Maharashtra News LIVE Update | पुण्यात दिवसभरात 70 नवे कोरोनाबाधित, 122 रुग्णांना डिस्चार्ज
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यात दिवसभरात 70 नवे कोरोनाबाधित, 122 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे : दिवसभरात ७० पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात १२२ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. -१६४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०३२४५. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १००३. – एकूण मृत्यू -९०६५. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९३१७७. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४६७५.
-
भाजपची तब्बल 9 तास बैठक, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर चर्चा
नवी दिल्ली – तब्बल 9 तास भाजपची बैठक
अखेर भाजपची आजची बैठक संपली
दिल्लीतल्या मुख्य कार्यालयात भाजपची बैठक
जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत झाली बैठक
5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर बैठकीत चर्चा
देशातील लसीकरणाबाबतही बैठकीत चर्चा
राज्यातून पंकजा मुंडे, विनोद तावडे बैठकीला हजर
विजया रहाटकर यांचाही बैठकीत सहभाग
-
-
मुंबईत दुकानं रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबईत दुकानं रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
उर्वरीत महाराष्ट्रात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावे, राजेश टोपेंचे आवाहन
-
कल्याण शीळ रोडवर पोलीस व्हॅनला भीषण आग
डोंबिवलीत पोलिसांच्या व्हॅनला लागली भीषण आग
आगीत पोलिसांची व्हॅन संपूर्णपणे जळून खाक
व्हॅन मुंबई पोलिसांची असल्याची मानपाडा पोलिसांची माहिती
सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही
काटई नाक्याच्या टोलनाक्याजवळ ६ वाजताच्या सुमारास लागली आग
आग सध्या पूर्णपणे विझवल्याची माहिती
आगीमुळे कल्याण शीळ रस्त्यावर अर्धा तास झाली वाहतूक कोंडी
-
बद्रीनाथमध्ये यंदाच्या वर्षातील पहिली हिमवृष्टी, उत्तर भारतात लवकरच थंडीची चाहूल
उत्तराखंड :
बद्रीनाथमध्ये यंदाच्या वर्षातील पहिली हिमवृष्टी
उत्तर भारतात लवकरच थंडीची चाहूल
राजधानी नवी दिल्लीमध्येही वातावरण बदलले
आज दिवसभर राजधानी नवी दिल्लीत ढगाळ वातावरण
उत्तराखंड राज्यातील अनेक रस्त्यांवरची वाहतूक विस्कळीत
राजधानी नवी दिल्लीत सध्या थंडीचं वातावरण
-
-
राज्यातील उपहारगृह, दुकानांची वेळ वाढणार, टास्क फोर्सच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्स मधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील.
-
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांना आजन्म जन्मठेप
एक मोठी बातमी पंजाबमधून आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना कोर्टानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलीय. सेवादार रणजितसिंह यांच्या हत्येप्रकरणी राम रहिम दोषी ठरले होते. त्यानंतर आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.
-
ठाणे महापालिका विरोधी पक्षनेते आणि महापौर यांच्यात महापौर दालनात खडाजंगी
ठाणे महापालिका विरोधी पक्षनेते आणि महापौर यांची बॅनरबाजी व लसीकरण कॅम्पवरून महापौर दालनात खडाजंगी
माजी खासदार व ठाणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यासह, विरोधी पक्षनेता शानू पठाण, गटनेते नजीब मुल्ला यांनी लसीकरण कॅम्पबाबत 20 लाख धनादेश महापौरांनी न स्वीकारत वागळे आणि ठाणे शहर येथील लसीकरण कॅम्पचे निवेदन स्वीकारले
महापौर दालनात शाब्दिक चकमक, विरोधक आणि महापौर नरेश म्हस्के यांच्यात चकमक पाहायला मिळाली
वैयक्तिक धनादेश मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यातील 20 लाख रुपयांचा होता
काही दिवसांपूर्वी खारेगाव भागात लसीकरण आव्हानाचे बॅनर शिवसेनेने फाडल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी केला
-
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार रवी राणा यांचा राडा
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी आमदार रवी राणा यांचा राडा
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाबाहेर केली कुजलेल्या सोयाबीनची होळी
कुजलेले सोयाबीन आणि संत्रे फेकून केला सरकारचा निषेध
नियोजन भवणाबाहेर राणा समर्थकांची जोरदार घोषणाबाजी
शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी हेक्टरी३०हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी
आज होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीत शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा ठराव मंजूर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्याची मागणी
-
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप सर्व 21 जागा लढविणार : गिरीश महाजन
जळगाव :
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप सर्व 21 जागा लढवत आहे, आमचे सर्व आमदार, खासदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ऐनवेळी दगाफटका केल्याने आमची शेवटी थोडी धावपळ झाली. पण जिल्ह्यात आमची ताकद आहे. 8 नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे, तोपर्यंत युतीची चर्चा सुरू राहिल. पण जर काही सकारात्मक निर्णय झाला नाही तर मात्र भाजप पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढेल, अशी माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे.
