Maharashtra News Live Update |किरण गोसावीच्या विरोधात पुणे पोलिसांकडे आणखी चार तरूणांच्या तक्रारी

| Updated on: Oct 30, 2021 | 2:54 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News Live Update |किरण गोसावीच्या विरोधात पुणे पोलिसांकडे आणखी चार तरूणांच्या तक्रारी
Aryan Khan

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Oct 2021 09:19 PM (IST)

    शेतकऱ्यांचं वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार

    पुणे : शेतकऱ्यांचं वीजबिल ऊस बिलातून वसूल करणार

    साखर संचालक शेखर गायकवाड यांच्या कार्यालयाकडून सर्व साखर कारखान्यांना या संदर्भातील पत्र

    याबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या साखर आयुक्तांनी बोलावली ऑनलाईन बैठक

  • 29 Oct 2021 08:51 PM (IST)

    किरण गोसावीच्या विरोधात पुणे पोलिसांकडे आणखी चार तरूणांच्या तक्रारी

    पुणे : किरण गोसावीच्या विरोधात पुणे पोलिसांकडे आणखी चार तरूणांच्या तक्रारी

    किरण गोसावीने परदेशात नोकरी लावण्याच्या बहण्याने केली फसवणूक

    पोलिसांनी चारही तरुणांना द्यायला लावले गोसावीविरोधात तक्रार अर्ज

    तीन तरूण लष्कर परिसरातील असून एक वानवडी परिसरातील

    या चार जणांचे अर्ज आल्यावर पुढील कायदेशीर कारवाई होणार

  • 29 Oct 2021 08:39 PM (IST)

    वानखेडेंनी आतापर्यंत हजारो कोटी रुपयांची वसुली केली- नवाब मलिक

    नवाब मलिक माध्यमांशी बोलत आहेत. त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर टीका केली आहे. बॉलिवूडला बदनाम करण्याचा कट आहे. वानखेडेंनी आतापर्यंत हजारो कोटी रुपयांची वसुली केलेली आहे.

  • 29 Oct 2021 08:05 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 57 कोरोना रुग्णांची वाढ 

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 57 कोरोना रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 110 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही.

    -135 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 504156

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 792

    – एकूण मृत्यू -9074

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 494290

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5493

  • 29 Oct 2021 06:16 PM (IST)

    शाहरुखची उद्या सुटका होणार, मन्नतवर रोषणाई

    शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर रोषणाई करण्यात येत आहे

    आर्यन आज जरी घरी आला नसला तरी उद्या मन्नतवर येईल

    आर्यनला जामीन मंजूर झाला

    वेळेच्या बंधनामुळे आज त्याची सुटका झाली नाही

    पण आर्यन उद्या घरी येणार त्याच्या स्वागतासाठी म्हणत लाइटिंग करण्यात येत आहे

  • 29 Oct 2021 06:10 PM (IST)

    अभिनेत्री जुही चावला कोर्टाच्या बाहेर आल्या

    अभिनेत्री जुही चावला कोर्टाच्या बाहेर

    बच्चा घर आयेगा म्हणता जुही चावला बाहेर पडल्या

  • 29 Oct 2021 06:02 PM (IST)

    आर्यनचा आजचा मुक्कामही तुरुंगातच

  • 29 Oct 2021 05:56 PM (IST)

    आर्यन खानची आज सुटका होणार नाही, आजचा मुक्कामही तुरुंगातच

    आर्यन खानची आज सुटका होणार नाही

    आर्थर रोड कारागृह प्रशासनाची माहिती

  • 29 Oct 2021 05:39 PM (IST)

    सात वाजेपर्यंत जामिनाची कॉपी स्वीकारण्याची वेळ

    एका तासानंतर आर्नन बाहेर येणार

    सात वाजेपर्यंत जामिनाची कॉपी स्वीकारण्याची वेळ

  • 29 Oct 2021 05:33 PM (IST)

    जामीन ऑर्डर स्वीकारण्याची वेळ संपली, आर्यनच्या सुटकेचा सस्पेन्स वाढला

    आर्यन खानच्या सुटकेवर सस्पेन्स वाढला

    अर्ज स्वीकारण्याची वेळ संपली

  • 29 Oct 2021 04:50 PM (IST)

    अभिनेत्री जुही चावला सेशन कोर्टात दाखल 

    अभिनेत्री जुही चावला सेशन कोर्टात दाखल

    गॅरंटर म्हणून जुही चावला आर्यनच्या जामिनावर सही करणार

  • 29 Oct 2021 04:43 PM (IST)

