Maharashtra Marathi News Live | मंत्री छगन भुजबळ यांची रोखठोक मुलाखत, केले अनेक खुलासे
Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींसह जगातील सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास दरम्यानचं युद्ध सुरूच आहे. या युद्धात आतापर्यंत इस्रायलचे 900 नागरिक मारले गेले आहेत. तर 2300 लोक जखमी झाले आहेत. तर गाजापट्टीत 765 पॅलेस्टीन नागरिक मारले गेले आहेत. इस्रायलने आतापर्यंत 1500 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना हायकोर्टाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 2369 गावांमध्ये निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजित पवार गटाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. यासह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
प्रकाश आंबेडकर यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
सभा सुरू झाल्यापासून बीडमध्ये इंटरनेट बंद असल्याचे समजले, मी शासनाचा जाहीर आभार मानतो. लोकसभा जशी जशी येईल तशी देशाची परिस्थिती बदलणार आहे. 2024 मध्ये सत्ता आल्यानंतर मोदी हिमालयात जाणार आहेत म्हणे, आरएसएस ने त्यांना आताच हिमालयात पाठवावे.
-
पिंपरी- चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय
पिंपरी- चिंचवडमधील क्षेत्रीय कार्यालय इमारतीवर रुफटॉप सोलर बसवण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीवर हे सोलर बसवण्यात येणार असून यामुळे विजेची बचत होणार आहे.
-
-
सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचं हे ठरलं होतं- भुजबळ
शरद पवार यांच्या घरी बैठक झाली, त्यात सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करायचं ठरलं. त्यानंतर शरद पवार यांनी राजीनामा दिला. अचानक राजीनामा दिल्याने मी आवाक् झालो. तेव्हा मी सुप्रिया सुळे यांना फोन केला. तेव्हा त्या म्हणाल्या अजित पवारांना माहिती होतं. ही माहिती दोन चार लोकांना होती.
-
अबू आजमी यांचे मोठे आरोप
आज सरकार महिलांच्या रिझर्वेशनवर बोलत आहेत. पण हे कधीपर्यंत तुम्ही खोटा बोलणार. ह्या देशात फक्त मोठ्या घरचे लोक जातात पर्लिमेंटमध्ये आणि सरकारमध्ये. त्यांना कधीच दुःख समजणार नाही. देश बोलता बेटी पढाव बेटी बचाव पण गुजरातमध्ये काय झालं. त्यानंतर त्या घराला जाळून टाकलं आणि त्या महिलेवर अत्याचार झाला.
-
2014 साली काय झालं? छगन भुजबळ यांनी खुलासा केला
2014 साली निवडणुका आल्या तेव्हा भाजपाने ठरवलं की शिवसेनेसोबत जायचं नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही काँग्रेसला सोडा. त्यामुळे चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील. त्यामुळे आम्ही काँग्रेसचा पाठिंबा काढला आणि स्वतंत्र्यपणे निवडणूक लढलो. मतमोजणीनंतर आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ असं स्पष्ट केलं. त्यानंतर शरद पवार यांनी आमचा पाठिंबा कायमस्वरुपी गृहीत धरू नका, असं सांगितलं. मग त्यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं.
-
-
मथुरेच्या श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिद प्रकरणी सुनावणी
अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी आणि मथुरेतील शाही इदगाह मशिदीची वादग्रस्त जागा हिंदूंच्या ताब्यात देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळली आहे. या मागणीसंदर्भात दाखल अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याच्या आधारे ही याचिका फेटाळण्यात आली आहे. तत्सम मागण्यांबाबत काही प्रकरणे प्रलंबित असल्याचे उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
-
गुजरातला पाठवतात रोजगार आणि….! आदित्य ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका
गुजरातचे मुख्यमंत्री आज मुंबईत आहेत… 'व्हायब्रंट गुजरात' रोड शो साठी. गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढावेत ह्यासाठी हा खटाटोप.