-
कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाने गर्भवती महिला प्रवाशाचा वाचविला जीव
कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार
आरपीएफ जवानाने गर्भवती महिला प्रवाशाचा वाचविला जीव
कल्याण स्थानकातील प्लेटफॉर्म क्रमांक 4 वर घडली घटना
मेल एक्सप्रेसमध्ये चूकून एक व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलासोबत बसला
या कुटुंबाला गोरखपूर एक्सप्रेस पकडायची होती
चूकून दर्शन एक्सप्रेसमध्ये जाऊन बसले
गाडी सूरु होताना गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला
गर्भवती महिला प्रवासी प्लेटफॉर्मवर पडली
आरपीएफ जवान एस.आर. खांडेकर यांनी वाचविले महिलेचा प्राण
-
भारतात कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही : भारती पवार
भारती पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
– पुणे महापालिकेकडून कोरोना काळात चांगले काम झाले. ऑक्सीजन प्लांट उभारले.
– केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या गाईडलाईन्सचे पालन केले.
– अतिरिक्त हॉस्पिटल बील कमी केली.
– पुणे महापालिकेच्या 88 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला.
– पुणे महापालिकेच्या हद्दीत 88 लाख लसीचे डोस देण्यात आलेत.
– कोरोनाची दुसरी लाट अचानक आली होती. महाराष्ट्र आणि केरळात अजुनही रुग्ण आहेत.
– लॉकडाउन किंवा निर्बंधांबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी केंद्राची भूमिका.
– भारतात दुसरी लाट अजून संपलेली नाही.
– काही देशामधे तिसरी, चौथी लाट आल्याच दिसलय. त्यामुळे महाराष्ट्रात त्या दृष्टीकोनातून तयारी सुरुय.
– सध्यातरी पहिल्या आणि दुसर्या लसीच्या डोसबाबात गाईडलाईन्स आहेत. बुस्टर डोसबाबात नाही.
– लहान मुलांच्या लसीकरणबाबत आवश्यक बाबी लवकरच पूर्ण केल्या जातील.
-
फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांकडून अटक
पुणे –
फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांकडून अटक
शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचे नाव
2018 मधे पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची मलेशियात नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली
2018 मधे दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात
याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतुन केली अटक
किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीसांची दोन पथक कार्यरत
महाराष्ट्र बरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जातोय.
आज करणार कुरेशील कोर्टात हजर
-
पिंपरी चिंचवड मधील कासारवाडी पश्चिम बस स्टॉप मागील नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला
पिंपरी चिंचवड
-पिंपरी चिंचवड मधील कासारवाडी पश्चिम बस स्टॉप मागील नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला
-काय घातपात आहे का त्या दृष्टीने भोसरी पोलिसांचा तपास सुरू
-या मृतदेहाचे वय अंदाजे 30 ते 35 असल्याचा प्राथमिक अंदाज
-पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात केला दाखल
-
औरंगाबादेतील प्राध्यापक राजन शिंदे खुनातील शस्त्र अखेर सापडले
औरंगाबाद –
प्राध्यापक राजन शिंदे खुनातील शस्त्र अखेर सापडले..
खून करून आरोपीने हत्यारे फेकले होते विहरीत..
व्यायाम करायचे डंबेल,चाकु आणि टॉवेल पोलिसांनी केले जप्त..
8 दिवस पूर्ण झाल्या नंतर अखेर घरा शेजारच्या विहरित मिळाले शस्त्र..
खुनाचे धागेदोरे आता लागले उलगडू..
