Maharashtra Marathi News Live | भारत जिंकला, राज्यात जल्लोष, मुंबईही आघाडीवर

| Updated on: Oct 15, 2023 | 7:20 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींसह जगातील सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra Marathi News Live | भारत जिंकला, राज्यात जल्लोष, मुंबईही आघाडीवर

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवली सराटीत सभेचं आयोजन केलं आहे. ही सभा दुपारी 12 वाजता होणार आहे. सभेसाठी हजारो लोक जमले असून जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करून आज 67 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे आज राज्यभरात ठिकठिकाणी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 141व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी आणि खारघर येथील मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. मणिपूर हत्याकांड प्रकरणी सीबीआयकडून पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. आज आठव्या दिवशीही इस्रायल आणि हमास दरम्यान युद्ध सुरूच आहे. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Oct 2023 08:44 PM (IST)

    शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विद्युत रोषणाई

    पंढरपूर : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर समितीच्यावतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रुक्मिणी मातेचा सभागृह, रुक्मिणी मातेचे शिखर, त्याचबरोबर विठ्ठलाचे शिखर नामदेव पायरी अशा संपूर्ण विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे…

  • 14 Oct 2023 08:28 PM (IST)

    भारत जिंकला, राज्यात जल्लोष, मुंबईही आघाडीवर

    मुंबई : क्रिकेट विश्वचषक सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारत विजयी झाला आणि राज्यात एकच जल्लोष सुरु झाला. नाशिकमध्ये क्रिकेट रसिकांनी ढोल वाजवत आनंद व्यक्त केला. तरुण – तरुणाई आणि महिला प्रेक्षकांनी नृत्य करत जल्लोष केला. इचलकरंजी मध्ये मलाबादी चौकामध्येही एकच जल्लोष झाला. फटाक्यांची आतिषबाजी करत साखर पेढे वाटण्यात आले. तर मुंबईही या जल्लोषात मागे नव्हती. मरीन ड्राइव भागात संपूर्ण सामन्याचा आनंद लुटण्यात आला. भारताचा विजय होताच मरीन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींनी आनंद व्यक्त केला.

  • 14 Oct 2023 08:16 PM (IST)

    तुषार भोसले यांची शरद पवार यांच्यावर टीका

    नाशिक : भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांचा मराठा आरक्षण प्रश्नावर हल्लाबोल केलाय. शरद पवार आणि त्यांच्या हस्तकांकडून देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला. शरद पवार यांच्या नाकावर टिच्चून देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देतील. शरद पवार यांच्यासारखं जाती जातीत भांडण लावणं हे फडणवीस यांच्या रक्तात नाही असेही तुषार भोसले म्हणाले.

  • 14 Oct 2023 08:07 PM (IST)

    Pune News | भारताने सामना जिंकताच पुण्यात तरुणाईचा जल्लोष

    पुणे | भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना भारताने जिंकताच पुण्यात तरुणाईचा जल्लोष सुरु झालाय. पुण्यातील एफसी रोडवर तरुणांचा एकच जल्लोष सुरू आहे. शेकडो तरुण-तरुणी पुण्यातील गुडलक चौकात हजर झाले आहेत. पुण्यातील गुडलक चौकात पोलीस पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे. भारताने सामना जिंकताच पुण्यात तरुणाईचा जल्लोष सुरु आहे.

  • 14 Oct 2023 07:59 PM (IST)

    राखी सावंत विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    मुंबई | अभिनेत्री राखी सावंत विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभिनेत्री तनुश्री दत्ता हीने राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केलीय. मी टू प्रकरणात राखी सावंतने नाना पाटेकर यांची बाजू घेत तनुश्री दत्ता हिच्यावर अभद्र भाषेत टीका केली होती. यानंतर तनुश्री दत्ता आणि राखी सावंत यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली होती. दोन दिवसांपूर्वी तनुश्री दत्ता हिने वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. अखेरीस वशिवरा पोलिसांनी आज तनुश्री दत्ता हीची राखी सावंत विरोधातील तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला. यामुळे आता राखी सावंत हिच्या अडचणीत वाढ झालीय.

