Maharashtra News LIVE Update |उस्मानाबाद जिल्ह्यात आज 37 नवीन कोरोना रुग्ण सापडले, 63 रुग्ण बरे
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
उस्मानाबाद जिल्ह्यात आज 37 नवीन कोरोना रुग्ण सापडले, 63 रुग्ण बरे
उस्मानाबाद जिल्ह्यात आज 37 नवीन रुग्ण सापडले 63 रुग्ण बरे झाले
आज 1 हजार 166 नमुने तपासले, त्यापैकी 37 पॉझिटिव्ह म्हणजे दर हा 3.17%
आतापर्यंत 66 हजार 376 रुग्ण सापडले त्यापैकी 63 हजार 844 बरे झाले.
हे प्रमाण 96.18 टक्के तर 1 हजार 474 मृत्यू झाले
-
जळगाव जिल्ह्यात एकही नवा कोरोना रुग्ण नाही
जळगाव : जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. तर दुसरीकडे 1 रुग्णाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
-
-
9 ऑक्टोबरला चिपी विमानतळावर विमान वाहतूक सुरु होणार- नारायण राणे
केंद्रीय मंत्री नाराण राणे यांची पत्रकार परिषद सुरु आहे. सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाविषयी ते बोलत आहे. या विमानताळावर विमान वाहतूक सुरु होणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी ज्योतीरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विमान वाहतूक सुरु होणार आहे. या कार्यक्रमाला नारायण राणे उपस्थित राहतील. सात वर्षापासून विमानतळ बांधून तयार होतं. आज सकाळी शिंदे यांना भेटलो. त्यानंतर मी हे जाहीर करत आहे, असं नारायण राणे म्हणाले.
आम्ही टुरिझम जिल्हा जाहीर केला
आम्ही स्थानिक आहोत. आम्हीच विमानतळ बांधले आहे. आमचा हा अधिकार आहे. आम्ही टुरिझम जिल्हा जाहीर केला. कोणीही श्रेय लाटण्याचं काम करु नये, असेही नारायण राणे म्हणाले.
मुख्यमंत्री उपस्थित राहायला पाहिजेच असे नाही
विमानतळाला जे परवानगी देणार आहेत त्यांनाच मी भेटलो. त्यांनीच 9 तारखेची वेळ दिला. त्यांनीच मला हा कार्यक्रम दिला आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहायला पाहिजेच असे नाही, असेही राणे म्हणाले.
शिवसेनेचा खासदार तसेच शिवसेना काही कामाचे नाहीत
शिवसेनेने कोकणात एकही प्रकल्प जाहीर केला नाही. पूरग्रस्तांना मदत नाही, पाटबंधाऱ्यांचे कामे बंत आहे. रस्त्यांचे बंद आहे. शिवसेनेचा खासदार तसेच शिवसेना काही कामाचे नाहीत. हे कलेक्शन मास्टर आहेत. पत्रव्यवहाराने विमानतळ होणार नाही. शिवसेनाचा कोणताही दावा चालत नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
चिपी विमानतळ मी बांधले
शिवसेनेने रोजगार आणले का, सगळं काही बंद आहे. चिपी विमानतळ मी बांधले आहे. आता माझ्याकडे तारीख आली, मी बोललो. हे 35 कोटी खर्च करु शकले नाहीत.
मुख्यमंत्री वागतात एक बोलतात एक. आमच्याच म्हणजेच हिंदूच्या सणांनां बंदी का? जे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारतात, त्यांचा मुख्यमंत्री ठाकरे सत्कार करतात. तिसरी लाटेची हे भीती घालतात. लाटेच्या नावाखाली त्यांना घरी बसायचं आहे. राज्यात एक लाख 57 हजार लोक गेली की ? वॉर्डबॉय नाही, डॉक्टर नाही. खूप दयनीय स्थिती आहे, असा टोला नारायण राणे लगावला.
