिवली कल्याण ग्रामीण मधील हेदुसन गावात आग

    महावितरणच्या भूमिगत केबलला आग

    अचानक आग लागल्याने गावात भीतीचे वातावरण

    डोंबिवली एमआयडीसी फायर ब्रिगेडची टीम गावात दाखल

    आग नियंत्रणात

    शॉर्टसर्किटमुळे आग लागली, फायर ब्रिगेड अधिकारी नंदकुमार शेंडगे यांची माहिती

  • 21 May 2021 07:57 PM (IST)

    तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर सहा दिवसांनी मालवण शहरात वीज पुरवठा पूर्ववत

    मालवण शहरात वीज पुरवठा पूर्ववत

    अनेक भागात वीज परत आली.

    तौऊते चक्रीवादळाच्या तडाख्याने वीज खांब कोसळून गेले 6 दिवस वीज पुरवठा झाला होता खंडीत

    जिल्ह्यातील देवगड, मालवण आणि वेंगुर्ले भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा झाला होता खंडित

    बाहेरच्या जिल्ह्यातील महावितरणचे 500 कर्मचारी आणि अभियंते वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते.

  • 21 May 2021 07:56 PM (IST)

    नवी मुंबई : पामबीच मार्गावर अनोळखी मृतदेह मिळाल्याने खळबळ

    पामबीच मार्गावर अनोळखी मृतदेह मिळाल्याने खळबळ

    ७ ते ८ वर्षाच्या लहान वयाच्या इसमाचा मृतदेह

    पिण्याच्या स्टीलच्या पिंपात होता कुजलेला मृतदेह

    पामबीच मार्गावर वादवा बिल्डिंग समोरील घटना

    घटना ४ दिवसांपूर्वी घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज

    नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला मृतदेह

    श्वान पथक घटनास्थळी दाखल

    मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरु

    परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली माहिती

  • 21 May 2021 07:54 PM (IST)

    घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सिडकोच्या लॉटरी धारकांसाठी खुशखबर!

    घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सिडकोच्या लॉटरी धारकांसाठी खुशखबर!

    आता स्वप्नातल्या घरात जायची प्रतीक्षा संपणार

    सिडको महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील अर्जदारांना 1 जुलै 2021 पासून मिळणार घरांचा ताबा

    तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सुमारे 25,000 घरे

  • 21 May 2021 06:21 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांना आढावा बैठकच घ्यायच्या होत्या तर ‘वर्षा’वर देखील घेतल्या असत्या : प्रविण दरेकर

    विधानपरिषद विरोधीपक्षनेते, प्रविण दरेकर :

    गेले तीन दिवस मी आ़नि विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला

    एकाबाजूला आमचा तीन दिवस दौरा आणि मुख्यमंत्री याचा तीन तासांचा दौरा

    तीन तासाच्या दौऱ्यावर आम्हाला आक्षेप नसता, मात्र मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा करायला हवी होती

    पंचनामे जरी नसली तरी नुकसानीची आकडेवारी ही कलेक्टरकडे असते

    आढावा बैठकच घ्यायच्या होत्या तर ‘वर्षा’वर देखील घेतल्या असत्या

    मात्र विरोधीपक्ष नेत्यांनी दौरा केला म्हणून मुख्यमंत्र्यांना कोकणात दौरा करावा लागला

    शिवसेनेला हे दिवस कोकणामुळे बघायला मिळाले

    मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने कोकणवासीयांचे समाधान झाले नाही

    मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली नाही आणि केंद्राकडे मदत मागतात

  • 21 May 2021 06:15 PM (IST)

    अंबरनाथ शहरात हार्डवेअर, प्लॅस्टिक, ताडपत्री, बिल्डिंग मटेरियल सप्लायर अशी दुकानं सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत सुरू राहणार

    अंबरनाथ शहरात हार्डवेअर, प्लॅस्टिक, ताडपत्री, बिल्डिंग मटेरियल सप्लायर अशी दुकानं सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत सुरू राहणार

    वादळाने नुकसान झालेल्या भगत दुरुस्तीसाठी साहित्य मिळावं यासाठी निर्णय

    अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी आज जारी केले आदेश

  • 21 May 2021 05:22 PM (IST)

    माजी मंत्री विजय शिवतारे यांचे पुत्र विनय शिवतारे यांच्या फेसबुकवरुन पुन्हा वादग्रस्त पोस्ट

