Maharashtra News Live Update : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना तिथीप्रमाणं शिवजंयती साजरी करणार

| Updated on: Mar 21, 2022 | 9:18 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update :  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना तिथीप्रमाणं शिवजंयती साजरी करणार
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज रविवार 20 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने (central railway) आज देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर लाईनच्या (houbour line) उपनगरीय विभागात मेगाब्लॉक (mega block)आयोजित केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण स्थानकादरम्यानच्या मुख्य मार्गावर कसल्याही प्रकारचा मेगा ब्लॉक असणार नाही. ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वे पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) स्थानकादरम्यान विशेष सेवा चालवणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Mar 2022 07:28 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना तिथीप्रमाणं शिवजंयती साजरी करणार

    शिवसेनेची शिवजयंती मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ( T 2) इथ साजरी होणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, शिवसेना खासदार सचिव अनिल देसाई उपस्थित राहणार

    सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान

  • 20 Mar 2022 07:06 PM (IST)

    कोल्हापूर म्हणलं की माझं नाव निघतं : राजेश क्षीरसागर

    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना अभिवादन करतो. माझ्या राजकीय महत्त्वाच्या निर्णयाक्षणी उभे असणाऱ्या, ठामपणे उभे राहणाऱ्या कार्यकर्ते, हितचिंतक आणि पत्रकार बांधवांचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेऊन, मला विजयाप्रत नेणाऱ्या कार्यकर्त्यांचं आभार मानतो. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसनं पाच आमदार पाडले त्या पक्षाला सोडावे लागले त्याचं दु:ख होतंय. महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाचा तो निर्णय होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गैरविश्वास पसरवला गेला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेते एकत्र आले. निवडणुकीच्या पराभवानंतर मी डगमगलो नाही. दुसऱ्या दिवसापासून समाजहिताची करत आलो.कोरोना काळात काम केलं. विकासाची काम केलं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे या सर्वांच्या आशीर्वादानं गेल्या दोन वर्षामध्ये शहरासाठी 237 कोटी रुपये, रंकाळ्यासाठी निधी आणला. पर्यटनासाठी निधी आणला. नगरविकास विभागाकडून निधी आणला. या पोटनिवडणुकीत मी निवडणूक लढवावी, असा निर्णय शिवसैनिकांनी घेतला होता. एक्झिट पोल शिवसेना विजयी होणार असं सांगत होता. खरोखरचं तिरंगी लढत व्हायला पाहिजे होती. शिवसेनेची ताकद काँग्रेसला समजली होती. 13 मार्चला आपण मेळावा घेतला, त्यावेळी शिवसेनेनं ही निवडणूक लढवावी, असं मत मांडलं होतं.

    काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेला डावलत भाजपला सोबत का घेतलं याचं उत्तर देण्याची गरज आहे. उदय सामंत आणि अरुण दुधवडकर यांनी जिल्हा बँकेतील भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादीची यूती होत असेल तर शिवसेना संपर्क प्रमुखांनी आपली बाजू पक्षनेतृत्त्वाला पटवून द्या.ला हवं होतं. महापालिकेत त्यांना यूती नको, पंचायत समितीत यूती नको, नगरपालिकेत यूती नको असताना शिवसैनिकांना युती कधी मिळणार, असं राजेश क्षीरसागर म्हणाले. 6 मे 1986 पासून मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत राहिलो.

    2019 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांनी मला नियोजन मंडळाचं अध्यक्ष दिलं हे मी विसरु शकत नाही. आजची परिस्थिती वेगळी आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती झाली. त्यावेळी मला मंत्रिपद दिलं असतं तर मी शिवसेनेचे  6 ते 8  आमदार करुन दाखवले असते. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडावा लागतं असलं तरी दु: ख वाटतंय. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केलं पाहिजे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्याशी प्रामाणिक होतो आणि राहणार आहे.

    दोन दिवसांपासून काँग्रेसला मतदारसंघ सोडल्यामुळं कार्यकर्ते  आणि पदाधिकाऱ्यांची जी भावना आहे.  ती उद्धव ठाकरे यांना कळवली आहे.  2024 ला ही जागा आपल्याला मिळेल, असं वरिष्ठांनी सांगितलं आहे. त्यामुळं पक्ष आदेशाप्रमाणं काम करुया असं राजेश क्षीरसागर  म्हणाले.