  • 14 Oct 2023 07:32 PM (IST)

    ठाण्यात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची स्क्रीन

    ठाणे | भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची स्क्रीन ठाण्यातील अभिनय कट्टा या ठिकाणी किरण नाकती यांच्या वतीने लावण्यात आली आहे. बच्चे कंपनी आनंद घेताना या ठिकाणी दिसून येत आहे. जितेगा भाई जितेगा हमारा भारत जितेगाचे नारे सुरु आहेत. या ठिकाणी जेष्ठ नागरिक, महिला,  तरुण मुलांसह लहान बचे कंपनी देखील आनंद घेत आहेत.

  • 14 Oct 2023 07:05 PM (IST)

    Rohit Pawar | जरांगे पाटील यांचं फेसबुक पेज बंद, रोहित पवारांकडून निषेध व्यक्त

    पुणे | मनोज जरांगे पाटील यांच्या सभेवर रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. आमदार रोहित पवारांकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. लाखोंचा समुदाय एकत्रित करून दाखवला. जरांगे पाटलांनी उभ्या महाराष्ट्राला एक महत्त्वाचा संदेश दिलाय. या महाशक्तीने जरांगे पाटलांच फेसबुक पेजच बंद केलं. इंटरनेट कनेक्शन बंद करण्यात आलं हे पाहून मनाला वाईट वाटलं. महाराष्ट्रात सत्तेत असणारी लोक असे वागत असतील तर त्या गोष्टीचा निषेध, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

  • 14 Oct 2023 05:50 PM (IST)

    गुजरातमधील वलसाड येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग

  • 14 Oct 2023 05:45 PM (IST)

    इस्रायल डिफेन्स फोर्सने दिला इशारा

    इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने सांगितले की, “अली कादीने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये नागरिकांची अमानुष हत्याकांड घडवून आणले. आम्ही त्याला ठार केले. सर्व हमास दहशतवाद्यांना असेच हाल भोगावे लागतील.”

  • 14 Oct 2023 05:25 PM (IST)

    अमित शहा सोमवारी दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटनासाठी कोलकात्यात जाणार?

    गृहमंत्री अमित शहा 16 ऑक्टोबर रोजी कोलकाता येथे जाऊन दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन करू शकतात. कोलकाता येथील राम मंदिराच्या धर्तीवर दुर्गापूजा मंडप बांधण्यात येत आहे.

  • 14 Oct 2023 05:09 PM (IST)

    लेबनान इस्रायलबाबत संयुक्त राष्ट्रांकडे करणार तक्रार

    लेबनान इस्रायलबाबत संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार करणार आहे. इस्रायलने लेबनान सीमेवर हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यात लेबनान पत्रकार ठार झाला.

  • 14 Oct 2023 04:58 PM (IST)

    विशिष्ट समाजाचे असल्याने फडणवीसांवर टीका – प्रवीण दरेकर

    एका विशिष्ट समाजाचे असल्यानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. गुणरत्न सदावर्ते आणि फडणवीस यांचा कसलाही संबंध नाही, हे सर्व जगाला माहिती असल्याचा दावा दरेकर यांनी केला. अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस, अजित पवार,छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोपांची राळ उठवली आहे.

  • 14 Oct 2023 04:24 PM (IST)

    जहाल माओवाद्याला ठोकल्या बेड्या

    गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल माओवाद्यास अटक केली आहे. त्याच्यावर राज्य शासनाने एकुण 16 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. मुळचा छत्तीसगडमधील चैनुराम नारायणपूर हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. छत्तीसगडच्या कांकेर भागातून तो सीमेलगत जारावंडी व पेंढरी या भागात घातपात घडविणार असल्याची माहिती मिळाली होती. गोपनिय माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने त्याला अटक केली.

  • 14 Oct 2023 04:09 PM (IST)

    ओबीसींमध्ये मराठा आरक्षणाची मागणी चुकीची

    मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मागणी चुकीची असल्याचा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. महाविकास आघाडीच्या काळात हे आरक्षण गेलं. कोणाचे आरक्षण नको तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे असे ते म्हणाले.