    पुरंदर : माजी मंत्री विजय शिवतारे यांचे पुत्र विनय शिवतारे यांच्या फेसबुकवरुन पुन्हा वादग्रस्त पोस्ट, विजय शिवतारे यांच्या छायाचित्रासह फेसबुक पोस्ट, अकाऊंट हॅक झाल्याचा विजय शिवतारे यांचा दावा, पोस्टवर कमेंट करत अकाऊंट हॅक झाल्याचा केल्याचा दावा, यापूर्वीही विनय शिवतारे यांच्या अकाऊंटवरुन दिली गेली होती धमकी

  • 21 May 2021 03:43 PM (IST)

    घरमालकासमोरच बंगल्यातील चंदनाचे झाड चोरी, घटना कॅमेऱ्यात कैद

    औरंगाबाद :

    घरमालकासमोरच बंगल्यातील चंदनाचे झाड चोरट्यांनी केले लंपास.

    चंदनचोरीची संपूर्ण घटना मोबाईल मध्ये कैद.

    शहरातील पुष्पनगरी भागात असलेल्या डॉ.घारापुरे यांच्या घरात चंदनचोरांची धाडसी चोरी

    घारापुरे यांनी सर्व घटना केली मोबाईलमध्ये कैद

    चेहऱ्यावर बॅटरी मारून हटकून देखील चोरांनी पळून न जाता घर मालकासमोरच नेला कापून चंदनाचे झाड

    तीन चोरटे कॅमेरात कैद

  • 21 May 2021 03:41 PM (IST)

    गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा, गृहमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक

    गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका अंतर्गत कोटमी जंगल परिसरात पैडी भागात 60 ते 70 नक्षलवादी तेंदूपत्ता संकलनची वसुली करण्यास कोटमी जंगल परिसरात आले होते. याची गुप्त माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी एक मोठं कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. यात आज पहाटे दीड ते दोन तास चकमक चालली. या चकमकीत तेरा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली सी. सीक्स्टी पोलिसांना यश आलं. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. या तीन महिन्यात गडचिरोली पोलिसांनी मोठ्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. एटापल्ली तालुक्यात दोनदा नक्षलवाद्यांनी जांबिया गटा पोलीस आणि पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता. याच भागात नक्षलवादी जास्त संख्येत असल्यामुळे सिस्टीम पताका आणि एक चांगला नियोजन करून यशस्वी ऑपरेशन राबविला आहे. या आपरेशनचे मार्गदर्शन गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या नक्षलवाद्यांची ओळख अजूनपर्यंत पटलेली नाही. परंतु या ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये काही मोठे नक्षलवादी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • 21 May 2021 01:43 PM (IST)

    ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून पालघरमध्ये महावितरणच्या नुकसानीची पाहणी

    पालघर : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज पालघर जिल्ह्यातील महावितरणच्या नुकसानीची पाहणी केली त्याचप्रमाणे आढावा बैठक घेतली

    यावेळी बोलताना राज्याच्या दृष्टीने महावितरणचा सक्षमीकरण व्हावं म्हणून आम्ही नवीन आराखडा तयार करत आहोत जेणेकरून वादळ आणि महापूर अशा संकटकाळात ही यंत्रणा तग धरू शकेल यादृष्टीने काही ठिकाणी अंडरग्राउंड लाइन टाकण्याचा विचार आहे.

    पालघरमध्ये सुद्धा काही ठिकाणी वनविभागाचा अडथळा येतोय त्यादृष्टीने केंद्र आणि राज्याचे पाठपुरावा करून योग्य मार्ग कसा काढता येईल आणि ही यंत्रणा कशा पद्धतीने सक्षम करता येईल असा प्रयत्न मी करणार आहोत.

    तर कोरोना काळात महावितरणचे 8000 कर्मचारी बाधित असून 300 कर्मचारी मृत्यू पावले आहेत तर पाच हजार कर्मचाऱ्यांची भरती न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे थांबली आहे

  • 21 May 2021 12:45 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक, नंतर थेट मुंबईला रवाना होणार

    मुख्यमंत्री सध्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतायेत,

    खासदार विनायक राऊतही बैठकीला उपस्थित आहेत,

    मुख्यमंत्री चिवला बिचवर बोलल्यामुळे बोलण्याची शक्यता कमी आहे,

    ते थेट मुंबईला रवाना होतील,

  • 21 May 2021 11:29 AM (IST)

    आमदार गोपीचंद पडळकर यांची पत्रकार परिषद, नोकरीत पदोन्नती आरक्षणावरुन पडळकर आक्रमक

    पंढरपूर – आमदार गोपीचंद पडळकर पत्रकार परिषद

    – नोकरीत पदोन्नती आरक्षणावरून आमदार पडळकर आक्रमक

    – महा आघाडी सत्तेत आल्यापासून आरक्षणाचा सावळा गोंधळ सुरू आहे

    – बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विट केले. माझ्या मुळे सरकार वठणीवर आले. यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

    – मागासवर्गीय पदोन्नती उप समितीचे प्रमुख अजित पवार होणे हेच अन्याय कारक आहे. कारण तिथे मागासवर्गीय व्यक्ती असेल तर त्यांना दुखणं कळेल.

