Maharashtra Marathi News Live | अनंत अंबानी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट, नक्की कारण काय?
Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींसह जगातील सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : मुंबई-गोवा महामार्गावर बांधलेल्या उड्डाण पुलाचा काही भाग सोमवारी कोसळला होता. आज बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पडलेल्या पुलाची पाहणी केली. बहादूर शेख नाका येथे जाऊन त्यांनी उड्डाणपुलाची पाहणी केली. दरम्यान समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धा दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्य ज्यो बायडेन इस्रायलच्या दौऱ्यावर येणार आहेत. माझी खासदार राजू शेट्टी आज शिरोळ मधून आत्मक्लेष यात्रा काढणार आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
Marathwada University | आंबेडकरी संघटनांकडून बुधवारी विद्यापीठ बंदची हाक
संभाजीनगर | संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. आंबेडकरी संघटनांकडून बुधवारी विद्यापीठ बंदची हाक दिली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात छेडछाड केल्यामुळे विद्यापीठ बंदची हाक देण्यात आली आहे.
-
Anant Ambani Eknath Shinde Meet | अनंत अंबानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा
मुंबई | मोठी बातमी समोर आली आहे. अनंत अंबानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा झाली आहे.
-
-
Congress On Bahadur Shaikh Naka | काँग्रेसकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामावरुन ताशेरे
मुंबई | मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथे उड्डाणपुल कोसळला. या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर आणि सरकारवर टीका केली जात आहे. पुलाचं काम सुरू असतानाच तो कोसळल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. आता काँग्रेसनेही संताप व्यक्त केलाय. तसेच पुलाच्या निकृष्ट आणि रखडलेल्या कामाबाबात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीच मुंबई काँग्रेसने केली आहे. या महामार्गाच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे.हे सर्व पैसे चिपळुणच्या पुलाप्रमाणेच धुळीला मिळाले, अशा शब्दात वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केलाय.
-
Supreme Court On Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेप्रकरणी न्यायालयाची थेट नाराजी
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुधारित वेळापत्रकासाठी शेवटची संधी दिली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयाने अध्यक्षांच्या भूमिकेप्रकरणी न्यायालयाने थेट नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ही 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सुनावणीत सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
-
मध्य प्रदेश : काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर, 500 रुपयांना गॅस सिलिंडर देणार
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली. गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळणार आहे. 100 युनिट वीज सवलतीच्या दरात तर 200 युनिट अर्ध्या दराने दिली जाणार आहे. तसेच जात जनगणना करणार असल्याचं सांगितलं आहे.
-
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन गाझा सीमेजवळ जाण्याची शक्यता
बुधवारी इस्रायलला जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन गाझा सीमेजवळ जाऊ शकतात. हमासने ज्या ठिकाणी हत्याकांड घडवून आणले त्या ठिकाणालाही बिडेन भेट देऊ शकतात. सुरक्षा व्यवस्थेसाठी 2000 अमेरिकन सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
-
अभिनेत्री पल्लवी जोशीला ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार
#WATCH दिल्ली: फिल्म 'द कश्मीर फाइल्स' के लिए अभिनेत्री पल्लवी जोशी को सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्री के पुरस्कार से सम्मानित किया गया।#NationalFilmAwards2023 pic.twitter.com/y7XnP8MiKe
— ANI_HindiNews (@AHindinews) October 17, 2023
-
‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटासाठी अभिनेता अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
#WATCH दिल्ली: फिल्म 'पुष्पा: द राइज' के लिए अभिनेता अल्लू अर्जुन को सर्वश्रेष्ठ अभिनेता के पुरस्कार से सम्मानित किया गया।#NationalFilmAwards2023 pic.twitter.com/qpvGfxscLE
— ANI_HindiNews (@AHindinews) October 17, 2023
-
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
#WATCH दिल्ली: फिल्म 'गंगूबाई काठियावाड़ी' के लिए अभिनेत्री आलिया भट्ट को सर्वश्रेष्ठ अभिनेत्री के पुरस्कार से सम्मानित किया गया।#NationalFilmAwards2023 pic.twitter.com/Ho86f6pZ6X
— ANI_HindiNews (@AHindinews) October 17, 2023
-
रक्षित शेट्टी यांना ‘777 चार्ली’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
#WATCH दिल्ली: फिल्म '777 चार्ली' के लिए अभिनेता-निर्माता रक्षित शेट्टी को सर्वश्रेष्ठ कन्नड़ फिल्म के राष्ट्रीय फिल्म पुरस्कार से पुरस्कृत किया गया। pic.twitter.com/sOulXQRK1T
— ANI_HindiNews (@AHindinews) October 17, 2023
-
मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
दिल्ली दारू धोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला विचारले की, मनीष सिसोदिया यांच्यावरील आरोपांवर अद्याप चर्चा का सुरू झाली नाही? तुम्ही कोणालाही अशा प्रकारे तुरुंगात ठेवू शकत नाही, असे न्यायालयाने ईडीला सांगितले.
