Maharashtra News Live Update : शेतकरी मरतो आहे आणि तुम्ही सूड घेताय, आज 18 लाखांहून अधिक शेतकरी कर्जबाजारीः देवेंद्र फडणवीस

| Updated on: Mar 15, 2022 | 12:17 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : शेतकरी मरतो आहे आणि तुम्ही सूड घेताय, आज 18 लाखांहून अधिक शेतकरी कर्जबाजारीः देवेंद्र फडणवीस
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9
समृद्धी महामार्गाला जर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे असेल तर महामार्गासाठी लागलेला अर्धा खर्च राज्य सरकारने द्यावा असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लोक गुजरातचे नेतृत्व कधीपासून कराय लागले? असा सवाल उपस्थित करत नाना पटोले यांनी रावसाहेब दानवे यांना टोला लगावला आहे. जेव्हा सत्ता आपल्याला मिळते तेव्हा राज्यासाठी केंद्राकडे पैसा मागायचा असतो. मात्र बोली लावण्याची भाषा आपण पहिल्यांदाच पाहत असल्याचे  पटोले यांनी म्हटले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Mar 2022 06:20 PM (IST)

    गिरीश महाजन यांना फसवण्याचे सरकारचे धोरणः फडणवीस

    पेनड्रायव्हचे प्रकरण सीबाआयकडे दिले म्हणून भाजपकडून सभात्याग

  • 14 Mar 2022 06:19 PM (IST)

    राज्य सरकार चौकशी करु शकत नाही म्हणून हे प्रकरण सीबीआयला द्याः फडणवीस

    संजय पांडये मुंबईत आले आहेत, प्रवीण दरेकर तुमच्यावर हल्ला करतात म्हणून तुम्ही त्यांच्यावर एफआर करणार

    राज्य सरकार चौकशी करु शकत नाही म्हणून हे प्रकरण सीबीआयला द्या

    आमचा न्यायालयावर विश्वास आहे पण सरकारवर नाही म्हणून

    पेनड्रायव्हचं प्रकरण सीबाआयकडे दिले नाही म्हणून आम्ही सभात्याग करतोय.

  • 14 Mar 2022 06:07 PM (IST)

    गेल्या बावीस वर्षात मी पहिल्यांदा एवढे हातबल वळसे-पाटील यांना बघितले नाहीः फडणवीस

    वळसे पाटील तुम्ही नाईट वॉचमनसारखे खेळलात

    बीएचआरसी केसमध्ये प्रवीण चव्हाण हे मुख्य आरोपीचे वकील आणि सरकारचे वकीलही हेच होते

    गिरीश महाजनाना पसवण्यासाठीचा तो व्हिडिओ आहे

    पुरावे तयार करणे हे सरकारचे काम आहे का

  • 14 Mar 2022 05:58 PM (IST)

    राज्यातील पोलिसांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहेः वळसे-पाटील

    तुम्ही अनुभवी आहात म्हणून तुम्ही मार्गदर्शन करा

    सभागृहामध्ये मी सस्पेंड करणार नाही

    सभागृहात एकाद्याला सस्पेंड करणार नाही, मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • 14 Mar 2022 05:55 PM (IST)

    सत्ता येते आणि जाते, सत्ता गेल्यानंतरची अस्वस्थता चांगली नाहीःवळसे-पाटील

    पाच राज्यात तुम्ही सत्तेत आला असला तरी ५७ जागा यूपीमध्ये कमी झाल्या आहेत

    सत्ता येते आणि जाते, सत्ता गेल्यानंतरची अस्वस्थता चांगली नाही

    मंदिर उघडण्याची आंदोलने, शाळांसाठी आंदोलने होता

  • 14 Mar 2022 05:50 PM (IST)

    धनगर समाजाला आरक्षण देऊ असं फक्त तुम्ही अश्वासन दिलेः वळसे पाटील

    मंत्र्यालयाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असं अश्वासन

    सूडबुद्धीनी कारवाई करु नये

    महाराष्ट्राच्या सलोख्याच्या वातावरणात गोंधळ

    केंद्रीय यंत्रणाचा वापर करता, त्यांचे तुम्ही प्रवक्ता आहात का

  • 14 Mar 2022 05:44 PM (IST)

    रश्मी शुक्ला यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर बेकायदेशीर निर्देशाचे पालन केले नाहीः वळसे-पाटील

    नाना पटोले यांचे नाव अमजत खान, बच्चू कडू यांचे निजामद्दीन शेख, संजय काकडे यांचे नाव तरबेज सुतार पुणे शहरातील गुन्हेगारी टोळीचे

    सदस्य अशी नावं बदलून गुन्हेगारीबाबत नावं ठेवण्यात आली.

