Maharashtra Breaking Marathi News Live | जंयत पाटील यांचा सरकारवर निशाणा, पाहा काय म्हणाले?
Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. नागरिक आणि सैनिक मिळून 150 जणांना हमासने बंधक बनवल्याची माहिती आहे. या भीषण युद्धात आतापर्यंत 900 इस्रायलींचा मृत्यू झाला असून 2,600 जखमी झाले आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. इस्रायलकडून गाझा पट्टीत एअर स्ट्राइक सुरुच आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलचा मुद्दा घेऊन राज्य सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. माझे कार्यकर्ते टोलनाक्यावर जाऊन पाहणी करतील, आमच्या लोकांना अडवलं तर टोलनाके जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरुन निवडणूक आयोगात काल सुनावणी झाली. शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघांनी आपआपली बाजू मांडली. यासह देश आणि विदेशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
Jayant Patil | राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढेपाळली : जंयत पाटील
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढेपाळली आहे. तसेच मंत्र्यांचं पोलीस प्रशासनात हस्तक्षेप वाढले आहेत, असंही जयंत पाटील म्हणालेत.
-
Lalit Patil Shiv Sena | ललित पाटील याचे शिवसेना पक्ष प्रवेशाचे जुने फोटो व्हायरल
मुंबई | एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ललित पाटील याचे शिवसेना पक्ष प्रवेशाचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ललित पाटीलसोबत दादा भुसे आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत.
-
-
Ajit Pawar Meeting | अजित पवार गटाची उद्या मुंबईत महत्वाची बैठक, नक्की कारण काय?
मुंबई | राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाची उद्या 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. मुंबईत 2 कार्याध्यक्ष नेमण्याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचं समजतंय. तसेच मुंबईतील पक्ष संघटनेवर अजित पवार गटाच्या नेत्यांची चर्चा होणार असल्याचं म्हटलं जातंय.
-
गंगाजलावर 18% GST, छत्तीसगडचे मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा
#WATCH | Raipur: "BJP talks about religion and on Gangajal they are thinking of earning money by imposing 18% GST on it," says Chhattisgarh CM Bhupesh Baghel pic.twitter.com/PaYvW78J0v
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) October 10, 2023
-
पंजाब सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले
पंजाबमधील भगवंत मान सरकारने दोन दिवसांसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 21 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. विधानसभेचे हे विशेष अधिवेशन का आणि कशासाठी बोलावण्यात आले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
-
-
म्यानमारमध्ये विस्थापितांच्या शिबिरावर हल्ला, 29 ठार
उत्तर-पूर्व म्यानमारमधील विस्थापितांसाठी बांधलेल्या छावणीवर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत अनेक मुलांसह एकूण 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हे शिबिर काचिन इंडिपेंडन्स ऑर्गनायझेशनच्या ताब्यात असलेल्या परिसरात आहे.
-
अमेरिकेतील चिनी दूतावासात घुसलेल्या कार चालकाची पोलिसांनी गोळ्या झाडून केली हत्या
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील चिनी वाणिज्य दूतावासात सोमवारी एक कार घुसल्याने गोंधळ उडाला आणि पोलिसांनी कार चालकाला ठार केले. अधिकाऱ्यांनी दूतावास परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून लोकांना या भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्याने व्हिसा ऑफिसच्या लॉबीत जाऊन कार चालकाशी संपर्क साधला, त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये गोळीबार सुरू झाला, असे सांगण्यात येत आहे. संशयिताचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
-
Asian Games | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना केलं संबोधित
दिल्ली: आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या चमूला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मला अभिमान आहे की आमच्या ‘नारी शक्ती’ने आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी केली. यातून भारतीय महिलांचं सामर्थ्य दिसतं.”