-
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
#WATCH दिल्ली: दिग्गज अभिनेत्री वहीदा रहमान को दादा साहब फाल्के लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार से सम्मानित किया गया। #NationalFilmAwards2023 pic.twitter.com/GPlbxqG3BP
— ANI_HindiNews (@AHindinews) October 17, 2023
-
तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू
तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटात आठ जण ठार तर काही जण गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
-
Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्या हेलिकॉप्टरटचं इमर्जन्सी लँडिंग
खेड : गोपीचंद पडळकर यांच्या हेलिकॉप्टरटचं खेडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. खेड दौऱ्यावर जात असताना गोपीचंद पडळकर यांचं हेलिकॉप्टर भरकटलं. अचानक वादळी वारा आणि पावसाला सुरुवात झाल्याने हेलिकॉप्टर भरकटलं.
-
Chhatrapati Sambhajinagar | मराठवाडा विद्यापीठात दोन गटात वाद
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वाद निर्माण झालाय. एका फलकारवर एबीवीपीचं नाव लिहिल्यामुळे काही विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. भाजप आणि आंबेडकरी कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.
-
Pune news | शरद पवारांची पुण्यात दसऱ्याच्या दिवशी सभा होणार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या पुण्यातील सभेची तारीख जाहीर झालीय. शरद पवारांची 24 ऑक्टोबरला दसऱ्या दिवशीच तोफ पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात दसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता शरद पवारांची सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघर्ष यात्रेची सुरुवात शरद पवारांच्या पुण्यातील शरद पवारांच्या सभेने होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा निघणार आहे. या यात्रेची सुरुवात आणि समारोप शरद पवारांच्या सभेने होणार आहे.
-
त्या भूखंडाबाबत माझा कोणताही आणि कसलाही सबंध नाही – अजित पवार
मुंबई : दिलीप बंड यांनी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाबाबत स्पष्टीकरण दिलेय. आर. आर. पाटील गृहमंत्री होते तेव्हाचे हे प्रकरण आहे. त्या वेळी एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने हा निर्णय घेतला होता. त्या समितीच्या कोणत्याही बैठकीला मी उपस्थित नव्हतो. त्या भूखंडाबाबत माझा कोणताही आणि कसलाही सबंध नाही.
-
मला काही फरक पडत नाही – अजित पवार
मुंबई : गृह खात्याचे काम होऊ दिले जात नव्हते. सरकारचे नुकसान होईल असे काम मी करत नाही. चौकशी करा किंवा अन्य काही करा मला काही फरक पडत नाही. पालकमंत्री आपापल्या परीने काम करत असतात, असे अजित पवार म्हणाले.