पण त्यांना एवढी मेहनत करायची गरजच काय? फक्त एक फोन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना केला असता, तर त्यांनी आनंदाने कोलांट्या उड्या मारत इकडचे उद्योग तिथे… pic.twitter.com/AUbBACGYXU
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 11, 2023
-
निवडणूक आयोगाने राजस्थानच्या निवडणुकीची तारीख बदलली
निवडणूक आयोगाने राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीची तारीख बदलून 23 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबर केली. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
चुनाव आयोग ने राजस्थान में विधानसभा चुनाव की तारीख 23 नवंबर से बदलकर 25 नवंबर कर दी है, मतगणना 3 दिसंबर को होगी। pic.twitter.com/6gSqQLXiGJ
— ANI_HindiNews (@AHindinews) October 11, 2023
-
आत परतीचे दोर कापण्यात आले आहेत- जयंत पाटील
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवार यांच्यावर टीका केल्याप्रकरणी त्यांनी खडे बोल सुनावले. आता त्यांच्या परतीचे दोर कापले असून आपण पुढील लढाईसाठी सज्ज आहोत.
-
आशियाई क्रिडा स्पर्धेत चमकदार केल्यानंतर कबड्डीपटू स्नेहल शिंदे हिचं पुण्यात स्वागत
पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकल्याबद्दल संघाची खेळाडू स्नेहल शिंदे म्हणाली, “गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आम्ही रौप्यपदक जिंकले होते. यावेळी सुवर्णपदक मिळवून देताना खूप आनंद होत आहे. “
#WATCH पुणे: एशियन गेम्स में भारतीय महिला कबड्डी टीम के स्वर्ण पदक जीतने पर टीम की खिलाड़ी स्नेहल शिंदे ने कहा, "पिछले एशियन गेम्स में हमने रजत पदक जीता था… इसबार हम स्वर्ण पदक लेकर आए इसकी बहुत खुशी है।" https://t.co/pWj92wdaaN pic.twitter.com/rQPyd4FLv7
— ANI_HindiNews (@AHindinews) October 11, 2023
-
रायगडच्या उरणमध्ये गोडाउनला भीषण आग
उरण तालुक्यातील सोनारी गावालगत असलेल्या गोडाऊनला आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या आहेत.
-
Caste Census | काँग्रेसशासित राज्यात जातीय जनगणनेला मान्यता
हिमाचल प्रदेशातील जातींबद्दल सर्वांनाच माहिती आहे. ही मोठी गोष्ट नाही. ती केवळ एक औपचारिकता आहे. असे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी स्पष्ट केले. काँग्रेस शासित राज्यात जातीय जनगणनेला CWC ने मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली.
-
Sanjay Raut | अपरिहार्य कारणामुळे काँग्रेससोबत – संजय राऊत
आम्ही अपरिहार्य कारणामुले काँग्रेससोबत आल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांनी कमळाबाईच्या पदराखाली लपून कधी राजकारण केले नाही, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.
-
Dhangekar News | ललितसाठी महिला कोण पाठवायचं?
ड्रग्स प्रकरणातील आरोप ललित पाटील याच्यावरुन राज्यात वातावरण तापले आहे. कालपासून मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोपांची राळ उडविण्यात आली आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. आता आमदार रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक बॉम्ब टाकला आहे. ललित पाटील ससूनमध्ये उपचारासाठी दाखल असताना तो हॉटेलमध्ये जायचा. त्या हॉटेलमध्ये त्याच्यासाठी महिला कोण पठवायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत.
-
शासकीय शाळा खाजगी कंपनीना देणे गैर – शरद पवार
शासकीय शाळांना खाजगी कंपनीला विकासासाठी देण्याचा विपरीत परिणाम होत आहे. या शाळांना अशा प्रकारे खाजगी कंपनीला दिल्यास नाशिक येथे एका शाळेत गौतमी पाटील यांचा कार्यक्रम झाल्याचा उल्लेख यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथील महिला मेळाव्यात ते बोलत होते.
-
महिला भगिनींना संधी दिली की त्या संधीचे सोने करतात – शरद पवार
महिला भगिनींना राजकारणात योग्य संधी दिली की ते त्या संधीचे सोने करतात असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथील महिला मेळाव्यात ते बोलत होते. रास्त प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरायचे हा आपला हक्क आहे असेही त्यांनी यावेळी महिलांना संबोधन करताना मार्गदर्शन केले.
-
25 वर्ष सत्ता उपभोगणारे आता पवारांना हुकूमशहा म्हणत आहेत – जयंत पाटील
25 वर्षे सत्तेत राहून सत्ता उपभोगून आता शरद पवार यांना हुकूमशहा म्हणत आहेत अशी टीका अजित पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथील महिला मेळाव्यात ते बोलत होते.
