Maharashtra Breaking Marathi News Live | माजी मु्ख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट
Narendra Modi Australia Visit Live Updates : तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर ट्रेन आणि बसने प्रवास करा - ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल साडेनऊ तास चौकशी झाली. या पार्श्वभूमीवर आज घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 28 मे चा नियोजित कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर जंबो कोविड सेंटरमध्ये सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्या गुन्हेगारी निष्काळजीपणामुळे अनेक कोविड रुग्णाचा मृत्यू झाला, असा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा आहे. याविरोधात आज दुपारी 2 वाजता ते मानवी हक्क आयोग महाराष्ट्राकडे याचिका दाखल करणार आहेत. पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. यात वडिलांचा मृत्यु झालाय. तर आई अत्यवस्थ आहे. अमरावती शहरात आजपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न वापरणाऱ्याला एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. यासह राज्यातील विविध भागातील घडामोडी तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळणार आहेत. वाचा…
LIVE NEWS & UPDATES
-
परभणीच्या पुर्णा शहरातील अर्धाच्यावर शहराचा काही भाग 24 तास अंधारात
परभणी :
परभणीच्या पुर्णा शहरातील अर्धाच्यावर शहराचा काही भाग 24 तास अंधारात,
काल रात्री नऊ वाजल्यापासून विद्युत पुरवठा नसल्याने अर्धे शहर अंधारात
भर उन्हाळ्याच्या दिवसात सतत दोन दिवस वीज नसल्यामुळे नागरिक त्रस्त,
पुर्णा-परभणी लोहमार्गावरील रेल्वे पुलाखालून गेलेले केबल खराब झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत
-
मुंबईमधील वार्ड क्रमांक 121 मधील नगरसेविका चंद्रावती मोरे यांचा आज शिवसेनेत प्रवेश
मुंबई :
मुंबईमधील वार्ड क्रमांक 121 मधील नगरसेविका चंद्रावती मोरे यांचा आज शिवसेनेत प्रवेश
त्यांच्यासोबत सातशे कार्यकर्त्यांनीही केला प्रवेश
सरकारचा गेल्या 10 महिन्यात झालेल्या कामावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केला
सरकारतर्फे होणारी कामे बघून त्यांचा एक विश्वास निर्माण झाला
-
-
कराड उंब्रज परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
कराड उंब्रज परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
उखाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा
हा पाऊस पेरणीपूर्वी मशागतीच्या कामाला उपयुक्त ठरला आहे
-
सांगलीत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशच्या तीन महिलांना पोलिसांकडून अटक
या 3 महिला बोगस कागदपत्रे तयार करून करत होत्या सांगलीमध्ये वास्तव्य
बांगलादेशामधील या महिलांवर विश्रामबाग पोलिसांनी केली कारवाई
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव यांनी फिर्याद दिली आहे
-
ऐतिहासिक किल्ल्यात रील्स बनवण्यासाठी केमिकल्सने लावली आग, वसई पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल
किल्ला प्रेमींनी या घटनेसंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला आहे
हाशिम शेख असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून तो फरार आहे
या तरुणावर कठोर कारवाई करण्याची किल्ला प्रेमी तर्फे मागणी
वसई पोलिस ठाण्यात हासिम शेख या तरुणांवर गुन्हा दाखल
-
-
विजापूरमध्ये नक्षलवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत
विजापूरमध्ये नक्षलवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत
पोलिसांनी तेलंगणाच्या सीमेवर 10 माओवाद्यांना केली अटक
यामधील 5 नक्षलवादी विजापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती
पोलिसांनी माओवाद्यांकडून 1 ट्रॅक्टर कार्डेक्स वायर आणि सुमारे 500 डिटोनेटर जप्त केले
-
Manohar Joshi Health Update | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
माजी मुख्य मंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर
मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर
हिंदुजा रुग्णालयाकडून मनोहर जोशी यांचं मेडिकल बुलेटिन जाहीर
ब्रेन ट्युमरमुळे मनोहर जोशी रुग्णालयात
-
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जागावाटपावरुन खोचक टीका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मविआतील जागावाटपावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका
ठाकरेंना 2 जागा दिल्या तरी ते मविआत राहतील, बावनकुळेंचा ठाकरेंना चिमटा
-
Kolhapur Shivaji Road Fire | कोल्हापूर इथल्या शिवाजी रोड परिसरात आग
कोल्हापुरातील शिवाजी रोड इथे भीषण आग
अनेक दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
-
अरविंद केजरीवाल यांचा राज्यपालांवर गंभीर आरोप
पंजाब, पश्चिम बंगाल, तामिळनाडूतील राज्यपालांकडून त्रास
राज्य सरकारना राज्यपालांचा मोठा हस्तक्षेप
विरोधकांनी एकत्र येण्याचे केले आवाहन
हमने पंजाब, पश्चिम बंगाल, तमिलनाडू में देखा कि राज्यपाल कैसे सरकार को तंग कर रहे हैं। दिल्ली में इन्होंने जो किया वह जनतंत्र के खिलाफ है। देश की जनता को इस अहंकारी सरकार को हटाना चाहिए। मैं दीदी का धन्यवाद करूंगा कि राज्यसभा में इन्होंने कहा कि वे हमारा समर्थन करेंगी। राज्यसभा… https://t.co/ss8eRUlVWB pic.twitter.com/9MjWcC3jt0
— ANI_HindiNews (@AHindinews) May 23, 2023
-
विदर्भात भाजपला रोखण्यात मोठं यश
विदर्भातील अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय
चुकून भाजपला त्यावेळी मतदान केल्याची मतदारांची भूमिका
नाना पटोले यांनी सांगितली बाजू
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगचा काही फायदा नाही
-
मविआतील जागा वाटप मेरिटनुसार व्हावं
जिंकून येणाऱ्याला जागा देणं महत्वाचं
नाना पटोले यांनी केली मागणी
जागा वाटपावरुन जाहीर केली भूमिका
भाजपकडून अनेक महान नेत्यांचा अवमान
-
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत गोंधळ
दोन्ही गटांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणा बाजी