    कोल्हापूर म्हणलं की माझं नाव निघतं : राजेश क्षीरसागर

  • 20 Mar 2022 06:48 PM (IST)

    नॉट रीचेबल माजी आमदार राजेश क्षीरसागर अखेर कोल्हापूर मध्ये दाखल

    दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असलेले माजी आमदार राजेश क्षीरसागर अखेर कोल्हापूर मध्ये दाखल

    शनिवार पेठेतील शिवालय कार्यालयात समर्थक ही जमले

    क्षीरसागर काय भूमिका घेणार याकड लक्ष

    कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून क्षीरसागर होते इच्छुक

    शिवालय कार्यालयाबाहेर शिवसैनिक जमले

    घोषणाबाजी सुरू आहे

  • 20 Mar 2022 06:19 PM (IST)

    MIM चा प्रस्ताव शरद पवार यांनी धुडकावला

    MIM चा प्रस्ताव शरद पवार यांनी धुडकावला आहे. एमआयएमला सोबत घेण्यास शरद पवार यांनी धुडकावला आहे. राज्यात दोन दिवस सुरु असलेल्या चर्चा यामुळं थांबण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षासोबत जायचं ते सांगू शकतात. मात्र, ज्या पक्षासोबत जायचं त्यांनी हो म्हटलं पाहिजे. हा  राजकीय निर्णय आहे, हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राज्याला तो निर्णय घ्यायचा अधिकार नाही. राष्ट्रीय समिती यासंदर्भात निर्णय घेत नाही तोपर्यंत राज्य यासंदर्भात निर्णय घेऊ शकत नाही, असं शरद पवार म्हणाले. हा आमच्या दृष्टीनं विषय संपला आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.  राज्याला यासंबंधीचा निर्णय घेऊ शकता हे राष्ट्रीय समिती स्पष्ट करत नाही तोपर्यंत कुठल्याही राज्यात हा निर्णय घेता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहे, पण आमच्या दृष्टीनं आणि माझ्या दृष्टीनं हा विषय संपल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

  • 20 Mar 2022 06:00 PM (IST)

    गिरीश महाजन यांच्या घराच्या परिसरात घुसला पाकिटमार, कार्यकर्त्यांनी चोप दिला

    गिरीश महाजन यांच्या घराच्या परिसरात घुसला पाकिटमार, कार्यकर्त्यांनी चोप दिला

    माजी नगरसेवक यांच्या खिशातील पैसे चोरण्याचा प्रयत्न..

    कार्यकर्त्यांनी दिला चोरट्याला चोप

  • 20 Mar 2022 05:40 PM (IST)

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना मातृशोक

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री सुमित्राबाई गोविंदराव ठाकरे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 102 व्या वर्षी यवतमाळ येथे दुःखद निधन झाले, त्यांच्या पश्चात एक पुत्र माणिकराव ठाकरे, तीन मुली, नातवंड असा आप्त परिवार आहेत. त्यांचे पार्थिवावर त्यांचे गावी हरू ता दारव्हा जि यवतमाळ येथे दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 10 वाजता, अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

  • 20 Mar 2022 05:23 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांना भाजपने दिलेला त्रास विसरू नका: ऋतुराज पाटील

    ‘शिवसैनिकहो खटक्यावर बोट जाग्यावर पलटी करायची वेळ आलीय’

    काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांचं खणखणीत भाषण

    उद्धव ठाकरे यांना भाजपने दिलेला त्रास विसरू नका- ऋतुराज पाटील

    शरद पवार साहेबांनी भाजपला पुन्हा येऊ देणार नाही असा विश्वास दिलाय

  • 20 Mar 2022 04:52 PM (IST)

    शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणूका जिंकली : देवेंद्र फडणवीस

    – शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणूका जिंकली,

    – आणि सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलेत, त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये,

    – त्यांनी एमआयएमसोबत जावं किंवा नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांचे लोकं आज जनाब बाळासाहेब ठाकरे बोलतायत, अजान स्पर्धा घेतायत,

  • 20 Mar 2022 04:31 PM (IST)

    एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचाही विरोध : बाळासाहेब थोरात

    – कट्टरवाद कोणताही असो तो आम्हाला मान्य नाही,

    – लोकशाहीचे मूलभूत तत्व मानणारी लोकं पाहिजेत,

    – समविचारी मध्ये घटनेचे तत्व मानले पाहिजेत, एका समाजासाठी नाही, त्यात एमआयएम बसत नाही,

    – एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचाही विरोध,

    – उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत मांडलं आहे, भाजपचा जसा कट्टरतावाद आहे तसा त्यांचा आहे,

  • 20 Mar 2022 04:05 PM (IST)

    कोणी कोणता रंग घेतला हे महत्त्वाचं नाही : पंकजा मुंडे

    कोणी कोणता रंग घेतला हे महत्त्वाचं नाही

    मराठवाड्याच्या खासदारांनी त्यांच्या मातेला गमावलं

    मी त्यांच्या सांत्वनासाठी आले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या

  • 20 Mar 2022 03:51 PM (IST)

    विदर्भात मागील 24 तासात तापमानात घट

    विदर्भात मागील 24 तासात तापमानात घट झाली असून , जवळपास 2 डिग्री तापमान खाली आलं आहे ,

    विदर्भात हिट वेव्हज ची स्थिती हळूहळू संपत आहे त्यामुळे हिट वेव्हज इशारा रद्द करण्यात आला

    चंद्रपूर सोडता इतर जिल्ह्यात तापमान 40 च्या खाली आलं , त्यामुळे हिट वेव्हज चा इशारा रद्द करण्यात आला

    बंगालच्या खाडी कडून येणाऱ्या हवे मुळे मोश्चर वाढलं असून ढग जमायला सुरवात झाली .. काही भागात ढगाळ वातावरण राहील

    येणाऱ्या पुढील पाच दिवस पर्यंत तापमान  सामान्य राहील

    नागपूर हवामान विभागाचा अंदाज ..

  • 20 Mar 2022 02:41 PM (IST)

    इम्तियाज जलील शरद पवार यांना भेटणार 

    इम्तियाज जलील शरद पवार यांना भेटणार

    शरद पवार यांना भेटून परिस्थिती सांगू

    वेळ पडल्यास उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊ

  • 20 Mar 2022 02:25 PM (IST)

    सत्तेसाठी काहीही करण्याची सेनेची तयारी  : प्रविण दरेकर 

    – सत्तेसाठी काहीही करण्याची सेनेची तयारी  : प्रविण दरेकर

    – हिंदुत्व आमच्यापासून कोसो दूर गेलं आहे, म्हणून सेनेला हे करावं लागतंय,

    – संजय राऊत हे काहीही बोलू शकतात, त्यांना तो अधिकार आहे,

    – अजान स्पर्धा घेतल्या जातात, शिवसेनेचे स्वरूप बदलत चाललं आहे,

    – मुख्यमंत्री राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार आहेत, याचं मी स्वागत करतो, आणि उशिरा का होईना मुख्यमंत्री अडीच वर्षांनंतर जवळून बघायला मिळणार आणि त्याचा आनंद होणार, मात्र त्यांनी मंत्रालयात तरी बसायला हवं होतं,

  • 20 Mar 2022 02:11 PM (IST)

    शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरु होणार, मराठवाडा विदर्भावर लक्ष

    शिवसेना शिव संपर्क अभियान खासदार संजय राऊत यांच्या कडे नागपूर ची जबाबदारी , संजय राऊत नागपुरातून विदर्भावर लक्ष केंद्रित करणार

    मुख्यमंत्र्यांनी खासदार आणि जिल्हा प्रमुखांना केल्या सूचना जनते पर्यंत पोहचून सरकार ची कामे पोहचावा

    शिवसेने च हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे , शिवसैनिक आणि जनते पर्यंत पोहचवा असे निर्देश

  • 20 Mar 2022 01:48 PM (IST)

    उल्हासनगरात धुळवडीच्या दिवशी एका इसमाची दगडाने मारहाण करत हत्या

    उल्हासनगरात धुळवडीच्या दिवशी एका इसमाची दगडाने मारहाण करत हत्या

    उल्हासनगर पोलिसांनी काही तासातच ठोकल्या आरोपीला बेड्या

    कुंदनमल दुलीचंद सुनगत (४१) असं हत्या झालेल्या इसमाचं नाव

    रुपराज उर्फ भाई राजा पाटील या मुख्य आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    किरकोळ कारणावरून धोबीघाट परिसरात झाली होती इसमाची हत्या

  • 20 Mar 2022 01:17 PM (IST)

    एमआयएमकडून आलेली ऑफर हा एक कटाचा भाग आहे – संजय राऊत

    उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं

    जोरदार असं मार्ददर्शन केलं आहे

    नागपूरला मी जातोय

    गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही १९ जिल्ह्याच्या दोऱ्यांवर जाणार