-
हेडगेवारांच्या नावाने मतं मिळत नाहीत, म्हणून यशवंतरावांचे नाव घेतात – सुप्रिया सुळे
अजित पवार यांनी हेडगेवारांच्या नावाने मतं मिळत नाहीत म्हणून शेवटी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घ्यावे लागले आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महिलांचा द्वेष करणारा पक्ष आज ‘लेक लाडकी’ म्हणत आहे असेही टीकास्र त्यांनी राज्य सरकारवर सोडले आहे.
-
सुषमा अंधारे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे जोडेमारो आंदोलन
सुषमा अंधारे यांनी ललित पाटील प्रकरणी मंत्री दादा भुसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे फोटोला जोडे मारो आंदोलन केले
-
मेट्रोच्या कामामुळे पीएमपीचे काही मार्ग होणार तात्पुरते बंद
मेट्रोच्या कामामुळे पुणे शहरातली पीएमपीचे तीन मार्ग तात्पुरते बंद करण्यात येणार आहेत. ११ ऑक्टोबर पासून निर्णयाची अंमलबजावणी होईल. शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी PMPLने निर्णय घेतला आहे.
-
Maharashtra News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून वेळापत्रकात बदल करण्यात करण्यात आलेला आहे. आधी 13 तारखेला ही सुनावणी होणार होती. सर्व याचीकांची सुनावणी एकत्र घेण्याची ठाकरे गटाची मागणी होती.
-
Maharashtra News : ठाकरे मुख्यमंत्री असताना जातीय जणगणनेचा विषय का आणला नाही- शेलार
भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना जातीय जणगणनेचा विषय का आणला नाही असा सवाल शेलार यांनी केला. हिंदू एकत्र आला की उद्धव ठाकरेंच्या डाक्यात प्रश्न पडायला लागतात असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
-
Maharashtra News : व्हायब्रन्ट गुजरात कार्यक्रमावरून ठाकरे गटाचा सरकारवर निशाना
व्हायब्रन्ट गुजरात कार्यक्रमावरून ठाकरे गटाने सरकारवर निशाना साधला आहे. महाराष्ट्राचा जीव काढून गुजरातला दिला जातोय असा घाणाघात संजय राऊत यांनी केला आहे. तर यावर कुठलाही प्रकल्प गुजरातमध्ये गेलेला नाही असे उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
-
Maharashtra News : सुशातसिंह राजपूत केस प्रकरणाचा तपास व्हावा- नितेश राणे
भाजप नेते नितेश राणे यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास झाल्यास खरी माहिती समोर येईल असेही राणे म्हणाले.
-
Nagpur News : 15 ऑक्टोबरला मांस विक्री बंद राहणार
नागपूरात 15 ऑक्टोबरला मांस विक्री बंद राहणार आहे. नवरात्री निमीत्त हा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे. पुढचे नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा होणार आहे.
-
Nagpur News : नागपुरातील पूराचं प्रकरण नागपूर खंडपीठाकडे
24 सप्टेंबरला नागपूरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. यामुळे नाग नदीला पूर आला. पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरले होते. यामध्ये लोकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. आता हे प्रकरण नागपूर खंडपीठाकडे गेले आहे. नुकसानग्रस्त लोकांनी याबाबत याचिका दाखल केली होती.
-
LIVE UPDATE | सुनावणीत कोणतीही दिरंगाई करायची नाही – राहुल नार्वेकर
सुनावणीत कोणतीही दिरंगाई करायची नाही असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. दिल्लीतील कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळे एक दिवस आधी सुनावणी होणार आहे. नियमांनुसार आणि घटनेच्या तरतुदीनुसार मी झाला निर्णय घेईल.. असं देखील राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे.