अहमदनगर येथील माध्यमिक शिक्षक सोसायटीची सभा आज केली होती आयोजित
-
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन
बी.एस.येदियुरप्पा यांच्या मुलाने घेतली भेट
बी. वाय. विजयेंद्र यांनी घेतली मुख्यमंत्री सिद्धारमाय्या यांची भेट
#WATCH कर्नाटक: बीजेपी के वरिष्ठ नेता बीएस येदियुरप्पा के बेटे और पार्टी विधायक बीवाई विजयेंद्र ने बेंगलुरु के विधान सौधा में सीएम सिद्धारमैया, मंत्री केएच मुनियप्पा और अन्य नेताओं से मुलाकात की। pic.twitter.com/ZmvGz0TAGI
— ANI_HindiNews (@AHindinews) May 23, 2023
-
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर
जोशी सध्या व्हेंटिलटरवर नाहीत
ब्रेन ट्यूमरमुळे जोशी हिंदुजा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल
आयसीयुमध्ये जोशी यांच्यावर उपचार
रुग्णालयाने जारी केले मेडिकल बुलेटिन
-
राहुल गांधी यांची छत्रपती शिवराय यांच्याशी तुलना
काँग्रेसने ही तुलना करणं वेदनादायक आहे
काँग्रेसने माफी मागावी नाहीतर आंदोलन करण्यात येईल
भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
-
बैठकीत साधकबाधक चर्चा झाली
बैठकीत जागेसंदर्भात चर्चा झाली-अशोक चव्हाण
जिल्ह्यातील प्रमुखांना 2 आणि 3 जून रोजी बोलविण्यात आल्याची दिली माहिती
-
एनसीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार
सध्या एनसीसीमध्ये सव्वा लाख विद्यार्थी
यामध्ये आणखी 60 हजार विद्यार्थ्यांची भर पडणार
महासंचालक गुरुबीर पाल सिंग यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
-
जयंत पाटील अजित पवार यांच्यावर नाराज?
मविआतील सर्वांनी आवर्जून फोन केले
अजितदादांचा फोन आला नाही-जयंत पाटील
फोनवर नाही तर जयंत पाटली यांच्याशी भेटून बोलणार
-
विरोधी गोटात चर्चांचे वारे
अरविंद केजरीवाल पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घेतली भेट
कोलकत्यात झालेल्या बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री पण सहभागी
#WATCH कोलकाता: दिल्ली के मुख्यमंत्री और आम आदमी पार्टी के संयोजक अरविंद केजरीवाल और पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान ने पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी से मुलाकात की। pic.twitter.com/JSquZoPRDn
— ANI_HindiNews (@AHindinews) May 23, 2023
-
जागावाटपाबाबत जाहीरपणे न बोललं बरं
काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांचा सूर
कोण मोठं, कोण लहान यामुळे वाद
-
लाखांदूर बाजार समिती काँग्रेसने राखली, तब्बल 45 वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता
लाखांदूर बाजार समिती काँग्रेसने राखली
तब्बल 45 वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता
नाना पटोलेंच्या कार्यावर ठेवला विश्वास.
लाखांदूर बाजार समितीवर काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवली.
सभापतीपदी काँग्रसचे सुरेश ब्रम्हणकर तर,
उपसभापतीपदी देवीदास पारधी हे विजयी झाले.
-
चालत्या गाडीवर अंघोळ करणाऱ्या रिल स्टारचा माफीनामा
उल्हासनगर- चालत्या गाडीवर अंघोळ करणाऱ्या रिल स्टारचा माफीनामा
मध्यवर्ती पोलिसांसोबत बनवला माफी मागतानाचा व्हिडीओ
इतरांना धोका पोहोचेल असे रिल्स न बनवण्याचं आवाहन
मध्यवर्ती पोलिसांकडून गुन्हा दाखल करत कारवाई
-
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि संतोष रावत यांची मोठी मागणी
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर हल्ला
करणाऱ्या आरोपींची नार्को टेस्ट करा
या हल्ल्यामागे खरे सूत्रधार कोण याची चौकशी करा
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि संतोष रावत यांची मागणी
-
पुण्यात मेट्रोच्या विरोधात मनसेच आंदोलन
पुणे मेट्रोमध्ये होत असलेल्या कामगार भरतीच्या विरोधात मनसे आक्रमक
मेट्रोमध्ये होणारी कामगार भरती साठीच्या मुलाखती बिहार मध्ये होत असल्याचा मनसेचा आरोप
मेट्रो भरतीच्या विरोधात PMRDA कार्यालयाच्या बाहेर मनसे करणार निदर्शने
नोकरी पुण्यात मग त्याची जाहिरात आणि मुलाखत बिहारमध्ये का मनसैनिकांचा प्रशासनाला सवाल
-
५० वर्षांपासून शेतकऱ्यांचा लढा, आता थेट मुख्यमंत्र्यांनाच साद
अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावर शेतकऱ्यांकडून शेती
एमआयडीसीच्या चुकीच्या भूसंपादनाचा शेतकऱ्यांकडून निषेध
एका जागेवर नोंद करत दुसरीच जागा घेतली ताब्यात
५० वर्षांपासून शेतकऱ्यांचा लढा, आता थेट मुख्यमंत्र्यांनाच साद
-
कौडण्यापूर येथील रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे रवाना होणार
विदर्भातील पंढरपूरला जाणारी कौडण्यापूरची महत्त्वाची पायदळ वारी पालखी
रुक्मिणी मातेच्या कौडण्यापूर माहेरघर वरून पालखी काही वेळातच पंढरपूरकडे होणार मार्गस्थ
अतिशय भक्तीमय वातावरणात टाळमृदुंगाच्या गजरात भाविक दंग
यंदा कौडण्यापूरच्या पालखीचे ४२९ वे वर्ष
कौडण्यापूरच्या रुक्मिणीच्या पालखीला आषाढी एकादशी पंढरपूरात विशेष मान
-
एक जूनपर्यंत मच्छीमारांनी समुद्रातून बोटी बाहेर घेण्याचे आदेश
एक जूनपर्यंत मच्छीमारांनी समुद्रातून बोटी बाहेर घ्याव्यात असे आदेश
सरकारकडून देण्यात आलेले आहेत, मात्र या आदेशाचा विचार करावा
हवामान खात्याने पाऊस उशिराने येणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे
दरवर्षी ७ जूनला बोटी मागे घेण्याचा आदेश देण्यात येतो मात्र यंदा लवकर देण्यात आलेला आहे
संपूर्ण मच्छीमारांचे यामुळे नुकसान होणार आहे
१० ते १५ जून दरम्यान पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि त्यानुसारच मग या दिवसात बंदी करावी अशी मागणी…
-
अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवरील हेदुटणे गावाजवळ
एमआयडीसीची पाईपलाईन फुटली
ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी
अनधिकृत बांधकामामुळे पाईपलाईन गंजली
-
नवी मुंबई | सानपाडा सेक्टर 5 येथील एका कपड्याच्या दुकानाला लागली आग
आगीचं कारण अद्याप स्पष्ट, अग्निशमन दलाला आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश
दुकानातील वस्तू जळून खाक, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
-
डोंबिवली | हेदुटणे गावाजवळ एमआयडीसीची मोठी जलवाहिनी फुटली…..