    या व्यक्ती जमीनी बळकावण्याचा धंदा

    तर आशिष देशमुख रघू चोरगे रहाटवाडी अंमली पदार्थाचा धंदा करतात अशी

    तर आशिष देशमुख यांचे हिना महेश सांळुखे असे नाव ठेवण्यात आले

    रश्मी शुक्ला यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर बेकायदेशीर निर्देशाचे पालन केले नाही

  • 14 Mar 2022 05:34 PM (IST)

    तुम्ही मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना मलिकप्रकरणी का तपास केला नाहीः वळसे-पाटील

    नवाब मलिकप्रकरणी तुम्ही मुख्यमंत्री असताना तपास का केला नाही

    केंद्र सरकारविरोधात नवाब मलिक आवाज उठवितात म्हणून कारवाई चुकीची

    बीएचआरसीची गैरव्यवहाराची चौकशी राधासिंग यांनी गैरव्यवहाराची चौकशी केली

  • 14 Mar 2022 05:31 PM (IST)

    जळगावमधील शिक्षण संस्थांप्रकरणी आम्ही कुणाला पाठीशी घालणार नाहीः वळसे पाटील

    जळगावमधील शिक्षण संस्थांप्रकरणी आम्ही कुणाला पाठीशी घालणार नाही

    या संस्थेतील तपास करण्याची सीबीआयकडे देणार

    नवाब मलिक पाच वेळा आमदार झाले

    केंद्र सरकारविरोधात नवाब मलिक आवाज उठवितात

  • 14 Mar 2022 05:25 PM (IST)

    …तर सीबीआयची मागणी काः दिलीप वळसे पाटील

    पोलीस दलावर एवढा विश्वास आणि अभिमान असेल तर तपास करताना सीबीआयची मागणी का

    १९९३ चा बॉम्बस्फोटप्रकरणी देवेंद्र फडणवीस तुम्ही आता एनआयकडे गुन्हा का दाखल करता

    देवेंद्र फडणवीस तुमचा आरोप काही जरी असला तरी त्याचा तपास करावा लागेल

    देवेंद्र फडणवीस तुम्ही राज ठाकरे यांच्यापासून ते आतापर्यंत तुम्ही पेनड्राईव्ह देता

    देवेंद्र फडणवीस तुम्ही तपास एजन्सी काढली का

  • 14 Mar 2022 05:16 PM (IST)

    पेपर फुटीप्रकरणी कठोर भूमिकाः दिलीप वळसे-पाटील

    १८८ अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत त्याचे खटले मागे घेणार

    खटले मागे घेण्याची जी प्रक्रिया आहे ती जिल्हा पातळीवरुन घेतले जातील

    पेपर फुटीप्रकरणी अतिशय कठोर भूमिका

    एकूण पाच गुन्हे दाखल वीस आरोपींना अटक, पाच आरोपी अजून अटक

    आरोग्य विभागाच्या परीक्षेचा घोटाळ्याप्रकरणीही गुन्हा

  • 14 Mar 2022 05:11 PM (IST)

    7231 पोलिसांची भरती करणारः दिलीप वळसे पाटील

    पोलीस भरतीत कोणताही गैरप्रकार होणार नाही

    पुढील दोन वर्षातील भरतीसाठी प्रस्ताव ठेवणार

    तीस वर्षानंतर प्रत्येक कॉन्स्टेबल पोलीस उपनिरीक्षक होणार

  • 14 Mar 2022 05:09 PM (IST)

    87पोलीस स्टेशनच्या इमारतीची कामं सुरु: दिलीप वळसे पाटील

    आहे त्या पोलीस स्थानकांचा 87पोलीस स्टेशनच्या इमारतीची कामं सुरु

    राज्य राखीव दलातील अमंलदार यांची बारा वर्षानंतर पोलीसात जात येणार

    कोरोनाकाळात पोलिसांची उत्तम कामगिरीबद्दल त्यांना आर्थिक मदत

  • 14 Mar 2022 05:02 PM (IST)

    मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो हे तुम्हाला माहिती पडताच तुम्ही माझी पिळवणूक सुरू केलीः एकनाथ खडसे

    देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस आली आणि काय त्यांचा तळफळा सुरु झाला
    देवेंद्रजी म्हणतात मी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरू झाली
    तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?
    मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो हे तुम्हाला माहिती पडताच तुम्ही माझी पिळवणूक सुरू केली
    माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बायकोबरोबर संबंध जोडले
  • 14 Mar 2022 04:58 PM (IST)

    यावर्षीच्या आषाढीवारीत या संतांच्या पालख्यांची विशेष सजावट कराः देवेंद्र फडणवीस

    सर्व संतांच्या समाधीस्थानांवर म्हणजेच आळंदी, त्र्यंबकेश्वर, सासवड आणि मुक्ताईनगर येथे विशेष निधी द्या

    या समाधीस्थळांचा विकास करा

    भाविकांसाठी सोयीसुविधा दिल्या जाव्यात

    यावर्षीच्या आषाढीवारीत या संतांच्या पालख्यांची विशेष सजावट करा

  • 14 Mar 2022 04:54 PM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला

    बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या व्हाट्सअपवर

    याबाबत पोलीस तपासानंतरच खुलासा करण्यात येणार आहे.

    श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल

  • 14 Mar 2022 04:47 PM (IST)

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए कोर्टाने फेटाळला

    राज्याचे  माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांचा जामिन अर्ज मुंबई सत्र न्यायालच्या  विशेष पीएमएलए कोर्टाचा फेटाळला

    मनी लाँड्रिंग प्रकरणात  देशमुखांना कोणताही दिलासा नाही

    100 कोटी वसुली  मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केली होती अटक

  • 14 Mar 2022 04:40 PM (IST)

    सरकारने आतातरी धोरण बदलावे,जनतेचा असा छळ करू नका: देवेंद्र फडणवीस

    मेट्रो ही आता अहंकारामुळे बंद

    किमान पाच वर्ष ही मेट्रो सुरू होणार नाही, अशी स्थिती

    पण सरकारने आतातरी धोरण बदलावे. जनतेचा असा छळ करू नका

    नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा विचार आम्ही केला होता. केवळ 33 टक्के भूसंपादन करावे लागेल

  • 14 Mar 2022 04:36 PM (IST)

    नाभिक समाज 21मार्च रोजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी जाऊन करणार मुंडन

    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात इंदापूरमध्ये नाभिक समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा
    रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजा विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून आज इंदापूरमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
    नाभिक समाजाच्यावतीने रावसाहेब दानवे हाय-हायच्या अशा घोषणा
  • 14 Mar 2022 04:32 PM (IST)

    सहा हजार कोटींचे फक्त अश्वासन, मात्र अजून संकेतस्थळही सुरु नाहीः देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना फक्त फोटो काढले

    या योजनेचा गाजावाजा करण्यात आला

    5 वर्षात 6000 कोटी रुपये देण्याचे अश्वासन देण्याचे अश्वासन 2 वर्षांपूर्वी देण्यात आले मात्र अजून संकेतस्थळसुद्धा सुरू झाले नाही: देवेंद्र फडणवीस

  • 14 Mar 2022 04:28 PM (IST)

    वेश्यांसाठीचा पैसा खात असाल तर तुम्ही कुठे चालला आहात, याचा विचार करा : देवेंद्र फडणवीस

    वेश्यासाठीच्या निधीत भ्रष्टाचार

    संजय राऊत जो शब्द वापरतात, तो येथे मी वापरू शकत नाही.

    पूर्ण माहिती घ्या.

    वेश्यांसाठीचा पैसा खात असाल तर तुम्ही कुठे चालला आहात, याचा विचार करा

  • 14 Mar 2022 04:27 PM (IST)

    किमान समान कार्यक्रमात 1 रुपया क्लिनिक पण अजून सुरूच झाले नाही: देवेंद्र फडणवीस

    हाफकिनच्या लसीचे काय झाले? एक तरी रुपया दिला का?

    15,000 वेंटिलेटरची घोषणा, पण निधी नाही.