    काश्मीरमध्ये अतिरेख्यांशी हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं

    काश्मीरमधल्या हुत्मात्माचा अपमान केला

    मोहन भागवंतानी म्हणाले होते. मुस्लीमांना विरोधक करणारे ते हिंदू नाहीत

    भारतीय पक्षाचं कारस्तान

    शिवसेनेची बदनामी करा

    आम्ही कुठे तुमच्याकडे आलोय,

    भारतीय जनता पक्षाच चुपा संबंध

    अनेक विषयांवर चर्चा

    सगळे खासदार दौऱ्यावर

    गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही सगळे दौऱ्यावर

    शिवसेना  प्रखर हिंदूत्ववादी पक्ष आहे, आणि तो कायम राहिल

    आमच्या हिंदूत्वावर कोणी शंका उपस्थित केली हे आम्हाला माहित आहे

    भाजपाचा कट आम्ही उधळून लावला

  • 20 Mar 2022 01:04 PM (IST)

    बीड येथील पती पत्नीला मारहाण करून ऐवज लुटला

    बीड येथील पती पत्नीला मारहाण करून लुटले, सशस्त्र दरोडा

    वाशी येथील औरंगाबाद – सोलापूर येथील हायवे वरील घटना

    10 ते 15 जणांच्या टोळक्याने गाडी अडवून मारहाण करित लुटले

    बीड येथील विशाल बडे व वर्षा बडे या दाम्पात्याला दगड लोखंडी रॉडने मारहाण

    बार लोणी पारधी पेढी येथील 14 जणावर गुन्हा नोंद

    कलम 395,427,324,323 अन्व्ये 14 जणांसह इतरावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

    दरोड्यात 6 हजार व 3 तोळे सोन्याचे दागिने लुटले, पोलीस तपास सुरु

    14 जणांना पोलिसांनी केले अटक, 8 महिला व 6 पुरुष यांना केली अटक

    पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांची माहिती

  • 20 Mar 2022 12:33 PM (IST)

    दादांनी मला भाजप कडून लढण्याची विनंती केली होती – जयश्री जाधव

    चंद्रकांत जाधव यांची स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वास महाविकास आघाडीने माझ्यावर दाखवला त्याबद्दल नेत्यांचे आभार मानते

    कोल्हापूर चा विकास व्हावा,रोजगार मिळावा,शाहू मिल सारखे प्रश्न मार्गी लागावा असा आराखडा त्यानी तयार करून ठेवला होता

    अण्णा नंतर जनतेचं मला धीर दिला

    आण्णा म्हणून उभे राहा आम्ही पाठीशी राहू असा विश्वास जनतेने मला दिलाय

    दादांनी मला भाजप कडून लढण्याची विनंती केली होती

    पण अण्णांनी झेंडा हाती घेतला त्याच्या पूर्तता मला केली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं

    तुम्ही सहकार्य करा अशी विनंती मी केली पण त्यांनी तस केलं नाही

    स्त्रियांना प्राधान्य द्यायची कोल्हापूरची परंपरा आणि दादांनी तसं करायला हवं होतं

    दादांनी ही वाटत होतं मी आमदार व्हावं आता त्यांनी सहकार्य केल असत तर नक्कीच बर वाटल असत

    क्षीरसागर यांच्याशी माझं बोलणं झालं नाही

    पण ते महाविकास आघाडी म्हणून सोबत राहतील असा विश्वास आहे

  • 20 Mar 2022 12:32 PM (IST)

    इम्तियाज जलील घेणार शरद पवारांची भेट

    इम्तियाज जलील घेणार शरद पवारांची भेट

    महविकास आघाडीत सामील होण्यासाठी घेणार शरद पवारांची भेट

    असदुद्दीन ओवैसी यांना सोबत घेऊन घेणार शरद पवारांची भेट

    लोकसभा अधिवेशनाच्या कालावधीत दिल्लीत भेट घेणार आसल्याची माहिती

    वेळ पडल्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही भेटणार असल्याची दिली माहिती

  • 20 Mar 2022 11:44 AM (IST)