-
राज्यात २४ तास अखंड विजेचा पुरवठा करतोय – नितीन राऊत
नितीन राऊत
– राज्यात २४ तास अखंड विजेचा पुरवठा करतोय
– राज्यात वीजनिर्मितीसाठी कोळसा स्थिती बीकट आहे
– आमचे प्लांट बंद होणार नाही अशी व्यवस्था उभी केलीय
– कोळशाअभावी एकही संच सध्या बंद नाही
– दिवाळीत राज्यावर वीज संकट नाही
– ‘महाराष्ट्र अंधारात जाऊ देणार नाही’
– ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती
-
सोलापूर तुळजापूर रस्ता आजपासून वाहतुकीसाठी बंद
सोलापूर – सोलापूर तुळजापूर रस्ता आजपासून वाहतुकीसाठी बंद
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक भाविक जात तुळजापुरला चालत
मात्र यंदा पायी चालत जाण्यावर प्रशासनाने घातली आहे बंदी
तरीही पायी भाविक चालत जाण्याच्या शक्यतेने प्रशासनाने घेतला भविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने वाहतूक बंद करण्याचा निर्णय
मी उद्या रात्री बारा वाजेपर्यंत राहणार वाहनांना वाहतुकीसाठी बंदी
-
विदर्भातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी
विदर्भातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी,
विदर्भातील 35 ठिकाणची कामांची होणार चौकशी,
नागपूरसह वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कामांची होणार चौकशी,
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना,
योजनेच्या कामात अनियमितता झाल्याचा आक्षेप घेत राज्यातील जलयुक्त शिवार कामाची राज्य सरकारनं लावलीय चौकशी
-
हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विधीमंडळ समिती नागपुरात दाखल
हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विधीमंडळ समिती नागपुरात दाखल
– विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत घेणार तयारीचा आढावा
– ७ डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशन
– थोड्याच वेळात आढावा बैठक सुरु होणार
– बैठकीत जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार
-
रेशनवरील धान्य वितरणातातील घोळाची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून गंभीर दखल
– रेशनवरील धान्य वितरणातातील घोळाची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून गंभीर दखल
– राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची आयजी लेव्हलचा अधिकारी चौकशीची मागणी
– मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आयजी लेव्हलच्या अधिकारी चौकशीची मागणी
– नागपुरात रेशनवरील २३ लाखांचा गव्हाची तस्करीची होणार सखोल चौकशी
– नागपूर ग्रामीण रेशन धान्य पुरवठा करणाऱ्या मुख्य कंत्राटदारावर होणार कारवाई
– नागपूर धान्य तस्करीत मुख्य पुरवठादाराची होणार चौकशी
-
इंदुरीकर महाराजांचे कीर्तनाचे आयोजन करणे पडले महागात
येवला
– इंदुरीकर महाराजांचे कीर्तनाचे आयोजन करणे पडले महागात
– येवला तालुक्यातील कोळम बुद्रुक येथील श्री सप्तशृंगी माता मित्र मंडळाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
– कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रमांना बंदी असतानाही नवरात्र उत्सवात 12 ऑक्टोंबर रोजी धार्मिक कीर्तनाचे आयोजन
– या धार्मिक कीर्तनात गर्दी जमविलेल्या प्रकरणी आयोजकांवर येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
– यावेळी विना मास्क , सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न
-
नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्टिव्ह
नागपूर –
नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्टिव्ह..
महाविकास आघाडी अजूनही वेट अँड वॉच च्या भूमिकेत..
काँग्रेस स्वबळाच्या तयारीत तर राष्ट्रवादी शिव सेना युती करण्याची शक्यता..
जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाने काँग्रेस मध्ये उत्साह, तर निकालाने भाजप चे वाढविले टेन्शन..
-
मुळशी तालुका ठरला राज्यातील पहिला लसीकरण मुक्त तालुका
पुणे
मुळशी तालुका ठरला राज्यातील पहिला लसीकरण मुक्त तालुका
तालुक्यातील108 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण
जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या मिशन कवचकुंडल अभियानाचा परिणाम
तर खेड, मुळशी, आंबेगाव तालुक्यात 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण
जिल्ह्यात सलग 75 तास लसीकरण केल्याने लसीकरणाला वेग
-
नाशकात चालक आणि वाहकांनी परस्पर केला लाखो रुपयांच्या मलाचा लिलाव
नाशकात चालक आणि वाहकांनी परस्पर केला लाखो रुपयांच्या मलाचा लिलाव..