  • 14 Oct 2023 03:42 PM (IST)

    Ratnagiri News | उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई

    तरुणांच्या बेरोजगारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने पहावं. गेले एक सव्वा वर्ष अनेक लोकांची जॅकेट नवीन बुटांना पॉलिश करून बसलेत, त्यामुळे सरकार आता कंत्राटी पद्धतीने मंत्रीपद देणार का? मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा आपण बोलू नाहीतर शोले चित्रपटाप्रमाणे कब है होली कब है होली त्याप्रमाणे कब है मंत्रिमंडळ विस्तार अशी विचारण्याची वेळ येईल.

  • 14 Oct 2023 03:28 PM (IST)

    Ratnagiri News | उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई

    कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही टेक्निकल, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोकणात आलो आहे. मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात सरकारला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. मराठा समाजासमोर जे काही आश्वासन दिलं होतं त्याच्याबरोबर उलट आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मध्ये जाऊन दिलं. त्यामुळे मराठा आरक्षणावरती आता उपमुख्यमंत्री यांनी बोलावं.

  • 14 Oct 2023 03:14 PM (IST)

    Gadchiroli | गडचिरोली पोलीस दलाने केले एका जहाल माओवाद्यास अटक

    माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे देशविघातक कृत्य गुन्हे दाखल. नामे चैनुराम नारायणपूर (छत्तीसगड) हा गडचिरोली जिल्ह्राच्या सिमावर्ती भागातील कांकेर (छ.ग.) सिमेलगत असलेल्या पोस्टे जारावंडी व पोस्टे पेंढरी या दोन्ही पोस्टेची घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे सी सिकस्टी नक्षल विरोधी पोलीस पथकाने केली अटक.

  • 14 Oct 2023 02:59 PM (IST)

    पनवेलमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमानंतर आयोजकांवर गुन्हा दाखल

    पनवेलमध्ये वांवजे इथं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीसुद्धा कार्यक्रम आयोजन करण्यात आल्यानं आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • 14 Oct 2023 02:50 PM (IST)

    Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून राज्य सरकारला अल्टिमेटम

    मनोज जरांगेंकडून राज्य सरकारला अल्टिमेटम देण्यात आला आहे. सरकारच्या हातात 10 दिवस आहेत. मराठा आरक्षण द्या अन्यथा माझी अंत्ययात्रा निघेल. यापुढचं आंदोलन शांततेत असणार, पण ते सरकारला झेपणारं नसेल, असाही इशारा त्यांनी दिला.

  • 14 Oct 2023 02:35 PM (IST)

    Manoj Jarange : 22 तारखेला आपल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार- मनोज जरांगे

    सर्वांनी शांततेत आंदोलन करा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. 22 तारखेला आपल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

  • 14 Oct 2023 02:20 PM (IST)

    खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा-अजित पवार

    राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सांडपाणी आणि कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या खडकवासला धरण परिसरातील हॉटेल आणि रिसॉर्टवर कारवाई करावी, असे अजित पवार यांनी यावेळी दिले.

    अजित पवार यांनी यावेळी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावातून धरणात येणाऱ्या अशुद्ध पाण्याबाबत माहिती घेतली.

  • 14 Oct 2023 02:17 PM (IST)

    Manoj Jarange : मराठ्यांनी जगाला आज मोठा संदेश दिला- मनोज जरांगे

    “मराठ्यांनी जगाला आज मोठा संदेश दिला. नजर पुरत नव्हती एवढी गर्दी आजच्या सभेला झाली. आमचं आंदोलन पैसा कमावण्यासाठी नाही. आरक्षणाविरोदात असणाऱ्यांनी नादी लागू नये. मराठा समाजाला भडकवण्याचं काम सुरू आहे,” असं मनोज जरांगे सभेत म्हणाले.