-
मीरा बोरवणकर यांच्या आरोपांचा माझा काही संबध नाही – अजित पवार
मुंबई : भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु होणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांचा माझा काही संबध नाही. त्या आरोपांना मी काही फारसं मनावर घेतलं नाही, मी भलं माझं काम भलं, असेही ते म्हणाले.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बोर्डावर एबीव्हीपीने टाकले स्वतःचे नाव
छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोर्डावर एबीव्हीपीने स्वतःचे नाव स्प्रे ने टाकले. या घटनेमुळे विद्यापीठातील तणाव निर्माण झाला आहे. विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
-
पुढील सुनावणीवेळी वेळापत्रक द्यावेच लागेल – अनिल परब
नवी दिल्ली : दसरा सुट्टीत अध्यक्ष यांच्यासोबत बसून वेळापत्रक ठरवावं अशा सूचना सुप्रीम कोर्टाने तुषार मेहता यांना दिल्या आहेत. पुढील सुनावणीवेळी वेळापत्रक द्यावेच लागेल अशी माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
-
आमदार प्रणिती शिंदे यांचा मोठा आरोप, त्यांनी सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला
सोलापूर : सरकारला खासगी नोकरी भरती करायची आहे. त्यासाठी भाजपने आरक्षण रद्द करण्याचा मोठा डाव आखला आहे. भाजपने ठेकेदारी पध्दतीने नोकरी भरती सुरू केली आहे. यामुळे उपेक्षित लोकांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने मोठ्या सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकला, असा गंभीर आरोप कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरात केला.
-
आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी आता 30 ऑक्टोबरला
नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे 16 आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी प्रलंबित आहे. ही सुनावणी लवकर घेण्यात यावी यासाठी उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज झालेल्या युक्तीवादादरम्यान सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला घेण्यात येईल असे सांगितले.
-
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्र सरकार सोडवणार
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्र सरकार सोडवणार आहे. केंद्रीय कृषी मूल्य निर्धारण समिती येत्या 20 तारखेला महाराष्ट्रात येणार आहे. 2023 गाळप हंगामातील ऊस रक्कम ठरवण्यासाठी समिती महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. 20 तारखेला चार सदस्य समिती महाराष्ट्रात येणार आहे. 2023-24 चा एफआरपी रक्कम जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-
Same sex marriage | समलैंगिक विवाहाबद्दल सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय?
न्यायमूर्ती रवींद्र भट्ट म्हणाले, “लग्न करण्याचा अपात्र हक्क असू शकत नाही ज्याला मूलभूत अधिकार मानलं जाऊ शकतं. नातेसंबंधाचा अधिकार आहे हे आम्ही मान्य केलं असलं तरी, आम्ही स्पष्टपणे मानतो की तो कलम 21 अंतर्गत येतो. यामध्ये जोडीदार निवडण्याचा आणि त्यांच्याशी शारीरिक संबंधांचा अधिकार, गोपनीयता, स्वायत्तता इत्यादी अधिकारांचा समावेश आहे. जोडीदार निवडण्याचा पर्याय अस्तित्वात आहे यात काहीच शंका नाही.”
-
Same sex marriage | समलैंगिक युनियनमधील व्यक्तींसाठी निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन होईल- SC
CJI चंद्रचूड म्हणाले, “केंद्र सरकार समलैंगिक युनियनमधील व्यक्तींचे अधिकार आणि हक्क यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करेल. ही समिती समलिंगी जोडप्यांना रेशन कार्डमध्ये ‘कुटुंब’ म्हणून समाविष्ट करण्यावर, संयुक्त बँक खाती उघडण्यावर, पेन्शन, ग्रॅच्युइटी इत्यादी संदर्भात दिलेल्या अधिकारांचा विचार करेल. जेणेकरून एखाद्याला त्यासाठी नोंदणी करता येईल. या समितीच्या अहवालावर केंद्र सरकारच्या स्तरावर विचार केला जाईल.”
-
Same sex marriage | समलैंगिक समुदायाच्या संघात प्रवेश करण्याच्या अधिकाराबाबत भेदभाव करणार नाही- SC
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश हे समलैंगिक समुदायाच्या संघात प्रवेश करण्याच्या अधिकाराबाबत भेदभाव करणार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
-
Same sex marriage | सुप्रीम कोर्टाचा समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार
सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याचं कोर्टाने म्हटलंय. हा विधिमंडळाचा अधिकार आहे, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. घटनापीठाने बहुमताने दिलेल्या निर्णयात म्हटलं आहे की, विवाहाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही.