जलवाहिनीला गंज लागल्याने पाण्याच्या प्रेशरमुळे जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया…
एमआयडीसी कडून जलवाहिनी दुसरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
जलवाहिनी फुटल्याने महापे, दिवा, मुंब्रा, शिळ परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार
-
कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत अमित ठाकरे करणार वाढदिवस साजरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे मुंबईतील सांताक्रूझ येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत केक कापून वाढदिवस करणार सारजा
कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोफत चित्रपट देखील दाखवण्यात येणार
-
तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर ट्रेन आणि बसने प्रवास करा – ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज
ऑस्ट्रेलिया आणि भारतातील लोकांमधील खोल संबंध – अल्बेनीज जेव्हा मी मार्चमध्ये भारतात होतो, तेव्हा गुजरातमध्ये होळी साजरी करणे, दिल्लीत महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली, ही अविस्मरणीय क्षणांनी भरलेली एक सहल होती. मी जिथेही गेलो, तिथे मला ऑस्ट्रेलिया आणि भारतातील लोकांमध्ये घट्ट नाते असल्याचे जाणवले. तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर ट्रेन आणि बसने प्रवास करा. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज
-
पुणे, पिंपरी शहरासह महामार्गांवर उभारण्यात येणार महावितरणची चार्जिंग स्थानके
पुणे
पुणे, पिंपरी शहरासह महामार्गांवर उभारण्यात येणार महावितरणची चार्जिंग स्थानके
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेत महावितरणने घेतला निर्णय
पुणे परिमंडल अंतर्गत सद्यस्थितीत १५ चार्जिंग स्थानके कार्यान्वित आहेत
-
टेम्पोने धडक दिल्याने ट्रॉली पलटी
पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर सासवड येथील चंदन टेकडी जवळ भरधाव टेम्पोने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीतील चारजण जखमी झाले. जखमींना सासवड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सासवडकडे सिमेंट विटा घेऊन ट्रॅक्टर चालला होता. ट्रॉलीमध्ये सिमेंट विटांवर चार कामगार बसले होते. टेम्पोने धडक दिल्याने ट्रॉली पलटी झाली, सर्व कामगार रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले.
-
आज मी एकटा आलो नाही – पंतप्रधान मोदी
आज मी एकटा आलो नाही – पंतप्रधान मोदी
परदेशातील भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी 2014 मध्ये आलो, तेव्हा मी तुम्हाला वचन दिले होते की, तुम्हाला पुन्हा भारताच्या कोणत्याही पंतप्रधानासाठी 28 वर्षे वाट पाहावी लागणार नाही. आज सिडनीमध्ये, या रिंगणात, मी पुन्हा उपस्थित आहे आणि मी एकटा आलेलो नाही. पंतप्रधान अल्बानीजही माझ्यासोबत आले आहेत.
-
ऐतिहासिक पानचक्की तलावातील हजारो माशांचा मृत्यू
ऐतिहासिक पानचक्की तलावातील हजारो माशांचा मृत्यू
तलावातील पाणी सोडून दिल्यामुळे माशांचा तडफडून मृत्यू
तलाव स्वच्छ करण्यासाठी सोडण्यात आले होते पाणी
तलाव कोरडा पडल्यामुळे पाण्याअभावी माशांचा तडफडून मृत्यू
पांचकी तलावात हजारो माशांचा पडला खर
तडपडून मेलेल्या मासे तलावातून हटवण्याचे काम सुरू
-
अतीदुर्गम नक्षलग्रस्त, आदिवासी भागातील शाळा तीन वर्षापासून बंद
गोंदिया :-
– अतीदुर्गम नक्षलग्रस्त, आदिवासी भागातील शाळा तीन वर्षापासून बंद
– चिमुकल्या विद्यार्थ्यांना करावी लागते जंगलातुन 15 किलोमीटरची पायपीट
– मोफत आणि सक्तीचे शिक्षणाचा कायदा या भागात लागू नाही का असा नागरिकांचा प्रश्न
– आता तरी प्रशासनाने लक्ष देऊन या भागातील शाळा सुरू कराव्या पालकांची मागणी
– देश आज अमृत महोत्सवाचा वर्ष साजरा करीत असताना या विद्यार्थ्यांसाठी कोणी आहे का वाली
-
ऑस्ट्रेलियाच्या मनात भारताविषयी प्रेम
ऑस्ट्रेलियाच्या मनात भारताविषयी प्रेम
आमची जीवनशैली भलेही वेगळी आहे
ऑस्ट्रेलियाशी आमचं नातं कधीपासून आहे ?
आमच्या इथं जेवण बनवायची पद्धत वेगळी आहे.
सिडनीतून मोदी लाईव्ह
आमच्याकडे भाषा वेगळी बोलली जात आहे, तरी सुध्दा आम्ही त्यांच्या जोडलो आहोत.