  • 14 Oct 2023 02:05 PM (IST)

    रत्नागिरी- उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई रत्नागिरीत दाखल

    उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई रत्नागिरीत दाखल झाले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाची विधानसभा मतदारसंघा नुसार बैठका घेत आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी वरूण सरदेसाई यांच्यावर आहे. 7 जुलै 2024 मध्ये कोकण पदवीधर मतदार संघाची मुदत संपणार आहे. भाजपच्या ताब्यातील कोकण पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी वरूण सरदेसाई ॲक्शन मोडमध्ये आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात वरूण सरदेसाई यांची पदाधिकाऱ्यासोबत बैठक सुरू आहे.

  • 14 Oct 2023 01:53 PM (IST)

    दहिवली गावात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय

    चिपळूण तालुक्यातील ‘दहिवली ‘ गावात ग्रामस्थांनी एकमुखाने दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमुखाने मान्य करण्यात आला.

    नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून कायमस्वरूपी दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला असून त्याची माहिती सावर्डे पोलीस स्थानकात देण्यात आली.

  • 14 Oct 2023 01:46 PM (IST)

    कंत्राटी पदभरतीच्या निर्णयाविरोधात नागपूरमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे धरणे आंदोलन

    कंत्राटी पदभरतीच्या निर्णयाविरोधात नागपूरमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं. शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली महात्मा गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रवादीने हे आंदोलन केलं.

    राज्य सरकारने कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेतलाय. एकीकडे तरुणांच्या हाताला काम नाही. दुसरीकडे कंत्राटी भरती केली जातेय. सरकारने आपल्या जवळच्या लोकांना याचं कंत्राट दिलं असा आरोप सलील देशमुख यांनी केला.

  • 14 Oct 2023 01:36 PM (IST)

    गडचिरोली – महाराष्ट्र शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणाविरोधात सत्ताधाऱ्यांचेच आंदोलन

    महाराष्ट्र शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणाविरोधात सत्ताधारी भाजपच्या आमदाराने आंदोलन केले. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी चामोर्शी ते हरणघाट मार्गाच्या दुरावस्थेविरोधात आंदोलन केले.  गेल्या वर्षभरापासून हा रस्ता खड्डेमय आहे. वीस कोटी रुपयांची प्रस्तावित कामे मंजूर असून सुद्धा या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून केले आंदोलन.

  • 14 Oct 2023 01:23 PM (IST)

    आरक्षण हे मागणीवर नसतं, तर परिस्थितीवर असतं – गुणरत्न सदावर्ते

    मनोज जरांगे बिनबुडाच्या गोष्टी करतात. त्यांचे पॉलिटिकल बॉस वेगळे आहेत. आरक्षण हे मागणीवर नसतं, तर परिस्थितीवर असतं असं सदावर्ते म्हणाले.

  • 14 Oct 2023 01:20 PM (IST)

    जरांगेंच्या सभेत अकलेची कुवत दिसली – गुणरत्न सदावर्तेंचा टोला

    जरांगेंच्या सभेत अकलेची कुवत दिसली. त्यांचं बोलणं नव्हतं तर बरळणं होतं, अशी टीका सदावर्ते यांनी केली.

  • 14 Oct 2023 01:17 PM (IST)

    जातीवर आधारित सभांचं मी समर्थन करत नाही – गुणरत्न सदावर्ते

    मनोज जरांगेंच्या सभेपेक्षा यात्राही मोठ्या असतात. त्यांच्या सभेत मग्रुरी दिसली. जरांगेंच्या सभेवर गुणरत्न सदावर्ते यांनी टीकास्त्र सोडले.

  • 14 Oct 2023 01:10 PM (IST)

    सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये – विजय वडेट्टीवार

    सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये. आरक्षणाला धक्का न लावता निर्णय घ्यावा असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

    मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता काय करता येईल ते सरकारने करावं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

  • 14 Oct 2023 12:54 PM (IST)

    Maratha Aarakshan : मराठा समाजाची मागणी योग्य- देवेंद्र फडणवीस

    मराठा समाजाची मागणी योग्य आहे असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही फडणवीस म्हणाले.