#WATCH दिल्ली: एशियन गेम्स में भाग लेने वाले भारतीय एथलीटों के दल को संबोधित करते हुए PM मोदी ने कहा, "मुझे गर्व है कि हमारी 'नारी शक्ति' ने एशियाई खेलों में बहुत अच्छा प्रदर्शन किया। यह भारत की बेटियों के सामर्थ्य के बारे में बताता है।" pic.twitter.com/ZrigQI0LXj
— ANI_HindiNews (@AHindinews) October 10, 2023
-
अजित पवार यांचा पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा
पुणे | अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेच्या अध्यक्षांनी याबाबत माहिती दिलीय. विशेष म्हणजे अजित पवार गेल्या ३० वर्षांपासून बँकेचे संचालक होते.
-
Ahmednagar News | हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
अहमदनगर | हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. अक्षय सब्बन, चैतन्य सूडके या आरोपींना आज न्यायालयात हरज करण्यात आलं. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शहर परिसरातून रात्री तीन जणांना केली होती. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. याप्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री करत. याबाबत कुलकर्णी यांनी तक्रार केली होती. याचा मनात राग धरून आरोपींनी हल्ला केल्याची माहिती समोर आलीय.
-
Dada Bhuse | दादा भुसे यांच्यावर सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप
ड्रग्जप्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला सूसन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी मंत्री दादा भुसे यांचा फोन आला होता. त्यामुळे भुसे यांचा कॉल रेकॉर्ड तपासा असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला आहे. तपासात खरी माहिती समोर येईल, असे त्यांनी सांगितले.
-
Maharashtra Cabinet Decisions | विद्यापीठाच्या नावात पण केला हा बदल
औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव अशी करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे नाव आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद ऐवजी तिथे धाराशिव असा उल्लेख करण्यात येणार आहे.
-
Udhav Thackery : आपला दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच- उद्धव ठाकरे
आपला दसरा मिळेवा शिवाजी पार्कवरच होणार आहे. शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा राहिलेली आहे. शिवाजी पार्कचा अर्ज शिंदे गटाने मागे घेतला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी काही जुन्या आठवणी पण यावेळी जागवल्या.
-
Sunil Tatkare | भाजपला न मागता दिला पाठिंबा
2014 मध्ये भाजपला न मागता राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता, असा हल्लाबोल सुनील तटकरे यांनी शरद पवार गटावर केला. या पाठिंब्याबाबत शरद पवार गटाने खुलासा करण्याचे आवाहन त्यांनी केले. येत्या काळात काही लोक अजित पवार गटात येतील असा दावा त्यांनी केला.
-
मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.
-
राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत सुशीलकुमार शिंदे याचे मोठे विधान
सोलापूर : शांतता भंग करणाऱ्यांवर ऍक्शन तर घेतली पाहिजे. मात्र त्यांनी वैचारिक भूमिका घेऊन काम केले पाहिजे. त्यांची समन्वयाची भूमिका दिसत नाही, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवले जाऊ शकते का यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसबाबत असे होईल असे वाटत नाही. पुढे काय होते ते बघावे लागेल असे सांगितले.
-
‘टोलचा झोल नो मोर’, मनसेची बॅनरबाजी
छत्रपती संभाजीनगर : टोलनाक्यावरून मनसेने केलेल्या बॅनरबाजीची शहरात एकच चर्चा सुरु आहे. ‘टोलचा झोल नो मोर’ या स्लोगनखाली ही बॅनरबाजी करण्यात आलीय. शहरातील क्रांती चौकात टोल न भरण्याचे बॅनर झळकलेत. बॅनरमधून दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांनी टोल भरू नये असे आवाहन करण्यात आलंय.
-
शेतकरी संघटनेचे पिंडदान आंदोलन
जळगाव : जिल्ह्यातील 78 हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळत नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पिंडदान आंदोलन केले. तापी नदीच्या संगमावर जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात पिंडदान आंदोलन केले. यावेळी जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आंदोलन दरम्यान करण्यात आली.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर विमानतळावर स्वागत
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरूनच ते तेलंगणातील आदिलाबादच्या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. आदिलाबाद येथे एका सार्वजनिक सभेला ते दुपारी चारच्या सुमारास संबोधित करणार आहेत. सभेनंतर ते हैदराबाद येथे जाणार आहेत.
