Maharashtra News Live Update : लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक्यांच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज गुरूवार 24 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलीय. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी दोन्ही बाजू कोर्टाने ऐकून घेतल्यानंतर नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर राज्यातील वातावरण पुन्हा गरम झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते आज मंत्रालय परिसरातील महात्मा गांधींच्या (mahatma gandhi) पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करणार आहे. मलिकांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते आजपासून राज्यभरात आंदोलन करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजपची लढाई आता रस्त्यावर पाहायला मिळणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक्यांच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना
लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक्या आणि हल्ल्यांचा विचार करता राज्य सरकारकडून नव्या विशेष पथकाची स्थापना करण्यात येत आहे. मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची या पथकाच्या प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
-
भंडारा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार, IMD चा अंदाज
हवामान विभागाने जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हा अंदाज खरा ठरला असून भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
-
-
इथं सगळी प्रेतं वाहतं होती हा इतिहास आम्ही विसरणार नाही: आदित्य ठाकरे
जे स्वप्न दाखवले ते पुर्ण झाली का ?.मग ते कसलं सरकार,?
बदला आपल्याला घ्यायचा आहे
पाच वर्षातला यूपीतला अंधार दूर झालाय का ?.
येणाऱ्या निवडणूक ही महिला सन्मानासाठी आहे उत्तर प्रदेशासाठी आहे..
ज्या जिल्ह्यात जातोय तिथं सांगतायेत महिला सुरक्षित नाही
मुख्यमंत्री आदित्यनाथ सांगतायेत ते खरं आहे की खोटं?
विकास झाला असं सांगतायेत, सत्याच्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे,
याच ठिकाणी विजयी सभा होईल,
आम्ही ही भगवाधारी आहोत
श्नीरामाचा आशिर्वाद घेऊन चालतोय,
कोरोना काळात मुख्यमंत्री भारत सरकारला फोन करत होते,आम्ही सरकार ला विनंती करत होतो मात्र सरकार मानायला तयार नव्हती,
उत्तर भारतीय लोकांना घरी पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो,
तेव्हा नागरिक चालत चालले होते,
तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगितलं 500 कँम्पस लावले,
सारा देश.आपला आहे महाराष्ट्र आपल्यासोबत आहे
महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना आपल्यासोबत होती
इथं सगळी प्रेतं वाहतं होती हा इतिहास आम्ही विसरणार नाही
हुकुमशाहीचं सरकार घालवायचं आहे
-
उत्तर प्रदेशात बदलाची लाट आहे परिवर्तन होईल : आदित्य ठाकरे
मी आधी माफी मागतो
यायला.उशीर झाला…आणि उत्तर प्रदेशात यायलाही उशीर झाला नाहीतर हे झालं नसतं
उत्तर प्रदेशात आम्ही फिरतोय आमचे उमेदवार आशिर्वाद घेऊन पुढे घेऊन जातायेत
उत्तर प्रदेशात बदलाची लाट आहे परिवर्तन होईल,
पाच वर्षांपूर्वी हुकुमत वाली सरकार आली
-
वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु
– मराठा उपसमितीची बैठक सुरु
– मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक
– अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील यांच्या सह समितीचे सदस्य बैठकीला उपस्थित
– वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु
-
-
आम्हाला 27 महिने त्रास दिला, आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाहीत : चंद्रकांत पाटील
1993 च्या समितीची अहवाल का झाकलाय?
तो अहवाल जाहीर झाला तर भल्या भल्यांना जेलमध्ये जावं लागेल
नवाब मलिक यांची चिठ्ठी उद्धव ठाकरे यांनी उचलली
कोण कुणाला शह काटशह देतंय
पुन्हा उद्धव ठाकरे यांना रडारवर आणण्याचं काम सुरु
संजय राऊत हे शरद पवारांशी एकनिष्ठ
उद्धव ठाकरेंचं आसन डळमळीत आणण्याचं काम सुरु
हे सरकार टिकणार नाही,
सरकार नाही म्हणून आमचं दमन करताय
राज्य तुमच्याकडे आहे आणि गृहमंत्री निदर्शनाला
-
रवी राणा यांना निषेध रॅलीतील भाषणानंतर चक्कर
जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आमदार रवी राणा याचे मौन.
राजपेठ उड्डाणपुलावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी देनार…
छत्री तलाव वरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी 50 लाख रुपये निधी देणार…..
टक पूर्व जामीनासाठी अर्ज करनार आ रवी राणा…..
रवी राणा यांची निषेध रॅली संपली…..
भाषण संपल्यानंतर रवी राणा यांना चक्कर आली
-
जामीन मिळेपर्यंत कायदेशीर लढाई लढणार : छगन भुजबळ
मुनिरा हिची जमीन आहे. त्यावर अतिक्रमण आहे. नवाब मलिक यांचं छोट्या जागेत गोडाऊन आहे. सलीम पटेल हा स्थानिक रहिवासी आहे. या प्रकरणात दाऊद अँगल येत नाही. स्थानिक पातळीवरील हे प्रकरण आहे. दाऊदचं नाव जोडून विधानसभा सदस्य निवडून आले आहेत ते दहशतवाद्यांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. केवळ मुस्लीम आहे म्हणून दाऊदचा संबंध लावताय का? हे सर्व प्रकरण कोर्टात आहे. जामीन मिळेपर्यंत कायदेशीर लढाया लढाव्या लागतात.