    शिवसेनेची शिव संपर्क अभियान सुरू होत आहे

    पक्ष संघटना मजुबत करणे हे आहेत

    काही जण शिवसेनेची हिदुत्वा बद्दल शका घेत असताना त्यांना दाखवायचे आहे

    हिंदुत्वाचा गजर आम्ही उठवणार आहोत

    केलेली कामे लोकांपृत पोहोचवण्याचे काम करणार आहोत

    मुख्यमंत्री व्हीसी द्वारे मार्गदर्शन करणार आहेत

    ऑन भगवद गीता

    हिंदुत्व हा आमचा श्वास आहे हे बाळासाहेब यांनी आधी सागितले

    मतासाठी हा अभ्यास क्रम घालण्यापेक्षा आम्ही हिंदुत्वाचा जागर करत आहोत

    भगवदगीता ज्ञानेश्वरी हे महत्वाचे आहे

    शिवसेनेचे हिंदुत्व आणि भाजपचे बेगडी हिंदुत्व यात फरक आहे

    यांचे हिंदुत्व मतासाठी आहे

  • 20 Mar 2022 11:44 AM (IST)

    सोनिया गांधी या सर्वावर मात करुन परिस्थिती पलटवण्यात त्या यशस्वी होतील – सुशीलकुमार शिंदे

    – सोनिया गांधी या सर्वावर मात करुन परिस्थिती पलटवण्यात त्या यशस्वी होतील

    – देशात धा आर्मिकणि जातीय शक्तींचा प्रभाव, विचार देशात वाढतोय. तो घटविण्याचे काम कॉंग्रेसलाच करावे लागेल

    – तात्पुरत्या कारणाने जे कॉंग्रेस सोडून गेले त्यांना परत आणण्याला पक्षाने प्राधान्य दिले पाहिजे

    – देशात सर्वधर्मसमभाव मानणारी नवी फळी उभारण्याची गरज आहे. त्यातूनच कॉंग्रेस विचाराचा तरुण उभा राहील

    – तरुणांना कॉंग्रेसने कार्यक्रम दिला पाहिजे, त्यासाठी शिबिरे, व्याख्याने, बैठकांचे नियमित आयोजन करणे आवश्यक आहे

    – 20-30 वर्षापुर्वी जशी परिस्थिती होती तसे कॉंग्रेसने पुढे येणे गरजेचे

  • 20 Mar 2022 11:43 AM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये सत्यता – रावसाहेब दानवे

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये सत्यता आहे, अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलाय

    तिकडून एखादा आरोप झाला की आम्ही पुढचे पेनड्राईव्ह बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिलाय

    पेन ड्राइवमध्ये सत्यता नव्हती तर मग ऍड प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला? असा सवालही रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केलाय, पेनड्राईव्ह मध्ये सत्यता आहे म्हणूनच त्याची चौकशीची मागणी आम्ही केली आहे, त्यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

  • 20 Mar 2022 10:52 AM (IST)

    संत तुकारामांची देहूनगरी वारकऱ्यांनी सजली

    संत तुकारामांची देहूनगरी वारकऱ्यांनी सजली

    तुकाराम महाराज बीज सोहळ्याला वारकऱ्यांची गर्दी

    ड्रोन कँमेऱ्यातून टीव्ही 9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास दृश्य

  • 20 Mar 2022 10:03 AM (IST)

    पुण्यातील कात्रजची बाग अर्थात राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आजपासून सुरू

    – पुण्यातील कात्रजची बाग अर्थात राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आजपासून सुरू,

    – कोरोनामुळे दोन वर्षे प्राणी संग्रहालय बंद होते,

    – आशियाई सिंहासह,शेकरु,वाघाटी मांजर हे नवे प्राणी बघायला मिळणार,

    – पहिल्याच दिवशी पुणेकर पर्यटकांची गर्दी,

    – येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार

  • 20 Mar 2022 10:01 AM (IST)

    पाकव्यात काश्मीर भारताला कधी जोडताय तेही पाहावं लागेल – संजय राऊत

    पण खरं लपवलं गेलंय

    काश्मीरच्या विषयावर चित्रपट आलाय

    भाजपाची लोक त्याचा प्रचार करीत आहे

    ज्यांनी फिल्म तयार केलीय त्यांना पुरस्कार मिळतील

    काश्मीरच्या पंडीतांवरती तिथं अन्याय झाला आहे

    बाळासाहेब ठाकरेंच्या मनात काश्मीर पंडीतांसाठी जागा होती

    पाकव्याप काश्मीर भारतात आणण्याचा वादा पुर्ण करावा

    काश्मीर फाईल्स चित्रपटात सत्य लपवण्यात आलंय

    काश्मीरमधील जोर ओसरतोय

    अनेक गोष्टी चुकीच्या दाखवण्यात आल्या आहेत

    ज्यांना पाहायचा आहे, ते पाहतील

    काश्मीरसाठी अनेकांचं योगदान आहे

    काश्मीर पंडीतांची घर वापसी कधी होणार

    पाकव्यात काश्मीर भारताला कधी जोडताय तेही पाहावं लागेल

  • 20 Mar 2022 09:39 AM (IST)

