Maharashtra News Live Update : दर महिन्याला निवडणुका लावा, म्हणजे महागाई वाढणार नाही, सुळेंचा केंद्राला टोला

| Updated on: Mar 23, 2022 | 10:44 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : दर महिन्याला निवडणुका लावा, म्हणजे महागाई वाढणार नाही, सुळेंचा केंद्राला टोला
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज बुधवार 23 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल डिझेस, एलपीजी गॅसच्या किमती वाढत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त आहे. त्यात आज पुन्हा पुण्यात पेट्रोल दर वाढ करण्यात आली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Mar 2022 09:07 PM (IST)

    रश्मी शुक्लांविरोधात नाना पटोले आक्रमक

    रश्मी शुक्लाविरोधात 500 कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

    फोन टँपिग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

  • 23 Mar 2022 09:07 PM (IST)

    कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीतून आम आदमी पार्टीची माघार

    आप कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवणार नाही

    प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांची पत्रक काढून माहिती

    पोट निवडणूक लढवण्यासाठी आप कडून करण्यात आली होती चाचपणी

    मात्र कोणतीच पोटनिवडणूक न लढविण्याचा आम आदमी पार्टीचा धोरणात्मक निर्णय

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र आप ताकतीने लढवणार

  • 23 Mar 2022 09:06 PM (IST)

    रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार

    अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार .. नर जातीच्या बिबट्याला रेल्वेरूळ ओलांडताना धक्का लागल्याने मृत्य.. घटनेची माहिती मिळताच राहुरी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि शवविच्छेदन करत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत..

  • 23 Mar 2022 09:05 PM (IST)

    बीड: शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात कुत्रा घुसला

    कुत्रा घुसल्याने काही काळ तणाव

    साउंडबॉक्स मुळे कुत्रा बिथरला

    मुंबईचे नगरसेवक भाषण करताना कुत्रा भर सभेत शिरला

  • 23 Mar 2022 07:58 PM (IST)

    नाशिकच्या राणेनगर येथील उड्डाण पुलावरती तीन वाहनांचा अपघात

    – अपघातात रस्त्याच्या डिव्हाईडर वरती झोपलेल्या एकाचा मृत्यू – घटनास्थळी अंबड पोलीस दाखल

  • 23 Mar 2022 07:36 PM (IST)

    घणसोलीत मोकळ्या भुखडात असलेल्या झाडाला लागली आग

    सत्यम इंपेरील हाइट्स इमारतीसमोरील मोकळ्या भूखंडावर झाडांना आग लागली

    अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

    आग विझवण्याचे प्रयत्न

    आगच कारण अद्याप ही असष्ट

  • 23 Mar 2022 07:10 PM (IST)

    चिदंबरम पिता-पुत्रांना कोर्टाचा दिलासा

    कोर्टाकडून नियमित जामीन मंजूर

    एअरसेल मॅक्सिस प्रकरणात माजी गृहमंत्री पी चिदंबरम आणि मुलगा कार्तिक चिदंबरम यांना कोर्टाकडून जामीन मंजूर

    मात्र पिता पुत्राची ईडी आणि सीबीआयकडून पुन्हा चौकशी होण्याची शक्यता

  • 23 Mar 2022 07:02 PM (IST)

    दोन वर्षानंतर कोरोनाबाबतचे सगळे नियम हटवले

    आता फक्त सोशल डिस्टंसिंग आणि मास्क गरजेचा

    केंद्र सरकारने निर्बंध संपूर्ण संपुष्टात आणण्याची घोषणा केली

    मास्क लावण्याचा नियम मात्र कायम असणार

    येत्या 31 मार्च पासून देशातील कोरोना निर्बंध संपणार

    केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्व हठवली जाणार

  • 23 Mar 2022 07:02 PM (IST)

    एच के पाटील यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

    कॉंग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीच्या आढावा बैठकीत प्रभारी एच के पाटील यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

    प्रदेश कॉंग्रेसला मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 1 कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले होते

    शेवटचा आठवडा राहिला असताना दहा लाख सदस्यांचा टप्पा देखील प्रदेश कॉंग्रेस पूर्ण करु शकले नाही

    यावरुन दिल्लीतील हायकमांडकेडे काय स्पष्टीकरण द्यायचे असा सवाल देखील याबैठीत एच के पाटील यांनी उपस्थित केलाय

    महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगाना आणि कर्नाटकची कामगिरी चांगली आहे, मग महाराष्ट्रात इतका निरुत्साह चांगला नसल्याची खंत पाटील यांनी बोलून दाखवली

  • 23 Mar 2022 07:00 PM (IST)

    किरिट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरून कोकणात वातावरण तापले

    रत्नागिरी – 26 मार्च रोजी होणाऱ्या किरिट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरून कोकणात वातावरण तापले

    सोमय्या यांनी येऊन दाखवावे, आम्ही त्यांना रोखणार – माजी आमदार संजय कदम

    कोकण म्हणजे गुजरात नव्हे – कदम

    26 तारीखला आल्यावर सोमय्या यांना रोखणार – कदम

    राजकारण होत असल्याने पर्यटनावर परिणाम – कदम

  • 23 Mar 2022 06:10 PM (IST)

    डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण सुनावणी अपडेट

    – 29 मार्चला पुढची सुनावणी होणार,

    – सरकारी पक्षाच्या साक्षीदाराची उलटतपासणी सुरूच राहणार,

    – आज आरोपींच्या वकिलाकडून सुरू असलेली साक्षादाराची उलटतपासणी अपूर्ण राहिल्याने 29 मार्चला पुढील सुनावणी होणार,

    – मागच्या सुनावणीत साक्षीदाराने प्रत्यक्ष मारेकऱ्यांना ओळखलं होतं

  • 23 Mar 2022 06:10 PM (IST)

    पिंपरी चिंचवडला एका मांजरीमुळं शंभर कोटींचा फटका बसलाय

    पिंपरी चिंचवडमधील महापारेशनच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आज मांजर घुसल्याने शहरातील बत्ती गुल झाली. विजेच्या धक्क्याने मांजरीच्या जागीच मृत्यू झाला. पण आकुर्डी, भोसरी, भोसरी एमआयडीसी भागातील साठ हजार ग्राहकांना याचा मोठा फटका बसला अशी माहिती माहापारेशन अधिकाऱ्यानी दिलीय.

  • 23 Mar 2022 06:09 PM (IST)

    बदलापूर रेल्वे स्थानकात एका तरुणाने एक्सप्रेस समोर मारली उडी

    रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान राखत तरुणाला वाचवलं

    संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत झाली कैद

  • 23 Mar 2022 05:32 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस Live

    महाविकास आघाडीचे वकील मंत्र्यांसोबत मिळून कट रचत आहेत

    मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होत नाही

    उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यावर झालेली कारवाई नियमानुसारच

  • 23 Mar 2022 05:06 PM (IST)

    सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळी पाऊस

    गडगडाटासह वादळी वारा व पाऊस. सावंतवाडी, कुडाळ व कणकवली तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसाने उडाली त्रेधातिरपीट. हवेत गारवा मात्र अवकाळी पावसामुळे बागायतदार चिंतेत.या अवकाळी पावसाचा आंबा व काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता.

  • 23 Mar 2022 05:05 PM (IST)

    विनायक राऊत यांच्या विरोधात ब्राम्हण समाज आक्रमक

    शेंडी जाणव्यातले हिंदुत्व आम्हाला नको असं वक्तव्य केल्यामुळे संताप

    विनायक राऊत यांनी 8 दिवसात माफी मागावी अन्यथा मातोश्रीवर धडकणार

    माफी नाही मागितली तर एप्रिल महिन्यात मातोश्रीवर धडकणार

  • 23 Mar 2022 04:38 PM (IST)

    गुरुनानक दरबारातील चोरी सीसीटीव्हीत कैद

    आधी देवाला हात जोडले, अन मग चांदीच्या पादुकाच चोरून नेल्या!