    किमान समान कार्यक्रमात 1 रुपया क्लिनिक पण अजून सुरूच झाले नाही

  • 14 Mar 2022 04:21 PM (IST)

    …पण आता मदत देताना तर संवेदनशील व्हा: देवेंद्र फडणवीस

    मुंबईत कोरोनामध्ये 16,500 बळीसंख्या होती, पण 28 जानेवारीपर्यंतचा दावा करण्यात आला 37,000

    आपण बळीसंख्या लपविली, हे तर खरे आहेच. पण आता मदत देताना तर संवेदनशील व्हा

  • 14 Mar 2022 04:18 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील महे कसबे बीड गावातील शेतकरी आक्रमक

    कोल्हापूर जिल्ह्यातील महे कसबे बीड गावातील शेतकरी आक्रमक

    कोल्हापूरमध्ये शेतकरी आक्रमक

    कनेक्शन तोडल्यानं शेतकरी आक्रमक

    महावितरणच्या कार्यालयात अंगावर डिझेल ओतून घेतलं

  • 14 Mar 2022 04:13 PM (IST)

    खरंच जनारोग्य योजना तरी राबविली का? : देवेंद्र फडणवीस

    महात्मा फुले जनारोग्य योजना:   2019 : 552 कोटी रुपये

    2020 या वर्षी : 399 कोटी रुपये

    2021 : 325 कोटी रुपये  खर्च करण्यात आला यावरुन सांगा की या सरकारने ही जनारोग्य योजना खरंच राबविली का?

    कोविडच्या काळात ही योजना नाही वापरायची, तर कधी वापरणार

  • 14 Mar 2022 04:09 PM (IST)

    अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी सरकारकडे 230 कोटींची मागणी करण्यात आली होती मात्र अद्याप निधी दिला नाही: देवेंद्र फडणवीस

    कंत्राटी सेवकांसाठी मागणी : 403 कोटी रुपयांची मागणी तर प्रत्यक्ष दिले केवळ : 180 कोटी

    आगीत 81 बळी गेले आहेत,  पण त्यासाठीही निधी अजून देण्यात आला नाही

    याप्रकरणी चौकशी करण्याची आणि कठोर कारवाई करण्याचे फक्त ऑनलाईनच सांगून झाले.

    आरोग्य विभागाला मिळालेल्या निधीतून केवळ 46.7 टक्के निधीच आरोग्य विभागाने खर्च केला

  • 14 Mar 2022 04:04 PM (IST)

    आरोग्य विभागाच्या 138 कोटी मंजूर निधी पैकी प्रत्यक्ष निधी 21 कोटी रुपये फक्त दिलाः देवेंद्र फडणवीस

    कोरोना रूग्णांना तसेच नवजात माता आणि शिशूंना आहार देण्याचाही प्रश्न आरोग्य विभागावर निर्माण व्हावा, हे फारच आश्चर्यजनक आहे.

    यासाठी आरोग्य विभागाने मागितलेला निधी : 138 कोटी – मंजूर निधी

    85 कोटी आणि प्रत्यक्ष दिले केवळ : 21 कोटी : देवेंद्र फडणवीस

    विविध अत्यावश्यक सेवांसाठी आरोग्य विभागाची मागणी : 835 कोटी

    आरोग्य विभागाने वीजबिल, पाणी, दूरध्वनीसाठी मागितले : 63 कोटी

  • 14 Mar 2022 03:39 PM (IST)

    1200 कोटींचा फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना बसला: देवेंद्र फडणवीस

    विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना वीज सवलत आम्ही दिली

    2019 मध्ये या योजनेला 2024 पर्यंत मुदतवाढ दिली तर महाविकास आघाडीने ती बंद केली.

    1200 कोटींचा फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना बसला आहे

  • 14 Mar 2022 03:33 PM (IST)

    अठरा लाख बावन हजार शेतकरी कर्जबाजारीः देवेंद्र फडणवीस

    सरकार स्मारक उभा करताना पैशाचा विचार करत नाही शेतकऱ्यांना मदत करताना मात्र सरकारकडून पैशाचा विचार केला जातो मे महिन्यापर्यंत वीज तोडणार नाही या सरकारच्या घोषणेचं काय झालं

  • 14 Mar 2022 03:21 PM (IST)

    जळगावमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची गर्दी

    उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात शाळा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे परीक्षेपूर्वी लस घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना लस घेण्याची सक्ती नाही