-
श्री विठ्ठल रुक्मिणी अलंकारांची डागडूजी
पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात श्री विठ्ठल रूक्मिणीस विविध अलंकारानी सजवलं जातं. त्याच मौल्यवान अलंकाराची साफसफाई केली जात आहे.
-
उद्धव ठाकरे यांच्या भेटीला सेवेकरी नंदी बैलासह मातोश्रीत दाखल
मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला राज्यातील सेवेकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. पारंपारिक वेशभूषेत हे सेवेकरी नंदी बैलांसह मातोश्रीत दाखल झाले आहेत. यात वासुदेवाचा देखील समावेश आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली.
-
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सरकारची लेकींना लखपती करणारी योजना
मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी राज्य सरकारने लेकींना लखपती करणारी योजना आखली आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर ती 18 वर्षांपर्यंत होईपर्यंत 1 लाख 1 हजार अशी रक्कम मुलीला मिळणार आहे.
-
ठाकरे गटाचे शिष्ठमंडळाने पालीका आयुक्तांची कानउघाडणी
ठाकरे गटाच्या शिष्ठमंडळाने मुंबई महानगर पालीका आयुक्तांची भेट घेऊन निधीच्या वाटपात समान न्याय देण्याची मागणी केली आहे.
-
ड्रग्स तस्कर भूषण पाटील याला पुणे पोलीसांनी केली अटक
उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून ड्रग्स तस्कर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला पुणे पोलीसांनी केली अटक आहे. भूषण पाटील याचा ड्रग्स बनवण्याचा कारखाना होता. मुंबई, पुणे पोलीस, नाशिक पोलीस त्याच्या मागावर होते. साकीनाका पोलिसांनी ३०० कोटींचे एमडी ड्रग्स केले होते.
-
बीकेसी उड्डाणपुलाखाली वाहन अपघाता झाल्याने वाहतूक विस्कळीत
एव्हराड नगराकडे जाणाऱ्या बीकेसी उड्डाणपुलाखाली ऑटो रिक्षा पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. या रिक्षातील जखमी महिला प्रवासी आणि रिक्षाचालकाला सायन रुग्णालयात दाखल केले आहे.
-
Maharashtra News : सरकार म्हणून आम्ही कोणावरही दबाव आणणार नाही- संजय शिरसाट
सरकार म्हणून आम्ही कोणावरही दबाव आणत नाही असे संजय शिरसाट म्हणाले. कुढल्याही सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणणे योग्य नाही असेही शिरसाट म्हणाले. सरकार दबावाचं राजकारण करतंय असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत होता. त्यावर संजय शिरसाट यांनी भूमिका मांडली.
-
Mumbai Pune Express way : मुंबई-पुणे द्रुतागता मार्गावरील ब्लॉक संपला
मुंबई-पुणे द्रुतागता मार्गावरील ब्लॉक संपलेला आहे. पूण्याच्या दिशेने वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. दोन तासांसाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला होता. बोरघाटातील कामामुळे हा ब्लॉक घेण्यात आला होता.
-
Maharashtra News : अजित पवारांच जनतेसाठी पत्र
सरकारमध्ये शंभर दिवस पूर्ण झाल्यानं अजित पवार यांनी जनतेसाठी पत्र लिहलं आहे. पत्रात स्वतःचा राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. पत्रात सरकारमध्ये सामिल होण्यामागच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे. राज्यात याआधी झालेल्या राजकिय बंडाचा यामध्ये अप्रत्यक्षपणे उल्लेख केला गेला आहे. यशवंतराव चव्हानांचा वारंवार उल्लेख करण्यात आलेला आहे, मात्र शरद पवारांचे या पत्रात नावही घेण्यात आलेले नाही.
-
Maharashtra News : अंबाबाई मंदिर परिसरात राडा
तुळजापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या चप्पल स्टँडवर प्रशासनाने कारवाई केली आहे. हे स्टँड अनाधिकृत असल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे स्टँड धारक आणि पोलिसांमध्ये राडा झाला आहे. दरम्यान प्रशासनाकडून कुठलीही पुर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात येत असल्याचं स्टँड धारकांचं म्हणणं आहे.