    उल्हासनगरच्या गुरुनानक दरबारातील चोरी सीसीटीव्हीत कैद

    पोलिसांकडून आरोपीला काही तासातच बेड्या

  • 23 Mar 2022 04:35 PM (IST)

    काश्मीर फाईल्सच्या शो वेळी नाशकात गोंधळ

    – भगवी शाल घालून प्रवेश नाकारल्यानं महिलांचा गोंधळ – कॉलेज रोडवरील पीव्हीआर सिनेमामध्ये घडला प्रकार – भगवी शाल घालून प्रवेश नाकारण्यात आल्यानं महिलांची जोरदार घोषणाबाजी – महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शो वेळी गोंधळ

  • 23 Mar 2022 04:13 PM (IST)

    प्रशासनाची वाळू माफियाविरोधात कारवाई

    चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात प्रशासनाची वाळू माफियाविरोधात कारवाई,

    उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी संजयकुमार डव्हळे  उतरले रात्रीच्या गस्तीवर,

    अवैध वाळू वाहतुक करणारे 3 हायवा केले जप्त,

    वाहनधारकांविरोधात साडेआठ लाख रुपये दंडाची कारवाई

  • 23 Mar 2022 04:12 PM (IST)

    महादेव जाणकर काय म्हणाले?

    उत्तर प्रदेश मध्ये 78 जागा लढवल्या

    6 मतदारसंघात शिवसेना राष्ट्रवादी पेक्षा जास्त मतदान

    राष्ट्रीय समाज पक्ष चार राज्यात चांगली मतं मिळाली

    राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या दिशेने काम सुरू आहे

    माझ्या उत्तर प्रदेश मध्ये शंभराहून अधिक सभा झाल्या

    चांगले उमेदवार मला मिळाले

    राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात देखील चांगलं काम करेल

  • 23 Mar 2022 03:21 PM (IST)

    नितेश राणे Live

    जो कायदा बाळासाहेबांनी मनोहर जोशींना लावला होता तोच मुख्यमंत्र्यांना लागणार का?

    संजय राठोडांना लागलेला कायदा आदित्य ठाकरेंना लागणार का?

    यांचे राजीनामे घ्या

  • 23 Mar 2022 03:18 PM (IST)

    किरीट सोमय्या Live

    संजय राऊत आणि सुजीत पाटणकर पार्टनर आहेत

    दोन्ही फॉरेनला मिळून जातात

    सामान्य लोकांच्या जावीशी पैसे खाण्यासाठी खेळत आहेत

  • 23 Mar 2022 03:16 PM (IST)

    किरीट सोमय्या Live

    याच्या आधीचे पाटणकरचे अनेक किस्से आहेत

    आदित्य ठाकरेंनी अनेक कंपन्यातून पैसा दिला

    माझ्याकडे सर्व पुरावे आहेत

    उद्धव ठाकरेंनी माफीय सेना उभा केली

    ईडी आपला तपास करत आहेत

    मी तुम्हीला पुरावे देतो

    कारवाई फक्त पाटणकरवर नाही बाकीचेही आत जाणार

    याचे उत्तर उद्धव ठाकरे का देत नाहीत?

    माफीयासेनेच्या लोकांना कमवून देत आहेत

    आदित्य ठाकरेंनी तीन कंपन्या एका व्यवसायिकाला दिल्या

  • 23 Mar 2022 03:15 PM (IST)

    किरीट सोमय्या Live

    संजय राऊत यांनी ही नौटंकी आधीही केली

    संजय राऊत यांची तक्रार खोटी होती

    हे कोर्टात सांगावं लागलं

    सरकारचे एकापाठोपाठ एक घोटाळे बाहेर येत आहे

    त्यामुळे केंद्रीय तापस यंत्रणावर दबाव आणत आहेत

    डझनभर नेते जेलमद्ये जाणार

    उद्धव ठाकरेंनी कितीही नौटंकी करु द्या

    उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याचा घोटाळा बाहेर आला ना

  • 23 Mar 2022 03:14 PM (IST)

    किरीट सोमय्या Live

    सुजीत पाटणकर विरोधात तक्रार दाखल केली आहे

    कोरोनाकाळात कोणताही अनुभव नसताना त्यांना कंत्राट दिलं

    उद्धव ठाकरेंना केवळ पैसे कमावयाचे म्हणून कंत्राट दिलं

    कोरोना होता म्हणून आम्ही शांत होतो, यावर आता कारवाई व्हायला हवी

  • 23 Mar 2022 02:45 PM (IST)

    अकोला जिल्हा परिषदेच्या बजेट सभेत राडा

    आज जिल्हा परिषदेची आज 2022 -23 ची बजेट सभा बोलाविण्यात आली होती….

    या बजेट सूची वाचण्यावरून शिवसेनेचे गोपाल दातकर यांनी घेतला आक्षेप…

    सूची ही सभापतींनी वाचावी, कॅफोने बजेट सूची वाचू नये यावरून गोपाल दातकर आणि गटनेता ज्ञानेश्वर सुलतानेंसह सभासदानी केला राडा….