  • 14 Mar 2022 03:03 PM (IST)

    नाशिकमध्ये प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यामुळे संत, महंत नाराज

    धार्मिक क्षेत्रातून प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेची झोड

    योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रणिती शिंदेंचा अप्रत्यक्ष निशाणा

    माफी मागा, नाहीतर परिणामांना समोर जा

    नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांचा प्रणिती शिंदेंना इशारा

  • 14 Mar 2022 02:17 PM (IST)

    मनसे पुन्हा एकदा प्रखरपणे मराठीचा मुद्दा लावून धरणारः राज ठाकरे

    हिंदुत्वा बरोबर मराठी माणसाची मनसे पुन्हा दिसली पाहिजे

    आपण हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नाही पण मराठीचा मुद्दा जोरकस पणे मांडा

    मराठी बाबत ठराविक नेत्यांनी न बोलता सर्वानी बोललं पाहिजे

    शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असतानाच, मनसे पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा प्रखरपणे मांडणार

    आज झालेल्या बैठक राज ठाकरे यांनी मांडली भूमिका

  • 14 Mar 2022 01:45 PM (IST)

    …तर निवडणुका उद्याही, भास्कर जाधवांचे मोठे विधान

    ओबीसी आरक्षणावर राज्य सरकारने कायदा केला तरी निवडणुका उद्याही होऊ शकतात

    आमदार भास्कर जाधव यांचे मोठे विधान

    74 व्या घटना दुरुस्तीनुसार निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा

    निवडणूक घेण्याचा अधिकार राज्याचा नाही

    विधानसभेत ठराव केला म्हणून निवडणुका पुढे जातील, या भ्रमात राहू नये

  • 14 Mar 2022 01:38 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे -राज ठाकरेंच्या ‘बाईं’चं 92 व्या वर्षी निधन

    दोन पक्षप्रमुखांना घडवणारी शिक्षिका हरपली

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ‘बाईं’चं निधन

    सुमन रणदिवे यांचं 92व्या वर्षी निधन

    सुमन रणदिवे यांनी अनेक बड्या नेत्यांना शिकवलं

  • 14 Mar 2022 01:26 PM (IST)

    पुण्यात एकतर्फी प्रेमातून विद्यार्थीनीवर धारदार हत्याराने वार

    एकतर्फी प्रेमातून दहावीत शिकणाऱ्या मुलीवर धारदार हत्याराने वार

    पुण्याच्या वडगाव शेरी येथील धक्कादायक घटना

    मुलीवर सिटी हॉस्पिटल वडगाव शेरी याठिकाणी उपचार सुरू

  • 14 Mar 2022 01:18 PM (IST)

    महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेविरोधात कुस्तीपटू संघटना आक्रमक

    महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेविरोधात कुस्तीपटू संघटना आक्रमक

    महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेविरोधात कुस्तीपटू संघटना आक्रमक

    कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगेंना हटवण्याची मागणी

    कुस्तीगीर परिषदेविरोधात स्वारगेट पोलीस स्टेशनवर मोर्चा

  • 14 Mar 2022 01:07 PM (IST)

    मालेगाव महानगरपालिकेच्या शाळेत भाडोत्री शिक्षक

    मालेगाव महानगरपालिकेच्या शाळेत भाडोत्री शिक्षक

    मालेगावच्या शाळेतील धक्कादायक प्रकार

    मालेगाव मनपाच्या शाळा क्रमांक 47मधील धक्कादायक प्रकार

    लाख रुपये पगार घेणारे शिक्षक मोजतायेत महिन्याचे 1500 रुपये

  • 14 Mar 2022 01:00 PM (IST)

    बारावीच्या परीक्षेतील गणिताचा पेपर फुटला

    अहमदनगरमध्ये बारावीच्या परीक्षेतील गणिताचा पेपर फुटला

    10 वाजताच गणिताचा पेपर उत्तरपत्रीकेसहीत सोशल मीडियावर व्हायरल

    चौकशीसाठी शिक्षणाधिकारी श्रीगोंदयात दाखल

    कुठल्या परीक्षा केंद्रावरुन पेपर फुटला याचा तपास सुरू

  • 14 Mar 2022 12:07 PM (IST)

    विधानसभेत भाजपनं स्थगन प्रस्ताव मांडला

    विधानसभेत भाजपनं स्थगन प्रस्ताव मांडला

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नोटीससंदर्भात स्थगन प्रस्ताव

    फडणवीसांना पाठवलेल्या नोटीसवरुन भाजप आक्रमक

    भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या फडणवीसांनाच नोटीस पाठवली जाते

    भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत विचारला सवाल

    सभागृहातील सदस्यांच्या अधिकारांवर गदा आणली जातेय-मुनगंटीवार

    भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा की भ्रष्टाचार काढणाऱ्यांना त्रास?

    भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा सभागृहात सवाल

    पत्रकार परिषदेत फडणवीसांनी फक्त पत्र वाचलं-आशिष शेलार

    भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यानंतर आशिष शेलारांचीही शेरोशायरी

    देवेंद्र फडणवीसांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस-गृहमंत्री

    मला जे प्रश्न पाठवण्यात आले ते आरोपींसाठीचे होते

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती

  • 14 Mar 2022 09:36 AM (IST)

    शिवसेना नेते संजय राऊतांची भाजपवर टीका

    4 राज्यातील विजयाचा भाजपाकडून उन्माद

    शिवसेना नेते संजय राऊतांची भाजपवर टीका

    पंतप्रधान एका पक्षाचे नेतृत्व करतायेत

    संजय राऊतांची केंद्रासह पंतप्रधान मोदींवर टीका

    मोदी देशाचे पंतप्रधान आहे, फक्त भाजपचे नाही

    गोव्यात कधीच पक्ष जिंकत नाही फक्त व्यक्ती जिंकतो

    बाबूश मोन्सेरात यांनी माझ्या विजयात भाजपचा हात नाही असं सांगितलं

    तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट, ते त्यानुसारच काम करतायेत

    शरद पवार टार्गेट, महाविकास आघाडीचे इतर नेते टार्गेट

    शिवसेना नेते संजय राऊतांचा भाजपवर टीकास्त्र

  • 14 Mar 2022 09:12 AM (IST)

    पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या योजनेला राज्य सरकारकडून ब्रेक

    पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या नदीसुधार योजनेला राज्य सरकारकडून ब्रेक

    7 हजार कोटीचा प्रकल्प आता रेंगाळणार

    पुर रेषेत झालेला बदल आणि पर्यावरण वाद्यांचे आक्षेप पाहता हा निर्णय घेण्यात आलाय

    राज्य सरकारने बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे

    गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यावर आक्षेप घेतला होता

  • 14 Mar 2022 09:02 AM (IST)

    पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार आजपासून प्रशासक पाहणार

    पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार आजपासून प्रशासक पाहणार

    आचारसंहिता लागल्यानंतर महापौर माई ढोरेंनी वाहन केल जमा

    आयुक्त राजेश पाटील प्रशासक म्हणून पालिकेचे प्रमुख असणार

    नगरसेवकांचा कार्यकाळ 13 तारखेला संपुष्टात आला

  • 14 Mar 2022 08:58 AM (IST)

    फळांचा राजा मुंबईच्या बाजारात!

    मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये हापूस आंबा दाखल

    वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्यांच्या 1 लाख पेट्यांची आवक

    सर्वात जास्त आंबा हा देवगड हापूसचा आहे

    80 टक्के आंबा देवगड आणि 20 टक्के रत्नागिरी, रायगडचा आंबा

    10 हजार आंब्यांच्या पेट्यांची निर्यात आखाती देशांमध्ये करण्यात आली

  • 14 Mar 2022 07:24 AM (IST)

    लोक अदालतमध्ये पुणे जिल्ह्या अव्वल

    लोक अदालतमध्ये पुणे जिल्ह्याचा अव्वल क्रमांक

    64 हजार 343 दावे काढले निकाली

    जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालत आयोजित करण्यात आली होती

    125 पँनेलच्या माध्यमातून 64 हजार दावे निकाली काढण्यात आलेत

  • 14 Mar 2022 07:23 AM (IST)

    पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील तीन पोलीस कर्मचारी अटकेत

    पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील तीन पोलीस कर्मचारी अटकेत

