Maharashtra News Live Update : टिपू सुलतान नावावरून राजकारण पेटलं, बजरंग दलाचे आक्रमक आंदोलन

| Updated on: Jan 26, 2022 | 10:31 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : टिपू सुलतान नावावरून राजकारण पेटलं, बजरंग दलाचे आक्रमक आंदोलन
सांकेतिक फोटो

मुंबई : आज बुधवार 26 जानेवारी 2022. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणासह सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. दिल्लीच्या राजपथावर मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आजदेखील या दोन्ही पक्षांतील नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे तसंच गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामानात कमालीचे बदल जाणवले असून राज्यात पुन्हा हुडहुडी वाढली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद झाली आहे, याचाही आढावा घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Jan 2022 08:09 PM (IST)

    मुंबई पोलिसांकडून 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त

    मुंबई पोलिसांकडून 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त..

    2 हजार रुपयांच्या 7 कोटी रकमेच्या नोटा गुन्हे शाखेकडून जप्त..

    गुन्हे शाखेकडून एकूण 7 आरोपीना अटक..

    दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक..

  • 26 Jan 2022 07:09 PM (IST)

    टिपू सुलतान नामकरण खरं की खोटं ?

    – पोलीस मागवणार अहवाल,उद्या करणार खुलासा – डीसीपींनी आम्हाला लेखी दिलं आहे-अतुल भातखळकर – उद्या सायंकाळपर्यंत आंदोलन स्थगित

  • 26 Jan 2022 05:32 PM (IST)

    अस्लम शेख यांचा भाजपवर पलटवार

    भाजपने रस्त्यांना टिपू सुलतान नाव दिलं

    भाजपने मुद्दाम राजकारण पेटवलं

    फडणवीस त्या भाजप नेत्यांचा राजीनामा घेणार का?

  • 26 Jan 2022 03:59 PM (IST)

    टिपू सूलतान नावावरून राजकारण पेटलं

    बजरंग दलाची जोरदार घोषणाबाजी

    पोलीस आंदोलकांना ताब्यात घेण्याची शक्यता

  • 26 Jan 2022 03:56 PM (IST)

    टीपू सुलतान नावावरून बजरंग दल आक्रमक

    मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यास बजरंग दलाचा विरोध

    जोरदार आंदोलन सुरू

  • 26 Jan 2022 03:55 PM (IST)

    पंजाब विधानसभा निवडणूक

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब दौऱ्यावर

    28 ते 30 जानेवारी 3 दिवस केजरीवाल यांचा दौरा

    पंजाब मधील जालंधर अमृतसर या भागात केजरीवाल प्रचार दौरा करणार

    राहुल गांधी यांच्या पाठोपाठ केजरीवालही पंजाबच्या दौऱ्यावर

  • 26 Jan 2022 03:45 PM (IST)

    बीडच्या राजकीय समीकरणात मोठा बदल

    बीड: केज नगरपंचायत निवडणूक

    जनविकास आघाडी आणि काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करणार

    जनविकास आघाडी ही भाजप पुरस्कृत

    भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं गणित जुळलं

    काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका

    नगरपंचायत सत्तेत खा. रजनी पाटील आणि पंकजा मुंडे एकत्र

  • 26 Jan 2022 01:59 PM (IST)

    टिपू सुलतान उद्यानाबाबत कुठलाही प्रस्ताव पालिकेकडे नाही, आदित्य ठाकरे यांची माहिती

    मुंबई : निर्भया पथकामुळे मुंबई पोलिस दल आणखी सक्षम होईल

    महिला आणखी सुरक्षीत होतील

    टिपू सुलतान उद्यानाबाबत कुठलाही प्रस्ताव पालिकेकडे नाही

    मुख्यमंत्री बॅक इनअॅक्शन आलेले आहेत. लवकरच आणखी सक्रीय होतील

  • 26 Jan 2022 12:40 PM (IST)

    ज्यांच्यावर संस्कार घडत नाहीत, त्यांना कायद्याचा वचक असणे आवश्यक- उद्धव ठाकरे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत आहेत. आपला महाराष्ट्र साधुसंतांचा महाराष्ट्र आहे. ज्याच्यावर संस्कार घडत नाहीत, त्यांना कायद्याचा वचक असणे आवश्यक आहे. त्याच वेळी त्यांना कायद्याचा वचक दाखवला गेला पाहिजे. आरोपींना वचक दाखवणारं हे निर्भया पथक आहे. या पथकाला मोबाईल देण्यात आले आहेत. तसेच वाहनं देण्यात आलेली आहेत.  महाराष्ट्र हा स्त्रीमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. यापुढे महाराष्ट्र महिलांकडे आदराने पाहणारा होईल, शक्तीपूजक महाराष्ट्र होईल अशी मला खात्री आहे. महिलांचा आदर कसा करावा, त्यांचे संरक्षण कसे करावे हे संपूर्ण जग महाराष्ट्राकडून शिकेल.