कोकणात आमचं रुग्णालय आहे.आम्ही तिथे कोरोनार रुग्णांवर उपचार करु. शासकीय रुग्णालयांपेक्षा आमच्याकडे अत्याधुनिक यंत्रे तसेच सुविधा आहेत. ज्यांना कोरोनाची लागण होईल, त्यांच्यावर आम्ही अपचार करु, असे नारायण राणे म्हणाले.
-
नाशिकमध्ये भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश, मुलबाळ प्राप्त होण्याच्या नावाखाली सुरू होती लूट
नाशिक – भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
अनिसने केला भंडाफोड
नाशिकच्या गंगापूर रोडवरील एक इमारतीत सुरू होती लूट
मुलबाळ प्राप्त होण्याच्या नावाखाली सुरू होती लूट
एका महिलेकडे केली होती 50 हजारांची मागणी
संशयित नाशिकच्या गंगापूर पोलिसांच्या ताब्यात
हनुमानभक्त गणेश महाराज ज्योतिषी असं संशयिताच नाव
-
भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरण, रोना विल्सन यांना 2 आठवड्यांचा तात्पुरता जामीन
मुंबई : भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणातील रोना विल्सन यांना दोन आठवड्यांचा तातपुरता जामीन
सत्र न्यायलयात कडून रोना विल्सन यांना दिलासा
विल्सन यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधि ( last rites ) मध्ये सहभाग घेता यावा यासाठी केला होता विनंती अर्ज
18 ऑगस्ट 2021 रोजी रोना विल्सन यांच्या वडिलांचा केरळमध्ये मृत्यू झाला होता
-
-
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकलने प्रवास
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकलने प्रवास
सीएसएमटी ते ठाण्यापर्यंत लोकलने प्रवास
IRSDC अंतर्गत प्लॅटफॉर्म विकासकामांची पाहणी करणार
गर्दीच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक घेणार
-
सोलापूर जिल्ह्याला एक लाख कोरोना प्रतिबंधक लसीकरण साठा उपलब्ध
सोलापूर जिल्ह्याला एक लाख कोरोना प्रतिबंधक लसीकरण साठा उपलब्ध
आज दिवसभरात लस वाटपाचे होणार नियोजन
ग्रामीण भागात उद्या एक दिवसात एक लाख लसीकरण करण्यात येणार
लसीकरण मोहीम सूर झाल्यापासून जिल्ह्याला पहिल्यांदाच एक लाख डोस प्राप्त
-
रत्नागिरी गेल्या 2 तासापासून चिपळूण परिसरातील पाऊस थांबला
रत्नागिरी गेल्या 2 तासापासून चिपळूण परिसरातील पाऊस थांबला
मात्र समुद्र भरतीची वेळ दुपारी 11.30 ची असल्याने चिंता मात्र कायम
पूर स्थिती निर्माण झाल्यास ठीक-ठिकाणी बोटी तयार
चिपळूण नगरपालिका सतर्क
-
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पावसाला सुरुवात
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पावसाला सुरुवात
मध्यरात्रीपासून झाली पावसाला सुरुवात
रिमझिम झाडीच्या पावसामुळे खरिपाच्या पिकाला जीवदान
झड पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन झाले विस्कळीत
-
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडाऱ्यात पावसाची हजेरी
भंडारा –
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे
रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस आला होता, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती
अखेर आज सकाळ पासून पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे
तर शेतकऱ्यांची धान पिके वाळत चालली असताना या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळेल हे मात्र निश्चित
-
नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या वॉर्डात महिलेची जमिनीवर प्रसूती, महिलेने दिला मृत बाळाला जन्म
नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या वॉर्डात महिलेची जमिनीवर प्रसूती
महिलेने दिला मृत बाळाला जन्म
डॉक्टर आणि परिचारिकांना विनंती करुनही भरती न केल्यानं रुग्णालयाच्या प्रतीक्षालयातच मूल बाहेर आल्याचा नातेवाईकांचा आरोप
त्यातूनच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी केली पोलिसांत तक्रार