-
बीड : मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी रिपाईचा मोर्चा
बीड : ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी मराठा समजाच्या समर्थनार्थ रिपाईचा मोर्चा सुरू आहे. रिपाईचा केज तहसील कार्यालयावर संविधानिक संघर्ष मोर्चा सुरू झाला आहे. प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सुरू असून त्यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आरक्षणासह त्यांच्या इतर विविध मागण्या आहेत. बीड जिल्हा दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
-
Mumbai : ठाकरे गटाचा मंत्रालयावर मोर्चा
ठाकरे गटाकडून मंत्रालयावर शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला आहे. म्हाडाच्या पुनर्विकास धोरणाचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाची मागणी केली जात असून जवळपास 10 हजार पोस्टकार्ड ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री कार्यालयात दिली जाणार आहेत.
-
चिपळूणमधील उड्डाणपूल दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट
चिपळूणमधील हायवे प्रशासन कार्यालयात राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांकडून राडा घालण्यात आला. चिपळूणमधील उड्डाणपूल कोसळल्यानंतर हायवे प्रशासनाचा कोणताही अधिकारी अद्याप चिपळूणमध्ये दाखल न झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी हायवे प्रशासनाच्या कार्यालयाला घेराव घातला आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हायवे बंद करण्याचा इशारा दिला आहे.
-
भिडे वाड्याची पडलेली वास्तू आता राष्ट्रीय स्मारक होणार
भिडे वाड्याची पडलेली वास्तू आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. मुंबई हायकोर्टाने विरोधातील याचिका फेटाळली असून लवकरच राष्ट्रीय स्मारकाचं काम सुरू होणार आहे. भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी पहिली शाळा सुरु केली होती. आता राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
Same sex marriage | समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन सुरु आहे. न्यायमूर्ती एस. रवींद्र भट्ट हे निकाल वाचत आहे. “समलैंगिक हा शहरी किंवा उच्चभ्रू नसतो, हे आम्ही मान्य करतो. यांना लग्न करण्याचा कोणताही मूलभूत अधिकार नाही, हे आम्ही मान्य करतो” असं ते म्हणाले.
-
Maharashtra News : राहूल नार्वेकर आज सुधारीत वेळापत्रक देणार नाहीत- सुत्र
राहूल नार्वेकर आज सुधारीत वेळापत्रक देणार नाहीत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. नार्वेकर आज कोर्टाकडून अभिप्राय मागू शकतात असंही सुत्रांचं म्हणणं आहे. आधी सादर केलेलं वेळापत्रकच नार्वेकर कोर्टामध्ये सादर करतील अशी माहिती आहे.
-
Maharashtra News : अपात्र आमदार प्रकरणावर थोड्याच वेळात सुनावणी
सेना राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजामध्ये प्रकरण 24 व्या क्रमांकावर आहे. अपात्रतेबाबत अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्हींनीसुद्धा याचिका दाखल केली होती. यावर आज एकत्रीत सुनावणी होणार आहे.
-
Same sex marriage | समलैंगिक विवाहाबद्दल सुप्रीम कोर्टाने काय म्हटलय?
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचन सुरु आहे. या बद्दल जाणून घ्या सर्वकाही….(इथे क्लिक करा)
-
Maharashtra News : समलिंगी विवाहाच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात वाचन सुरू
समलिंगी विवाहाच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात निकालाचे वाचन सुरू झाले आहे. स्पेशल मॅरेज अॅक्टमध्ये बदल करण्याचे अधिकार नाहीत. समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी यासाठी मागच्या वर्षीपासून निकालाला सुरूवात झाली होती. यावर आज निकाल येतोय. 2018 पासूनचा हा लढा आहे.
-
Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचे ठिकाण ठरले आहे. यंदा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे विशेष लक्ष असते.
-
Maharashtra News : जेलजवळ जमीन घेण योग्य नाही- रामदास आठवले
जेल जवळ जमीन घेणे योग्य नाही. जेलजवळ जमीन घेतली तर कधी जेलमध्ये जावं लागेल यांची खात्री नाही अशी प्रतिक्रीया रामदास आठवले यांनी दिली. ते मीरा बोरवळकर यांनी केलेल्या आरोपाबद्दल बोलत होते.