    आर्यनला घेण्यासाठी शाहरुख तुरुंगाकडे रवाना

    आर्यनला घेण्यासाठी शाहरुख तुरुंगात पोहोचणार

    काही क्षणात शाहरुख आर्थर रोड कारागृहात पोहोचणार

  • 29 Oct 2021 04:41 PM (IST)

    सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतरच आर्यनची सुटका होणार

    जुही चावला सेशस कोर्टात दाखल

    कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यासाठी दोन ते अडीच तास लागतील

    सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतरच आर्यनची सुटका होणार

    आर्यन खासनोबत मूनमून धेमेचा, अरबाज मर्चंट यांचीदेखील सुटका होणार

    सत्र न्यायालयात कायदेशी प्रक्रिया पार पडत आहे

  • 29 Oct 2021 04:37 PM (IST)

    आर्यनला आणण्यासाठी स्वत: शाहरुख खान जेलच्या दिशेला रवाना

    आर्यनला आणण्यासाठी स्वत: शाहरुख खान जेलच्या दिशेला रवाना, आर्यनला जेलमधून आणण्यासाठी दोन गाड्या रवाना, शाहरुख थोड्याच वेळाच ऑर्थर रोडजवळ पोहोचेल

  • 29 Oct 2021 04:36 PM (IST)

    आर्यनला आणण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोडकडे रवाना

    आर्यन खान तुरुंगातून बाहेर येणार

    आर्यनला घेण्यासाठी स्वत: शाहरुख खान रवाना

    आर्यनला जेलमधून आणण्यासाटी दोन गाड्या रावाना

    शाहरुख आर्थर रोड तुरुंगात पोहोचणार

  • 29 Oct 2021 02:44 PM (IST)

    जलयुक्त शिवारातून किती पाणी जिरलं आणि कोणी जिरवलं याचा तपास सुरुय : संजय राऊत

    संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    जलयुक्त शिवाराची स्वतंत्र चौकशी एसआयटी, लाचलुचपत विभागाकडून सुरु आहे. चौकशी सुरु असताना अचानक निर्दोष, क्लिन चीटचं कमळ कसं उगवलं? कोणीतरी ही कारस्थान करतंय. आमच्यावर चिखल उडवायचा दोषी म्हणून आणि स्वत:वर आलं तर निर्दोष. हा पोरखेळ बंद व्हायला पाहिजे. या महाराष्ट्रात जो पोरखेळ सुरुय तो बंद व्हायला पाहिजे. जलयुक्त शिवाराचे आरोप शेकडो कोटींचा आहे. हे आरोप बघितल्यानंतर मला बिहारमधल्या चारा घोटाळ्याची माहिती झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यात चारा घोटाळा झाल्याचं सीबीआयने म्हटलं. तसंच महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराबाबत अनेक जिल्हे आणि तालुक्यात डबके तयार झाली. त्यातून किती पाणी जिरलं आणि कोणी जिरवलं याचा तपास सुरु आहे.

    आमच्या बत्तीशीला कोणी चॅलेंश देऊ नका. आमचे दात मजबूत आहेत.

  • 29 Oct 2021 12:46 PM (IST)

    पुण्यात जिल्हा परिषदेबाहेर दिव्यांगाच आंदोलन

    पुण्यात जिल्हा परिषदेबाहेर दिव्यांगाच आंदोलन,

    जिल्हा परिषदेच्या सीईओंना घातला घेराव

    विविध मागण्यांसाठी दिव्यांगांच आंदोलन

  • 29 Oct 2021 12:44 PM (IST)

    फुसक्या डायलॉगबाजीला आम्ही विचारत नाही- आशिष शेलार

    हे असंवेदनशील, अकार्यक्षम सरकार आहे – आशिष शेलार

    परिवहन मंत्री परिवार मंत्री झालेत

    राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

    कर्मचाऱ्यांचं तोंड गोड करण्याऐवजी कडू करण्याचं काम

    फुसक्या डायलॉगबाजीला आम्ही विचारत नाही

  • 29 Oct 2021 12:41 PM (IST)

    नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

    नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न,

    लोखंडी खांबावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न,

    कमलेश ठाकरे असं चालकाचं नाव,

    मात्र कर्मचारी वेळीच पोहचल्यानं टाळला अनर्थ,

    एसटी कर्मचारी आर्थिक संकटात असल्यानं आत्महत्येचा निर्णय,

    कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

  • 29 Oct 2021 11:33 AM (IST)