-
ऑस्ट्रेलियाच्या मनात भारताविषयी प्रेम
ऑस्ट्रेलियाच्या मनात भारताविषयी प्रेम
आमची जीवनशैली भलेही वेगळी आहे
ऑस्ट्रेलियाशी आमचं नातं कधीपासून आहे ?
आमच्या इथं जेवण बनवायची पद्धत वेगळी आहे.
सिडनीतून मोदी लाईव्ह
आमच्याकडे भाषा वेगळी बोलली जात आहे, तरी सुध्दा आम्ही त्यांच्या जोडलो आहोत.
-
यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
पहिल्या तीन क्रमांकांमध्ये मुलींचा समावेश
इशिता किशोर देशात प्रथम, गरिमा लोहिया देशात द्वितीय आणि उमा हरिती देशात तृतीय
2022 साली झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर, 933 विद्यार्थी यशस्वी ठरले
-
२०१४ नंतर पुन्हा ऑस्ट्रेलियात येण्याचा शब्द दिला होता.
सीडनीत २० हजार भारतीयांशी मोंदीचा संवाद
२०१४ नंतर पुन्हा ऑस्ट्रेलियात येण्याचा शब्द दिला होता.
ऑस्ट्रेलियात भारतीय जनतेविषयी खूप प्रेम
तुमच्या संवाद साधत असताना खूप आनंद झाला आहे.
-
महाराष्ट्रात मुसंडी नावाचा चित्रपट प्रदर्शित होतोय
नऊ जून रोजी महाराष्ट्रात मुसंडी नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरती आधारलेला असून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची घुसमट मांडणारा एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रात केला जातोय. या चित्रपटाची टीम सध्या प्रमोशन करत संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. या चित्रपटाची टीम औरंगाबाद येथे होती.
-
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे युवकांचे आत्मदहन टळले
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे युवकांचे आत्मदहन टळले
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बस स्टँड परिसरातील अतिक्रमण हटविले जात नाही, म्हणून त्रस्त चार युवकांनी पाचोरा प्रांत कार्यालयासमोर अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
-
जागा कशी लढवायची या संदर्भात चर्चा झाली आहे – अशोक चव्हाण
सर्वसाधारण चर्चा झाली आहे
जागा कशी लढवायची या संदर्भात चर्चा झाली आहे
निवडणुकीच्या संदर्भात नक्की काय करायचे या साठी बैठक होती..
जिल्ह्यातील प्रमुख लोकांना 2 आणि 3 तारखेला बोलावलं आहे..
त्यानंतर सर्व रणनीती निश्चित केली जाईल
संजय राऊत हे बोलतात ते त्यांचा मत आहे त्यांची ती इच्छा आहे, त्यात काही चुकीचं नाही
पण तेच काही अंतिम होईल हे काही माणण्याचं कारण नहीं आहे..
बैठकीला ज्यावेळी सुरुवात होईल, त्यावेळी यातून तोडगा काढला जाईल
-
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी असंच राहणं आवश्यक आहे – आनंद दवे
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी असंच राहणं आवश्यक आहे – आनंद दवे
हिंदू महासंघच्या जाहीर कौतुकासाठी धन्यवाद नितेश राणेजी
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी असंच राहणं आवश्यक आहे
खरं तर राजसाहेब किवा राऊत साहेबांना त्रंबकेश्वरच्या निमित्ताने हिंदू धर्मावर येणाऱ्या संकटाची तीव्रताच कळली नाही.
तुमची जर त्रंबकेश्वरवर श्रद्धा असेल, त्याला मानत असाल तर तुम्ही तिलक लावून हिंदू पद्धतीने पूजा करायला हवी, गोल टोपी घालून, काजळ घालून, वेगळ्या पद्धतीचा हार आणि हिरव्या शालिचा आग्रह कसा चालेल.
काही मूर्ख हिंदू चर्च ला जातात तेव्हा चर्च च्या पद्धतीने वागतात. आम्ही चर्च ला जाऊन आरतीचा, गुरुद्वारात जाऊन डोक्यावरून रुमाल न घेण्याचा, तिथं गणपती च्या आरतीचा आणि दरग्यात जाऊन हिंदू पूजेचा आग्रह धरू शकतो का ?
आस्था असेल तरी तुमच्या देवांच्या पूजा आमच्या पद्धतीने करू ते सुद्धा वर्षात एकदाच हा जिहादच आहे.
तो थांबवला आम्ही आम्हाला अभिमान आहे.
-
लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांचा जामीन अर्ज फेटाळला
लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. आता सतीश खरे यांना सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. सतीश खरे यांची चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सतीश खरे यांचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराच्या बाजूने निकाल देण्याच्या मोबदल्यात जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी लाच मागितली होती. तीस लाख रुपयांची लाच घेताना सतीश खरे यांच्यासह एका वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहत्या घरी रंगेहात पकडले होते.
-
आमदार योगेश कदम हे गेले काही दिवस डेंग्युची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होते
शिवसेनेचे खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हे गेले काही दिवस डेंग्युची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होते. कालच त्याना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
-
आज मी महाआरती करण्यासाठी एक हिंदू म्हणून आलो – नितेश राणे
– आज मी महाआरती करण्यासाठी एक हिंदू म्हणून आलो – धूप दाखवण्याची परंपरा आहे, हे जे वारंवार सांगण्यात येत आहे, हे साफ खोटं आहे
-
योगेश कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, कोरोनात आमचे वडील रामदास कदम आजारी होते
21 दिवस अॅडमिट होते
घरी आल्यानंतर ते 6 महिने घरी होते, त्यावेळी उद्धवजींचा एकही फोन आला नाही
पण एकनाथ शिंदे हे असे मुख्यमंत्री आहेत, जे आजारी असताना आमच्यासारख्या आमदाराला घरी भेटायला येतात
हाच फरक आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात
-
हिंदू महासंघाच्या जाहीर कौतुकासाठी धन्यवाद नितेशजी -आनंद दवे
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी असंच राहणं आवश्यक
खरं तर राजसाहेब किंवा राऊत साहेबांना त्रंबकेश्वरच्या निमित्ताने हिंदू धर्मावर येणाऱ्या संकटाची तीव्रताच कळली नाही
तुमची जर त्रंबकेश्वर वर श्रद्धा असेल, त्याला मानत असाल तर तुम्ही टिळक लावून हिंदू पद्धतीने पूजा करायला हवी
गोल टोपी घालून, काजळ घालून, वेगळ्या पद्धतीचा हार आणि हिरव्या शालिचा आग्रह कसा चालेल
काही मूर्ख हिंदू चर्चला जातात, तेव्हा चर्चच्या पद्धतीने वागतात
आम्ही चर्चला जाऊन आरतीचा, गुरुद्वारात जाऊन डोक्यावरून रुमाल न घेण्याचा, तिथं गणपतीच्या आरतीचा आणि दरग्यात जाऊन हिंदू पूजेचा आग्रह धरू शकतो का ?