-
नवाब मलिक यांच्यावर फक्त आरोप, सत्यमेव जयते, कायद्यानं लढणार : सईदा खान
मी सकाळी भावाला भेटण्यासाठी आले. मला चौथ्या मजल्यावर बोलावण्यात आलं. स्टेटमेंट रेकॉर्ड करणं सुरु असल्यानं पुन्हा बोलावण्यात आलं आहे. कोर्टाची ऑर्डर फक्त जेवण देण्यात येत आहे. त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. काल कोर्टातचं भेटली होती. आम्ही लढू आणि जिंकू हा विश्वास आहे. नवाब मलिक यांची सकाळी भेट झाली. त्यावेळी सकारात्मक राहा, आपण लढू असं सईदा खान यांनी सांगितलं आहे. आरोप कुणावर देखील करु शकता. ही कायद्याची लढाई आहे. कायद्यानं लढू, असं सईदा खान म्हणाल्या. सत्याची लढाई सुरु होते. सत्यमेव जयते, असं म्हणाले. देवेंद्र फडणवीस आरोप करत आहेत, त्यांनी पुरावे दिले आहेत.
-
जळगावात काळ्या साड्या परिधान करुन राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून निषेध
जळगावात काळ्या साड्या परिधान करत राष्ट्रवादी महिला आघाडीने केला नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध
अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना इडीकडून अटक केल्याच्या निषेधार्थ आज जळगावात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे काळ््या साड्या परिधान करत अनोख्या पध्दतीने केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
-
आदित्य ठाकरेंची युपीत भाजपवरती टिका
आताचे मुख्यमंत्री आहे, जे उद्याच्या निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री होतील, ते सांगतात उद्योग वाढले, पण महिला अत्याचार वाढले की, सुरक्षितता वाढली, सामाजिक अत्याचार वाढले की सुरक्षा वाढली, मला यात काहीही दिसत नाही. हेच बदलायचं असेल तर यूपीत परिवर्तन बदललं हवं आहे. परिवर्तनाचं प्रतीक कोण असणार, शिवसेनेचे प्रतिनिधी असणार. सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे, प्रेमाची राजनिती हवी आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या यूपीच्या लोकांची जबाबदारी आमची आहे. कोरोनाच्या संकटात 23 मार्चला जनता कर्फ्यू लागला होता. तेव्हा यूपीतल्या नागरिकांना मुंबईतून परत यायचं होतं, गर्दी झाली होती, ट्रेन कधी जाणार लोक विचारत होते, तेव्हा आम्ही, मुख्यमंत्री भारत सरकारला फोन करत होते, ट्रेन सोडण्याची विनंती करत होते,तेव्हाही भारत सरकारने ऐकलं नाही, 1 मे पर्यंत ट्रेन बंद ठेवल्या, लाच वाटण्यासारखं आहे हे सगळं. लोक रस्त्यावर चालत यूपीत परतत होते, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अपिल केलं, तुम्ही जाऊ नका, इथेच थांबा, आम्ही काळजी घेऊ. मुंबईत 500 हून अधिक कॅम्प लावले, योगाचे कॅम्पल लावले, त्यानंतरही ट्रेन सुरु झाली, तेव्हा तिकीट कापण्यासाठीही भारत सरकारने पैसे मागितले, तेव्हा महाराष्ट्र सरकार पुढं आलं, आणि मजूरांच्या ट्रेनचे पैसे दिले. आम्ही काही केलं नाही, माणुसकीचं नातं पाळलं,
-
परिवर्तन लाट यूपी मध्ये पण आहे, परिवर्तन होणार आहे – आदित्य ठाकरे
मी आज यूपी मध्ये आलो, पण मला इथं विजयी सभेलाही यावं लागेल, हा विश्वास
परिवर्तन लाट यूपी मध्ये पण आहे, परिवर्तन होणार आहे,
सपा, भाजप ने स्वप्न पूर्ण कर्ली नाहीत,
इथं राजाला बहुमत असत तसं इथं bjp ला मिळालं, पण स्वप्न साकार झाली नाहीत
फक्त तिरस्कार च्या गोष्टी यूपी मध्ये घडत आहेत
ही रामाची भूमी, इथं कुणीही धोक्यात नाही
-
आदित्य प्रचारासाठी आल्याने मला वाटलं मुंबईत सभा आहे – संजय राऊत
आदित्य आलेत, प्रचारासाठी मुंबई मधून आलेत, मला वाटलं सभा मुंबई मध्ये आहे
हा धनुष्य बाण जसा रामाचा आहे, तसा बाळासाहेब ठाकरे यांचाही आहे
हाच धनुष्य बाण घेऊन राजू श्रीवास्तव विधानसभेत जातील, आणि ते मंत्री पण होतील
आमच्याकडे अनेक हिंदी भाषिक आहेत
ईस्ट इंडिया कंपनी 10 मार्च नंतर दिसणार नाही – राऊत यांची bjp वर टीका
हेच वातावरण राहील तर ती कंपनी 2024 ला दिल्ली मधून पण गायब होईल
-
ठाण्यात मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचं आंदोलन
महाविकास आघाडी मधील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप ने केले जिल्हाधिकारी बाहेर आंदोलन..
जोपर्यंत महाविकास आघाडी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आंदोलन सुरू राहणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे
यावेळी भाजप कडून महा विकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..