  • 14 Oct 2023 12:44 PM (IST)

    Manoj Jarange : दोन तासांआधी माझं फेसबुक अकाउंट बंद झालं- जरांगे पाटील

    दोन तासांआधी माझं फेसबुक अकाउंट बंद करण्यात आलं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकार आरक्षणाला गालबोट लागण्यासाठी षड्यंत्र करण्यात येत आहे. मात्र तुम्ही गाफिल राहू नका असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

  • 14 Oct 2023 12:28 PM (IST)

    Manoj Jarange : यांच्या छाताडावर बसुन आरक्षण घेऊ- जरांगे पाटील

    मनोज जरांगे पाटील यांची जालण्यात भव्य सभा सुरू आहे. छगण भुजबळ यांच्या माध्यमातून सरकार मराठ्यांना उचकविण्याचा प्रयत्न करत आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाचा उद्रेक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र कुठलाही उद्रेक तुम्ही होऊ देवू नका असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. आरक्षण यांच्या छाताडावर बसून घेऊ असे मनोज जरांगे म्हणाले.

  • 14 Oct 2023 12:21 PM (IST)

    Manoj Jarange : 22 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार

    शांततेतल्या आंदोलनानेच मराठा समाजाला एकजुट केलं आहे. शांततेत प्रचंड शक्ती आहे. या पूढचेही आंदोलन हे मराठा समाज शांतीपूर्ण पद्धतीने करेल. 22 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असे जरांगे पाटिल म्हणाले.

  • 14 Oct 2023 12:14 PM (IST)

    Manoj Jarange : मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल

    मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल, असे मनोज जरांगे म्हणाले. यावेळी मनोज जरांगेंनी नाव न घेता छगण भुजबळांवर टीका केली. आरक्षण देण्यासाठी 22 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ जरांगे पाटील यांनी दिला आहे.

  • 14 Oct 2023 12:09 PM (IST)

    Manoj Jarange : सरकारने 10 दिवसांत आरक्षण द्यावे- मनोज जरांगे

    सरकारने दहा दिवसांत आरक्षण द्यावे असा अल्टीमेटम दिला आहे. याशिवाय फडणवीसांनी  सदावर्तेंना समज द्यावी असे जरांगे पाटिल म्हणाले. अजून आग्या मोहोळ उठलं नाही असं म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

  • 14 Oct 2023 11:57 AM (IST)

    आमदार राहुल पाटील जरांगे पाटलांच्या सभेसाठी रवाना

    वाढदिवस साजरा न करता ठाकरे गटाचे परभणीचे आमदार राहुल पाटील जरांगे पाटलांच्या सभेसाठी निघाले आहेत. ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटलांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचे सगळे कार्यक्रम रद्द करत पाटलांचा ताफा अंतरवलीकडे निघाला आहे. समाजासाठी आजचा दिवस क्रांतिकारक असणार असल्याच्या विधान त्यांनी केलं आहे.

  • 14 Oct 2023 11:55 AM (IST)

    जरांगे पाटील यांचं सभेला संबोधन; पाहा काय म्हणाले…

    मराठ्यांचं आगी मोहोळ शांत आहे. पण हे मोहोळ जर एकदा उठलं तर काही खरं नाही. केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, असं जरांगे पाटील म्हणालेत.

  • 14 Oct 2023 11:47 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? पाहा…

    आम्हाला आरक्षण द्या. नाहीतर 40 व्या दिवशी आम्ही उत्तर देऊ, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी केली आहे.

  • 14 Oct 2023 11:30 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन

    मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवली सराटीत सभा होत आहे. मनोज जरांगे यांच्याकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं आहे. आता थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होईल.

  • 14 Oct 2023 11:15 AM (IST)

    मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ

    राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.  नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. उद्या मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.  कालच मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या वाढदिवसानिमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. मंत्री भुजबळ यांच्या थेट जवळ जाण्यासाठी मनाई राहणार आहे. वाढदिवसानिमित्त भेटायला येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

  • 14 Oct 2023 10:59 AM (IST)

    Manoj Jarange-Patil | मनोज जरांगे यांच्या मातोश्री सभा स्थळी

    मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांची आज सभा होत आहे. या सभेसाठी त्यांच्या मातोश्रीही दाखल झाल्या आहेत. मनोज जरांगे पाटील काही वेळेत सभा स्थळी पोहचणार आहे. त्यांच्या या सभेसाठी राज्यभरातून लोक आले आहेत.