-
LIVE UPDATE | भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा पनवेलमध्ये निषेध
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा पनवेलमध्ये निषेध करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांचा पनवेलमध्ये दौरा होता. दरम्यान, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
-
LIVE UPDATE | गृहमंत्र्यांच्या पत्नी जिथे सुरक्षित नाही तिथे सर्व सामान्यांचे काय ? – सुषमा अंधारे
मला पुन्हा एकदा शांतपणे हे मांडायचं आहे, पुणे विद्येचं माहेरघर आहे पुण्यात शिक्षणासाठी येतात त्यांच्या आरोग्याची मला काळजी आहे. ललित पाटील याला कुठला आजार होता म्हणून त्याला ऍडमिट केलं होतं. तो सलग 9 महिने ससूनमध्ये दखल होता. याच उत्तर ससूनच्या डिनने दिले पाहिजे. मागच्या नऊ महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे असं म्हणतं सुषमा अंधारे यांनी गृहमंत्र्यांच्या पत्नी जिथे सुरक्षित नाही तिथे सर्व सामान्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
-
Israel-Hamas War : ‘बॉम्बहल्ले, चहूबाजूने सायरनचे आवाज…’, इस्रायलमध्ये नुशरत भरुचा हिला आलेला थरारक अनुभव
इस्रायल मधून सुखरुप भारतात आलेल्या नुशरत भरुचा हिने सांगितला थरारक अनुभव… ‘आपण खूप नशीबवान आहोत. कारण आपण भारतासारख्या सुरक्षित देशात राहतो…’ असं म्हणत अभिनेत्रीने केली शांततेसाठी प्रार्थना… वाचा सविस्तर
-
संजय राऊतांच्या आरोपात तथ्य नाही – उदय सामंत
संजय राऊतांच्या आरोपात काहीच तथ्य नाही, आम्हीही व्हायब्रंट महाराष्ट्र हा कार्यक्रम करू शकतो. राज्यातून उद्योग बाहेर गेलेले नाहीत, हा खोटा प्रपोगंडा आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
-
पीएफआयसंदर्भात NIAचे देशभरात १२ ठिकाणी छापे
पीएफआयसंदर्भात NIA ने देशभरात १२ ठिकाणी छापेमारी केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये NIA ने छापे टाकले.
यापैकी एक छापा विक्रोळी येथे वाहिद शेख याच्या घरीही टाकण्यात आला आहे.
-
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची आज मुंबईत महत्वाची बैठक
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची आज मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. महिला संघटना बळकट करण्याचं शरद पवार गटाचं लक्ष्य असून त्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांची आज वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे.
तर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार गटाचीदेखील आज बैठक होणार आहे. मुंबईत दोन कार्याध्यक्ष नेमण्याबाबत चर्चा होऊ शकते.
-
राज्यकर्त्यांच्या आशीर्वादानेच ड्रग्स तस्करी सुरू, नाना पटोले यांचा गंभीर आरोप
राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्जची तस्करी अशक्य आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. योग्य वेळ आल्यावर पुरावे देऊच असेही ते म्हणाले.
-
नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्जचा कारभार अशक्य – संजय राऊत
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना ड्रग्स माफियांकडून किती खोके मिळाले ? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी भुसे यांच्यावर हल्लाबोल केला.
-
मुंबई, महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू – संजय राऊत
मुंबईतील व्हायब्रंट गुजरात इव्हेंटवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुंबई, महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.
-
अंगार कोण आणि भंगार कोण हे येणारा काळच ठरवेल – संजय राऊत
शिवसेनेला भंगार म्हणण्याइतकी पातळी घसरली. अंगार कोण आणि भंगार कोण हे येणारा काळच ठरवेल, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोडले.
-
नाशिकमध्ये परिसरात १२ अतिक्रमणे उद्ध्वस्त
नाशिक शहरातील नाशिकरोड येथील वास्को चौक, सुभाषरोड मुक्तीधाम परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने १२ अतिक्रमणे उद्ध्वस्त केली. अतिक्रमण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. महापालिका आयुक्तांनी स्थानिकांच्या तक्रारींची दखल घेत हे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.
-
डकवासला धरण साखळीत किती टक्के पाणी?
खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चार धरणांमध्ये ९५.८१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षी या कालावधीत ९९.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. मागील वर्षीपेक्षा १.१७ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. यंदा परतीचा पाऊस सप्टेबर मधील शेवटच्या आठवड्यात चांगला पडला. परिणामी धरण साठ्यात चांगली वाढ झाली आहे. खडकवासला धरणात एक जून पासून आज अखेर ५८५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. पानशेत येथे १६३० व वरसगाव येथे १६४२ मिलीमीटर पाऊस तर टेमघरमध्ये २५६८ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.
-
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतलाय. जून-जुलैच्या पुरवणी परीक्षेपासून दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ झालीये. पुढील वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचा भुर्दंड बसणार आहे.