या आदोलनात भाजप आमदार संजय केळकर ,निरंजन डावखरे सह नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते होते..
-
नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस निषेध आंदोलन
ईडीकडून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे शहादा येथे केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणा यांच्याविरोधात आंदोलन करणार आहेत दुपारी तीन वाजता
-
आरोग्य भरतीत आत्तापर्यंत वीस जणांना अटक
आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी केलं न्यायालयात चार्जशीट दाखल
तब्बल 3 हजार 800 पानांच चार्जशीट सायबर सेलने केलं दाखल
आरोग्य भरतीत आत्तापर्यंत वीस जणांना करण्यात आलीये अटक
-
मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक : यवतमाळ येथील दत्त चौकात आंदोलन
यवतमाळ : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना इडीने अटक केली. त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. यवतमाळ शहरातील दत्त चौकात आंदोलन करून संतपा व्यक्त केला. मंत्री मलिक यांचा राजीनामा घेण्यात आला नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
-
उत्तर प्रदेशातील हंडीयात अखिलेश यादवांच्या सभेला मोठी गर्दी
जाहीर सभेतून भाजपवर हल्लाबोल
कार्यकर्त्यांनी अंगावर गोंदल सपा पार्टीचं चित्र
अखिलेश यादवांना मुख्यमंत्री करणार कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
अखिलेश यादव आज चौथ्या टप्प्यातील निवडणूकसाठी प्रयागराज दौऱ्यावर
-
सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालसमोर राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
– सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालसमोर राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
– केंद्रातील भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकत्यांची निदर्शने
– आंदोलनानंतर जवळपास 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
– नवाब मालिकानी भाजपच्या अनेकांची पोलखोल केल्याने त्यांच्या विरोधात सुड उगवण्याचे काम सुरु असल्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
-
अमरावतीच्या इर्विन चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त…..
आमदार रवी राणा करणार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन…..
इर्विन चौक ते राजपेठ मधील कार्यालया पर्यत काढणार रॅली…
रवी राणांच्या अटके संदर्भात पोलिसांचे मौन….
15 दिवसानंतर आ रवी राणा अमरावती मध्ये येणार….
-
नाशिकमध्ये भाजपचे नवाब मलिकांविरोधात आंदोलन
भाजपचे नवाब मलिकांविरोधात आंदोलन
भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी
नवाब मलिक यांच्या पोस्टरला मारल्या चपला
नवाब मलिक,उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबा
-
अनिल परब यांची फाईल तयार, लवकरच त्यांना ईडी अटक करेल -नवनीत राणा
– अनिल परब यांची फाईल तयार, लवकरच त्यांना ईडी अटक करेल
– राज्य सरकार कोसळणार, राष्ट्रपती शासन लागणार
– षड्यंत्र तरुण माझ्यावर गुन्हा दाखल केलाय
-
महिला पोलीस अधिकारी आणि भाजप नेते अनिल बोंडें यांच्यात बाचाबाची…
महिला पोलीस अधिकारी आणि भाजप नेते अनिल बोंडें यांच्यात बाचाबाची….
आंदोलकाना ताब्यात घेण्यावरून झाली पोलीस आणि बोंडें यांच्यात बाचाबाची…
नवाब मलिक यांच्या राजीनाम्या वरून सुरू होते आंदोलन..
पोलीस की दादागिरी नही चलेगी,भाजपच्या घोषणा
-
मी अमरावतीत नसतानाही पालकमंत्री यांनी कट रचून माझ्या विरोधत षडयंत्र केले
मी अमरावतीत नसतानाही पालकमंत्री यांनी कट रचून माझ्या विरोधत षडयंत्र केले…
माझ्या विरोधात 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले… हे सर्व मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या दबावात झाले…
जर महविकास आघाडी खोटे गुन्हा दाखल करून आमदाराला फसवत असेल तर सामान्य जनतेचे काय… मविआच्या नेत्यांना याचा जबाब द्यावा लागेल…
या सरकारचे अनेक मंत्री ईडीच्या रडारवर आहे…
मी दिल्लीत असताना माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल करतात ही माझी फसवणूक आहे… आज मी दिल्लीतील न्यायालयातून ट्रान्झिट बेल घेऊन राज्यात आलो आहे, खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर मानहानी चा दावा दाखल करणार…
अमरावतीच्या पालकमंत्री यांचा 1200 कोटींचा घोटाळा उघडकीस येईल, ईडी त्याचा तपास करत आहे…
सीएम आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब यांचे घोटाळे देखील समोर येतील…
-
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार व महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नवाब मलिक देशद्रोही असून त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करेल असा इशारा यावेळी दिला. घोषणबाजीने जिल्हाधिकारी परिसर दणणून गेला, धर्माच्या नावाखाली काही लोक त्यांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे दाऊद जितका देशद्रोही आहे त्यापेक्षा जास्त देशद्रोही मलिक आहेत.
-
उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांचा झंझावात
उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांचा झंझावात,
हंडिया इथं अखिलेश यादवांची जाहीर सभा,
युवकांमध्ये अखिलेश यादवांची क्रेझ,
अखिलेश यादव भाजपला टक्कर देणार ?