  • 26 Jan 2022 11:55 AM (IST)

    जळगावात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केले भीक मांगो आंदोलन

    जळगाव : जळगावात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केले भीक मांगो आंदोलन

    कुटुंबातील लहान मुलांसमवेत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा जळगाव शहरात भीक मागून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

    विभागीय कार्यशाळा ते बसस्थानक असे 3 ते 4 किमी भीक मागून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला राज्य सरकारचा निषेध

  • 26 Jan 2022 11:43 AM (IST)

    पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 हजार फूट लांबीचा ध्वज 

    पुणे : पुण्यात 1 हजार फूट लांबीचा ध्वज

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं धायरी गावात साकारण्यात आलाय ध्वज

    मानवी साखळीच्या माध्यमातून हा ध्वज साकारण्यात आला

    यावेळी प्रभात फेरीही काढण्यात आली

  • 26 Jan 2022 10:56 AM (IST)

    अंधेरी पूर्व येथील काजू पाडा नेताजी नगरमध्ये आग, तिघे जखमी

    मुंबई : अंधेरी पूर्व साकिनाका काजू पाडा नेताजी नगर येथील जैन सोसायटीमध्ये सकाळी 8 च्या सुमारास गॅस लीक होऊन आग लागल्याने 3जण जखमी – जखमींना राजावाडी रुग्णालयात केले दाखल, जखमींची प्रकृती स्थिर – 8.45  वाजता आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश

    – जखमींची नावे

    हकीम खान 50 वर्षे

    सोहेल खान 24 वर्षे

    सहिम अन्सारी 34 वर्षे

  • 26 Jan 2022 10:08 AM (IST)

    कोणत्या अधिकाराखाली सोमय्या यांना नोटीस जारी करण्यात आली- देवेंद्र फडणवीस

    या सरकारचे डोके फिरलेले आहे. अण्णा हजारे यांच्या संघर्षानंतर माहितीचा अधिकार प्राप्त झाला. या अधिकाराच्या खाली कोणत्याही नागरिकाला ऑफिसमध्ये जाऊन इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार आहे. तोच अधिकार बजावण्यासाठी सोमय्या ऑफिसमध्ये गेलो होते. डॉक्युमेंटचे इन्स्पेक्शन करताना खुर्चीवर बसणे हादेखील अधिकार आहे. खासगी मालमत्ता असल्यासारेखे नोटीस जारी केली जात आहे. कोणत्या अधिकाराखाली सोमय्या यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.

  • 26 Jan 2022 10:05 AM (IST)

    मैदानाला टीपू सुलतानाचे नाव देणे अयोग्य- देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधत आहेत. ज्या टीपू सुलतानने हिंदूंवर अन्वनित अत्याचार केले तो टीपू सुलतान देशाचा गौरव होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचे नाव महानगपालिकेने मैदानाला देणे अतिशय अयोग्य आहे. यामध्ये एका प्रकारे अत्याचार करणाऱ्याचे महिमामंडन करण्याचे काम होत आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द केला पाहिजे.

  • 26 Jan 2022 09:55 AM (IST)

    आरक्षण मिळणे हा ओबीसींचा अधिकार, त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे- अजित पवार