-
Mumbai Local : कल्याण रेल्वे स्थानकावर विशेष तिकीट तपासणी मोहिम
कल्याण रेल्वे स्थानकावर विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत 4,440 रेल्वे प्रवाश्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय 16 लाखांहूल अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
-
Mumbai News : मुंबई विमानतळ आज सहा तास बंद
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आज सहा तास बंद असणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी पाच विमान वाहतूक बंद अणार आहे. या काळात धावपट्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे.
-
Maratha Reservation : जरांगेंच्या सभेला हिंसक वळण लावण्याचा डाव- विनायक राऊत
जरांगेंच्या सभेला हिंसक वळण लावण्याचा सरकारचा डाव होता, मात्र मराठा समाजाने शांततेत आंदोलन केल्याने सरकारचा डाव फसला असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
-
कोल्हापूर : गरबा खेळायला जाण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर, अपघातानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस
गरबा खेळायला जाण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. सायरन वाजवून रुग्णवाहिका घेऊन जात असताना अपघात झाल्याने हा प्रकार उघड झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
मलबार हिल येथील बाणगंगा तलावात माशांचा मृत्यू
मुंबईतील मलबार हिल येथील बाणगंगा तलावात पितृपक्ष श्राद्धाचा माशांना फटका बसला आहे. पिंडदान विधीतील अन्न पदार्थ आणि निर्माल्य तलावातील पाण्यात मिसळल्याने तलावातील माशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर बाणगंगा परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलं आहे. मनपाकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार.
-
दंगली घडवण्याचे ठाकरेंचे आदेश – नितेश राणेंचा गंभीर आरोप
दंगली घडवा असे आदेश उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर, गोऱ्हेंना दिले होते, असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे केला आहे. ठाकरे यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
-
राहुल नार्वेकर आज सुधारित वेळापत्रक देणार नाहीत – सूत्रांची माहिती
आमदार अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. मात्र राहुल नार्वेकर आज सुधारित वेळापत्रक देणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नार्वेकर आज कोर्टाकडून अभिप्राय मागू शकतात.
-
कल्याण रेल्वे स्टेशनवर टीसींची विशेष तपासणी मोहीम
कल्याण रेल्वे स्टेशनवर टीसींनी विशेष तपासणी मोहीम राबवली. 167 टीसींनी कल्याण स्टेशनवर साखळी तयार करत प्रवाशांची नाकाबंदी केली. एका दिवसात 4438 प्रवाशांवर कारवाई करत 16.85 लाखांचा दंड वसूल.
-
नार्वेकर चोरांना सुरक्षा देत आहेत – संजय राऊत यांचा हल्लाबोल
नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करू इच्छितात. ते टाईमपास सिरीज बनवत आहेत. नार्वेकरांनी पळ काढण्याचा प्रयत्न करू नये असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
-
चोर, लफंग्यांना घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून संरक्षण – संजय राऊत
चोर, लफंग्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती संरक्षण देत आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राहूल नार्वेकरांवर टीकास्त्र सोडले.
नार्वेकरांचं नाव काळ्याकुट्ट इतिहासात नोंदवलं जाईल. त्यांना राज्याची जनता माफ करणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
-
दीपक केसरकरांनी एकविरा गडावर जाऊन घेतले देवीचे दर्शन
महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी लोणावळ्यातील एकविरा गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेला सुख समृद्धी लाभू दे, असं साकडं मंत्री दीपक केसरकर यांनी देवीच्या चरणी घातलं.
-
LIVE UPDATE | शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्याची माहिती मिळत आहे. ३१ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी आता लांबणीवर गेली आहे.
-
LIVE UPDATE | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये आले आहेत. आज संध्याकाळी ६.३० वाजता ठाण्यातील टिपटॉप प्लाझा इथे सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. दसरा मेळाव्यातील नियोजन, गर्दी, कार्यकर्त्यांची व्यवस्था , नेत्यांमधील समन्वय या सगळ्यांवर आज चर्चा होणार आहे. रेकॉर्ड ब्रेक गर्दीसाठी नियोजनाबाबत बैठक बोलावण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यासाठी स्वतः पुढाकार घेत आहेत.