सभेला तुफान गर्दी
-
नाशिकमध्ये मलिक यांच्या समर्थनात राष्ट्रवादी रस्त्यावर
नवाब मलिक यांच्या समर्थनात राष्ट्रवादी रस्त्यावर
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यानी घोषणाबाजी करत दिल समर्थन
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी
-
जळगावात निघाला मूक मोर्चा
धरणगाव अल्पवयीन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, म्हणून जळगावात निघाला मूक मोर्चा
सर्व समाजातील महिला व पुरुषांनी एकत्रितपणे काढला मूक मोर्चा
शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला मोर्चा
-
नवाब मलिकांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला, ईडीचे अधिकारी चौकशी करण्याची शक्यता
बुधवारी सकाळी नवाब मलिकांना ईडीच्या अधिका-यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यापासून राजकीय वातावरण अधिक तापलं असल्याचं पाहायला मिळतंय. नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत न्यायालयाने ईडीची कोठडी देण्यात आली आहे, त्यामुळे मलिक ईडीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते आज मंत्रालय परिसरात धरणं आंदोलन करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचं मलिकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी भाजपने राज्यभर आंदोलनं सुरू केलं आहे. तसेच मलिकांनी केलेला गुन्हा अद्याप सिध्द झालेला असं जयंत पाटील यांनी मीडियाला सांगितलं आहे, त्यामुळे मलिक राजीनामा देणार नाहीत असं चित्र दिसतंय. कालपासून ईडीच्या कारवाईवरती अनेकांचं लक्ष असून आज ते मलिकांच्या घराची आणि गोवावाला कॅपाऊंडला भेट देणार असल्याने तिथल्या परिसरातला पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ईडी त्या जागांची चौकशी करणार असून तिथं काही पुरावे सापडतात हे पाहणार असल्याची माहिती मिळतेय
-
नवाब मलिकांना राजीनामा द्यावा लागणार – किरीट सोमय्या
महाविकास आघाडीतील घोटाळा केलेल्या सगळ्या नेत्यांना जेलमध्ये जाव लागणार आहे, चिंता करण्याचं कारण नाही.
-
माझ्या वडिलांनी चुकीचं असं काही केलेलं नाही – निलोफर खान
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना भाजपच्या विरोधात बोलल्यानंतर ज्या पध्दतीने कारवाई केली जाते ते अत्यंत चुकीचं आहे. त्याला त्यांच्या कुटुंबियांना भिती दाखवायची हे अत्यंत चुकीचं आहे. 5 वेळा नवाब मलिक मंत्री झाले आहेत, त्यामुळं त्यांनी असं काही केलं असेल असं आम्हाला वाटत नाही. माझ्या वडिलांनी चुकीचं असं काही केलेलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांची जास्त चिंता करीत नाही. ते लवकरचं बाहेर येतील
-
नागपूरमधील भाजपचं आंदोलन आक्रमक
नागपूरमधील भाजपचं आंदोलन आक्रमक
उद्धव ठाकरेंनी तात्काळ राजीनामा घ्यावा
नागपूरमधील आंदोलन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं
राजीनामा घेतल्यास आंदोलन आक्रमक होईल
-
औरंगाबादेत भाजपचे आंदोलन सुरू
औरंगाबादेत भाजपचे आंदोलन सुरू
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलन सुरू
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू
भाजपचे असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी
-
नवाब मलिकांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला
नवाब मलिकांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला
कुर्ला परिसरात असलेल्या मलिकांच्या घरात पोलिस बंदोबस्त वाढवला
ईडीचे कार्यकर्ते जमीनीची आणि घराची चौकशी करणार असल्याचं समजतंय
-
भाजपकडून असा प्रकार अनेक ठिकणी केला आहे
भाजपकडून असा प्रकार अनेक ठिकणी केला आहे
या प्रकारामुळे भारतातली सिस्टीम बदलणार इतका अंदाज अजून भाजपाला आलेला नाही
नेत्यांच्या आपसात चर्चा सुरू
महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते मंत्रालय परिसरात उपस्थित
कार्यकर्ते आक्रमक
-
नवाब मलिकांची भेट घ्यायला बहिण ईडीच्या कार्यालयात
नवाब मलिकांची भेट घ्यायला बहिण सईदा या ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत
-
माझ्या भावावर सूडबुद्धीने कारवाई होत आहे – डॉ. सईदा खान
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मालिक यांना मनी लॉन्ड्रिंग फंड प्रकरणी काल अटक केली आहे.
न्यायालयाने नवाब मलिक यांना चौकशीसाठी इडीची कोठडी दिली आहे
आज आम्ही इडी कार्यालयाकडे रवाना होतोय
माझ्या भावावर सूडबुद्धीने कारवाई होत आहे त्याच बरोबर कुठलीही प्रक्रिया पूर्ण न करता त्यांना डीडीने ताब्यात घेतलं होतं
नवाब मलिक हे लढवय्ये आहेत, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही
न्यायालयाकडून आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे
काही झालं तरी देखील आम्ही लढा देऊ, हटणार नाही, हरणार नाही… सगळ्यांना ठाऊक आहे की हे सूड बुद्धीने केलं जात आहे,
चार महिन्यापासून सगळ्यांना ठाऊक आहे की घरी इडी येणार आहे.. पुर्वकल्पना होतीच…
-
कोणत्याही मंत्र्याचं नाव दाऊदसोबत जोडलं की त्याची बदनामी करायला सुरूवात करतात – छगन भुजबळ
कोणत्याही मंत्र्याचं नाव दाऊदसोबत जोडलं की त्याची बदनामी करायला सुरूवात करतात
नवाब मलिकांनी काहीही चुकीचं केलेलं नाही
भाजप अनेक नेत्यांना धमकावतंय
दाऊदलचे संबंध मुद्दाम मलिकांसोबत जोडले जात आहेत.