-
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तलाठी परीक्षेचा निकाल डिसेंबर महिन्यात लागणार आहे. 26 जानेवारीपर्यंत नियुक्त्या मिळणार आहे. भूमियाभलेख विभागाकडून निकालाचं काम सुरु झालं आहे. 3 नोव्हेंबरपर्यंत आलेल्या हरकतीवर उत्तर कळवलं जाणार आहे. यंदा जवळपास 8 लाख 64 हजार विद्यार्थ्यांनी तलाठीची परिक्षा दिली. 15 डिसेंबर पर्यंत निकाल लागणार आहे.
-
सुकन्या समृद्धी योजनेत पुणे विभाग देशात अव्वल
केंद्र शासनाने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत पुणे विभाग देशात अव्वल आहे. जवळपास 2 हजार कोटीची गुंतवणूक झाली. 8 वर्षात पुणे विभागात उघडली. 6 लाख 6 हजार इतकी खाती झाली आहे. एकट्या महाराष्ट्रात साडे सहा हजार कोटीची गुंतवणूक झाली 8 वर्षात केंद्र सरकारकडे 70 हजार कोटीची गुंतवणूक झाली आहे.
-
नाना पटोले आज अमरावती दौऱ्यावर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील 4 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघाचा नाना पटोले आढावा घेणार आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, आणि बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. अमरावती विभागातील आजी माजी खासदार आमदार बैठकीला उपस्थिती राहतील. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागताचे अमरावती शहरात बॅनर लागलेत. आगामी लोकसभा,विधानसभा आणि इतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार आहेत.
-
Israel-Hamas War | किबुत्जमध्ये हमासची क्रूरता
इस्रायलच्या किबुत्ज भागात हमासच्या दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूर, माणुसकीला काळीमा फासणार कृत्य केलं. त्यांनी लहान मुलं आणि 40 बाळांचा शिरच्छेद केला.
-
Israel-Harma war | मोहम्मद डेफच्या वडिलांच्या घरावर बॉम्बफेक
आज सकाळी इस्रायली लष्कराने मोहम्मद डेफच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब टाकला. हमासच्या लष्करी विभागाचा तो प्रमुख आहे. इस्रायलवरील हल्ल्याचा मोहम्मद डेफच मास्टरमाइंड आहे.
-
Israel-Hamas War | पॅलेस्टाइनमध्ये किती लाख लोकांनी घर सोडलं?
हवा, जमीन आणि समुद्रमार्गे गाझापट्टीत इस्रायलचे हल्ले सुरुच आहेत. त्यामुळे 2 लाख 60 हजार नागरिकांना आपल राहत घर सोडून पळ काढावा लागलाय. संयुक्त राष्ट्राने ही माहिती दिलीय.
-
Israel-Hamas War | युद्धाचा पाचवा दिवस, आतापर्यंत 3000 मृत्यू
इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. गाझा पट्टीत आता जमिनीवरुन हल्ले सुरु करण्याची इस्रायलची योजना आहे. इस्रायल आणि गाझामध्ये मिळून आतापर्यंत 3,000 मृत्यू झाले आहेत.
-
Sharad Pawar : शरद पवार गटाने बोलावली महिला पदाधिकाऱ्यांची बैठक, बैठकीत काय निर्णय होणार?
शरद पवार गटाने आज महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आज सकाली 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे. पक्षातील महिला संघटना बळकट करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
Ajit Pawar : अजित पवार गटाची मुंबईत बैठक, मोठा निर्णय घेणार
अजित पवार गटाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक मुंबईतच होणार आहे. यावेळी दोन कार्याध्यक्ष निवडण्याचा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे अजितदादा गटाच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
Tuljapur Bandh : तुळजापूर बंदची हाक, नव्या विकास आराखड्याला विरोध
राज्य सरकारने 1300 कोटी रुपयांचा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. या विकास आराखड्याला विरोध म्हणून आज तुळजापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. विकास आराखड्यात दर्शन मंडपाची जागा घाटशीलाजवळ नेण्यात आली असून त्याला विरोध करण्यात आला आहे.
-
Israel-Palestine : दिल्ली ते तेल अवीव दरम्यानची विमानसेवा 14 ऑक्टोबरपर्यंत रद्द, गाजात 187500 विस्थापित
इस्रायल- हमास युद्धात आातपर्यंत 1600 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युद्धाचा आज चौथा दिवस आहे. गाजा पट्टीतील विस्थापितांची संख्या 187500च्या पुढे गेली आहे. तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ते तेल अवीव दरम्यानची विमान सेवा 14 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
Published On - Oct 11,2023 7:11 AM