Maharashtra News Live Update : उद्या शिवसेना बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार-संजय राऊत
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज सोमवार 14फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. आज उत्तर प्रदेशातील 55 जागांसाठी तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान होत आहे. उत्तराखंड, गोवा, उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेस प्रमुख पक्ष आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला समाजवादी पार्टीचं आव्हान आहे. काँग्रेसनं आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. भाजपकडून देखील प्रतिआव्हान देण्यात आलं आहे. त्यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
पुरी गांधीधाम एक्सप्रेस मधून 2 लाखाचा गांजा जप्त
भुसावळ रेल्वे स्थानकावर पुरी गांधीधाम एक्सप्रेस मधून 2 लाखाचा गांजा जप्त
अल्पवयीन मुला मुलीकडून 2 लाखांच्या गांजाची तस्करी केली जात असल्याचा प्रकार उघड
भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी दोन अल्पवयीन मुला मुलींना घेतले ताब्यात तर एक आरोपी पसार
-
सोलापूर महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेविरोधात आल्या एकूण 108 सूचना आणि हरकती
– प्रभाग रचनेवर घेतलेल्या हरकतीवर 25 फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी – 1 फेब्रुवारीला जाहीर केली होता प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा – हरकरती घेण्याची मुदत आज संपली असून 25 फेब्रुवारीला होणार सुनावणी – राज्य निवडणूक आयोगाला देणार याबाबतची माहिती – राज्य निवडणूक आयोगाकडून नेमलेल्या चार जणांची समिती घेणार सुनावणी – सुनावणी समिती 2 मार्चला देणार हरकतींचा निकाल – सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
-
-
नाना पटोले यांच्या विरोधात समता नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
भाजप आमदार अतुल भातळकर यांनी कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात समता नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सागर बंगल्यावर आंदोलन करण्यात आले यामध्ये लहान मुलांचा वापर करण्यात आला होता-भातखळकर
नाना पटोले हे जनतेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अफवा पसरत आहेत
नाना पटोले यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा अर्थ संकल्प मध्ये प्रश्न उचलणार
-
किरीट सोमय्या लाईव्ह
दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे केंद्राचे आदेश
जिल्हाधिकारी, अधीक्षकांकडे सोमय्यांची तक्रार
अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे-सोमय्या
रिसॉर्ट कुणी बांधलं त्याला शोधून काढा
किरीट सोमय्या रत्नागिरी दौऱ्यावर
अनिल परबांचं रिसॉर्ट तोडलेच पाहिजे
-
संजय राऊत Live
उद्या शिवसेना बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार
संजय राऊत उद्या पत्रकार परिषद घेणार
महाराष्ट्र खोटारडेपणाविरोधात लढेल
सोमय्यांचे आरोप, ईडीच्या कारवाईवर पत्रकार परिषद
उद्याची पत्रकार परिषद विरोधकांनी ऐकावी
केंद्रीय तपास यंत्रणांनीही ऐकावी
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहोत हे दाखवून देऊ.
कुणीही उठावं आणि महाराष्ट्राची बदनामी करावी हे चालणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसारच ही पत्रकार परिषद होईल. ही पोलखोल नाही, खोलायला त्यांच्याकडे आहे काय? ते आतून पोकळ आहेत.
-
-
आदित्य ठाकरे Live
औष्णिक प्रकल्पातील राख टाकणं बंद करा
झाडं वाचली पाहिजेत ही माझी भूमिका-आदित्य ठाकरे
कुठेही वादाची भूमिका घेऊन नका
प्रत्येक ठिकाणी राजकारण नको
-
गडचिरोलीत काँग्रेसचा बोलबाला
गडचिरोली नगरपंचायत निवडणुकीत चामोर्शी, एटापल्ली, धानोरा या तीन नगरपंचायत काँग्रेसची एकहाती सत्ता
अपक्ष नगरसेवकांना घेऊन सत्ता स्थापन केली,
जिल्ह्यातील नऊ नगरपंचायत पैकी 3 नगरपंचायती काँग्रेसच्या ताब्यात,
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवारयांनी केला करेक्ट कार्यक्रम
यावेळी भाजपला अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला
-
नाशिक -किराणा दुकानात वाईन विक्री निर्णय विरोधात भाजप आक्रमक
रस्त्यावर वाईन ओतून केला निर्णयाचा निषेध
आंदोलन दरम्यान ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
काही महिलांनी तर सांडलेल्या वाईन वर नाचत केला निषेध
जिल्हाधिकारी कार्यलय समोर महिला भाजपच्या वतीने आंदोलन
आमदर सीमा हिरेंसह भाजप महिला पदाधिकारी उपस्थित
-
आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक महिला महापालिकेवर धडकल्या
जळगाव हातात लाटणे घेऊन आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक महिला महापालिकेवर धडकल्या
मानधनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेवर मोर्चा
जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध
-
कुरखेडा नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीवरुन शिवसेना भाजपमध्ये राडा
गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा नगरपंचायत निवडणुकीपूर्वीच भाजप सेना कार्यकर्त्यामध्ये राडा
अखेर पोलीसाच्या हस्तक्षेपानंतर नगरसेवक नगरपंचायतीत गेले.