-
Maharashtra News : वैभव नाईक यांच्यावर नितेश राणे यांची टिका
वैभव नाईक हे सकाळचा चहा मुख्यमंत्री शिंदेंच्या बंगल्यावर घेतात आणि रात्रीचं जेवणही तिथेच करतात म्हणून त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टिका करू नये असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
-
Maharashtra News : आमच्या हिंदूत्ववादी संघटना सक्षम- नितेश राणे
फक्त हिंदू धर्मियांना दांडियासाठी परवाणगी द्या असे आवाहन नितेश राणे यांनी आयोजकांना केले आहे. दांडिया खेळायला येणारे हिंदू आहेत की नाही हे तपासा असे राणे म्हणाले.
-
Maharashtra News : विजय वडेट्टीवार लवकरच पक्षांतर करतील- आशिष देशमुख
विजय वडेट्टीवार लवकरच पक्षांतर करतील असं वाटतयं असे आशिष देशमुख म्हणाले. विजय वडेट्टीवारांच्या राहुल गांधी यांच्यावरील प्रतिक्रीयेनंतर आशिष देशमुख यांनी ही प्रतिक्रीया दिली. राहुल गांधी उच्चशिक्षीत आहेत मात्र ते वक्ता चांगले नाहीत असे विजय वडेट्टीवार म्हणाले होते.
-
Maharashtra News : छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्राम्हण समाजाचा मोर्चा
छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्राम्हण समाजाचाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. परशूराम आर्थिक विकास महामंडाच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. वंदेमातरम सभागृहापासून विभागीय आयूक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये शेकडो लोक सामिल झाले आहेत.
-
कोल्हापूरच्या अंबाबाई परिसरात राडा; मंदिर परिसरातील चप्पल स्टँड हटवण्यावरून वाद
कोल्हापूरच्या अंबाबाई परिसरात राडा सुरू आहे. मंदिर परिसरातील चप्पल स्टँड्स हटवण्यावरून वाद सुरू आहे. यावेळी पोलीस आणि चप्पल स्टँडवाल्यांमध्ये झटापट झाली.
-
पिंपरी चिंचवड : ताथवडेमधील स्फोटाची CID मार्फत चौकशीची मागणी
पिंपरी चिंचवड इथल्या ताथवडेमधील स्फोटाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ता अंकुश काकडे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ताथवडे इथं जेएसपीएम संस्थेजवळ सिलेंडरचे स्फोट झाले होते. “हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. ज्याठिकाणी स्फोट झाले ती जागा कोणाची याचा शोध पोलिसांनी घ्यावा. या घटनेमागे नेमकं कोण आहे, याचा छडा लावण्यात यावा,” अशी मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने केली आहे.
-
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर ससून रुग्णालयाला देणार भेट
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर ससून रुग्णालयाला भेट देणार आहे. भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसंच ससूनचे प्रमुख डॉ.संजीव ठाकूर यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. ससून रुग्णालयातून काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार झाला होता.
-
मनोज जरांगे यांची आज छत्रपती संभाजीनगर शहरात जंगी सभा
मनोज जरांगे यांची आज छत्रपती संभाजीनगर शहरात जंगी सभा पार पडणार आहे. विभागीय क्रीडा संकुलात जरांगे पाटलांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला जवळपास दीड लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आतापर्यंतची सर्वात मोठी सभा होणार आहे. मनोज जरांगे यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता होणार मनोज जरांगे यांच्या सभेला सुरुवात होणार आहे.
-
ओव्हल मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा
ओव्हल मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. मनपाकडे केलेला अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवतिर्थावर ठाकरे गटाच्या मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये टोलनाक्यावरून मनसेची बॅनरबाजी
छत्रपती संभाजीनगरमध्ये टोलनाक्यावरून मनसेची बॅनरबाजी पहायला मिळाली. ‘टोलचा झोल नो मोर’ असे बॅनर्स शहरातील क्रांती चौकात लावण्यात आले आहेत. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना टोल न भरण्याचं आवाहन केलं आहे.