आस्था असेल तरी तुमच्या देवांच्या पूजा आमच्या पद्धतीने करू ते सुद्धा वर्षात एकदाच हा जिहादच आहे
तो थांबवला आम्ही, आम्हाला अभिमान आहे
-
उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी वारकऱ्यांसाठी जास्त औषधे, पाण्याची व्यवस्था
यंदा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान एक महिना लवकर होतेय
उन्हाचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये यासाठी पुरेशी औषधे आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास प्रशासन प्राधान्य देण्यात येणार
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडून पालखीमार्ग, पालखी तळ आणि विसाव्यांच्या ठिकाणांना भेटी
पालखीमार्गावर आरोग्य सुविधा, फिरती शौचालये, पाणी, वीज आदी सर्व सुविधा प्राधान्याने पुरविण्यात येणार
पालखी मार्गावर विसावा, मुक्काम असलेल्या ठिकाणी अतिरिक्त राखीव पंप ठेवणार
पालखी मार्गावर आवश्यक तेथे पाण्याच्या टाक्या ठेवण्यात येणार
-
पुण्याच्या भोर एसटी बसस्थानकात वारकऱ्यांचं भजन करत अनोख आंदोलन
दर अमावस्येला वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जाणारी स्पेशल बस, भोर आगाराने अर्ध्यातून माघारी बोलवलीवारकऱ्यांची गैरसोय झाल्याने केलं आंदोलनएसटी बस माघारी आल्याने वारकऱ्यांना तीन गाड्या बदलून यावं लागल्यानं महिला आणि ज्येष्ठ वारकऱ्यांची गैरसोयआंदोलन करत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलं निवेदन -
आमचा जयंत पाटील यांना पाठिंबाच
तासगाव कवठे महांकाळ मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई आर आर पाटील यांची प्रतिक्रिया
आगामी विधानसभा निवडणुकीत कोण लढणार हे आता सांगू शकणार नाही
-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावरील गोळीबार प्रकरण
चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जिल्हाध्यक्ष राजवीर यादवला भावसह पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात
बाबूपेठ परिसरात काल रात्री स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष तपास चमुची धाड
राजवीर आणि त्याच्या भावाला ताब्यात घेत दुर्गापूर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरु
11 मे रोजी मुल शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखे समोर रात्री सव्वानऊ वाजता झाला होता हल्ला
हल्ल्यात रावत यांच्या दंडाला गोळी चाटून गेल्याने ते थोडक्यात बचावले
25 मे रोजी काँग्रेसने सर्वपक्षीय बंद आणि रास्ता रोकोचा दिला होता इशारा
-
लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांचा जामीन अर्ज फेटाळला
जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने सुटकेसाठी उच्च न्यायालयात घ्यावी लागणार धाव
चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर खरे यांना न्यायालयात करण्यात आले होते हजर
न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराच्या बाजूने निकाल देण्याच्या मोबदल्यात खरे यांनी मागितली होती लाच
30 लाख रुपयांची लाच घेताना खरे यांना रंगेहाथ करण्यात आले होते अटक
-
आजच्या बैठकी संदर्भात अध्यक्ष बोलतील – सुशीलकुमार शिंदे
कर्नाटकमध्ये जी निवडणूक झाली, त्यावर या बैठकीत जास्त चर्चा झाली नही
एकत्रित काम केल पाहिजे
महाविकास आघाडीत कोण मोठं, कोण छोटं नाही तर महाविकास आघाडी आहे
-
मुक्ताईनगरात लाखोंचा गुटखा जप्त
आ.चंद्रकांत पाटील यांनी पकडले गुटख्याचे वाहनमध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे होत होती गुटख्याची तस्करीचौकात गुटख्याची गाडी पकडून गाडीसह लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांच्या स्वाधीन -
राष्ट्रीयीकृत बँकांबाहेर 2 हजाराच्या नोटा बदली करण्यासाठी गर्दी
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील बँकेबाहेर मार्केट व्यापाऱ्यांची सकाळपासून गर्दी
नोटा बदली करण्याची जी मर्यादा आहे ती वाढवून देण्याची व्यापाऱ्यांची मागणी
-
जिहादी विचाराच्या लोकांकडून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न – नितेश राणे
त्र्यंबकेश्वरमधील शांतता भंग करण्याचा हेतू नाही
धूप दाखवण्याची परंपरा नाही
जो काही उरुस निघतो तो रस्त्यातून निघतो
13 मे च्या घटनेनंतर गैरसमज पसरवले जात आहेत
मंदिर बंद असताना पुजा करण्याचा हट्ट करण्यात आला
हिंदू धर्म परंपरेनुसार सर्व दर्शन घेतात तसे तुम्ही घ्या, निघून जा
कुणाला आक्षेप नाही
13 तारखेला 10 ते 12 तरुण आले, धूप दाखवण्याचा हट्ट केला
त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते
-
पोलीस अधिकाऱ्याने खेळाडूंना काढायला लावल्या उठाबश्या
सीसीटीव्ही बंद कर रे.. सगळे एकमेकांच्या कानाखाली मारा!’