बॉम्बस्फोटाचा संबंध अजिबात मलिकांसोबत नाही
-
ज्या ठिकणी केंद्राला विरोध केला जातो तिथं अशी परिस्थिती आहे – जयंत पाटील
ज्या ठिकणी केंद्राला विरोध केला जातो तिथं अशी परिस्थिती आहे
नवाब मलिकांच्यावर केलेले आरोप चुकीच आहेत.
ज्याने जागा खरेदी केली म्हणून त्यांना आतमध्ये टाकणे हे अत्यंत चुकीचं आहे.
हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे मी काहीही बोलणार नाही.
नवाब मलिक यावर सविस्तर उत्तर देतील
राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळ ते आमच्या मंत्रीमंडळात कायम राहतील
-
उद्यापासून राज्यात आंदोलनाला सुरूवात होईल – हसन मुश्रीफ
उद्यापासून महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करतील असं राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे
-
महाविकास आघाडीचे नेते धरण आंदोलनस्थळी दाखल
महाविकास आघाडीचे नेते धरण आंदोलनस्थळी दाखल
महाविकास आघाडीतील अनेक मोठे नेते धरण आंदोलनस्थळी दाखल झालं आहे. छगन भूजबळ, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार, यांच्यासोबत अनेक नेते असल्याची माहिती मिळत आहे.
-
पुण्यात भाजपाच्या आंदोलनाचा सुरूवात
पुण्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी मलिकांचा तात्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आंदोलनाला सुरूवात केली आहे.
-
महाविकास आघाडीतील नेत्याचं धरण आंदोलनाला सुूरूवात
धरणं आंदोलन करण्यासाठी अनेक महाविकास आघाडीतील अनेक नेते मंत्रालयजवळ दाखल झाले आहेत. नवाब मलिकांना अटक झाल्यामुळे आक्रमक झालेले नेते धरण आंदोलनासाठी पोहचले आहेत.
-
ज्या प्रॉपर्टीचा काल ईडीचे तपास केला त्यात डान्सबार चालत होता – मोहित कंबोज
ज्या प्रॉपर्टीचा काल ईडीचे तपास केला त्यात डान्सबार चालत होता
एक मंत्री डान्स बार चालवत होता
बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायात टाकण्याचे काम नवाब मलिक करत होते
माझ्याकडे तसे व्हिडिओ आहेत. ते मी व्हिडिओ समोर आनणार आहे
अंडरवर्ल्डशी संबंध, वेश्या व्यवसाय आणि ड्रग्सची संबंध त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा
-
महाविकास आघाडी सरकारने लोकांच्या भावना समजायला हव्यात राजकारण करू नये – मोहित कंबोज
महाविकास आघाडी सरकारने लोकांच्या भावना समजायला हव्यात राजकारण करू नये
जे राज्याचे आणि देशाचे दुष्मन आहेत असे लोक आपल्यासोबत आहेत याचा विचार महाविकास आघाडी सरकारने केला पाहिजे
3 हजार करोडची संपत्ती भ्रस्ताचार करीत, आंतरराष्ट्रीय टेरेरिस्टच्या माध्यमातून कमावली आहे
वरळी, वांद्रेतील घर असो, किंवा कुर्ला येथील शाळा असो याचा तपास एजन्सीने केला पाहिजे
भ्रस्ताचाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत राहू
-
झवेरी बाजार मधला ब्लास्ट आम्ही पाहिला
कालजी नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली
नवाबचा नकाब उतरताना देशाने पाहिले
राज्यातला आमदार, एका पक्षाचा प्रवक्ता याचे संबंध 1993 च्या ब्लास्टमधील आरोपीशी
झवेरी बाजार मधला ब्लास्ट आम्ही पाहिला
अशा लोकासोबत याचे संबंध आणि पैशाचे व्यवहार देखील झालेत
-
पैशाचाही व्यवहार आहे, खूप मोठी गुपिते बाहेर येणार आहेत – मोहित कंबोज
पैशाचाही व्यवहार आहे, खूप मोठी गुपिते बाहेर येणार आहेत
अलीकडच्या काळात नवाब मलिक यांच्या जावयाला गांज्यासह अटक करण्यात आली होती.
त्यावर अंमली पदार्थांची कारवाई त्यांच्या अकिलीस फूट ठेवली होती
देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यासाठी आम्ही काम करतो,
टाडा आरोपींची मालमत्ता बेकायदेशीररीत्या खरेदी करण्यासाठी वापरली.
ही बाब अतिशय गंभीर असून, यामध्ये राजकारण होता कामा नये.
1993 चा बॉम्बस्फोट प्रत्येकाच्या हृदयात वेदना आहे, प्रत्येक व्यक्तीने आपले कुटुंब गमावले,
महासरकारने जनतेच्या वेदना पाहाव्यात.