  • 23 Mar 2022 02:34 PM (IST)

    नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

    – शिवनाथ कापाडे असे कर्मचाऱ्याचे नाव – कापाडे शहापूर आगारात 8 वर्षांपासून होते कामाला – 4 महिन्यांपासून कापाडे एसटी विलीनीकरण आंदोलनात होते सहभागी – ड्युटी नसल्याने कापाडे सापडले होते आर्थिक संकटात – गळफास घेऊन केली आत्महत्या, गंगापूर पोलिसांत नोंद..

  • 23 Mar 2022 02:33 PM (IST)

    ट्रकने शाळकरी मुलाला चिरडले

    मोहाडी रस्त्यावर ट्रकने शाळकरी मुलाला चिरडले, ट्रकवर दगडफेक

    जळगाव शहराकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लांडोर खोरी उद्यानाच्यापुढे उत्तर उतरतीवर एका ट्रकच्या चाकाखाली आल्याने शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला

    घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली असून घटनास्थळी पोलीस पोहचले आहे.

  • 23 Mar 2022 02:32 PM (IST)

    पालघर मनोर मार्गावर धावत्या ट्रकला आग

    पालघर मनोर मार्गावर धावत्या ट्रकला मासवन येथे लागली अचानक आग .

    आगीचे कारण अस्पष्ट, गवताच्या गथडे घेऊन जाणाऱ्या टेंम्पोने घेतला पेट .

    प्रसंगावधान म्हणून चालकाने ट्रक उतरला थेट सूर्या नदीत .

    चालकाच्या प्रसंगधावनामुळे कोणतीही जीवितहानी नाही .

    मात्र टेंम्पो मधील सर्व गवताचे गथडे जळून खाक .

  • 23 Mar 2022 02:00 PM (IST)

    महाराष्ट्रातील लोकं Petrol भरण्यासाठी थेट गुजरातमध्ये!

    पाच राज्यांच्या निवडणुका (5 State assembly Elections 2022) संपूर्ण आता या राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार, हेही स्पष्ट झालं आहे. निवडणुकांच्या काळापासून काही प्रमाणात स्थिरावलेले पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rates Today) आता पुन्हा एकदा भडकू लागले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं डोकं वर काढलं आहे. उत्तर प्रदेशसह गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपुरातील निवडणुकांची रणधुमाळी आता थंडावते आहे. पण दुसरीकडे संपूर्ण देशभरातच पुन्हा इंधनाच्या दैनंदिन दरांमध्ये चढता आलेत, पाहायला मिळू लागलेय. अशातच गुजरातमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलचे दर हे शंभरीच्या आत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सीमेवरील लोकं पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी चक्क गुजरातमधील पेट्रोल-पंपावर जात असल्याचं चित्र पाहायला मिळालंय.

  • 23 Mar 2022 01:46 PM (IST)

    दहावी, बारावीप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षाही होणार ऑफलाईन ; लवकरच जाहीर होणार निणर्य?

    पुणे- कोरोनाचा तिसरी लाट पूर्णपणे ओसरली असून कोरोनाचे निर्बंधही कमी करण्यात आले आहेत. त्यानंतर यंदाच्या दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही ऑफलाईन (Offline exam ) घेण्यात आलया आहेत. त्यानंतर आता विद्यापीठाच्या (University )तसेच महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षाही ऑफलाईन घेण्यात येणारा असल्याची माहिती समोर आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या यापुढच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय काही दिवसांत घेतला जाणार असल्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant)यांनी केले आहे. त्यामुळे आता विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे.

  • 23 Mar 2022 01:22 PM (IST)

    नागपुरात तलाव स्वच्छतेसाठी रिमोट ऑपरेटेड बोट

    नागपूर : नागपूर शहरातील फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव तलावांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महापालिकेला मोठे सहकार्य मिळाले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे ( Indian Oil Corporation Limited) सीएसआर निधीतून मनपाला रिमोट ऑपरेटेड बोट (Remote Operated Boat) प्राप्त झालेली आहे. बॅटरी आधारित या बोटद्वारे शहरातील प्रमुख तलावांमधील तरंगता कचरा स्वच्छ करण्याचे महत्वाचे कार्य होणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Municipal Commissioner Radhakrishnan B) यांच्या नेतृत्वात शहर स्वच्छतेच्या कार्यात आता तलाव स्वच्छतेचे कार्यही जलद गतीने व सुरळीतरित्या होणार आहे.