कापड निर्मितीसाठी लागणार उच्च प्रतीचा माल परस्पर लिलावात विकला
ट्रक मध्ये 180 खोक्यांमध्ये भरला होता माल..
चालक आणि वाहकाने परस्पर या मलाचा केला लिलाव..
सुरत मधून दोघा खरेदीदारांना पोलिसांनी केली अटक
तर तिघे जण अद्याप फरार
-
राज्य सरकारच्या आदेशानुसार 22 ऑक्टोंबर पासून चित्रपटगृहे सुरू
सोलापूर –
राज्य सरकारच्या आदेशानुसार 22 ऑक्टोंबर पासून चित्रपटगृहे सुरू
मात्र या काळात कोणतेही नवे चित्रपट झळकणार नाही
रसिकांना 5 नोव्हेंबरची वाट बघावी लागणार
प्रसिद्ध चित्रपट,गाजलेले चित्रपट पुन्हा पडद्यावर आणल्याशिवाय चित्रपटचालकाना पर्याय नाही
-
वाळू वाहतूकदाराकडून 40 हजाराची लाच घेणाऱ्या दोन पोलिसांची चौकशी सुरू
सोलापूर –
वाळू वाहतूकदाराकडून 40 हजाराची लाच घेणाऱ्या दोन पोलिसांची चौकशी सुरू
अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन आडवुन मंगऴवेढा पाेलीस स्टेशनच्या दाेन पोलीस कर्मचार्यांनी वाहान साेडण्यासाठी ७० हजार लाचेची केली होती मागणी
तडजोडीने दाेन साक्षीदारासमाेर ४० हजार स्विकारल्याबद्दलची अजय नाईक वाडी यांची तक्रार
पोलीस कर्मचारी आजित मिसाळ व गणेश पवार या दोघांची होणार पोलीस उपअधीक्षकामार्फत चौकशी
-
कोरोना प्रतिबंधक लसीकरणं आज 64 केंद्रावर होणार
पिंपरी चिंचवड
-कोरोना प्रतिबंधक लसीकरणं आज 64 केंद्रावर होणार
-त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे 30 हजार 800 लसीचे डोस उपलब्ध
-त्यामध्ये कोव्हीशिल्ड चे 28 हजार डोस तर कोव्हॅक्सन चे 2800 डोस उपलब्ध
-
पिंपरी चिंचवड महानगरपालिका जलतरण तलावाच्या शुल्कामध्ये तिप्पट वाढ
पिंपरी चिंचवड
-पिंपरी चिंचवड महानगरपालिका जलतरण तलावाच्या शुल्कामध्ये तिप्पट वाढ
-पोहणाऱ्याना आत 10 रुपय शुल्क ऐवजी 30 रुपये शुल्क मोजावे लागणार
– त्यामुळे वार्षिक शुल्क एक हजार रुपये वरून आता तीन हजार रुपये इतकी होणार
– यासाठी स्थायी समिती याला मान्यता दिली त्यामुळे पोहणाऱ्याचा हिरमोड झालाय
-
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक
कोल्हापूर
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक
दोन जागा द्या अन्यथा आम्ही बंडखोरी करू
शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जिल्ह्यातील महाविकासआघाडी नेत्यांना थेट इशारा
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पदाधिकारी बैठकीत दिला इशारा
राज्य सरकार असले तरी जिल्ह्यात शिवसैनिकांना मानसन्मान दिला जात नसल्याचा ही बैठकीत काही पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी केला आरोप
-
आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात ‘सकल स्त्री संतगाथा’ या ग्रंथाचे प्रकाशन
पुणे
-आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात ‘सकल स्त्री संतगाथा’ या ग्रंथाचे प्रकाशन
-संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी चे माजी विश्वस्त डॉ शिवाजीराव मोहिते यांनी हा ग्रंथ संपादित केलाय
-यावेळी संस्थान चे प्रमुख विश्वस्त आणि मोजके भाविक उपस्थित होते
-
केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच
केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच
मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त
घर जमीनदोस्त होतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद
मुसळधार पावसामुळे अनेक घर जमीनदोस्त
आतापर्यंत 40 हून अधिक जणांचा मृत्यू
कोट्टायम जिल्ह्यातील घर जमीनदोस्त होतानाचा व्हिडीओ कॅमेरात
-
हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विधीमंडळ समिती आज नागपुरात
– हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विधीमंडळ समिती आज नागपुरात
– विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत घेणार तयारीचा आढावा
– ७ डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशन
– आजच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी राहणार उपस्थित
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या 20 वी ऊस परिषद
कोल्हापूर –
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या 20 वी ऊस परिषद
जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानात होणार ऊस परिषद
एफआरपी अधिक 200 ची पहिली उचल देण्याची मागणी होण्याची शक्यता
पहिल्यांदाच हंगामा आधी साखरेचे दर वाढल्याने ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही राहणार
स्वाभिमानीच्या ऊस परिषदेकडे ऊस उत्पादकांचे लक्ष
महापुराच्या तुटपुंज्या नुकसान भरपाई वरही सरकार विरोधात नव्याने एल्गार पुकारला जाण्याची शक्यता
-
नागपूर जिल्ह्यात 24 तासांत तीन नव्या कोरोना रुग्णांची नोंद
– नागपूर जिल्ह्यात 24 तासांत तीन नव्या कोरोना रुग्णांची नोंद
– जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या घटली, सध्या २२ सक्रिय रुग्ण
– नागपूरातील आमदार निवासातील कोरोना रुग्णांची विलीगीकरण सुविधा बंद
– हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी आमदार निवास केलं रिकामं
– आता कोरोना पॅाझाटीव्ह आढळल्यास थेट रुग्णालयात रवानगी
– कोरोना रुग्णांना पाठवण्यात येणार एम्स रुग्णालयात
-
19 महिने बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुणे मुंबईकरांच्या सेवेत दाखल
पुणे
19 महिने बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुणे मुंबईकरांच्या सेवेत दाखल
नोकरदार वर्गाला मोठा दिलासा
स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटी ला हार घालून केलं स्वागत
पुण्यावरून ही रेल्वेगाडी (क्र. ०१००९) सकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी पोचेल.
-
नागपूरात 14 श्वानांना विष देऊन मारल्याची धक्कादायक घटना
नागपूरात 14 श्वानांना विष देऊन मारल्याची धक्कादायक घटना
– सोनेगाव परिसरातील ममता सोसायटीतील धक्कादायक घटना उघड
– 8 दिवसांपूर्वीच्या घटनेत काल सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
– शवविच्छेदनानंतर श्वानांचा विषबाधेने मृत्यू झाल्याचं झालं उघड
-
सातपूर परिसरात अनधिकृत होर्डिंगवर पुन्हा कारवाई
नाशिक – सातपूर परिसरात अनधिकृत होर्डिंग वर पुन्हा कारवाई
पोलीस आणि महापालिकेचा कारवाईचा धडाका
अनधिकृत होर्डिंग विरोधात पोलिसांनी उघडली आहे मोहीम
आधी समज, नंतर थेट गुन्हा दाखल करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
पोलिसांच्या परवानगी शिवाय बॅनर लावल्यास थेट कारवाईचे आदेश
सातपूर परिसरातील 22 जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
-
पुढील एक-दोन दिवसांत राज्यात सर्वच भागांत हवामान कोरडे होणार
पुणे :
पुढील एक-दोन दिवसांत राज्यात सर्वच भागांत हवामान कोरडे होणार
कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता
पुणे वेधशाळेने वर्तवली तापमान वाढीची शक्यता
-
दोन तरुणांची फसवणूक केल्या प्रकरणी किरण गोसावीवर अखेर पालघरमध्ये गुन्हा दाखल
पालघर –
पालघरमधील एढवन येथील दोन तरुणांची फसवणूक केल्या प्रकरणी किरण गोसावीवर अखेर पालघरमध्ये गुन्हा दाखल
केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात किरण गोसावी आहे साक्षीदार
दोन तरुणांना परदेशात कामासाठी पाठवण्यासाठी घेतले होते दीढ लाख रुपये,
उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे ह्या दोन तरुणांची फसवणूक
-
अकोल्यात दुर्गादेवी विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू
अकोल्यात दुर्गादेवी विसर्जनाला गालबोट…
दुर्गादेवी विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू….
दोनी युवक अकोला शहरातील शिवसेना वसाहत मधील रहिवाशी…
सुनील वाघळकर,अभिषेक वाघळकर अशी बुडालेल्या यवकांची नावे आहेत…
बोरगाव पोलीस घटनास्थळी पोचली असून युवकांचा शोध सुरू आहे….
Published On - Oct 18,2021 6:37 AM