-
भाजपा विरोधात बोलणा-यांना ईडीची भिती दाखवले जाते – बाळासाहेब थोरात
काही लोकांना मुद्दाम त्रास देण्यात येतोय, कारण कोणीही विरोधात बोललं की त्याला अटकाव केल्याचं देशात पाहायला मिळतंय. या यंत्रणा दुसरीकडे वापरायच्या असतात. परंतु भाजपाकडून चुकीचा वापर होतोय. ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे तिथं भाजप सरकार त्रास देत असल्याचं दिसतंय – बाळासाहेब थोरात
-
भाजपची सुड बुध्दी दिसून आली – जितेंद्र आव्हाड
भाजपची सुड बुध्दी दिसून आली
एकत्रितपणाने त्यांना बदनाम केला जातोय
लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातोय
राज्याला यशवंतराव चव्हाणांचा इतिहास त्यांचं आव्हाडांकडून उदाहरण
कारवाई करा किंवा नका करू हे मी सांगणार नाही
-
भाजपाच्या आंदोलनाला सुरूवात
राज्यात अनेक ठिकाणी भाजपाने मलिकांच्या राजीनामासाठी आंदोलन सुरू केले आहे
-
नवाब मलिकांच्या फॅमिलीकडून त्यांचं समर्थन – मोहित कंबोज
नवाब मलिकांच्या फॅमिलीकडून त्यांचं समर्थन
भाजप नेत्यांचे त्यांच्या कुटुंबियावर मोठे आरोप
मलिकांचे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे काय संबंध हे सुध्दा जनतेला कळावं
मलिकांच्या मुलाने देखील कशा पध्दतीने भ्रष्टाचार केला हे देखील पाहिले आहे.
नवाब मलिकाच्या जावायाची पुन्हा चौकशी झाली पाहिजे
कोणतीही पार्टी देशापेक्षा मोठी नाही
93 बॉम्बस्फोट कोणताचं मुंबईकर विसरू शकत
त्यावेळी अनेकांचा मृत्यू झाला
महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांवर लक्ष द्याव
-
मलिकांच्या राजीनाम्यासाठी नांदेडमध्ये आंदोलन
गुरूवार दि 24-2-2022 सकाळी ठीक 11.30 वाजता, भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर जिल्हयाच्या वतिने जिल्हाअध्यक्ष श्री प्रवीण साले यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात येनार आहेत.
-
पुणे शहर भाजपच्या वतीनं मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन
अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक
पुणे शहर भाजपच्या वतीनं मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन
पुणे महापालिकेसमोर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच आंदोलन
थोड्याच वेळात होणार आंदोलनाला सुरवात
-
शिरपूर तालुक्यात 65 किलो वजनाचा गांजा जप्त
शिरपूर तालुक्यातील मांडणी पाडा शिवारातून शेतात मधून पोलिसांनी छापा टाकून 65 किलो वजनाचा गांजा ची झाडे केली जप्त एक लाख तीस हजार रुपये एवढी गांजाचे झाडांची किंमत… याप्रकरणी शिरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
-
जादूटोणा झाल्याचे सांगत येवल्यात आईसह तीन मुलींवर बलात्कार
– भोंदूबाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांवर याप्रकारणी येवला शहर पोलिसात उशिरा रात्री गुन्हा दाखल
– दोन वर्ष 4 महीने वेळोवेळी आई व मुलींवर बलात्कार
– बलात्कर करून ब्लॅकमेल करत आतापर्यंत आठ लाख रुपये उकळल्याची पीडितेची माहिती
-
नाशिक स्मार्ट सिटी कार्यालयात सिटी फोरमची बैठक
सिटी लेव्हल अॅडव्हायझरी फोरमची पाचवी विशेष बैठक ऑनलाईन पद्धतीने
बैठकीत स्मार्ट सिटीतर्फे पूर्ण झालेल्या प्रकल्पांची तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांची देण्यात आली माहिती
भागधारकांकडून सहयोगाच्या दृष्टिकोनातून स्मार्ट सिटी डव्हायझरी फोरमची तरतूद
-
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी युपीत दाखल
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी युपीत दाखल
देशातील सगळ्यात मोठ राज्य अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत शिवसेनाही उतरली आहे. आज पूर्वांचाल म्हणजेच उत्तर प्रदेश मधल्या गोरखपुर आणि प्रयागराजमध्ये शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दोन सभा होणार आहेत. खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह आदित्य ठाकरे सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बालेकिल्ल्यातच शिवसेना भाजपला शह द्यायचा प्रयत्न करणार आहे या निवडणुकीत शिवसेनेकडून 37 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत
-
मंत्री नवाब मलिकांनी राजीनामा देण्यासाठी दक्षिण-मध्य मुंबईत आंदोलन
भाजपा दक्षिण-मध्य मुंबई जाहीर निषेध कार्यक्रम अंडरवर्ल्ड सोबत कनेक्शन असलेल्या दाऊद इब्राहिम चे साथीदार महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली ही आघाडी सरकारला चपराक आहे. दि. 24 फेब्रु रोजी दुपारी 3.00 वाजता,कैलास लस्सी, दादर रेल्वे स्टेशन (पुर्व) जवळ, नवाब मलिक यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. त मुख्य अतिथी मा.चंद्रकांत दादा पाटील जी महाराष्ट्र अध्यक्ष भाजपा आमदार प्रसाद लाड जी आमदार कालिदास कोळंबकर आमदार कॅप्टन सेल्वन राजेश शिरवडकर इत्यादी नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत.