    राज्यातील शिक्षकांच्या बदल्या होणार आता ऍपच्या माध्यमातून

    – राज्यातील शिक्षकांच्या बदल्या होणार आता ऍपच्या माध्यमातून,

    – शिक्षकांच्या बदल्यांसाठी विकसित करण्यात येत असलेल्या ॲपचा मसुदा तयार,

    – येत्या दोन आठवड्यांत या ॲपचे काम पूर्ण होणार,

    – शिक्षकांच्या बदल्या या ॲपच्या माध्यमातून येत्या मे महिन्यात ऑनलाइन होणार,

    -ग्रामविकास विभागाची माहिती

  • 20 Mar 2022 08:45 AM (IST)

    गडचिरोली अहेरी पोलिसांची अवैध दारू तस्करीवर मोठी धाड

    गडचिरोली अहेरी पोलिसांची अवैध दारू तस्करीवर मोठी धाड

    आलापल्ली ग्रामपंचायत परिसरात काल रात्री जवळपास सात ठिकाणी अवैद्य देशी दारू तयार करीत असलेल्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली

    अवैध देशी दारू तयार करणाऱ्या दारू अड्डे उध्वस्त करण्यात आले

    जवळपास 27 देशी दारू विक्रेत्यांना अटक केली आहे

    अहेरी पोलीस स्टेशनची कारवाई

  • 20 Mar 2022 08:45 AM (IST)

    बंगालच्या उपसागरातील कमी दाब्याच्या पट्यामुळे चक्रीवादळाचा कोकणाला धोका नाही

    रत्नागिरी-  बंगालच्या उपसागरातील कमी दाब्याच्या पट्यामुळे चक्रीवादळाचा कोकणाला धोका नाही

    जिल्हा प्रशासनाचे सष्टीकरण

    सोशल मिडियावरून चक्रीवादळाच्या धोक्याची बातमी परसत असल्याने प्रशासनाकडून सष्टीकरण

    हवामान खात्यानं सुद्दा कोकणात तुरळ पावसाचाा दिलाय इशारा

    किनारपट्टीवर कोकणतेच चक्रीवादळ थडकणार नसल्यानं नागरिकांनी घाबरून जावू नये

  • 20 Mar 2022 08:43 AM (IST)

    इचलकरंजी सह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा

    इचलकरंजी सह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा

    वादळी वाऱ्यामुळे झाडे पडली घराचे पत्रे उडून गेली नागरिकांचे मोठे नुकसान

    इचलकरंजी शहर संपूर्ण अंधारामध्ये  झाडे पडल्यामुळे महावितरणची वाहिनीचे मोठे नुकसान

    नगर पालिका प्रशासनाकडून अजुनी झाडे तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत

  • 20 Mar 2022 08:43 AM (IST)

    गोव्यात भाजपला सरकार स्थापनेचा मुहूर्त अखेर सापडला

    गोव्यात भाजपला सरकार स्थापनेचा मुहूर्त अखेर सापडला

    24 तारखेला मुख्यमंत्र्यांसह 11 मंत्र्यांचा शपथविधी

    डॉ. प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत दिल्लीत खलबते

    23 तारखेला केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर आणि एल मुरूगन गोव्यात येणार

    विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडणार

    24 तारखेला शपथविधी

    गोव्यात भाजपला पहिल्यांदाच 20 आमदारांचे स्पष्ट बहुमत मिळाल्याने गोमंतक जनतेच्या साक्षीने शपथविधी सोहळा करण्याची तयारी

    श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार शपथविधी सोहळा

    अपक्ष आमदारांसह महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षालाही मिळू शकते मंत्री पद

  • 20 Mar 2022 08:42 AM (IST)

    डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती..

    डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती..

    अँकर -प्रति देहू समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत साजरा होणार… दुपारी १२ वाजता श्रींच्या मूर्तीवर गुलाल पुष्पवर्षाव केला या बीज उत्सव सोहळ्यासाठी पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातून ५० हजारांहून अधिक भाविक येतात. यामुळे याठिकाणी 70 हजार स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे..