    राष्ट्रवादी कधीच भरोशाचा पक्ष नाही – चंद्रकांत पाटील

    चंद्रकांत पाटील –

    सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीला

    राष्ट्रवादी कधीच भरोशाचा पक्ष नाही

  • 29 Oct 2021 10:41 AM (IST)

    ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील, भुजबळांचा वानखेडेंना टोला

    – ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील, भुजबळांचा वानखेडेंना टोला,

    – नवाब मलिकांनी जी भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका आहे, पक्ष त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे,

    – समीर वानखेडे आणि त्यांचे कुटूंब मुस्लिम आहे सिद्ध झालंय,

    – आर्यन खानचा जामीन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याचा एकमेकांना काही संबध नाही,शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देतच आहेत,भाजपला प्रत्युत्तर

    – भाजप विरोधी सरकार जिथे जिथे आहेत, तिथे तपास यंत्रणा चुकीचे काम करतायत,

    – एसटी कर्मचाऱ्यांनी संयम बाळगळा पाहिजे, सरकार त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार

  • 29 Oct 2021 10:06 AM (IST)

    जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत निरापराध व्यक्तीला तुरुंगात डांबणं चुकीचं – नवाब मलिक

    जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत निरापराध व्यक्तीला तुरुंगात डांबणं चुकीचं

    काल तीन लोकांना जामीन मिळाला, वानखेडे आल्यानंतर एनसीबीने अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं

    एक महिन्याच्या आत आता अनेक गोष्टी बदलत आहेत

    वानखेडेंनी सर्व हातखंडे वापरले, आधी म्हणाले की माझ्या कुटुंबलाा या प्रकरणात घुसडण्यात येत आहे

    माझ्या मरहूम आईचंही या प्रकरणात नाव घेतलं. पण मी कधीच त्यांच्या आईचं नाव घेतलं नाही

    मी त्यांच्या पहिल्या पत्नीचा ट्विटरवर फोटो टाकला, पण त्यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल एका शब्दानेही बोललो नाही

    माझी लढाई कुणाच्या कुटुंबाविरोधात नाही, लढाई ही अन्यायाविरोधात आहे

  • 29 Oct 2021 10:04 AM (IST)

    आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे, पिक्चर अभी बाकी है – नवाब मलिक

    नवाब मलिक

    जो व्यक्ती आर्यनला तुरुंगात घेऊन जात होता. तो तुरुंगात आहे. २ तारखेनंतर परिस्थिती बदलली. जो व्यक्ती आर्यनला जामीन मिळू नये म्हणून शक्तीपणाला लावत होता. तो काल कोर्टात दाद मागत होता. पोलिसांनी जी चौकशी सुरू केली आहे, ती सीबीआय किंवा एनसीबीकडे द्या म्हणत होता.

    आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. पिक्चर अभी बाकी है, संपूर्ण सिक्वेन्स बदलला आहे. धरपकड करणारे आता बचावाचा मार्ग शोधत आहे. म्हणून मी काल म्हटलं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त

  • 29 Oct 2021 09:58 AM (IST)

    नागपूर वाहतूक पोलिसांचा आता स्पेशल ड्राईव्ह

    नागपूर वाहतूक पोलिसांचा आता स्पेशल ड्राईव्ह

    हेल्मेट न घालणाऱ्या न विरोधात स्पेशल ड्राईव्ह

    3 दिवस चालणार स्पेशल ड्राईव्ह

    काल एकाच दिवशी 1 हजार 564 जणांवर कारवाई

    82 हजाराचा केला दंड वसूल

    पेट्रोल पंप परिसरात राबविणार पोलीस ड्राईव्ह

  • 29 Oct 2021 09:56 AM (IST)

    वाहन परवान्यासाठी आता लागणार ऑनलाईन फिटनेस प्रमाणपत्र

    बारामती

    – वाहन परवान्यासाठी आता लागणार ऑनलाईन फिटनेस प्रमाणपत्र

    – वाहन परवान्यासाठी घेतले जात होते ऑफलाईन फिटनेस प्रमाणपत्र

    – नोव्हेंबरपासून पॅनलवरील डॉक्टरांकडून ऑनलाईन स्वरुपात मिळणार प्रमाणपत्र

    – नवीन परवाना, नुतणीकरण या कामासाठी लागणार ऑनलाईन प्रमाणपत्र

    – परिवहन विभागाच्या संकेत स्थळावरुनच घेता येणार फिटनेस प्रमाणपत्र

  • 29 Oct 2021 09:55 AM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची धग पुन्हा वाढली

    कोल्हापूर

    एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची धग पुन्हा वाढली

    शेवगावमधील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पुन्हा आंदोलन सुरू

    कोल्हापुरातील अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी.