  • 14 Oct 2023 10:45 AM (IST)

    Manoj Jarange-Patil Rally | सराटीमध्ये लाखोंची गर्दी

    अंतरवाली सराटीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले आहे. सभा स्थळाजवळ 60 एकर क्षेत्रात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगपासून 5 किलोमीटरवर सभेचे आयोजन केले आहे. आता पार्किंगपासून सभा स्थळापर्यंत मराठा बांधवांच्या रांगा लागल्या आहेत.

  • 14 Oct 2023 10:33 AM (IST)

    Manoj Jarange-Patil | मनोज जरांगे पाटील सभास्थळाकडे

    मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांची आज सभा होत आहे. दुपारी १२ वाजता होणाऱ्या या सभेसाठी मनोज जरांगे पाटील स्थळाकडे निघाले आहे. त्यांच्या सभा ऐकण्यासाठी सकाळपासून प्रचंड गर्दी झाली आहे.

  • 14 Oct 2023 10:12 AM (IST)

    Sanjay Raut | कोर्टाने विधासभा अध्यक्षांना फटकारले – संजय राऊत

    वर्षभरापासून राज्यात बेकायदेशीर सरकार सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाचे पालन करत नाही. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कठोर शब्दांत फटकारले आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

  • 14 Oct 2023 10:04 AM (IST)

    cricket news | भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर रेकॉर्ड सट्टेबाजी

    वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज होणार आहे. या हाय व्होल्टेज मॅचच्या आधी बुकींकडून मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी केली जात आहे. या सामन्यावर आतापर्यंत 40 हजार कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे, असा दावा सूत्रांनी केला आहे.

  • 14 Oct 2023 09:50 AM (IST)

    LIVE UPDATE | पश्चिम बंगालमधील हावडामध्ये भीषण आगीची घटना

    पश्चिम बंगालमधील हावडामध्ये भीषण आगीची घटना घडलेली आहे. संकरेल औद्योगिक वसाहतीमधील गोदामाला भीषण आाग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

  • 14 Oct 2023 09:21 AM (IST)

    LIVE UPDATE | दहशतवादी विरोधी पथकातील अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

    दहशतवादी विरोधी पथकातील अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तपासादरम्यान महिलेसोबत लगट करुन गुंगीचे औषध देऊन बलात्काराचा आरोप अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराचे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा महिलेचा आरोप आहे.

  • 14 Oct 2023 09:07 AM (IST)

    LIVE UPDATE | अंतरवाली सराटीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल

    अंतरवाली सराटी मध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले आहेत. 60 एकराच्या पार्किंगची व्यवस्था, तर अनेक ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग पासून 5 किलोमीटर वर सभेच आयोजन करण्यात आलं आहे. नजर जाईन तिथपर्यंत नागरिकांची गर्दी दिसत आहे. मनोज जरांगे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष…

  • 14 Oct 2023 08:58 AM (IST)

    Ncp | शरद पवार गटात इनकमिंग

    गोंदिया जिल्ह्यात शरद पवार गटात अनेकांचा प्रवेश. गोंदिया जिल्ह्यात शरद पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू. जिल्ह्यात पुन्हा प्रफुल पटेल गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसण्याची चिन्हे.

  • 14 Oct 2023 08:50 AM (IST)

    Supreme court | न्यायमुर्तींच्या शपथेला आव्हान देणाऱ्याला दणका

    मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी घेतलेल्या शपथेला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल करणार्‍या अशोक पांडेला SC चा दणका. सर्वोच्च न्यायालयाकडून पांडेला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला. याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला होता की शपथ घेताना मुख्य न्यायाधीशांनी “मी” हा शब्द वापरला नाही. SC ने याचिका फेटाळून लावत याचिककर्त्यालाच दंड ठोठावला

  • 14 Oct 2023 08:36 AM (IST)

    Manoj Jarange-Patil : सभेसाठी 123 गावांमधून लोकवर्गणी

    अंतरवली सराटीत आज मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा होणार आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर सभेसाठी येणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. सभेसाठी 123 गावांमधून लोकवर्गणी गोळा करण्यात आलीय.