    – गृह मंत्री वेगळेच बोलतात.

    -मुख्यमंत्र्यांनी या गोंधळा वर बोलावे . पदोन्नती आरक्षण वर मंत्रिमंडळ बैठकीत काय झाले हे सगळ्यांना सांगावे…. ओबीसी समाजाला पदोन्नती मध्ये आरक्षण दिले जात नाही. यासाठी एक समिती केली होती…. त्यांनी २००६ ला प्रस्ताव दिला होता १९% आरक्षण पदोन्नती मध्ये देण्याचं सुचवले होते….

  • 21 May 2021 11:06 AM (IST)

    संजय राऊत रुटीन चेकअपसाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल 

    संजय राऊत फोर्टिस रुग्णालयात पोहोचले… – सोबत आमदार भाऊ सुनिल राऊतही पोहोचले.. – संजय राऊत रुटीन चेकअपसाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल – रुग्णालयात वाढवला सुरक्षा बंदोबस्त

  • 21 May 2021 10:19 AM (IST)

    उजनीचे पाणी पेटले, इंदापूरमध्ये एकाचवेळी रस्ता रोको आंदोलन

    उजनीचे पाणी पेटले.. इंदापूर मध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलने… इंदापूर तालुक्यात साठी उजनी धरणातून मंजूर केलेले पाच टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यानी दबाव आणल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यो आदेश रद्द केल्याने तालुक्यातील शेतकरी व राष्ट्रवादी पदाधिकारी आक्रमक.. तालुक्यातील भिगवण मध्ये रस्ता रोको करीत अनेक जणांनी केले मुंडन..

  • 21 May 2021 09:47 AM (IST)

    कोकणावर कोरोना आणि वादळ असं दुहेरी संकट, जमिनीवरुन पाहणी करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीत प्रसारमाध्यामांशी संवाद

    कोकणावर कोरोना आणि वादळ असं दुहेरी संकट मी फोटोसेशन करायला आलो नाही हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमिनीवरुन पाहणी करणार, आढावा घेतल्यावर मदत जाहीर करणार जास्त फिरत बसण्यापेक्षा सरकार वादळग्रस्तांसोबत, नुकसानीचे पंचनामे सुरु

  • 21 May 2021 08:45 AM (IST)

    नागपूर रेल्वे स्टेशनवर मोठा अपघात टळला, सहा फुटाचा खड्डा पडल्याने उसळला रेल्वेचा कोच

    नागपूर रेल्वे स्टेशनवर मोठा अपघात टळला

    – रुळाखाली सहा फुटाचा खड्डा पडल्याने उसळला रेल्वेचा कोच

    – दक्षिण एक्सप्रेस गाडीचा एसएलआर कोच उसळला

    – रेल्वे रुळांवरुन घसरली नसल्याने टळला अपघात

    – माहिती कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर बुजवला खड्डा

  • 21 May 2021 08:44 AM (IST)

    नागपूर रेल्वे स्टेशनवर मोठा अपघात टळला, रुळाखाली सहा फुटाचा खड्डा पडल्याने उसळला रेल्वेचा कोच

    – नागपूर रेल्वे स्टेशनवर मोठा अपघात टळला

    – रुळाखाली सहा फुटाचा खड्डा पडल्याने उसळला रेल्वेचा कोच

    – दक्षिण एक्सप्रेस गाडीचा एसएलआर कोच उसळला

    – रेल्वे रुळांवरुन घसरली नसल्याने टळला अपघात

    – माहिती कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर बुजवला खड्डा

  • 21 May 2021 08:44 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक

    गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांमध्ये चकमक !!

    आज पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी केला गोळीबार प्रति उत्तरेत पोलीस विभागांकडून दोन तासापासून चकमक सुरू!!