-
LIVE UPDATE | घाटकोपरच्या विक्रांत सर्कल गुजराती बोर्ड तोडफोड प्रकरणी भाजप आक्रमक
घाटकोपरच्या विक्रांत सर्कल गुजराती बोर्ड तोडफोड प्रकरणी भाजप आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्ते, स्थानिक आमदार, नगरसेवक याठिकाणी जाऊन आज ११.३० वाजता पाहणी करणार , आंदोलन करणार आहेत. यावेळी मनसे आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता…
-
LIVE UPDATE | जलतरण तलावात क्लोरिन गॅस लिकेज, २० ते २२ जणांना श्वास घेण्यास त्रास
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाला आहे. ज्यामुळे पोहण्यासाठी आलेल्या 20 ते 22 जणांना श्वास घेण्यास त्रास झाला आहे. तसेच परिसरात क्लोरीन गॅस पसरल्याने काही मीटर पर्यंत नागरिकांना खोकला आणि गळ्याचा त्रास, श्वास घेण्यास त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
LIVE UPDATE | पुण्यातील बुधवार पेठेत सामाजिक सुरक्षा विभागाची छापेमारी
पुण्यातील बुधवार पेठेत सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी केली आहे. बुधवार पेठेतील सात बांग्लादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरामध्ये राहणाऱ्या महिलांवर पुणे पोलिसांची नजर आहे. बांगलादेशी महिलांवर कारवाईची सामाजिक सुरक्षा विभागाची एक महिन्यात तिसरी कारवाई करण्यात आली आहे. बांगलादेशी महिलांकडे भारतात येण्याचा पुरावा नसल्याचे तपासात उघड झालं आहे.
-
केसरकरांनी आम्हाला शिकवू नये- संजय राऊत
दीपक केसरकर मोती तलावावरचा डोमकावळा आहेत. त्यांनी आम्हाला शिकवू नये. ते शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपमध्ये जातील, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.
-
दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळीने आरशात पहावं – संजय राऊत
दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळीने आरशात पहावं, संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
शिवसेना ठाकरेंची हे कोणीही सांगेल, शिंदेंना कोणीही ओळखत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
-
दादर : फूल मार्केटमागील खत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
दादरमधील फूल मार्केटच्या मागे सुरू असलेल्या खत प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी दर्शवला विरोध, मंडई परिसरात आंदोलन सुरू आहे.
आंदोलनस्थळी भाजप नेते कालिदास कोळंबकर हेही उपस्थित आहेत.
-
कारमधून अफूची तस्करी, 18 लाखांचा माल जप्त
चाळीसगाव शहर पोलिसांनी अफू विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 18 लाख रुपये किंमतीचा अफू जप्त केला आहे. कारमधून केली जात होती तस्करी, कारचालका विरोधात गुन्हा दाखल.
-
कुणाच्या चिन्हावर कोण उभ राहणार, हे महत्वाचं नाही – दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर नवी चर्चा
कुणाच्या चिन्हावर कोण उभ राहणार, हे महत्वाचं नाही. नरेंद्र मोदींना निवडून आणणं हे एकच उद्दिष्ट आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यानंतर नवी चर्चा रंगली आहे.
-
मुंबई नाशिक महामार्गावर स्विफ्ट- कंटेनरचा अपघात, 5 जण जखमी
मुंबई नाशिक महामार्गावर पाडळी फाट्याजवळ स्विफ्ट कार कंटेनरखाली घुसल्याने झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले.
कारचालकाला डुलकी लागल्याने पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. चौघे जण गंभीर जखमी असून एकाल किरकोळ मार लागला
-
कॅबिनेट बैठकीपूर्वी अजित पवार गटाच्या मंत्र्यांची बैठक
आज दुपारी १२ वाजता राज्य मंत्रीमंडळाची महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. त्यापूर्वी अजित पवार गटाच्या मंत्र्यांची देवगिरी बंगल्यावर बैठक होत आहे.