  • 14 Oct 2023 08:15 AM (IST)

    Operation Ajay | ऑपरेशन अजय अतंगर्त आतापर्यंत किती भारतीय दाखल?

    ऑपरेशन अजय अंतर्गत 235 भारतीय दिल्लीत दाखल. इस्रायलमधून दुसरे विमान भारतात दाखल. आतापर्यंत 447 भारतीयांना देशात परत आणण्यात सरकारला यश. युद्ध भूमीत अडकलेल्या भारतीयांसाठी ऑपरेशन अजय.

  • 14 Oct 2023 08:00 AM (IST)

    Manoj Jarange-Patil : आम्हाला हक्काचं आरक्षण हवंच; मनोज जरांगे पाटील कडाडले

    आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवच आहे. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आजची सभा ही सभा नाही. ही लोकांची गर्दी नाही तर ही वेदना आहे. आमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. त्यासाठी सर्व एकत्र आले आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 14 Oct 2023 07:49 AM (IST)

    Manoj Jarange-Patil : राज्य सरकारला पुन्हा मुदत की इशारा?; जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय

    राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत आज संपत आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी दहा दिवस अधिक दिले आहेत. त्यामुळे पुढील दहा दिवसात निर्णय न घेतल्यास काय करायचं याबाबतची भूमिका मनोज जरांगे पाटील आज जाहीर करणार आहेत. मनोज जरांगे पाटील हे आज सरकारला मुदत देणार की इशारा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हजारो लोकांसमोर जरांगे पाटील हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  • 14 Oct 2023 07:39 AM (IST)

    Manoj Jarange-Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकडे लक्ष; कशी आहे सभेची तयारी?

    अशी आहे सभेची तयारी

    आज दुपारी 12 वाजता अंतरवली सराटीमध्ये सभेला सुरुवात होणार, 150 एकर मैदानावर सभा होणार, सभेची तयारी पूर्ण

    सभेसाठी 15 फूट उंचीचा स्टेज उभारण्यात आलाय, स्टेजवरून चारही बाजूने संवाद साधता येईल अशी व्यवस्था केलीय

    मनोज जरांगे यांच्या एन्ट्रीसाठी 500 फुटांचा रॅम्प बनवलाय, सभेसाठी तब्बल 600 भोंग्याचा वापर

    5 हजाराहून अधिक स्वयंसेवक सभेची तयारी करत आहेत, 20 हजार स्वयंसेवक सभास्थळी दाखल

    10 लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था

    123 गावांनी ही सभा आयोजित केलीय, सभेसाठी 31 गावांनी निधी उभारला. कुणी 500 रुपये दिले तर कुणी हजार

    23 गावातील 31 गावांच्याच लोकांच्या खर्चात सभा होणार, उर्वरित गावांचे पैशांची गरज पडली नाही.

    चार ठिकाणी 100 एकरवर पार्किंगची व्यवस्था, सभेसाठी आजपासून धुळे-सोलापूर मार्ग बंद

    जालन्यात 1 हजार पोलिसांचा बंदोबस्त

  • 14 Oct 2023 07:35 AM (IST)

    Manoj Jarange-Patil : जालन्यात तुफान आलंय… हजारो मराठा बांधव अंतरवली सराटीत; जरांगे पाटील काय बोलणार

    मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत विशाल सभेचं आयोजन केलं आहे. या सभेला कालपासूनच हजारो लोक अंतरवलीत आले आहेत. 150 एकर जागेवर होणाऱ्या या सभेसाठी एक हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजता जरांगे पाटील सभेला संबोधित करणार असून जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published On - Oct 14,2023 7:30 AM

Follow us
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.