    काही नक्षलवादी ठार तर काही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे

    अजूनही त्या परिसरात चकमक सुरूच

    गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटमी जंगल परिसरातील छत्तीसगड सीमावर्ती भागात सदर चकमक !!

    कोटरी जंगल परिसरात नक्षलवादी आणि मोठी सभा घेतल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली

    या माहितीद्वारे आज पहाटे सी.६० पोलिस पथकाने सुरू केला होता आपरेशन

  • 21 May 2021 08:43 AM (IST)

    नाशिकमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद, रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

    नाशिक – उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद

    तर रविवारी शहरात येणार कमी दाबाने पाणी

    गंगापूर आणि मुकणे धरणावर महावितरणच्या कामांमुळे पाणी पुरवठा राहणार बंद

    आजच पाण्याचं नियोजन करण्याचं आवाहन

  • 21 May 2021 08:42 AM (IST)

    तौत्के चक्रीवादळामुळे वीज पुरवठ्याची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत, औरंगाबाद महावितरणाकडून कोकणला मदतीचा हात

    तौक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या कोकणाला औरंगाबाद महावितरणने मदतीचा हात पुढे केला आहे.

    चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाला महावितरणने 650 पथदिवे कोकण महावितरणला पाठवले आहेत.

    चक्रीवादळामुळे वीज पुरवठ्याची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत

    बहुतांश गावे ही आजही अंधारात

    वीज वाहिन्या जोडण्याची प्रक्रिया व्यवस्थित व्हावी यासाठी औरंगाबाद परिमंडळा कडून 650 पथदिव्यांचे खांब पाठवण्यात आलेत.

  • 21 May 2021 08:37 AM (IST)

    मुंबई पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम, पेट्रोल 18 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी महागलं

    मुंबईत आज पुन्हा पेट्रोलच्या किंमती वाढल्या – आज मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 99.32 रुपये आहे. डिझेलचा दर प्रति लिटर 91.01 रुपये आहे, .. – पेट्रोल 18 पैशांनी तर डिजेल 30 पैशांनी महागलंय… – पावर पेट्रल 103.32 पैसे आहे… – मुंबईत दहा दिवसांतील ही आठवी दरवाढ आहे… पेट्रल शंभरी पार करेल असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे… – मार्च आणि एप्रिलमध्ये काही दिवस सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत होती. विशेष म्हणजे १२ मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शेवटची वाढ झाली होती. पण आता पुन्हा महामारीच्या काळात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे…. – पेट्रोलच्या किंमती वाढल्याने भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे…

  • 21 May 2021 08:37 AM (IST)

    नाशिक स्थायी समितीचे 2,759 कोटींचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी महासभेवर

    नाशिक – स्थायी समितीचे 2759 कोटींचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी महासभेवर

    27 मे रोजी होणाऱ्या ऑनलाईन महासभेत मंजुरीची शक्यता

    शहरात उभारणार 100 बेड असलेले तीन क9व्हिडं रुग्णालय

    पंचवटी , सिडको , सातपूरला हॉस्पिटल आणि ऑक्सिजन प्लांट

    महापालिका शाळांमध्ये अग्नी प्रतिबंधित उपाययोजना करणे या कामांना प्राधान्य

  • 21 May 2021 08:36 AM (IST)

    नाशिक – उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद

    नाशिक – उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद

    तर रविवारी शहरात येणार कमी दाबाने पाणी

    गंगापूर आणि मुकणे धरणावर महावितरणच्या कामांमुळे पाणी पुरवठा राहणार बंद

    आजच पाण्याचं नियोजन करण्याचं आवाहन

  • 21 May 2021 08:00 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा, वर्षा बंगल्यातून मुंबई विमानतळाकडे रवाना

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगल्यातून निघाले

    काही मिनिटात ते मुंबई विमानतळावर पोहोचणार

    तेथून विमानने 8.35 वाजताच्या सुमारास रत्नागिरी विमानतळावर पोहोचणार

    रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर भागात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत आज बैठक घेणार आहेत मुख्यमंत्री

  • 21 May 2021 07:44 AM (IST)

    उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले, सोलापूर शहरासह नदीकाठच्या गावांची पाणीटंचाई होणार दूर

    सोलापूर –

    उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

    सोलापूर शहरासह नदीकाठच्या गावांची पाणीटंचाई होणार दूर

    सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा पडला होता कोरडा

    सध्या शहराला टाकळी येथे जेमतेम पंधरा दिवस पुढील इतका पाणीसाठा

    भीमा नदीही कोरडी पडल्याने पंढरपूर मंगळवेढा सांगोला या शहरासह नदीकाठावरील शेकडो गावांना पाणीटंचाई