    एका दिवसाची रजा टाकून पोलीस असल्याची बतावणी करत लुटले 45 लाख

    ठाण्यात पोलीस असल्याचं सांगून गाडी अडवत पाच कोटीपैकी घेतले 45 लाख

    ठाण्यातून खाजगी व्यक्तीला अटक केल्यावर पोलीस तपासात तीन नावं आली समोर

    मुंबई पोलिसांनी पुण्यात येऊन चौकशी केली असता तिघेही फरार आढळले

    नारपोली – ठाणे पोलिसांनी गुन्हा नोंद करत तिघांना अटक केली

  • 14 Mar 2022 07:21 AM (IST)

    रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे आज भूमिपूजन

    रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारतीचे आज भूमिपूजन

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री ऑनलाईन लावणार उपस्थिती

    सकाळी 9 वाजता होणार भूमिपूजनाचा कार्यक्रम

    विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपण्यापूर्वी इमारतीच्या कामाचा शुभारंभ

    44 कोटी 36 लाख खर्च करुन जिल्हा परिषदेची इमारत बांधली जाणार

  • 14 Mar 2022 07:18 AM (IST)

    नागपूरमध्ये वाघ आढळला मृतावस्थेत

    अडीच वर्षांचा वाघ मृतावस्थेत आढळल्याची नागपुरच्या उमरेड-मकरधोकडा मार्गावर घटना

    कोळसा खानी शेजारी, शाळेपासून 100 मिटर अंतरावर वाघ मृतावस्थेत आढळा

    मृत नर वाघाचं डोकं चिखलात फसले होते

    मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याची वन विभागाची माहिती

    वाघाच्या मृत्यूबाबत वन विभागाची चौकशी सुरू

  • 14 Mar 2022 07:13 AM (IST)

    इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात पर्यावरण विषय सक्तीचा

    इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात पर्यावरण विषय सक्तीचा

    एस आय सीटीईचा निर्णय देशातील इंजिनिअरिंगच्या महाविद्यालयांना लिहीलं पत्र

    पत्र लिहून अभ्यासक्रमात पर्यावरण हा विषय आणण्याची केली मागणी

    एस आयसी टीईच्या उच्चस्तरीय समितीनं केली शिफारस

    विद्यार्थ्यांना गावातील समस्या सोडवण्याचे उपाय सुचवावे लागणार

  • 14 Mar 2022 07:07 AM (IST)

    आजपासून पुणे महापालिकेवर येणार प्रशासक राज

    आजपासून पुणे महापालिकेवर प्रशासक येणार

    पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार असणार प्रशासक

    सोमवारी सगळ्याच पक्षांनी विकासकामांच्या उद्घाटनाचा उडवला धुरळा

  • 14 Mar 2022 07:02 AM (IST)

    नांदेडमध्ये ह्रदयविकाराची 32 बालके आढळली

    नांदेड जिल्ह्यात जन्मजात हृदयविकाराची 32 बालके आढळली

    बालकांना शस्त्रक्रियेसाठी वर्धा, नागपूरला पाठवण्यात आलं

    राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, महात्मा फुले आरोग्य अभियानांतर्गत मोफत शस्त्रक्रिया

    बालकांना पाठवताना जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर उपस्थित

    बालकांच्या पालकांना ठाकूर यांनी धीर देत केलं उपचारासाठी रवाना

  • 14 Mar 2022 06:56 AM (IST)

    परळीमध्ये पुन्हा मुंडे बहीण-भावात शाब्दिक युद्ध

    परळीमध्ये पुन्हा मुंडे बहीण-भावात शाब्दिक युद्ध

    कर्ते-नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या – धनंजय मुंडे

    बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरुन मुंडे भावंडात जुंपली

    बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करु नये

    भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा धनंजय मुडेंना टोला

    धनंजय मुंडेंचं पंकजा मुडेंना प्रत्युत्तर देत प्रीतम मुंडेंच्या पत्रकाचा दिला दाखला

  • 14 Mar 2022 06:51 AM (IST)

    नालासोपाऱ्यात गाद्याच्या दुकानाला भीषण आग

    नालासोपाऱ्यात सोमवारी रात्री 10 वाजता एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. हे दुकान गादीचे असून, शॉर्टसर्किटने आग लागल्याचा  प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकान पूर्णता जळून खाक झालं आहे. आग इतकी भीषण होती की  सर्व परिसर हादरुन गेला होता. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळवले आहे.

Published On - Mar 14,2022 6:34 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.