  • 20 Mar 2022 08:02 AM (IST)

    औरंगाबादच्या विभागीय माहिती आयोग खंडपीठातील स्थिती

    माहिती अधिकाराची 15 हजार प्रकरणे सुनावणीसाठी प्रलंबित

    औरंगाबादच्या विभागीय माहिती आयोग खंडपीठातील स्थिती

    पूर्ण वेळ माहिती आयुक्त नसल्यामुळे खोळंबली 15 हजार प्रकरणे

    मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील 15 हजार प्रकरणे प्रलंबित

  • 20 Mar 2022 08:02 AM (IST)

    विदर्भातील रस्ते विकासासाठी 831 कोटीच्या प्रकल्पांना मंजुरी

    विदर्भातील रस्ते विकासासाठी 831 कोटीच्या प्रकल्पांना मंजुरी

    महाराष्ष्ट्रात 2252 कोटीच्या कामाचा समावेश

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

    महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बांधण्यात येणाऱ्या महामार्गाच्या कामाना मंजुरी

    त्यात विदर्भातील तीन प्रकल्पांचा समावेश

    यामुळे दळणवळण व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे

  • 20 Mar 2022 07:59 AM (IST)

    यंदाचा ऊस गाळप हंगाम ३१ मे अखेरपर्यंत चालणार

    – यंदाचा ऊस गाळप हंगाम ३१ मे अखेरपर्यंत चालणार,

    – साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील गाळप संपले तरी त्यांनी परिसरातील उसाचे गाळप करण्याच्या सूचना,

    – राज्यात यंदा सुमारे एक हजार २५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज,

    – साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती

  • 20 Mar 2022 07:59 AM (IST)

    यूरोपात वाढत्या कोरोना संसर्गानं राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

    यूरोपात वाढत्या कोरोना संसर्गानं राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

    सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना

    पुण्याचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक

    बंद झालेल्या कोरोना आढावा बैठक पुन्हा सुरू होणार..

    राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांच्या अलर्ट राहण्याच्या सूचना !

  • 20 Mar 2022 07:54 AM (IST)

    यवतमाळमध्ये महिलेचा गळा चिरला

    यवतमाळ मध्ये महिलेचा गळा चिरला

    गळा चिरून महिलेला रस्त्यावर फेकले

    धामणगाव बायपास वरील घटना

    महिलेची प्रकृती चिंताजनक

    शहर पोलिसात गुन्हा दाखल

    अर्चना क्षीरसागर असे जखमी महिलेचे नाव

  • 20 Mar 2022 07:54 AM (IST)

    नागपूरकरांना या वर्षी उन्हाळ्यात पाण्याची चिंता नाही

    नागपूरकरांना या वर्षी उन्हाळ्यात पाण्याची चिंता नाही

    शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणात उन्हाळ्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा मुबलक साठा उपल्बध

    64 टक्के पाणी तोतलाडोह मध्ये

    53 टक्के कामठी खैरी धरणात

    50 टक्के खिंडशी धरणात

    पाणी साठा उपलब्ध असला तरी पाण्याचं योग्य नियोजन आवश्यक

  • 20 Mar 2022 07:32 AM (IST)

    पदव्युत्तर पदवी न घेता करता येणार पीएचडी

    पदव्युत्तर पदवी न घेता करता येणार पीएचडी

    युजीसीचं नवं शैक्षणिक धोरण, मसुदा केला तयार

    बारावीनंतर पदवी तीन वर्षाऐवजी चार वर्ष करण्याचा प्रस्ताव

    थेट पीएचडीला घेता येणार प्रवेश

    प्रस्तावावर मागवल्या 31 मार्चपर्यंत सूचना,

    मसुदा यूजीसीनं संकेतस्थळावर केला प्रसिद्ध !

  • 20 Mar 2022 07:02 AM (IST)

    वानखेडे आवारात 109 अधिकृत स्वाक्षरी करणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित होते

    – वानखेडे आवारात 109 अधिकृत स्वाक्षरी करणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित होते

    – मिलिंद नार्वेकर आणि नीलेश भोसले यांची गव्हर्निंग कौन्सिलवर नियुक्ती

    – दिलीप वेंगसरकर बीसीसीआयमध्ये एमसीएचे प्रतिनिधित्व करणार आहेत

    – CIC ने नवीन CIC नियुक्त करण्यासाठी सर्वोच्च परिषदेला दिलेले अधिकार रद्द केले

    – दिलीप भोसले यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश लोकपाल म्हणून नियुक्ती

    – 3 वर्षांची खाती प्रलंबित असल्याने खाती पुढील बैठकीसाठी पुढे ढकलली

  • 20 Mar 2022 07:01 AM (IST)

    राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?