या नगरपंचायतीत शिवसेनेच्या अनिता बोरकर नगराध्यक्षपदी विजयी झाल्या
भाजपच्या नगरसेविकेची बंडखोरी अखेर कुरखेड्यात शिवसेनेची सत्ता..
भाजपच्या नगरसेविका जयश्री रासकर यांनी बंडखोरी करत शिवसेना काँग्रेस युतीची साथ धरल्याने नगरपंचायतीत प्रवेशाच्या वेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये राडा झाला.
-
अकोल्यात जिनिंग प्रेसला भीषण आग, कोट्यवधींच्या नुकसानाचा अंदाज
अकोला अकोट मधील कुटासा फाटा येथील जिनिंग प्रेसिंग ला लागली भीषण आग…
घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलीस घटनास्थळी दाखल अकोला दर्यापूर अकोट येथील अग्निशमन दल घटना स्थळी रवाना
पळसो बडे येथील रहिवासी अशोक गावंडे यांच्या मालकीचे जिनिंग असून कोटी रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज
आग लागल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट अकोट अग्निशमन दलाचे आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू…
-
कुडाळमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये राडा, कार्यकर्ते भिडले
शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले आहेत
कुडाळ नगरपंचायतीजवळ राडा झाल्याचं समोर आलं आहे
वैभव नाईक गाडीतून शिवसेना नगरसेवकांना आणलं यावर भाजपनं आक्षेप घेतला
यानंतर जोरदार राडा झाला
सध्या कुडाळमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
-
आर्यन खान ड्रग्स प्रकरण, समीर वानखेडे यांची 23 तास चौकशी
आर्यन खान ड्रग्स प्रकरण, समीर वानखेडे यांची 23 तास चौकशी
येत्या मार्च महिन्यात समीर वानखेडे यांच्याबाबतचा अंतिम अहवाल तयार केला जाणार
एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे वानखेडे यांनी सादर केली महत्त्वाची कागदपत्रे
-
मोदींजीनी माफी मागण्याची गरज नाही, काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे : देवेंद्र फडणवीस
आपण असताना कोणाची हिम्मत नाही इथं येऊन आंदोलन करतील
मोदींजीनी माफी मागण्याची गरज नाही
काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे
नाना पटोले यांच्या सारख्यांनी आंदोलन करण्याची नौंटकी करु नये
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा सुरु आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित आहेत.
-
मुंबईकरांच्या अडचणींचा विचार करुन आंदोलन थांबवतोय : नाना पटोले
नाना पटोले यांनी आज होणार आंदोलन थांबवत असल्याचं सांगितलं आहे
नरेंद्र मोदी जोपर्यंत महाराष्ट्राची माफी मागत नाहीत, आसामचे मुख्यमंत्री माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहील
मुंबईकरांच्या अडचणींचा विचार करुन आंदोलन थांबवत आहोत
देश विकून केंद्र सरकार कामकाज चालवत आहे
महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांच्या पाठिशी उभ्या राहाणाऱ्याचा निषेध
भाजपनी भाडेकरु लोक रस्त्यावर आणली
भाजप महाराष्ट्र द्रोही आहे हे स्पष्ट झालं
आजचं आंदोलन मागं घेतो पण खासदारांच्या घराबाहेर आंदोलन सुरु राहणार
-
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं दिल्लीत महत्त्व वाढवावं यासाठी आंदोलन : राम कदम
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं दिल्लीत महत्त्व वाढवावं यासाठी आंदोलन
सरकारनं वसुली बंद करावी, बदल्यातील कमिशनखोरी बंद करावी
पोलिसांबद्दल नितांत आदर, पोलीस बळाचा वापर दुर्दैवी
भाजपच्या कार्यकर्त्यांना अडवता येणार नाही
कायदा, सुव्यवस्था, संविधान पाळतो, असं राम कदम म्हणाले
-
लोकसभेत महाराष्ट्राचा अपमान करायला आम्ही सांगितलं नाही : नाना पटोले
महाराष्ट्राचा अपमान आहे, केंद्र सरकारनं, नरेंद्र मोदींनी अपमान केला त्यामुळं महाराष्ट्राची जनता आंदोलन करुन निषेध करत आहोत
आमचे एक एक लोक जात आहेत, पोलिसांचा पहारा असल्यानं एकत्र जात नाही
भाई जगताप तिथं जवळपास पोहोचले आहेत
नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीचा संबंध नाही
लोकसभेत महाराष्ट्राचा अपमान करायला आम्ही सांगितलं नाही
-
काँग्रेसचे आंदोलन हे फक्त मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने माफी मागावी यासाठी : विजय वडेट्टीवार
काँग्रेसचे आंदोलन हे फक्त मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने माफी मागावी या साठी आहे,
काँग्रेसच्या आंदोलनावर मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया,
आंदोलन करणं हा आमचा लोकतांत्रिक अधिकार आहे, मात्र भाजप चे नेते आमच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करत आहे,
या मध्ये भाजपने गुंडगिरी दाखवू नये
-
काँग्रेसकडून टाळ मृदुंगाच्या गजरात आंदोलनाला सुरुवात
आक्रमकता दाखवून आम्हाला भांडायचं नाही
महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी
नाना पटोले यांच्या निवासस्थानाबाहेर वारकरी उपस्थित
पोलिसांनी नाना पटोले यांना निवासस्थानाबाहेर अडवलं
-
महाराष्ट्रद्रोही भाजपचा निषेध असो, अतुल लोंढे यांच्या पोलिसांच्या ताब्यात असताना घोषणा
महाराष्ट्रद्रोही भाजपचा निषेध असो, अतुल लोंढे यांच्या पोलिसांच्या ताब्यात असताना घोषणा
-
बाबुलनाथ परिसरात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
बाबुलनाथ परिसरात भाजप कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं आहे. भाजप कार्यकर्त्यांना अडवल्यानं त्यांनी घोषणाबाजी सुरु केलीय. महाविकास आघाडी सरकार, नाना पटोले यांच्या विरोधात यांची घोषणाबाजी केली. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे.
-
जिथं अडवतील तिथं आंदोलन करणार : नाना पटोले
पोलीस जिथं अडवतील त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करु
बहिरं आणि आंधळ सरकार दिल्लीत बसलेलं आहे त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवणार असल्याचं नाना पटोले म्हणाले
-
भाजपचा खरा चेहरा यानिमित्तानं समोर येतोय : नाना पटोले
आमचं तीन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे
नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला त्याबद्दल माफी मागावी म्हणून आंदोलन
भाजपचे नेते काल धमकावत होते, आसामचे मुख्यमंत्री एका आईचा अपमान करत होते
नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचं समर्थन भाजपकडून करण्यात येतंय
त्यामुळं भाजपचा चेहरा समोर येत आहे
आम्ही कुणाच्या घरात घुसलेलो नाही, घराबाहेर बसून आंदोलन केलेलं आहे
भाजपचा खरा चेहरा यानिमित्तानं समोर येत आहे
अण्णा हजारे यांच्याबद्दल काही बोलणार नाही
प्रसाद लाड यांच्याबद्दल काही बोलणार नाही
आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत,
भाजपच्या 23 खासदारांच्या घराबाहेर जाणार आहोत, असं नाना पटोले म्हणाले
-
आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांना फडणवीसांच्या घराकडे जाण्यास परवानगी
भाजप नेते आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांना देवेंद्र फडणवीस यांच्या घराकडे सोडण्यात आलं आहे.
-
आम्ही जनतेची सेवा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत होते : अतुल लोंढे
आम्ही अहिंसेच्या मार्गानं तिथे पोहोचलो
कोणत्याही प्रकरारचे दगड उचलले नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी मोराला दाणा खाऊ घालत होते तेव्हा महाराष्ट्रात जनतेची सेवा करत होतो
फक्त निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा अपमान
निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा अपमान केल जातोय याचं उत्तर दिलं जाण्याची गरज होती
-
महाराष्ट्रद्रोही भाजपचा निषेध असो, अतुल लोंढे यांच्या पोलिसांच्या ताब्यात असताना घोषणा
महाराष्ट्रद्रोही भाजपचा निषेध असो, अशा घोषणा अतुल लोंढे यांनी दिल्या. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केलाय, असं अतुल लोंढे म्हणाले.