अंबरनाथच्या चिखलोलीतील क्रिकेट टर्फमध्ये घडली घटना
टर्फ उशिरापर्यंत सुरू असल्यानं मॅनेजर आणि खेळाडूंना शिवीगाळ
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत आवाजासहित झाली कैद
-
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्याला जोडणाऱ्या चांदशैली घाटात पिकअप वाहनाचा भीषण अपघात
घाटात रस्ता खराब असल्याने आणि नागमोडी वळणाचा तीव्र उताराचा असल्याने अपघात
पिकअप गाडीतील तीन प्रवाशांचा मृत्यू
-
लोकसभा माजी अध्यक्ष डॉ मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल
प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल
काल सायंकाळी केलं दाखल
मेंदूत रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने रुग्णालयात दाखल
न्यूरॉ स्पेशालिस्ट डॉ चारूलता संकला यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे जोशींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हिंदुजात पोहोचले
-
ज्ञानवापीच्या सर्व खटल्यांची सुनावणी एकत्रितपणे, न्यायालयाचे आदेश
– ज्ञानवापी मशीद प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सर्व खटल्यांची एकत्रितपणे सुनावणी घेण्याचे आदेश वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिले आहेत.
– ज्ञानवापी मशीद प्रकरणी सर्व आठ खटल्यांची एकत्रितपणे सुनावणी करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
-
शिवसेना नेते मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल
– लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
– काळ संध्याकाळी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते.
– मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांशी निगडित काही आजार झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
– डॉक्टर चारुलता संकला या त्यांच्यावर उपचार करत आहेत.
– मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर आहे. माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुजा रुग्णालयात मनोहर जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचत आहेत.
-
पंढरपुरात आषाढी यात्रा नियोजनाची बैठक सुरू, भाविकास २ लाखांचे विमा कवच
– पंढरपुरात आषाढी यात्रा नियोजनाची बैठक सुरू असून या बैठकीत भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला.
– मंदिर समितीकडून आषाढीला येणाऱ्या भाविकांचा विमा उतरवला जाणार आहे.
– पंढरपूरपासून १० किमीपर्यंतच्या क्षेत्रात अपघात घडल्यास प्रत्येक भाविकास २ लाखांचे विमा कवच देण्यात येणार आहे.
– मात्र, वारकरी संप्रदायाने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून पंढरपूरपर्यंत येणाऱ्या भाविकांना विमा सुरक्षा कवच देण्यात यावे अशी मागणी केली.
– वारकरी संप्रदायाच्या या मागणीवर प्रशासन सकारात्मक आहे.
-
नितेश राणे यांच्याकडून त्रंबकेश्वर मंदिराची पाहणी, लवकरच महाआरती करणार
– त्रंबकेश्वरमध्ये ज्या ठिकाणी वादग्रस्त घटना घडली त्या ठिकाणाची भाजप आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली.
– यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते.
– नितेश राणे यांनी त्रंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
– त्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये महाआरती करण्यासाठी नितेश राणे जाणार आहेत.
– या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे.
-
भाजपकडून लोकसभेची तयारी सुरु, प्रवीण दरेकर यांच्यावर महत्वाची जबाबदारी
– भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
– राज्यातील लोकसभा मतदारसंघात महासंपर्क अभियान राबवले जाणार आहे.
– 31 मे ते 31 जून दरम्यान हे संपर्क अभियान राबवले जाणार असून भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
-
स्टेपमपेपरवर लिहून देतो महाविकास आघाडी कायम रहाणार – अजित पवार
– महाविकास आघाडी ही कायम रहाणार आहे.
– येणाऱ्या निवडणूक आम्ही एकत्र लढविणार आहोत.
– ज्या २५ जागा महाविकास आघाडीकडे नाहीत त्यावर चर्चा होईल.
– चर्चा करायला काही अडचण नाही. कारण त्या जागाच आमच्या तिन्ही पक्षांकडे नाही.
– काही जागांबद्दल अदलाबदल होऊ शकेल.
– वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे विचार पुढे येतात. शेवटी अंतिम निर्णय त्या पक्षाचे सर्वोच्च नेते घेतील. त्याची अंमलबजावणी त्या पक्षाचे सगळे बाकीचे कार्यकर्ते करतील असे अजित पवार म्हणाले.
-
नितेश राणे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार
त्र्यंबकेश्वर मंदिरात नितेश राणे करणार महाआरती
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त
नितेश राणे साधणार पत्रकारांशी संवाद
-
दंगली होणाऱ्या भागात राजकीय हस्तक्षेप नको- अजित पवार
कर्नाटक निवडणूकीमुळे भाजपला निवडणूकीची भीती
जिंकलेल्या जागा आमच्याकडे राहाव्या अशी ठाकरेंची इच्छा- अजित पवार
महाविकास आघाडी मजबूत राहाणार स्टॅम्प पेपरवर लिहून देतो- अजित पवार
-
त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लिमांकडून धूप दाखवण्याची प्रथा जुनी- अजित पवार
धार्मिक तेढ निर्माण करू नये- अजित पवार
अनेक परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे, लोकं ती पाळतात- अजित पवार
-
MI vs LSG : लखनऊ विरुद्ध जिंकायच असेल, तर टिम डेविड, कॅमरुन ग्रीनने रिंकू सिंहकडून काय शिकलं पाहिजे?
MI vs LSG IPL 2023 Eliminator : पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांसमोर यश ठाकूर असणार. रिंकू सिंह यशची गोलंदाजी कशी खेळला होता? आणि तेच टिम डेविड-कॅमरुन ग्रीन कसे खेळलेले? यातून फरक दिसून येतो. वाचा सविस्तर….
-
WTC Final 2023 : टीम इंडियाचा पहिला ग्रुप इंग्लंडला रवाना, फ्लाइट पकडणाऱ्या प्लेयर्समध्ये कोण-कोण?
Team India leaves for WTC : चर्चा असूनही दोन मोठे प्लेयर्स या फ्लाइटमध्ये नव्हते. चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी 30 मे रोजी इंग्लंडमध्ये एकत्र जमायच आहे. कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या उमेश यादवला IPL 2023 दरम्यान दुखापत झाली होती. वाचा सविस्तर….