    उजनीतून सोडलेल्या पाण्याने भीमा नदीवरील सर्व 14 बंधारे भरून घेतले जाणार

  • 21 May 2021 07:43 AM (IST)

    समाजमाध्यमावरुन जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिका अपयशी

    – समाजमाध्यमावरुन जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिका अपयशी

    – खाजगी कंपनीला लाखोंचा निधी देवून जनजागृती नाही

    – सोशल मिडियावर ना लसीकरणाबाबत माहिती, ना मार्गदर्शन

    – अनधिकृत व्यक्तीकडून होतेय माहितीच्या पुरवठा

  • 21 May 2021 07:26 AM (IST)

    पीएमपीएलची सुरु असलेली अत्यावश्यक सेवेतील वाहतूक बंद होण्याची शक्यता

    पुणे –

    – पीएमपीएलची सुरु असलेली अत्यावश्यक सेवेतील वाहतूक बंद होण्याची शक्यता,

    – थकीत रक्कम लवकर भरा अन्यथा तुमचा पुरवठा बंद करू सीएनजीने पीएमपी प्रशासनास बजावली नोटीस,

    – पीएमपीएल प्रशासनाने सीएनजीचे ५२ कोटी थकवलेत,

    – सीएनजीवर पीएमपीचे बहुतांश गाडया धावतात, सध्या ११८ गाडया अत्यावश्यक सेवेत धावत आहे,

    – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी सुरू आहे, यात केवळ ११८ गाड्या दररोज धावत आहे.

  • 21 May 2021 06:59 AM (IST)

    यवतमाळमध्ये RTi कार्यकर्त्याला रेती व्यावसायिकांनी विवस्त्र करत केली मारहाण

    यवतमाळ :

    चंदन हातगाडे नामक RTi कार्यकर्त्याला रेती व्यावसायिक यांनी विवस्त्र करीत केली मारहाण

    काल सायंकाळी त्याला 7 ते 8 व्यक्तीनी पांढरकवडा रोड वरील एका ठिकाणी चंदन याला नेत त्याला विवस्त्र करीत

    मारहाण केली रेती व्यावसायिक यांनी मारहाण

    मारहाण करणाऱ्यावर अटट्रोसिटी सह अनेक गुन्हे दाखल

    8 पैकी 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक ईतर 5 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत

    या घटनेतील सर्व आरोपी रेती व्यवसायात गुंतलेले आहेत

    चंदन हातगाडे हा rti कार्यकर्ता असून रेती व्यवसायिकांनी खंडणी मगितल्याच्या कारणावरून मारहाण केल्याची पोलिसांची माहिती

    यवतमाळ शहर पोलीस मध्ये गुन्हा दाखल

    चंदन हातागडे हा नेताजी नगर येथील रहिवासी आहे माहिती अधिकार कार्यकर्ता आहे

    त्याच्या विरुद्ध सुद्धा रेती व्यावसायिकानी खंडणी मगितल्याची तक्रार दिली आहे

    चंदन हातागडे याचा विवस्त्र केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

  • 21 May 2021 06:54 AM (IST)

    गरीब महिलेची भाजी पोलीस उपनिरीक्षकाने फेकली रस्त्यावर, नागपुरातील जरीपटका परिसरातील घटना

    – गरीब महिलेची भाजी पोलीस उपनिरीक्षकाने फेकली रस्त्यावर

    – नागपुरातील जरीपटका परिसरातील घटना

    – भाजी फेकण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने समाजमाध्यमावर संतप्त प्रतिक्रिया

    – भाजी फेकणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश

    – ११ नंतरंही भाजीचं दुकानं सुरु ठेवल्याने पोलीसाने फेकला भाजीपाला

  • 21 May 2021 06:41 AM (IST)

    आयपीएस जयजीत सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

    आयपीएस जयजीत सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त होण्याची शक्यता – सूत्रांची माहिती

    आयपीएस विनीत अग्रवाल एटीएसचे नवे महासंचालक होण्याची शक्यता – सूत्रांची माहिती

    ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना काही दिवसांपूर्वी पदोन्नती मिळाली असून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आलीय.

    ठाण्याचे नवे सीपी कोण होणार यासंदर्भात अनेक नाव चर्चेत आहेत मात्र सध्याचे एटीएस प्रमुख जयजीत सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त बनण्याची शक्यता आहे..

Published On - May 21,2021 8:54 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.