    एस टी सेवेवर पुन्हा किंचित परिणाम

  • 29 Oct 2021 09:55 AM (IST)

    परळी तालुक्यातील हाळंब परिसरात गांजाची शेती

    परळी :

    परळी तालुक्यातील हाळंब परिसरात गांजाची शेती

    पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या तालुक्यात गांजाची शेती आढळून आल्याने खळबळ

    आठवडाभरातील दुसरी कारवाई; परळी ग्रामीण पोलिसांकडून दोन आरोपींना बेड्या

  • 29 Oct 2021 09:32 AM (IST)

    जळगाव महापालिकेत वाढणार नगरसेवकांची संख्या

    जळगाव – जळगाव महापालिकेत वाढणार नगरसेवकांची संख्या

    15 हजार नागरिकांच्या मागे वाढणार 1 नगरसेवक

    2023 मध्ये 86 जागांसाठी मतदान, प्रभागांची संख्या वाढणार

    सध्यस्थीतीत 75 नगरसेवक असून ही संख्या 86 होणार

  • 29 Oct 2021 09:31 AM (IST)

    जळगाव मनपातील 25 वर्षानंतर रोजंदारीवरील कर्मचारी कायम

    जळगाव मनपातील 25 वर्षानंतर रोजंदारीवरील कर्मचारी कायम

    96 पैकी 20 कर्मचारी मनपाच्या कायम सेवेत

    लवकरच इतर कर्मचाऱ्यांना देखील कायम सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.

  • 29 Oct 2021 08:29 AM (IST)

    नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णयाचा असाही परिणाम

    कोल्हापूर

    नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णयाचा असाही परिणाम

    कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या 81 वरून 92 वर जाणार असल्याने सध्याच सभागृह पडणार अपुर

    वाढलेल्या नगरसेवकांच्या बैठक व्यवस्थेची होणारी गैरसोय

    कोल्हापूर महानगर पालिकेला शोधावे लागणार पर्यायी सभागृह

    निवडणुकीच्या काळातच घ्यावा लागणार पर्यायी जागेचा शोध

    कमी कालावधीत नवीन सभाग्रह बांधण ही अशक्य

  • 29 Oct 2021 06:58 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील वीज देयकाच्या थकबाकीची 191 कोटी वसूल

    पुणे –

    – जिल्ह्यातील वीज देयकाच्या थकबाकीची 191 कोटी वसूल,

    – जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ५१८ शेतकऱ्यांकडून वीजबिल भरणा,

    – जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ९९५ कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे एकूण ३०९६ कोटी २८ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती,

    – जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ५१८ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला.

  • 29 Oct 2021 06:57 AM (IST)

    दिवाळीच्या तोंडावर गुड न्यूज, 24 तासांत नागपूर जिल्ह्यात कोरोना शुन्यावर

    – दिवाळीच्या तोंडावर गुड न्यूज, 24 तासांत नागपूर जिल्ह्यात कोरोना शुन्यावर

    – महिनाभरात तीन वेळा नागपूर जिल्ह्यात शुण्य कोरोना रुग्णांची नोंद

    – २८२९ जणांच्या चाचण्यांमधून शुण्य कोरोना रुग्णांची नोंद

    – नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा

    – गेल्या २४ तासांत जिल्ह्यात शुण्य कोरोना मृत्यूची नोंद

  • 29 Oct 2021 06:56 AM (IST)

    पुण्यात राष्ट्रीय नॅशनल प्रबोधिनी अर्थात NDA चा 141 वा दीक्षांत समारंभ आज पार पडतोय

    पुणे –

    पुण्यात राष्ट्रीय नॅशनल प्रबोधिनी अर्थात NDA चा 141 वा दीक्षांत समारंभ आज पार पडतोय..

    लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत…

    खडकवासला येथील NDA च्या खेत्रपाल मैदानात हा सोहळा रंगतोय…

Published On - Oct 29,2021 6:20 AM

Follow us
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.