-
आम्हाला आता चांगली झोप येते असे भाजप नेतेच सांगतात- अजित पवार
कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर मी प्रतिक्रीया देत नाही- अजित पवार
तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा अधीकार- अजित पवार
-
MI vs LSG : लखनऊ विरुद्ध जिंकायच असेल, तर टिम डेविड, कॅमरुन ग्रीनने रिंकू सिंहकडून काय शिकलं पाहिजे?
MI vs LSG IPL 2023 Eliminator : पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांसमोर यश ठाकूर असणार. रिंकू सिंह यशची गोलंदाजी कशी खेळला होता? आणि तेच टिम डेविड-कॅमरुन ग्रीन कसे खेळलेले? यातून फरक दिसून येतो. वाचा सविस्तर….
-
नोटबंदीचा काहीही फायदा झालेला नाही- अजित पवार
काळा पैसा बाहेर पडणार नसेल तर नोटबंदीचा फायदा काय?- अजित पवार
नोटा बदण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे- अजित पवार
वानखेडेंबद्दल नवाब मलिक जे बोलले तेच खरं झालं- अजित पवार
-
तपास यंत्रणांच्या गैरवापराने शिंदे सरकार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
जनतेच्या पैश्यांचा चुराडा करून कोरोना काळात नवे संसद भवन उभे केले- संजय राऊत
राष्ट्रपतीला डावलून संसद भवनाचं उद्घाटन होतयं हे लेकशाहीसाठी चिंतेची बाब आहे- संजय राऊत
अन्याय विरोधात जे आवाज उठवणार नाही त्यांनाच राष्ट्रपती पदी बसवल्या जातंय- संजय राऊत
-
मंत्रीपदाची लालसा नाही पण विस्तार करा- आमदार बच्चू कडू
जेवणाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही- आमदार बच्चू कडू
कोणालाही मंत्री करा पण विस्तार करा – बच्चू कडू
-
विधानसभेचे शुद्धीकरण चुकीचे , अंकुश काकडे यांची टीका
कर्नाटक विधानसभा शुद्धीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची टीका
काँग्रेस आणि भाजपामध्ये काय फरक राहिला, काकडे यांचा सवाल
-
शरद पवारांच्या भेटीसाठी जयंत पाटील सिल्व्हर ओककडे रवाना
ईडी चौकशीनंतर सर्व मित्रपक्षाच्या प्रमुखांचा मला फोन आला होता
अजित पवारांचा मला फोन आला नाही, पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटील यांचे उत्तर
जयंत पाटील यांची पुन्हा चौकशी होण्याचीही शक्यता
-
2024 साली विरोधकांनी एकत्र येऊन भाजपाचा पराभव केला पाहिजे – संजय राऊत
मोदींच्या पराभवानंतर युपीएत पंतप्रधानपदावर चर्चा होईल
मविआतील सर्व नेते जयंत पाटील यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत
-
भाजपा सतत केवळ निवडणुकांचा विचार करत असतं – संजय राऊत
देशातील प्रश्न, जनतेची स्थिती याकडे सरकारचं लक्ष नाही
ते तिन्ही त्रिकाळ सतत राजकारणाचा आणि निवडणुकीचाच विचार करत असतात
-
भाजपाकडून वारंवार राष्ट्रतपतींचा अपमान होत आहे – संजय राऊत
राष्ट्रपतींना निमंत्रण नाही हे गंभीर आहे
नव्या संसद भवनाचे उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवं
पण या सोहळ्यासाठी राष्ट्रपतीनांच उद्घाटनाचे निमंत्रण नसेल तर हे गंभीर आहे
-
मुंबईत लवकरच स्फोट घडवणार, ट्विटरवरून धमकी
मुंबई पोलिसांना ट्विटरवर टॅग करत बॉंबस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
-
मुंबई : जयंत पाटील शरद पवार यांची घेणार भेट
ईडी चौकशीनंतर जयंत पाटील आज सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेणार
-
गौतमीच्या कार्यक्रमात लहान मुलेही थिरकले
गौतमी पाटीलच्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. गौतमी पाटीलच्या डान्सचे व्हिडीओ Youtube, instagram, facebook वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने तिच्या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे….सविस्तर वाचा
-
राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांची काँग्रेसवर टीका
काँग्रेस हा सेक्युलर पक्ष त्यांनी अशा पद्धतीने धार्मिक विधी करणे चुकीचे आहे
विधानसभा शुद्धीकरण करणे मला अयोग्य वाटले, मग काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक काय राहिला?
यावर काँग्रेसच्या नेत्यांनी विचार केला पाहिजे
-
मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची मिश्किल प्रतिक्रिया
जेवणाचे आमंत्रण जेवल्या शिवाय खरं नसतं मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची मिश्किल प्रतिक्रिया
घोडा मैदान जवळच आहे. मंत्री नाही झालो तरी काम करूनच राहलो. मंत्री झालो तर अधिक वेगाने काम करू.
आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे विस्तार तातडीने होण गरजेच आहे.
प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री भेटणं गरजेचं आहे ही जनतेची खरी मागणी आहे.
-
पार्श्वनाथांच्या मुर्तीला लेप लावण्याची प्रक्रिया
वाशिमच्या शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथांच्या मुर्तीला लेप लावण्याच्या तिसऱ्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही लेप प्रक्रिया श्वेताम्बरी आणि दिगंबरी या दोन्ही जैन पंथीयांमधील 5 जणांच्या उपस्थितीत इन कॅमेरा करण्यात येत आहे. दरम्यान भाविकांचं दर्शन सुरू ठेवण्यात आलं आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
पुणे मेट्रोसाठी भरती बिहारमधून
सरकारी प्रोजेक्टच्या नोकरीसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती
पुणे मेट्रोसाठीच्या इंजिनीरिंग डिपार्टमेंटसाठी भरती बिहारमधून होत आहे
आनंद दवे यांचा आरोप, मेट्रो अधिकाऱ्यांची घेणार भेट
-
कोकणवासीयांसाठी मनसे सरसावली
कोकणवासीयांच्या मदतीला मनसे सरसावली
रेल्वे तिकीटाचा काळाबाजार करणाऱ्यांना मनसे स्टाईल दाखवा
दलाल नजरेस पडल्यास आमच्या कार्यकर्त्यांना दाखवा
मनसे आमदार राजू पाटील यांचे प्रवाशांना आवाहन
-
GT vs CSK IPL 2023 Qualifier 1 | आज ऋतुराज गायकवाड चांगला खेळला नाही, तर चेन्नईचा जास्त फायदा का?