    मुंबई : आयोगाला पूर्णपणे स्वायत्तता आहे. सरकार फार तर त्यांच्याकडची माहिती आयोगाला देऊ शकते. सरकारकडे असणारी माहिती आोयगाला द्यावी. शेवटी निर्णय आयोगाला घ्यावा लागणार आहे. आयोगाने घेतलाल्या निर्णायाच्या संदर्भाने कोर्टात सुनावणी सुरु आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पन्नास टक्क्यांच्या समोर आरक्षण जाता कामा नये, याचा सरकाराचा प्रयत्न आहे. कोर्टाचंही तसंच म्हणणं आहे. एसी एसटी तिथल्या लोकसंख्येनुसार आरक्षण देऊन, पन्नास टक्क्यांपर्यंत आरक्षण जात नाही, तोपर्यंत ओबीसींना आरक्षण भेटलं पाहीजे. तो त्यांचा अधिकार आहे. काही काळासाठी प्रशासक नेमावा लागला तर तो नियुक्त करावा. पण एकदा का निवडणुका झाल्या की पाच वर्षे थांबावे लागेल. हा काळ मोठा आहे. त्यामुळे निवडणुका लांबल्या तरी काही फरक पडत नाहीत.

  • 26 Jan 2022 09:49 AM (IST)

    केंद्राकडून येणारे जीएसटीचे पैसे आता बंद होणार- अजित पवार

    अजित पवार माध्यमांशी बोलत आहेत. केंद्राकडून येणारे जीएसटीचे पैसे आता बंद होणार आहेत. उद्या कॅबिनेटची बैठक होण्याची शक्यता आहे.

  • 26 Jan 2022 09:27 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरेंसह उपस्थित

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्क इथंल्या कार्यक्रमाला उपस्थित

    मुख्यमंत्र्यांसह रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित

  • 26 Jan 2022 09:08 AM (IST)

    सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

    सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्योती नलावडे या महिलेचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

    जावली सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप

    संचालकांवर कारवाई करून दोषारोप दाखल करण्याची होती मागणी

    पोलिसांनी दखल न घेतल्याने उचलले पाऊल

  • 26 Jan 2022 08:44 AM (IST)

    वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

    मुंबई :- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.

    UDDHAV THACKERAY FLAG HOSTING

    UDDHAV THACKERAY FLAG HOSTING

  • 26 Jan 2022 08:14 AM (IST)

    मुंबईत आज कडाक्याची थंडी, पारा 16 अंशावर

    मुंबईत आज कडाक्याची थंडी पारा 16 अंशावर…

    – मुंबईतील जेवायएलआर, विक्रोळी परिसरात दाट धुक्याची चादर

    – पश्चिम उपनगरातही आज हवेत प्रचंड गारवा, त्याचबरोबर धुक्याची चादरही पसरलीय

    – मुंबईचा पारा बऱ्यापैकी खाली आला असून आज तापमानाती 16  अंश सेल्सिअस अशी नोद झालीय.

    24 तास राज्यात मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात थंडी आणि वेगवान वारे वाहणार

    मुंबईत धुरकट वातावरण निर्माण झालंय. सकाळी दृष्यमानताही कमी झालीये

  • 26 Jan 2022 07:55 AM (IST)

    28 जानेवारीला मागासवर्ग आयोगाची महत्वपूर्ण बैठक, 8 फेब्रुवारीला अंतरिम अहवाल सादर करणार

    पुणे : 28 जानेवारीला मागासवर्ग आयोगाची महत्वपूर्ण बैठक

    एकूण 7 सर्वेक्षण रिपोट्सच्या आधारे आयोग अंतरिम अहवाल तयार करणार

    याच बैठकीत आयोग अंतरिम अहवाल तयार करणार

    8 फेब्रुवारीला शासन आणि आयोगाचा अंतरिम अहवाल सादर करणार

    बार्टीच्या अहवालाचाही मागासवर्ग आयोग आधार घेणार

    टीव्ही 9 मराठीला सूत्रांची माहिती

  • 26 Jan 2022 07:09 AM (IST)

    साडे दहा वाजल्यापासून राजपथावर संचलन, नवी दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

    राजधानी नवी दिल्लीत आज 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय, सकाळी साडे दहा वाजल्यापासून राजपथावर संचलन होणार असून भारतीय संस्कृतीच आणि सामर्थ्याच दर्शन आज राजपथावर पाहायला मिळणार आहे यामध्ये अनेक लढाऊ विमानांची थरारक प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहेत तसच महाराष्ट्रासह अनेक मंत्रालयाच्या चित्ररथाच संचलन होणार आहे.कोरोनाच्या संकटामुळे यावेळी राजपथावर फक्त 24 हजार लोकांना परवानगी देण्यात आलेय..सकाळी दहा वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजपथावर दाखल होणार आहेत. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय

Published On - Jan 26,2022 6:20 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.