तर नातेवाईकांनी वॉर्डात घुसून व्हिडिओ तयार केले, कामकाजात हस्तक्षेप केला, महिला रुग्णालयात उशिरा आली, बाळ अपुऱ्या दिवसाचे होते, त्यामुळं बाळाचा मृत्यू झाल्याचा रुग्णालय प्रशासनाचा आरोप
रुग्णालय प्रशासनानं दिली महिलेच्या नातेवाईकांविरुद्ध पोलिसात तक्रार
-
नाशिकच्या मानाच्या गणपतींच्या ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था
नाशिकच्या मानाच्या गणपतींच्या ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था
गर्दी टाळण्यासाठी महापालिका करणार मनाच्या गणपती दर्शनाची ऑनलाईन व्यवस्था
गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी
गर्दी न करण्याचे महापालिकेचे नाशिककरांना आवाहन
मनाच्या गणपतीचं दर्शन महापालिकेच्या संकेतस्थळावर होणार
शहरात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्शवभूमीवर निर्णय
-
सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग सुरुच
सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग सुरुच
24 तासात ग्रामीण भागात 153 रुग्ण तर पाच जणांचा कोरोनाने मृत्यू
ग्रामीण भागात 13 हजार 234 चाचण्यातून 153 जणांचा कोरोना पॉजिटीव्ह
तर शहरात 24 तासात पाच जणांचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह
-
नागपुरातील गंगाजमूना रेडलाईट परिसरातील अवैध बांधकाम पाडा, आमदार कृष्णा खोपडे यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
– नागपुरातील गंगाजमूना रेडलाईट परिसरातील अवैध बांधकाम पाडा
– भाजप नेते आमदार कृष्णा खोपडे यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
– ‘गंगाजमुना परिसरात अवैध दंधे, अल्पवयीन मुलीचं शोषण’
– ‘गंगाजमुना परिसरातल्या खोल्यांमध्ये अनेक तळमजले’
– आ. कृष्णा खोपडे यांची पोलीस आयुक्तांना माहिती
-
पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नाव द्या, संभाजी ब्रिगेडची माहिती
पुणे
पुण्यातील मेट्रो स्थानकांना महापुरुषांची नाव द्या
संभाजी ब्रिगेडने केली महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
महापुरूषांचा वैचारिक आणि ऐतिहासिक वारसा आपण जपलं पाहिजे. त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी, आपण त्यांचे वैचारिक ठेवा जपन्याचं काम केलं पाहिजे.
भारतातील 13 महापुरूषांची मेट्रो स्टेशनला नावं देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी केली संभाजी ब्रिगेडने मागणी
-
राज्यातील महापालिकांना उचलावा लागेल संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा खर्च
सोलापूर – राज्यातील महापालिकांना उचलावा लागेल संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा खर्च
अगोदरच आर्थिक संकटांना तोंड देणाऱ्या महापालिकांना फुटला घाम
मार्च 2019 पासून सुरु आहे कोरोनाचा संसर्ग
बाधित व्यक्ती शोधणे, त्यांच्यावर उपचार करणे, अलगीकरण करणे ,उपचार करणे अशा अनेक गोष्टीसाठी महापालिकेने लावली होती आपली संपूर्ण यंत्रणा
जिल्हा प्रशासनामार्फत महापालिकेला दिला जात होता निधी
आता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी महापालिकांना स्वतःच्या निधीतूनच करावा लागणार खर्च
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉक्टर रामास्वामी एन.यांचे आदेश
-
पुण्यात विनामास्क फिरणाऱ्या विरोधात रेकॉर्डब्रेक कारवाई, आत्तापर्यंत तब्बल 45 कोटी रुपये केले वसूल
पुणे –
पुण्यात विनामास्क फिरणाऱ्या विरोधात रेकॉर्डब्रेक कारवाई
आत्तापर्यंत तब्बल 45 कोटी रुपये केले वसूल
पुणे, पिपरी आणि पुणे ग्रामीण भागातील पावणे दहा लाख नागरिकांवर दंडात्मक कारवाई
रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिक फिरतायत मास्क
यात पुणे शहरातील सर्वाधिक पाच लाख नागरिकांकडून 25 लाख दंड केला वसूल..