मंत्र्यांसोबत आमदार दत्ता भरणे, शेखर निकम, निलेश लंके हेदेखील उपस्थित आहेत.
-
Maharashtra News | तरुणीकडून टीसीला मारहाण
चर्चगेट ते गोरेगाव लोकलमध्ये सोमवारी विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला महिला टीसीने दंड भरण्यास सांगितले म्हणून तिने टीसीला मारहाण केली प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी वांद्रे जीआरपी पोलिसांनी तरुणीवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
-
Maharashtra News | मुलुंड टोलनाक्यावर बंदोबस्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल संदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर मनसेकडून सोमवारी जनजागृती करण्यात आली. तसेच मुलुंड टोल नाका जाळण्याचा प्रयत्न झाला होता.त्यानंतर आता मुलुंड टोल नाक्यावर मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
-
Maharashtra News | मीरा भाईंदर शहरात मनसेकडून बॅनरबाजी
मीरा भाईंदर शहरात मनसेकडून बॅनर बाजी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल माफी संदर्भात केलेल्या वक्तव्याचें मनसेकडून बॅनर लावून आभार मानण्यात आले. हा बॅनर चर्चेचा ठरला आहे.
-
Maharashtra News | बुलढाणा टोल नाक्यावर मनसेकडून आंदोलन
बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर येथील टोल नाक्यावर मनसेकडून आंदोलन करण्यात आले. चार चाकी वाहने टोल न घेता सोडून देण्यात आली. यावेळी मनसेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागपूर ते पुणे महामार्गावर मनसेने हे आंदोलन केले.
-
Maharashtra News | बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी जखमी
छत्रपती संभाजीनगरमधील शेंदूर्वादा गावात बिबट्याने लहान मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात लहान मुलगी गंभीर जखमी झाली. नागरिकांनी दगडफेक करताच बिबट्या पसार झाला. मोसंबी शेतात मजुराच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला.
-
Nashik News | सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रासाठी किती कोटीचा निधी मंजूर?
सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रासाठी 81.86 कोटींचा सुधारित आराखडा जाहीर. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितित झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत निर्णय. सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्राचा होणार विकास. सप्तशृंगी देवी तिर्थस्थळी स्वच्छता गृह बांधणे, डोम बसवणे, दरड कोसळू नये यासाठी संरक्षक जाळी बसवणार
-
Mumbai-Pune Express way | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कधी राहणार बंद?
मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते दुपारी 2 पर्यंत राहणार बंद. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी आज दुपारी राहणार ब्लॉक. महामार्गावर पुणे वाहिनीवर अमृतांजन पुल व खंडाळा बोगदा येथे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार.
-
MNS Toll protest | मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची रात्री उशिरा सुटका
मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवसह कार्यकर्त्यांची मध्यरात्री नवघर पोलीस ठाण्यातून सुटका करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना असे स्पष्ट केले होते की, राज्यामधील टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफी आहे.. ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मुलुंड चेक नाक्याजवळ देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी चर्चा केलेला व्हिडिओ वाहन चालकांना दाखवून टोल न भरण्याची विनंती करत होते त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते होते हे सगळे मिळून वाहन चालकांना व्हिडिओ दाखवून टोलमुक्ती बाबतची जनजागृती करत होते. मुलुंड नवघर पोलिसांनी ऐरोली, मुलुंड, ठाणे या परिसरातील कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि त्यांना अटक देखील केली आणि रात्री 12 नंतर कार्यकर्त्यांची सुटका केली ..
-
Israel-Hamas Conflict | युद्धात आतापर्यंत किती नागरिकांचा मृत्यू?
गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. आतापर्यंत 900 इस्रायलींचा मृत्यू झाला असून 2,600 जखमी झाले आहेत. इस्रायलकडून शनिवारपासून एअरस्ट्राइक सुरु आहेत. त्यात आतापर्यंत 687 पॅलेस्टाइनचा मृत्यू झाला आहे. गाझन आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलीय. अन्य 3000 जखमी झाले आहेत.
Published On - Oct 10,2023 7:32 AM