-
LIVE UPDATE | नाना पटोले तातडीनं दिल्लीला रवाना
नाना पटोले तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहेत. नाना पटोल आज दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहेत. मविआतील जागावाटप आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.
-
LIVE UPDATE | मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तोफ अकलूजमध्ये धडाडणार….
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तोफ अकलूजमध्ये धडाडणार असल्याची माहिती मिळत आहे. सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने विराट सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांनी माहिती दिली आहे.
-
LIVE UPDATE | देशभरात लवकरच थंडीच आगमन; शिमला, कुल्लू मनाली भागातील उंच पर्वतांवर बर्फदृष्टी
देशभरात लवकरच थंडीच आगमन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिमला, कुल्लू मनाली भागातील उंच पर्वतांवर सोमवारी बर्फदृष्टी झाली आहे. राजधानी दिल्लीत काल रात्री पावसाच्या सरी बरसल्या आहेत. राजधानी दिल्लीतील तापमान घटल , प्रदूषणही घटल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
Maharashtra News | संभाजीनगर, १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच या निवडणुका होत आहे. यासाठी १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे.
-
Maharashtra News | फुकट्या प्रवाशांकडून १८ कोटींचा दंड वसूल
मध्य रेल्वेने तीन लाख फुकट्या प्रवाशांकडून १८ कोटींच्या दंडा वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या गेल्या पाच महिन्यातील विशेष तिकीट तपासणी मोहिमेत मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
-
Maharashtra News | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश पदयात्रा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश पदयात्रा आजपासून कोल्हापुरात सुरु होत आहे. उसाचा गतवर्षीचा दुसरा हप्ता चारशे रुपये द्यावा यासाठी अक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे. कारखान्याचे वजन काटे डिजिटल करण्याची मागणी केली आहे.
-
Maharashtra News | विरार लोकलमध्ये धरला गरब्यावर ठेका
विरार लोकलमध्ये गरब्यावर ठेका धरल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. कामावरून घरी परतणाऱ्या महिलांनी तर चक्क विरारच्या धावत्या लोकल मध्येच गरब्यावर ठेका धारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
-
Maharashtra News | दादा भुसे घेणार बैठक
पुणे ड्रग्स प्रकरणात मंत्री दादा भुसे मंगळवारी बैठक घेणार आहेत. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ते बैठक घेणार आहेत. ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळी’ संदर्भात ही बैठकीत चर्चा होणार आहे.
-
Supreme Court | समलैंगिक विवाहाबाबत आज महत्त्वाचा निर्णय
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
-
Pune news | पुणे-कोल्हापूर दरम्यान महत्त्वाची ट्रेन होणार सुरु
कोरोना काळात बंद पडलेली सह्याद्री एक्सप्रेस लवकरच सुरु होणार. पुणे ते कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस धावत होती, कोरोना काळात ही बंद करण्यात आली होती. मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाला पाठवला प्रस्ताव. लवकरच सकारात्मक निर्णय होईल मध्य रेल्वेची माहिती.
-
Pankaja Munde | पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर साखर आयुक्तालय कारवाई करणार?
एफआरपीची रक्कम थकवली म्हणून राज्यतील संबंधित साखर कारखान्यावर कारवाई करण्याच्या साखर आयुक्तालयाच्या सूचना. महसुली वसुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश. राज्यात 13 जिल्ह्यात जवळपास 31 साखर कारखान्यांनी दीड हजार कोटीची एफआरपीची रक्कम थकवली आहे. पंकजा मुंडे यांच्याही कारखान्याचा यात समावेश. जीएसटी नंतर आता साखर आयुक्तालयाची कारवाई होणार ?
-
Mumbai-Goa Highway | पडलेल्या उड्डाणपुलाची होणार चौकशी
चिपळूणमध्ये गरडला तडा गेल्यानंतर पडलेल्या उड्डाणपुलाची चौकशी होणार. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. तीन सदस्य कमिटी करणार या अपघाताची चौकशी. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून होणार चौकशी
Published On - Oct 17,2023 7:42 AM