-
नांदेडमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर कायम, विष्णुपुरी बंधाऱ्याचे नऊ दरवाजे उघडले
नांदेड
रात्रीपासून पावसाचा जोर कायम
विष्णुपुरी बंधाऱ्याचे नऊ दरवाजे उघडले
पावसाचा जोर कायम राहिल्यास निर्माण होणार पुरसदृश्य स्थिती
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
-
पुण्यातील जिल्हा न्यायालयातील कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू
पुणे :
कोरोना रुग्णसंख्या घटल्यानंतर पुणे जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले
तरीही जिल्हा न्यायालयातील कामकाज एकाच शिफ्टमध्ये सुरू होते
आजपासून मात्र जिल्हा न्यायालयातील कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे
-
‘नागपूर जिल्ह्यातील गणपती उत्सव साध्या पद्धतीनं साजरा करा’, प्रशासनाचे सुचनांचे परिपत्रक जारी
– ‘नागपूर जिल्ह्यातील गणपती उत्सव साध्या पद्धतीनं साजरा करा’
– ‘सार्वजनिक गणपती चार फुटाचा तप घरगुती गणपती २ फुटाचा असावा’
– गणपती उत्सवासाठी मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक जारी
– सार्वजनिक गणेशोत्सवाला महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी अनिवार्य
– गणेशोत्सवासाठी सुसंगत आणि मर्यादीत मंडप उभारण्याच्या सूचना
-
गोंदिया जिल्ह्यात पावसाचे आगमन, बळीराजा सुखावला
गोंदिया –
दीर्घ विश्रांती नंतर गोंदिया जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे
शहरासह ग्रामीण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार एक दोन तास बॅटिंग सुरू असून काही तालुक्यात संततधार पाऊस येत आहे
संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे
शहर परिसरातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
-
नागपुरातील मार्बत उत्सवाची 141 वर्षांची परंपरा यंदाही होणार खंडीत
– नागपुरातील मार्बत उत्सवाची 141 वर्षांची परंपरा यंदाही होणार खंडीत
– कोरोनामुळे यंदा नागपुरातील मार्बत उत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा
– कोरोनाच्या निर्बंधांमुळे यंदा मार्बत जल्लोष, मिरवणूक नाही
– नागपुरात काळ्या आणि पिवळ्या मार्बत उत्सवाला दरवर्षी हजारोंची असते गर्दी
– नागपुरातील प्रसिद्ध पिवळी मार्बत उत्सवाला 138 वर्षांची तर काळी मार्बत उत्सवाची 141 वर्षांची परंपरा आहे
– कोरोनामुळे यंदाही मार्बत उत्सवावर निर्बंध, चार ते पाच लोक एकाच ठिकाणी करणार पुजा
-
चिपळूण परिसरात गेल्या 16 तासापासून मुसधार पाऊस सुरू
चिपळूण – चिपळूण परिसरात गेल्या 16 तासापासून मुसधार पाऊस सुरू
मुसळधार पावसामुळे चिपळूणकारांनी रात्र काढली जागून
शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात भरले पाणी
वाशिटी नदी आणि शिवनदी शेजारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
-
दापोलीला मुसळधार पावसाने झोडले
रत्नागिरी – दापोलीला मुसळधार पावसाने झोडले
दापोली बाजारपेठ, केळस्कर नाका, तहसील कार्यालय याठिकाणी रात्री भरलं होत पाणी
दापोलीकरांनी रात्र काढली जागून, रात्रभर मुसळधार पावसाचं थैयमांन
दापोलीच्या इतिहात पहिल्यांदाच एवढं पाणी भरलं
Published On - Sep 07,2021 6:42 AM