-
पालघर ते वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान 23 ते 28 फेब्रुवारी पर्यंत पावर ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या पालघर ते वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान 23 ते 28 फेब्रुवारी पर्यंत पावर ब्लॉक. सकाळी 10:10 ते 11:10 पर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर पावर ब्लॉक . 10:40 ची डहाणू विरार लोकल आणि 10:49 ची डहाणू चर्चगेट लोकल रद्द .
-
नवाब मलिक याना राजिनामा द्यावाच लागणार – किरीट सोमय्या
नवाब मलिक याना राजिनामा द्यावाच लागणार…
संजय राऊत, अनिल परब यांच्या प्रकरणाचा मी पाठपुरावा सुरूच ठेवणार…
रिसाॅर्टवर कारवाईसाठी पाठपुरावा करणार…
-
सकाळीपासून ED कार्यालयाचे बाहेर पोलीस वाढवण्यात आलाय
मंत्री नवाब मलिक यांनी ED च्या कास्टडी मध्ये पहिला दिवस काढले…
सकाळीपासून ED कार्यालयाचे बाहेर पोलीस वाढवण्यात आले..
रात्री नवाब मलिक यांच्या घरातून त्यांच्या कार्यकर्ता ने ED कार्यालयात त्यांना झोपण्यासाठी गादी, उशी आणि काही औषध आणून दिला होत्या..
मंत्री नवाब मलिक यांना ED ने मनी लाँड्रीनग प्रकरणी अटक करून तीन मार्च पर्यंत चौकशी साठी ED कस्टडी घेतली आहे..
-
मलिकांनी राजीनामा मागणीसाठी वसईत भाजपाचं आंदोलन
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ह्यांना ईडी ने अटक केली आहे, अशा भ्रष्ट मंत्र्याला मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नसून त्यांचा राजीनामा ठाकरे सरकारने तात्काळ घ्यावा, ह्या मागणी करिता भाजपा वसई विरार जील्हातर्फे, वसई तहसीलदार कचेरीवर भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
-
मंत्री नवाब मलिक यांनी ED च्या कास्टडी मध्ये पहिला दिवस काढला
रात्री नवाब मलिक यांच्या घरातून त्यांच्या कार्यकर्ता ने ED कार्यालयात त्यांना झोपण्यासाठी गादी, उशी आणि काही औषध आणून दिला होत्या..
सकाळी ED कार्यालयाचे बाहेर पोलीस वाढवण्यात आले..
मंत्री नवाब मलिक यांना ED ने मनी लाँड्रीनग प्रकरणी अटक करून तीन मार्च पर्यंत चौकशी साठी ED कस्टडी घेतली आहे..
-
नागपूर विद्यापीठ उन्हाळी परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या तयारीत
अंतिम वर्षाच्या परीक्षा अगोदर
ऑनलाइन परीक्षा ला विराम लागण्याची शक्यता
50-50 च्या सूत्र नुसार सर्व सम सत्रांच्या परीक्षा ची जबाबदारी विध्यपीठा वर असणार
लवकरच वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता
कोरोना मुळे विद्यापीठाने ऑनलाइन सुरू केल्या होत्या परिक्षा
-
तुळजाभवानी देवीच्या 7 पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई
खासदार ओमराजे निंबाळकर यांना देवीच्या गाभाऱ्यात नेहून दर्शन पूजा केल्याने कारवाई
मंदिरात बेशिस्त वर्तन,कर्मचारी यांना शिवीगाळ करित प्रशासकीय कामात अडथळा आणणे, पाळी नसताना देवीच्या गाभाऱ्यात पुजारी यांनी अनधिकृत प्रवेश करणे यामुळे प्रवेशबंदी
भविकांनी देवीस अर्पण करण्यासाठी दिलेली सोन्याची नथ व रोख रकमेवर डल्ला मारल्या प्रकरणी प्रवेश बंदी
तुळजाभवानी मंदिर संस्थानने केली कारवाई
भोपे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम यांच्यासह 4 पूजाऱ्यांना प्रत्येकी 6 महिने मंदिर प्रवेश बंदी
इतर 3 पूजाऱ्यांना प्रत्येकी तीन महिने मंदिर प्रवेश बंदी घालण्यात आली
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची धडक कारवाई
-
लग्न समारंभासाठी शाळा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला केलं निलंबित
शिक्षण विभागाची परवानगी न घेता लग्न समारंभासाठी शाळा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला केलं निलंबित
वाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील प्रकरण
आशा केशव सोमकुवर असं मुख्याध्यापिकेच नाव
3 फेब्रुवारी रोजी कोणाची ही परवानगी न घेता परस्पर एका कुटुंबाला लग्न समारंभासाठी दिली होती शाळा
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आदेश
-
औरंगाबाद जिल्ह्यातील भयानक प्रकार
औरंगाबाद जिल्ह्यातील भयानक प्रकार..
चार बालकांचे जंगली प्राण्याने तोडले लचके..
चिमुकल्यांचे लचके तोडणारा प्राणी प्राणी कुत्रा की लांडगा हे मात्र अस्पष्ट..
चिमुकल्यांवर जोरदार हल्ला करत तोंडसह शरीरातील इतर भागांचे तोडले लचके..
चिमुकल्यासह युवकाचा ही घेतला चावा..