-
आम्ही आंदोलनात हिसेंचा मार्ग स्वीकारणार नाही : नाना पटोले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या व्यक्तव्यानं लोकांच्या मनात नाराजी
लोकशाही मार्गानं आंदोलन करणार आहोत
आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करायला जाणार आहोतच
आम्ही आंदोलनात हिसेंचा मार्ग स्वीकारणार नाही
-
आम्ही काय बोलतोय ते संपूर्ण देश पाहिल : संजय राऊत
उद्या 4 वाजता शिवसेना भवन, महाराष्ट्राचं ऊर्जा केंद्र जिथ बाळासाहेब ठाकरे बसायचे तिथं पत्रकार परिषद
आमची संपूर्ण पार्टी असेल, मंत्री असणार, नेते असणार, खासदार असणार
संपूर्ण देश पाहिल आम्ही काय बोलतोय
भाजपचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील
अनिल देशमुख बाहेर असतील
महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्त्वात सरकार असेल
-
नांदेड जिल्हा परिषदेत 10 गट वाढणार
नांदेड जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी कच्चा आराखडा निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आलाय, त्यात नांदेड जिल्ह्यात 10 गटांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या 73 वरून 83 होणार आहे. त्याचबरोबर पंचायत समितीच्या 20 गणात वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा आराखडा सादर झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग गटरचनेच्या प्रारूप आराखड्याचा कार्यक्रम घोषित करणार आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची लगबग पहायला मिळणार आहे.
-
आशिष शेलार आणि प्रसाद लाड एकाच गाडीतून देवेंद्र फडणवीसांच्या घराकडे रवाना
काँग्रेस आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड आणि आशिष शेलार हे फडणवीस यांचं निवासस्थान सागर कडे निघाले आहेत. भाजपचे दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास करत आहेत.
-
Saharanpur Voting Percentage Updates : शहरानपूरमध्ये 9 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान
Saharanpur Voting Percentage Updates : उत्तर प्रदेशमधील शहरानपूरमध्ये 9 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे.
-
नाना पटोलेंविरोधात घोषणाबाजी करणारे भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
नाना पटोलेंविरोधात घोषणाबाजी करणारे भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पोलिसांनी या परिसरातील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जाणारे रस्ते बंद, मोठा पोलीस बंदोबस्त
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रसाद लाड हे सायनच्या कार्यालयातून निघाले आहेत.
-
आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू देणार नाही : मंगलप्रभात लोढा
आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू देणार नाही : मंगलप्रभात लोढा
आम्ही कायद्याच पालन करणार
आमचे कार्यकर्ते सागर निवासस्थानी येऊन बसतील
-
हल्ल्याची भाषा करालं , तर आम्हीही तसचं उत्तर देऊ : प्रसाद लाड
हल्ल्याची भाषा करालं , तर आम्हीही तसचं उत्तर देऊ आमच्या नेत्याबद्दल बोलला अजून आक्रमक उत्तर मिळेल अण्णा म्हणतात मला जगण्याची इच्छा नाही काँग्रेसनं याचं उत्तर द्यावं गांधीजी बद्द्ल आम्हाला आदर आहे काही साधे नगरसेवक होऊ शकतं नाही हत्ती चालत राहतो कुत्रे भुंकत राहतात
-
नागपूर महापालिका प्रभाग प्रारूप संदर्भात आक्षेप नोंदविण्याचा आज शेवटचा दिवस
नागपूर महापालिका प्रभाग प्रारूप संदर्भात आक्षेप नोंदविण्याचा आज शेवटचा दिवस
शनिवार पर्यंत 73 नगर सेवक व नागरिकांनी सीमा प्रारूप संदर्भात तक्रारी आणि सूचना नोंदविल्या
बहुतेक तक्रारी प्रभाग सीमा संदर्भात असल्याची माहिती
आज शेवटच्या दिवशी किती तक्रारी येतात आणि त्यावर काय सुधारणा होणार याकडे लागलं आहे लक्ष
-
भारताकडून PSLV-C52 चे अंतराळात यशस्वी उड्डाण
भारताकडून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण
PSLV-C52 चे अंतराळात यशस्वी उड्डाण
श्रीहरीकोटा मधील सतीश धवन अंतराळ केंद्रतुन यशस्वी उड्डाण
श्रीहरिकोटा मधून आज सकाळी 529 किमी उंचीच्या सूर्य-समकालिक ध्रुवीय कक्षेत उपग्रहाचे उड्डाण
-
नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रचार करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज जाहीर सभा
उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा
कानपूर जिल्ह्यात दुपारी बारा वाजता मोदींची जाहीर प्रचार सभा
नरेंद्र मोदी पंजाबमध्येही करणार प्रचार
जालंदर मध्ये दुपारी साडेतीन वाजता मोदींची जाहीर प्रचार सभा
Published On - Feb 14,2022 6:15 AM