    बुलडाणा

    राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?

    आशा सेविकांना कुटुंब नियोजन किटमध्ये दिले चक्क रबरी लिंग,

    आशा वर्कर नाराज असल्याची माहिती,

    गावात प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी देण्यात आले लिंग,

    ग्रामीण भागातील महिलांना प्रात्यक्षिक दखवण्यासाठी वाटण्यात आले लिंग

  • 20 Mar 2022 07:01 AM (IST)

    उस्मानाबाद येथे सायकलोथॉन या स्पर्धेचे आयोजन

    उस्मानाबाद येथे सायकलोथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला आज मोठ्या उत्साहत सुरुवात झाली , उस्मानाबाद येथे प्रथमच या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने यात ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले सहभागी झाले होते. सायकलिंग स्पर्धे या 25,50 व 100 किमी या गटात होत आहेत. मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

  • 20 Mar 2022 07:00 AM (IST)

    पैठणच्या प्रसिद्ध नाथशष्टी यात्रेला अखेर मिळाली परवानगी

    औरंगाबाद

    पैठणच्या प्रसिद्ध नाथशष्टी यात्रेला अखेर मिळाली परवानगी

    शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांच्या मध्यस्थी नंतर मिळाली परवानगी

    पैठणच्या एकनाथ मंदिरात अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत यात्रेला परवानगी देण्याचा निर्णय

    23 तारखेला पार पडणार पैठणची नाथशष्टी यात्रा

    नाथशष्टी यात्रेसाठी किमान पाच लाख लोक जमण्याची शक्यता

    यात्रेची सर्व तयारी करण्याचे संदीपान भुमरे यांचे प्रशासनाला आदेश

  • 20 Mar 2022 06:32 AM (IST)

    पंकजा मुंडे यांनी मध्यरात्री सुप्रसिद्ध गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला

    चहाचा आस्वाद… औरंगाबाद कडे जाताना शेवगाव येथे मध्यरात्री 12 वा. सुमारास कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून एका चौकात अमजद पठाण यांच्या सुप्रसिद्ध गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला.

  • 20 Mar 2022 06:28 AM (IST)

    वन विभागाच्या सप्तशृंगी मंदिर असलेल्या डोंगरावर भीषण आग

    मालेगावच्या करंजगव्हाण ते दहिदी दरम्यान हाताने शिवारात येणाऱ्या वन विभागाच्या सप्तशृंगी मंदिर असलेल्या डोंगरावर भीषण आग लागली असूनआगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

    परंतु या आगीने रौद्र रूप धारण केले असून संपूर्ण डोंगर ज्वाळांनी घेरलेला दिसून येत होता. व्हिडिओमध्ये हे भयानक दृश्य स्पष्टपणे दिसत असून या डोंगराच्या आज बाजूला गरीब वस्त्या आहेत त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

    घटनास्थळी मालेगांव अग्निशमन विभागाचे ४ बंब पोहोचले असून त्यांनी आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांनी अग्निशमन विभागाला कळवलं.

  • 20 Mar 2022 06:27 AM (IST)

    उल्हासनगरात महिलेची हत्या करणाऱ्याला अखेर बेड्या

    उल्हासनगरात महिलेची हत्या करणाऱ्याला अखेर बेड्या

    लिव्ह इन जोडीदाराने मारहाण करून केली होती हत्या

    विठ्ठलवाडी पोलिसांनी इगतपुरीहून घेतलं ताब्यात

  • 20 Mar 2022 06:26 AM (IST)

    बदलापूरच्या बारवी धरण परिसरात जंगलाला भीषण वणवा

    बदलापूरच्या बारवी धरण परिसरात जंगलाला भीषण वणवा

    वणवा लागल्यानं वनसंपदेचं प्रचंड नुकसान

    वणवा लागल्याबाबत वन विभाग अद्याप अनभिज्ञ

    स्थानिकांकडून वणव्याची भीषणता दाखवणारे व्हिडिओ आले समोर

Published On - Mar 20,2022 6:20 AM

Follow us
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.