GT vs CSK IPL 2023 Qualifier 1 | तुम्ही म्हणाल ऋतुराज चांगला खेळतोय. मग त्याला का विसरायचं? वाचा सविस्तर….
-
MI Playoff IPL 2023 : ‘RCB अजून तू अंड्यात, बच्चा’ मुंबईच्या प्लेऑफ प्रवेशानंतर RCB चा खिल्ली उडवणारा Video Viral
MI Playoff IPL 2023 : मुंबईच्या फॅन्सनी हा व्हिडिओ नक्की बघावा, पण RCB फॅन्सनी हा व्हिडिओ पाहू नये. वाचा सविस्तर….
-
छत्रपती संभाजी नगर | महावितरणची ग्राहकांकडे 70 हजार कोटी रुपयांची थकबाकी
महावितरणावर विविध बँकांचे हजारो कोटींचे कर्ज
विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे महावितरणची 60 ते 70 कोटींची थकबाकी
70 हजार कोटींची थकबाकी असल्याने महावितरण संकटात
महावितरणला संकटातून बाहेर काढण्यासाठी ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली करण्याचे ध्येय
वीज वितरण कंपनीच्या तीन कोटी वीज ग्राहकांपैकी फक्त 50% ग्राहकांची होते योग्य बिलिंग
-
बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे 2049 जणांची बळी
16 महिन्यात बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे 2049 जणांची बळी
चार जिल्ह्यातील 16 महिन्यात झालेल्या अपघातात 2049 जनांचा गेला जीव
छत्रपती संभाजी नगर जिल्हा,जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आकडेवारी
हजारो अपघातग्रस्तांना आले कायमच अपंगत्व
-
अमरावती | अमरावती जिल्ह्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात
अपघातात पाच जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी
दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील लेहगाव फाटा येथील घटना
रात्रीच्या सुमारास झाला अपघात
एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
मृतांमध्ये 2 लहान मुले 2 महिला एका पुरुषांचा समावेश
-
परळ-टीटी उड्डाणपुलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना 1 जूनपासून प्रवेश बंदी
अडीच मीटरपेक्षा उंच वाहनांसाठी हाइट बॅरियर लागणार
परळ-टीटी उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येणार
उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे भरण्यासह रस्त्यावर असणारे खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात
-
नाशिक | जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आजपासून होणार बदली प्रक्रिया
तब्बल पाच ते सहा वर्ष एकाच जागी असलेल्या कर्मचाऱ्यांची होणार बदली
गेल्या तीन वर्षांपासून बदली प्रक्रिया रखडली
दहा टक्के प्रशासकीय, तर दहा टक्के होणार विनंती बदल्या
-
नाशिक | नाशिकमधून आणखी 19 शहरांना मिळणार कनेक्टिंग फ्लाईट
नाशिकच्या ओझर विमानतळावरून विमानसेवेचे जाळे होणार व्यापक
एक जूनपासून देशातील प्रमुख 19 शहरांसाठी इंडिगो कडून मिळणार कनेक्टींग फ्लाईट
बेंगळूर, अमृतसर, भुवनेश्वर, चंदीगढ, चेन्नई, नवी दिल्ली, जयपूर, कोची, कोलकाता, जोधपूर, लखनऊ,
प्रयागराज, तिरूवअनंतपुरम, वाराणसी, विजयवाडा, विशाखापट्टणम या शहरांना नाशिक जोडले जाणार
-
नाशिक | जुलै महिन्यात होणार महापालिकेची नोकरभरती
टाटा कंपनीकडून एप्लिकेशन्स तयार करण्याचे काम सुरू
1997 नंतर महापालिकेत होणार भरती
वैद्यकीय आणि अग्निशमन विभागातील 706 पदांची होणार भरती
-
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी माहिती सादर करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मतदान साहित्यासह इतर अनुषंगिक माहिती पुढील दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश
पुणे लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघातील मतदारांची यादी, मतदान यंत्रे, याबाबत नियोजन सुरू
खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त
-
हज यात्रेकरुंसाठी आजपासून लसीकरण मोहिम
नाशिकमध्ये हज यात्रेकरुंसाठी आजपासून लसीकरण सुविधा
मनपातर्फे डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात मिळणार सुविधा
आरोग्य तपासणी करून मेंदूज्वर आणि तोंडावाटे पोलिओची लस दिली जाणार
65 वर्षांवरील व्यक्तींना इन्फ्लुंझा लस दिली जाणार
-
पुण्यातील विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न
पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न
वडिलांचा मृत्यु, तर आई अत्यवस्थ
नैराश्य, आजारपण याला कंटाळून एका कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा केला प्रयत्न,
ही घटना फुरसुंगीमधील लक्ष्मी निवास येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली,
सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे यांचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी जनाबाई अबनावे आणि मुलगा चेतन अबनावे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याची नाव आहे.
यामध्ये दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
नितेश राणे त्र्यंबकेश्वर मंदिरात महाआरती करणार
त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाद्वारासमोर धूप दाखविण्याचे प्रकरण
भाजपचे आमदार नितेश राणे करणार महाआरती
आज सकाळी 11 वाजता करणार महाआरती
यानंतर पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता
-
अमरावतीत आजपासून हेल्मेट सक्ती
अमरावती शहरात आजपासून हेल्मेट सक्ती
हेल्मेट न वापरणाऱ्याला १००० रुपये दंड
शाळा,महाविद्यालय,विद्यापीठ,शासकीय कर्मचारी अधिकारी यांना हेल्मेट सक्ती
आज पासून कारवाईसाठी आरटीओ व वाहतूक पोलीस उतरणार रस्त्यावर
Published On - May 23,2023 7:42 AM