कन्नड तालुक्यातील जेऊर येथील भयानक प्रकार..
चिमुकल्यांचे लचके तोडल्याच्या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण..
-
ही अटक राजकिय हेत्यूने नाही – रावसाहेब दानवे
नवाब मलिक यांच्या अटकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ही अटक राजकिय हेत्यूने केली नसून नवाब मलिक यांनी वादग्रस्त जमीन विकत घेतली होती त्यामुळे अटक झाली असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
-
नागपूरमध्ये मोबाईल टॉवरसाठी मनपाचे नवीन धोरण
मोबाईल टॉवर साठी मनपाचे नवीन धोरण
सभागृहा कडे प्रस्ताव ,शहरात 773 मोबाईल टॉवर
शहरात मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉवर आहे
मात्र या पासून मनपा च्या तिजोरीत महसूल जमा होत नाही
म्हणून आता यासाठी नवीन धोरण ठरणार
2 मार्च ला होणाऱ्या मनपा च्या सभेत ठेवला जाणार प्रस्ताव
-
महाविकास आघाडीतील नेत्यांचे मंत्रालय परिसरात धरणे आंदोलन
नवाब मलिकांना अटक केल्यामुळे महाविकास आघाडीतील नेते आज मंत्रालय परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आज सकाळी 10 वाजता धरणे आंदोलन करणार आहेत.
-
अमरावती महापालिका आयुक्त शाइफेक प्रकरण
आमदार रवी राणा आज अमरावतीमध्ये येणार..
शाई फेक प्रकरणी रवी राणा यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल.
आमदार रवी राणा यांना दिल्ली कोर्टाकडून सात दिवसांची ट्रान्झिट बेल मिळाली.
दुपारी 12 ते 2 वाजताच्या सुमारास अमरावतीत येणार आहे.
अमरावतीत जल्लोषात स्वागत केलं जाणार असल्याची माहिती.
-
सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
राज्यातील आरोग्य विभाग, म्हाडा, टीईटी सह विविध ऑनलाईन पेपर फोडण्याचे प्रशिक्षण थेट बिहार मधील पाटण्यात
सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
विशेषतः टीईटीमध्ये आढळलेल्या आरोपींनी अशा प्रकारचे पेपरफुटीचे प्रशिक्षण घेतले आहे काय ? याचा तपास सुरु
अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी दरम्यान तविविध प्रकारच्या परीक्षांचे पेपर फोडण्यासाठी बिहारमधील पाटना येथे खास प्रशिक्षण केंद्र असल्याची माहिती आली
संबंधित ठिकाणांहूनच आरोग्य सेवा, “टीईटी’मधील आरोपींनी प्रशिक्षण घेतले आहे काय ? याचा तपास पोलिसांकडून सुरू
सायबर पोलिसांनी अटक केलेल्या दलालांचे देशभर जाळे असून त्यांच्याकडूनच देशातील विविध परीक्षांचे पेपर फोडण्याच्या प्रकरणांशी संबंध असल्याची माहिती
-
नबाव मलिक यांच्या राजीनामासाठी भाजपचे आज राज्यभर आंदोलन
अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांच्या राजीनामाच्या मागण्यासाठी भाजपचे आज राज्यभर आंदोलन
पुण्यात महापालिका भावनासमोर सकाळी 9 वाजता होणार आंदोलनाला सुरवात
-
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण
टीईटी परीक्षेतील घोटाळ्यात अधिकारी आणि दलालांनंतर पैसे देऊन पात्र झालेल्या अपात्र उमेदवारांवर पोलिसांनी केलं लक्ष केंद्रित
संबंधीत उमेदवारांनी माफीचे साक्षीदार होऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे पोलिसांचे आवाहन
अन्यथा कडक कारवाई करण्याचा संबंधीत उमेदवारांना पोलिसांचा इशारा
9 हजार 300 हून अधिक उमेदवार गुणवाढीसाठी पैसे देऊन पात्र झाल्याचे पुणे सायबर पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये पुढे
-
पुरंदर तालुक्यात प्राथमिक शाळेचे इंग्रजी माध्यमाच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये रूपांतर
पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे इंग्रजी माध्यमाच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये रूपांतर करण्यास शालेय शिक्षण विभागाने पुणे जिल्हा परिषदेला परवानगी
त्यामुळे खानवडीतील मुलींची निवासी शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा
राज्य सरकारने या शाळेला ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल असे नाव दिले
या शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग असणार
त्यामुळे खानवडी पुणे जिल्हा परिषदेची इंग्रजी माध्यमाची जिल्ह्यातील पहिलीच उच्च माध्यमिक शाळा ठरणार
येत्या शैक्षणिक वर्षापासून (2022-2023) ही निवासी शाळा सुरु केली जाणार
-
स्वाभिमानीच्या धरणे आंदोलनाला हिंसक वळण
कागल मधील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय पेटवलं
राजू शेट्टी यांच्या धरणे आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकऱ्यांचा कृत्य
मध्यरात्री पेटवलं कार्यालय, अग्निशामक दलाच्या मदतीने विझवली आग
आज दिवसभर राज्यात आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता
शेतीला दिवसा वीज देण्यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरातील महावितरण कार्यालय बाहेर दोन दिवसापासून राजू शेट्टी यांचा सुरू आहे बेमुदत धरणे आंदोलन
Published On - Feb 24,2022 6:20 AM