  • 23 Mar 2022 01:07 PM (IST)

    दोन वर्षानंतर मनसेचा मुंबईत पाडवा मेळावा

    मुंबई: कोरोना संकटानंतर दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मनसेचा (mns) मुंबईत पाडव्या निमित्ताने मेळावा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने या मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे महापालिका निवडणुकीचं (bmc) रणशिंग फुंकण्याचीही चिन्हे आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत त्यांची तोफ पाडवा मेळाव्यात धडाडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राज यांच्या या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता लागली असून या मेळाव्यात राज यांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसे नेत्यांनी हा मेळावा आमच्यासाठी एक उत्सवच असल्याचं आधीच स्पष्ट केल्याने हा मेळावा अतिभव्य होणार असल्याचे आधीच संकेत मिळत आहेत.

  • 23 Mar 2022 12:48 PM (IST)

    मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील इमारतीला भीषण आग, घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात

    मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग लागलेल्या इमारतीमधून नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या आगीत आतापर्यंत कोणीही मृत अथव जखमी झाले नाहीये.

  • 23 Mar 2022 12:20 PM (IST)

    ठाकरे सरकारच्या आणखी सहा मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर ((shridhar patankar)) यांचे 11 फ्लॅट्स ईडीने जप्त केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. कालचं प्रकरण फक्त सुरुवात आहे. पुढच्या काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या सहा मंत्र्याचे घोटाळे बाहेर काढणार आहे. तपासानंतर काय कारवाई झाली हे जनतेला दिसेलच. घोटाळेबाज सरकारला मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे, असं किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितलं.

  • 23 Mar 2022 11:42 AM (IST)

    BJP नेते रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?; संजय राऊतांचा सवाल

    नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (shridhar patankar) यांच्या मालमत्तांवर ईडीने (ed) कारवाई केल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपमध्ये सर्वच चांगले आहेत का? असा एकही व्यक्ती भाजपमध्ये नाहीये का? भाजप नेते रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागत आहेत का? सर्वच रस्त्यावर बसून भीक मागत आहेत का? कुणी चने विकतंय, कुणी भेळपुरी विकतंय, कुणी पावभाजींची गाडी लावून जगत आहेत असं काही आहे का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तुमच्याकडे काय आहे. तुम्ही जे शकडो हजारो कोटी खर्च करून निवडणुका लढत आहात तो पैसा कुठून येतो. तुमचे इमले, बंगले कसे उभे राहिले. आम्ही दिलेले कागदपत्रे पुरावे ठरत नाहीत, पण तुमचे चिटोरे पुरावे ठरतात. हा न्याय नाही. परत परत सांगतो, घाई नाही. पण सर्व समोर येईल. मोकळेपणाने श्वास घेण्याच्या स्वातंत्र्यावरचं हे संकट आहे. पण हे काही काळच राहणार, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

  • 23 Mar 2022 10:13 AM (IST)

    किरीट सोमय्या लाईव्ह

    श्रीधर पाटणकर आणि कारनानमे यावर गेले तीन वर्ष मी पाठपुरावा करतोय – सोमय्या

    पाटणकर यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता – सोमय्या

    या प्रकरणात 30 कोटींचा गैरव्यवहार

    सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार

    नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध..? – सोमय्या

    उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकांचे काय संबंध?

    किरीट सोमय्यांचा ठाकरेंना सवाल

    श्रीधर पाटणकर आणि आदित्य ठाकरे यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत ठाकरे बोलणार का? सोमय्या

  • 23 Mar 2022 09:59 AM (IST)

    दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना जन्मठेप

    दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना जन्मठेप

    अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

    चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे कर्मचारी सतीश नाईक यांची झाली होती हत्या

    27 मे 2018 मध्ये दारूबंदी मोहिमेदरम्यान झाला होता हल्ला

    मांजरखेड मधील उमेश राठोड व अजय राठोड अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे

  • 23 Mar 2022 09:55 AM (IST)

    कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

    कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

    प्रथमेश मारणे याच्यावर सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल

    प्रथमेश मारणे याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता

    दरम्यान एका मुलीशी मैत्री करून नंतर शारीरिक संबंध ठेवल्याची पीडित मुलीची तक्रार

    तसेच अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचीही सदर मुलीची तक्रारीत माहिती

  • 23 Mar 2022 09:17 AM (IST)

    Nagpur | मानकापूर स्टेडियमवर 27 मार्चला एरोमॉडेलिंग शो, क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

    नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्च रोजी शहरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या (Departmental Sports Complex) मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे. आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य कुमार अवस्थेत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे, यासाठी राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाची ही झेप आहे. असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Youth Welfare Minister Sunil Kedar) यांनी केले आहे. या एरोमॉडेलिंग शोच्या (Aeromodelling Show) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आपल्या आवडीच्या क्षेत्रात अग्रेसर होण्याची जिद्द तसेच एरोमॉडलिंग क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी. निर्मितीचे विविध क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुले व्हावे, अवकाशाची गुढता जाणण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी. हा उद्देश असून हा शो सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • 23 Mar 2022 08:52 AM (IST)

    नेते भाजपात आल्यावर कारवाया थांबतात कशा? सुप्रिया सुळेंचा मोदींना सवाल

    नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देश सुधारायचा असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर त्यांचं मी स्वागत करते, पण असं सिलेक्टिव्ह लोकांविरोधात कारवाई करायची असेल तर याला आम्ही साथ देणार नाही, ED ची रेड करायची असेल तर सगळ्याच पक्षांवर करा, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supiya Sule) यांनी केलं आहे. दिल्लीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पंतप्रधानांना या सर्व प्रकाराबद्दल मी अत्यंत विनम्रपणे याविषयीचा प्रश्न विचारणार आहे, असं सुळे यांनी सांगितलं. भाजपाच्या विरोधातील लोकांवर आरोप केले जातात. हेच लोक भाजपात आले की त्यांच्यावरील आरोप विरघळतात, हे असं का होतं? त्यांच्यावरील कारवाया कशा थांबतात, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला

  • 23 Mar 2022 06:53 AM (IST)

    वाळवंटातील जहाजाच जिल्ह्यात आगमन

    वाळवंटातील जहाजाच जिल्ह्यात आगमन.

    जिल्हातील ग्रामीण भागात विविध रस्त्यांवर हे वाळवंटातील जहाज असलेल्या उंट व मेंढी फिरताना आढळून येतात.

    राजस्थानातील असलेले हे कुटुंब जिल्ह्यात पाण्याचा शोधात दरवर्षी हजारो मैल गाठत उन्हाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात येत असतात.

  • 23 Mar 2022 06:53 AM (IST)

    पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांची कसून चौकशी

    पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात सलग दुसऱ्या दिवशी तत्कालीन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांची कसून चौकशी

    चौकशी नंतर पोलिसांकडून जबाब नोंदविण्यात आला

    राजकीय नेत्यांचे फोन टॅपींग केल्याप्रकरणी माजी पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे

    या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून

    या प्रकरणामध्ये माजी पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांचाही जबाब घेतला जाण्याची शक्‍यता

  • 23 Mar 2022 06:23 AM (IST)

    खा भावना गवळी विरोधात भाजपने लावलेले बॅनर शिवसैनिकाने काढले

    यवतमाळ – खा भावना गवळी विरोधात भाजप ने लावलेले बॅनर शिवसैनिकाने काढले, काही वेळातच बॅनर काढले

    भाजप ने गेल्या 4 ते 5 महिन्यापासून भावना गवळी ह्या मतदार संघात नाहीत लोकांना भेटत नाही यावरून शहरातील एल आय सी चौकात बॅनर लावले होते या बॅनर ची चर्चा वाऱ्यासारखी शहरात पसरताच भावना गवळी समर्थक शिवसैनिकाने त्या ठिकाणहुन लगेच बॅनर हटवले

  • 23 Mar 2022 06:22 AM (IST)

    पुण्यात आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या भावात वाढ

    पुण्यात आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या भावात वाढ

    साधे पेट्रोल 111 रुपये 19 पैसे, तर पॉवर पेट्रोल 115 रुपये 69 पैसे

    डिझेल 93 रुपये 97 पैसे

Published On - Mar 23,2022 6:19 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.